Home Blog Page 60

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद – ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून श्रीमती मंजुलाबेन गुणवंतराय शाह पदव्युत्तर अभ्यास विभाग (एमएससी. क्लिनिकल न्यूट्रिशन आणि आहारशास्त्र), डॉ. बी. एम. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) आणि नुट्रीशन सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रुसा प्रायोजित राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यंदाचा परिसंवाद ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’ या विषयावर केंद्रित होता. स्तनपान ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून बालआरोग्याचा मजबूत पाया घालणारी, माता–बाल नात्यातील विश्वास आणि प्रेम वृद्धिंगत करणारी जीवनशैली आहे, यावर परिसंवादाचा विशेष भर होता.

पहिल्या सत्रात डॉ. अमृता देसाई, स्तनपान व्यवस्थापन सल्लागार, एनआयसीयू विभाग, केईएम हॉस्पिटल, पुणे यांनी ‘स्तनपान व्यवस्थापन: एक समाधानकारक करिअर’ या विषयावर आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यताप्राप्त कोर्सेसची माहिती दिली, तसेच स्तनपान व्यवस्थापन सल्लागार म्हणून लागणाऱ्या कौशल्ये आणि गुणवत्तांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की, “जन्मानंतरच्या पहिल्या तासात बाळाला आईचे दूध पाजण्याची सवय लावल्यास त्याच्या प्रतिकारशक्तीवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात.”

दुसऱ्या सत्रात श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट (एसएमडीटी), नाशिक यांच्या समूहाने स्तनपान करण्याच्या प्रभावी पद्धतींचे प्रत्यक्षिक सादर केले. जुळ्या मुलांना स्तनपान देण्याच्या पद्धती, तान्ह्या मुलाला पाजल्यानंतर ढेकर काढण्याचे योग्य मार्ग तसेच गरोदर व स्तनपान देणाऱ्या मातांसाठी आणि मुलांसाठी संतुलित आहाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

या परिसंवादात मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती येथून सुमारे ३०० विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून सहभागी झाले. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अशा उपक्रमांनी मातृत्व आणि बालआरोग्य क्षेत्रात जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

‘डिकोडिंग डिमेंशिया’साठी आंतरराष्ट्रीय संवाद : संशोधन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि भविष्याचा मार्ग

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डिमेंशिया—एक वैद्यकीय आणि सामाजिक आव्हान. याच विषयावर संशोधन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि भविष्याचे मार्ग शोधण्यासाठी मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त), श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाचा समाजशास्त्र विभाग आणि आजी केअर सेवक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा प्रायोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. देश-विदेशातील ३६५ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात सहभाग घेतला.

परिषदेचे बीजभाषण लोकमान्य टिळक रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश शाह यांनी केले. “आजोबा, चला शाळेत जाऊ या” या संकल्पनेद्वारे त्यांनी ज्येष्ठांसाठी खास शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या शाळेत फिजिओथेरपी सत्रे, शारीरिक व मानसिक व्यायाम, तसेच तरुणांकडून डिजिटल कौशल्य प्रशिक्षण अशा उपक्रमांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी दिली.

आजी केअर सेवक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश बोरगावकर यांनी डिमेंशियाची सद्यस्थिती, रुग्णसंख्या आणि सुरुवातीची लक्षणे स्पष्ट केली.
मानसोपचारतज्ज्ञ व डिमेंशिया तज्ज्ञ डॉ. संतोष बांगर यांनी डिमेंशियाची कारणमीमांसा सांगितली. त्यांनी संतुलित आहार, नियमित चालणे आणि सवयींवर नियंत्रण ठेवण्याच्या सोप्या पद्धतींचा आग्रह धरला.
प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी कुटुंबातील तरुणांनी वृद्धांच्या भावना समजून घ्याव्यात, वर्तनातील बदल दुर्लक्षित करू नयेत आणि गरज पडल्यास तत्काळ काळजी घ्यावी, असे सांगितले.

प्रश्नोत्तर सत्रात डॉ. खालप यांनी रुग्णाच्या खोलीची व्यवस्था न बदलणे, आहार वेळेवर देणे आणि नियमित क्रियाकलाप कायम ठेवणे यावर भर दिला. प्रसाद भिडे यांनी विश्वासार्ह संस्थेकडूनच काळजीवाहक नेमण्याचा आणि ठराविक निकष पाळण्याचा सल्ला दिला. अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी मुलांनी वृद्ध पालकांना सोडू नये, असे ठाम सांगितले आणि एमडब्ल्यूपीएससी कायदा, २००७, मानसिक आरोग्य कायदा, २०१७ आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६ यांची सविस्तर माहिती दिली.

दुपारच्या सत्रात अमेरिकेतून सहभागी झालेल्या प्राजक्ता पाडगावकर यांनी “होप फॉर अल्झायमर” या सादरीकरणातून निदानातील आधुनिक उपकरणे आणि सक्रिय राहण्याचे फायदे सांगितले. प्रा. मानसी पै यांनी संज्ञानात्मक वृद्धत्व हे फक्त जैविक कारणांवर अवलंबून नसून जीवनशैली, मानसिक स्थिती आणि सामाजिक घटकांमुळेही प्रभावित होते, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले.

या परिषदेच्या यशात सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अतुल संघवी, प्राचार्य डॉ. माला पांडुरंग, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिना शाह, प्रकाश बोरगावकर आणि समाजशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा होता.

डिमेंशियाग्रस्त व्यक्तींच्या काळजीत कुटुंब, समाज आणि तंत्रज्ञान या तिन्हींची सांगड आवश्यक आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या जोरावरच डिमेंशियाला समर्थपणे सामोरे जाता येते — हा परिषदेचा सामूहिक संदेश ठरला.

सेंट जोसेफ महाविद्यालयात ‘श्रावण सरी’चा सुरेल जल्लोष

0

Loading

विरार (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे आंतरिक गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (आईक्यूएसी) अंतर्गत मराठी विभाग आणि ‘कोमास’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावण सरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, मराठी विभाग प्रमुख जगदीश संसारे यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर ‘श्रावण सरी’च्या सुरेल वर्षावाला सुरुवात झाली.

सुप्रसिद्ध गायक आणि ‘सुर संस्कार’ गायन वर्गाचे संचालक उदय डांगे यांनी सादर केलेल्या कोळीगीतावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. ‘कानडा राजा पंढरीचा’ या सुस्वर भक्तिगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्योती मुदलीयार यांनी सादर केलेल्या ‘रेशमाच्या रेघांनी’ या लावणीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.

महाविद्यालयातील अकाउंट विषयाचे प्राध्यापक डॉ. प्रसाद डाबरे आणि कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज यांनीही बहारदार गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या प्रभावाने प्रेरित होऊन प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी जिनिषा एरंगले आणि श्रेया गायकवाड यांनी देखील मनमोहक गीत सादर केले.

लावणी नृत्यांगना विस्मया माळकर हिने सादर केलेल्या नृत्याने वातावरणात आणखी रंग भरले.

एकूण १०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध आयोजन आणि बहारदार सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख जगदीश संसारे यांनी केले.

बालकांसोबत आनंदोत्सव: मानखुर्द बालगृहात शिव श्रमिक कामगार संघटनेचा चॉकलेट दहीहंडी उत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मानखुर्द येथील नवीन व अतिरिक्त बालगृहात शिव श्रमिक कामगार संघटनेने १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता चॉकलेट दहीहंडीचा आनंदोत्सव आयोजित केला. या कार्यक्रमात सुमारे ७५ अनाथ बालक सहभागी झाले.

या उत्सवाचा उद्देश बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांची ओळख करून देणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, ऊर्जा व प्रेमाचे क्षण निर्माण करणे हा होता.

बालकांनी चॉकलेट हंडी फोडून मनमुराद आनंद लुटला, चॉकलेट्सची लयलूट केली आणि कार्यक्रमाचा अनुभव आत्मसात केला. यावेळी त्यांना शैक्षणिक साहित्य, मिष्टान्न व अल्पोपहार वाटप करण्यात आले, ज्यामुळे हा दिवस बालकांसाठी अविस्मरणीय ठरला.

शिव श्रमिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. विशेषतः अनुज केसरकर (कार्याध्यक्ष), विकास माळी, विक्रम चव्हाण, प्रदिप गावडे, छोटू शर्मा आणि विक्रम कांबळे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

“बालकांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद पाहून आम्हाला अत्यंत समाधान वाटते,” असे संस्थापक अध्यक्ष संतोष राऊळ यांनी सांगितले. “यापुढेही समाजातील उपेक्षित घटकांसाठी आम्ही सातत्याने सामाजिक सेवा देत राहू,” असे सचिव संदीप शुक्ला यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान गुंजन ऑर्केस्ट्राने सुमधुर गीतांचे सादरीकरण करून बालकांना व उपस्थितांना श्रवणीय आनंद दिला. याबद्दल संघटनेने संचालक राज नाखवा यांचे आभार मानले. बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल संघटनेने कृतज्ञता व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच बालकांना आनंद देण्यासाठी रवी सिंह (माजी शाखाप्रमुख, शिवसेना शिंदे गट), ऍड. महेंद्र भिंगारदिवे (वकील व समाजसेवक), श्री. जे. पी. अग्रवाल (समाजसेवक), राजू नगराळे (समाजसेवक), जितेश काटकर (उपाध्यक्ष, दक्षिण मध्य मुंबई भाजपा), मनोज सिंह (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, युवा मोर्चा समाजवादी पार्टी), अंकित सिंह (वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग क्र. १४६, युवा मोर्चा भाजपा), राकेश तळगावकर (कामाक्षी क्रिएटिव्ह संचालक तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक समन्वयक), राज पांडे (संपादक, CEN न्यूज), महेश फोंडके (समाजसेवक), शमशाद भाई (समाजसेवक), गुरुदत्त वाकदेकर (साहित्यिक पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित होते.

एका बाजूला संस्कृतीचे विद्रुपीकरण होत असताना, शिव श्रमिक कामगार संघटनेने अनाथ बालकांसोबत हा उत्सव साजरा करून समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे, आणि हा उपक्रम भविष्यातील सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

बालकांचे अभिप्राय:
“मला चॉकलेट हंडी फोडायला खूप मजा आली!” – असे एका मुलाने सांगितले. तर “गाणी ऐकून पावसात नाचून आम्हाला खूप आनंद झाला,” – असे एका मुलीने सांगितले.

गो.से. हायस्कूल पाचोरा येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे भव्य उद्घाटन

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सोमवार, दि. 18 ऑगस्ट रोजी बुद्धिबळ खेळाचा जागर प्रसार करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या बुध्दीविकासाला चालना देण्यासाठी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गो.से. हायस्कूल पाचोरा आणि पाचोरा तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 14, 17 व 19 वर्षाखालील गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली असून तालुक्यातील विविध शाळांमधील शेकडो स्पर्धक विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले आहेत. या उद्घाटन सोहळ्यास श्रीनिवास हॉस्पिटलचे संचालक डॉ. नरेश गवांदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष मा. भाईसो. दुष्यंत रावल, संघटनेचे उपाध्यक्ष मा. दादासो. सुरज वाघ, सचिव तसेच गो.से. हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. एन. आर. ठाकरे, डॉ. सौ. अर्चना पाटील, सौ. उज्वला महाजन, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, गो.से. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहील, आर. बी. तडवी, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, माजी पर्यवेक्षक मा. ए. जे. महाजन यांसह शहर व तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. आप्पासाहेब ओ. ना. वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या पूजन विधीमुळे कार्यक्रमाला सन्मानाचे व प्रेरणादायी स्वरूप लाभले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. स्वागताच्या या क्षणांनी वातावरण आनंदमय झाले आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा नवा जोम निर्माण झाला. कार्यक्रमामध्ये संगीत शिक्षक सागर थोरात यांनी इशस्तवनाचे सुरेख सादरीकरण केले. त्यांच्या आवाजातील ओजस्वीपणा आणि तालमय सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व मान्यवरांच्या मनात देशभक्तीचा व प्रेरणेचा स्फुल्लिंग चेतवला. यानंतर आपल्या मनोगतातून भाईसो. दुष्यंत रावल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बुद्धिबळ खेळ हा केवळ क्रीडा प्रकार नसून मानवी बुध्दीला धार लावणारा एक शास्त्रशुद्ध खेळ आहे, असे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या युगात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची मांडणी, एकाग्रता, योजनाबद्धता आणि संयम या गुणांचा विकास करणे गरजेचे आहे. बुद्धिबळ हा खेळ हेच गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करतो. त्यामुळे अशा स्पर्धांमधून विद्यार्थी केवळ जिंकण्याचा आनंद घेत नाहीत, तर आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या जीवनमूल्यांची शिकवणही घेतात. त्यांनी सर्व खेळाडूंना उत्तम प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून बुद्धिबळाच्या शैक्षणिक व मानसिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, बुद्धिबळ खेळामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची व विश्लेषणशक्तीची वाढ होते. नियोजनबद्धता, संयम, शिस्त आणि तर्कशुद्ध विचार या सर्व कौशल्यांचा विकास या खेळाद्वारे होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबरच बुद्धिबळासारख्या खेळांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमपूर्वक स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात प्रा. गिरीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना तालुका पातळीवरून जिल्हा व राज्य पातळीवर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. त्यांनी सांगितले की, अशा स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी एक पायरी असते. यामधून उद्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणारे खेळाडू तयार होऊ शकतात. डॉ. अर्चना पाटील व सौ. उज्वला महाजन यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींनी देखील अशा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे परिसरात क्रीडामहोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला खेळातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास जोपासावा, हेच या उद्घाटनाचे सार मानले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी ओघवत्या शैलीत केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांची माहिती प्रभावी शब्दात प्रेक्षकांसमोर मांडत कार्यक्रमाचे वातावरण रंगतदार केले. आभारप्रदर्शन एस. पी. करंदे यांनी करून उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. या सर्व मांडणीतून हे प्रकर्षाने जाणवले की, बुद्धिबळासारख्या खेळातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. या खेळामुळे विचारशक्तीचा कस लागतो, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. म्हणूनच या खेळाचा तालुकास्तरीय स्तरावर इतक्या भव्य पद्धतीने होणारा प्रारंभ विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत ठरला आहे. स्पर्धेचे आयोजन ज्या शिस्तबद्धतेने झाले त्याबद्दल सर्वत्र कौतुकाची दाद मिळाली. पुढील काही दिवस या स्पर्धांमधून अनेक प्रतिभावान खेळाडूंचा उदय होईल, याची खात्री मान्यवरांनी व्यक्त केली. गो.से. हायस्कूल पाचोरा आणि पाचोरा तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या या संयुक्त प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या मनात बुद्धिबळाबद्दल नवीन आकर्षण व आवड निर्माण होईल, यात शंका नाही.

आज दि.18/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ. मनोबल वाढेल. घरातील वातावरण आनंददायी राहील.
शुभ अंक : ५
शुभ रंग : तांबडा

वृषभ :
काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. संयमाने काम करणे गरजेचे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक : ७
शुभ रंग : करडा

मिथुन :
नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कौटुंबिक सौख्य टिकेल. मनोवृत्ती सकारात्मक राहील.
शुभ अंक : ३
शुभ रंग : हिरवा

कर्क :
शुभ विचारांचे बीज मनात रोवले जाईल. आरोग्यात सुधारणा. जुने प्रयत्न फळ देतील.
शुभ अंक : २
शुभ रंग : पांढरा

सिंह :
कार्यतत्परता वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कामात सहभाग वाढेल.
शुभ अंक : १
शुभ रंग : केशरी

कन्या :
एखादे महत्त्वाचे काम लांबणीवर पडू शकते. थोडी अस्वस्थता वाटू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : ८
शुभ रंग : फिकट निळा

तूळ :
शुभ समाचार मिळेल. मानसिक समाधान मिळेल. नवे संकल्प मनात येतील.
शुभ अंक : ४
शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक :
नवीन ओळखी उपयोगी ठरतील. घरगुती चर्चा यशस्वी होतील. संयम आवश्यक.
शुभ अंक : ६
शुभ रंग : जांभळा

धनु :
महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थैर्य वाढेल. धार्मिक विचारांना चालना मिळेल.
शुभ अंक : ९
शुभ रंग : पिवळा

मकर :
जुनी कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
शुभ अंक : २
शुभ रंग : राखाडी

कुंभ :
कौटुंबिक मतभेद मिटतील. घरात शांतता राहील. मनात नवचैतन्य निर्माण होईल.
शुभ अंक : ७
शुभ रंग : निळसर

मीन :
विद्यार्थ्यांना यशाचे क्षण. मनाला समाधान देणाऱ्या घडामोडी. सर्जनशील कामात प्रगती.
शुभ अंक : ५
शुभ रंग : फिकट पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

जळगाव पीपल्स बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चोपड्यात आमरण अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस

0

Loading

चोपडा : जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँके विरोधात दाखल तक्रारीवर अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्यामुळे चोपड्यात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सागर काशिनाथ ओतारी यांनी दि. 14 ऑगस्टपासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण आज चौथ्या दिवशीही ठामपणे सुरू आहे. उपोषणकर्त्यांचा दावा आहे की “न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील.”
स्वातंत्र्य दिनालाही अन्यायाविरोधात उपोषण
15 ऑगस्टसारख्या राष्ट्रीय पर्वाच्या दिवशीही उपोषण सुरू ठेवावे लागत असल्याने नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना दिसून आली. “देश स्वतंत्र होऊनही अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे,” असे मत उपोषणास भेट देणाऱ्या काही नेत्यांनी व्यक्त केले.
नागरिकांचा मोठा प्रतिसाद
या उपोषणाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. नागरिकांचा ओघ सुरू असून उपोषण शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे.
न्यायालयीन पार्श्वभूमी
सागर ओतारी यांनी 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या तक्रारीवर गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. दरम्यान, बँकेने या संदर्भात मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन क्र. 798/2025 दाखल केली होती. सुनावणीदरम्यान बँकेच्या वकिलांनी याचिका मागे घेतल्याने 24 जून 2025 रोजी मा. उच्च न्यायालयाने ती रद्द केली. यानंतरही अद्याप कारवाई न झाल्याचा आरोप उपोषणकर्ते व नागरिकांकडून होत आहे.
तपासावरील प्रश्नचिन्ह
सदर प्रकरणातील तपास अधिकारी यांनी वरिष्ठांकडे वारंवार परवानगी मागूनही गुन्हा नोंदवला गेला नाही, अशी माहिती समोर येत आहे. नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, “जर न्यायालयीन पातळीवर मार्ग मोकळा झाला असेल तर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी.”
नागरिकांच्या प्रतिक्रिया
पत्रकारांशी बोलताना काही नागरिकांनी, “सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तीलाही उपोषणास बसावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, पोलिस प्रशासनाने कारवाईत विलंब करून लोकांचा विश्वास गमावला असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
उपोषणकर्त्यांच्या मुख्य मागण्या
1) तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवून आवश्यक ती कारवाई करावी.
2) प्रकरणात विलंब घडवून आणणाऱ्या जबाबदार अधिकारी यांची चौकशी व्हावी.
प्रकृती खालावली, तरीही उपचारास नकार
उपोषणकर्ते सागर ओतारी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती आहे. उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दररोज दोन वेळा तपासणी करत असून, उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र ओतारी यांनी उपचारास नकार दिला असून, उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

आज दि.17/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साह देणारा ठरेल. जुने अडथळे दूर होतील. सामाजिक मान वाढेल.
शुभ अंक : ३
शुभ रंग : तांबडा

वृषभ :
कुटुंबात मतभेद होऊ शकतात. खर्चात वाढ संभवते. शांतपणे निर्णय घ्या. सहकार्याची गरज भासेल.
शुभ अंक : ५
शुभ रंग : पांढरा

मिथुन :
महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवे करार लाभदायक ठरतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : ९
शुभ रंग : हिरवा

कर्क :
नवीन योजना सुरु करण्यासाठी अनुकूल दिवस. नातेवाईकांची भेट होईल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक : २
शुभ रंग : चंदेरी

सिंह :
स्वतःवरचा विश्वास वाढेल. कामात यशाची शक्यता. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक : १
शुभ रंग : केशरी

कन्या :
दिवस संमिश्र स्वरूपाचा. आरोग्यावर लक्ष द्या. जुन्या कामांकडे पुन्हा लक्ष देणे आवश्यक.
शुभ अंक : ६
शुभ रंग : फिकट निळा

तूळ :
मित्रपरिवारात वेळ आनंदात जाईल. नवे विचार मांडण्यास अनुकूल वेळ. आर्थिक बाबतीत सुधारणा.
शुभ अंक : ८
शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक :
जुने निर्णय आज फलदायी ठरतील. कर्तव्यपूर्तीत समाधान मिळेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल.
शुभ अंक : ७
शुभ रंग : जांभळा

धनु :
प्रवासाचे योग संभवतात. घरातील वातावरण सौख्यदायक राहील. नवे संकल्प पुढे रेटाल.
शुभ अंक : ४
शुभ रंग : पिवळा

मकर :
महत्त्वाचे व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत. आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक : ५
शुभ रंग : करडा

कुंभ :
मनातील गोंधळ दूर होईल. एखादी शुभ वार्ता मिळण्याची शक्यता. नवे मार्ग खुले होतील.
शुभ अंक : २
शुभ रंग : निळसर

मीन :
विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वेळ. सर्जनशीलतेला चालना मिळेल. जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळेल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : फिकट पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.16/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
महत्त्वाचे निर्णय आज टाळावेत. मन स्थिर ठेवावे लागेल. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. घरात शांतता राखा.
शुभ अंक : २
शुभ रंग : पांढरा

वृषभ :
नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एखादी शुभ बातमी मिळू शकते. मानसिक आनंदाची अनुभूती होईल.
शुभ अंक : ९
शुभ रंग : फिकट निळा

मिथुन :
व्यवसायात चांगले यश मिळेल. मित्रांची साथ लाभेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

कर्क :
कुटुंबीयांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. आर्थिक व्यवहारात संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावा.
शुभ अंक : ४
शुभ रंग : करडा

सिंह :
कामात उत्साह जाणवेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रतिष्ठा वाढेल. अधिकारी वर्गाची साथ लाभेल.
शुभ अंक : १
शुभ रंग : केशरी

कन्या :
एखाद्या जुन्या कामाला चालना मिळेल. मनात नवीन कल्पना निर्माण होतील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक : ३
शुभ रंग : गुलाबी

तूळ :
वाहन किंवा प्रवासात सावधगिरी बाळगा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. थोडा संयम आवश्यक.
शुभ अंक : ७
शुभ रंग : चंदेरी

वृश्चिक :
दैनंदिन कामात गती येईल. घरातील वातावरण शांत राहील. आध्यात्मिक विचारांना चालना मिळेल.
शुभ अंक : ८
शुभ रंग : जांभळा

धनु :
महत्त्वाची योजना यशस्वी होईल. कामाचा वेग वाढेल. जुनी अपेक्षा पूर्ण होईल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : पिवळा

मकर :
संपत्तीविषयक कामात यश येईल. मन प्रसन्न राहील. घरात एखाद्या कार्याचे नियोजन होईल.
शुभ अंक : ५
शुभ रंग : तपकिरी

कुंभ :
कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. निर्णय घेण्यास योग्य वेळ.
शुभ अंक : ४
शुभ रंग : निळसर

मीन :
विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक. मानसिक समाधान मिळेल. नवी दिशा मिळू शकते.
शुभ अंक : २
शुभ रंग : फिकट पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा पंचक्रोशीत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष – देशभक्तीच्या भावनेत रंगलेले रस्ते, शाळा आणि मनं

0

Loading

पाचोरा – १५ ऑगस्ट २०२५ – पहाटेपासूनच आजचा दिवस वेगळाच होता. काल रात्रीच गावोगावच्या चौकात रंगीत दिव्यांची रोषणाई पेटली होती. प्रत्येक शाळा, प्रत्येक घर, प्रत्येक गल्लीने तिरंग्याचे स्वागत करण्यासाठी स्वतःला सजवले होते. थंड गार वाऱ्यात फडकणारे तिरंगे, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या फुलांच्या तोरणा, आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा अभिमान – जणू संपूर्ण पाचोरा तालुका एकाच हृदयाने धडकत होता. शहराच्या मुख्य बाजारपेठेत पहाटे सहा वाजताच लहान मुलांचे गट ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत प्रभात फेऱ्या काढू लागले. आईच्या हातात हात धरून चालणारे बालक, पाठीवर तिरंगा बांधून सायकल

चालवणारे तरुण, तर कधी निवृत्त शिक्षक, शेतकरी, व्यापारी – सर्वजण या सकाळी एका भावनेत रंगलेले दिसत होते.
श्री. गो.से. हायस्कूल – शिस्त, संस्कार आणि देशभक्तीचा संगम
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूलच्या आवारात सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांच्या ओळी लष्करी तुकडीप्रमाणे सरळ आणि ताठ उभ्या होत्या. तिरंगा फडकविण्यासाठी मंच सजला होता. चेअरमन दादासाहेब खलील देशमुख यांनी तिरंग्याला सलामी दिली आणि क्षणभरासाठी सगळीकडे नीरव शांतता पसरली. राष्ट्रगीताचे सूर वातावरणात घुमताच, उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाची चमक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणीने दाटलेले अश्रू उमटले. संगीत शिक्षक सागर थोरात आणि रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायले तेव्हा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी डोळे पुसले. ‘तंबाखूमुक्त शाळा’ आणि ‘राष्ट्रीय ऐक्य’ची शपथ घेताना विद्यार्थ्यांच्या ओठांवर गंभीरपणा आणि डोळ्यांत संकल्पाची ज्वाला होती. क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कवायतींमध्ये मुलांचा ताल, पावले आणि जोश पाहून पालक थक्क झाले.
खडक देवळा – ग्रामभावनेत न्हालेला सोहळा
खडक देवळ्यातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरची मोकळी जागा पहाटेपासूनच फुलांनी सजवली होती. ध्वजारोहण पोलीस पाटील तुकाराम धोंडू तेली आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला यांनी केले. प्रथम चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावभर निघाली. मुलांच्या छोट्या छोट्या पावलांबरोबर त्यांच्या घोषणांचा आवाज गावाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचत होता. शाळेच्या प्रांगणात सुधीर कल्याणराव शेलार यांच्या हस्ते स्वतंत्र ध्वजारोहण झाले. उपस्थित ग्रामस्थ, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुले – सर्वजण एकत्र बसून कार्यक्रम ऐकत होते. कोणत्याही औपचारिकतेशिवाय पण मनापासून साजरा झालेला हा सोहळा गावाच्या एकतेचे जिवंत उदाहरण ठरला.
निर्मल इंटरनॅशनल स्कूल – ‘ऑपरेशन सिंदूर’चा भावस्पर्शी अनुभव
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी ७:३० ला झालेल्या ध्वजारोहणावेळी उपस्थित प्रत्येकाच्या नजरेत उत्सुकता होती. संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी तिरंगा फडकविला. पथसंचलनातील विद्यार्थ्यांची पावले एकदम ताठ, नजर सरळ, आणि हातातील बंदुकीच्या प्रतिकृतींनी लष्करी वातावरणाची अनुभूती दिली. यानंतर रंगला ‘ऑपरेशन सिंदूर’ – १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित नाट्याविष्कार. नायकाच्या मृत्यूच्या प्रसंगाला आलेल्या शांततेत केवळ मुलांच्या हुंदक्यांचा आणि प्रेक्षकांच्या दाबलेल्या सुस्काऱ्यांचा आवाज होता. प्राचार्य गणेश राजपूत यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची कथा सांगताना, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे फक्त सण नाही, ही आपली जबाबदारी आहे” असे सांगत विद्यार्थ्यांच्या मनात ठसा उमटवला.
उत्राण गु.ह. – २०० विद्यार्थ्यांसाठी जीवनरक्षक कवच
उत्राण गु.ह. येथे यावर्षीचा स्वातंत्र्य दिन फक्त ध्वजारोहणापुरता मर्यादित राहिला नाही. येथे २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच देण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या आईने डोळ्यातून पाणी काढत सांगितले, “आता मला जरा दिलासा आहे, माझा मुलगा शाळेत असताना काही झालं तरी त्याचं भविष्य सुरक्षित आहे.” हा उपक्रम ग्रामस्थांच्या टाळ्यांच्या गजरात पार पडला.
लोहारी गाव – सलग चौथ्या वर्षीचा सामाजिक उपक्रम
लोहारी गावातील जय जवान जय किसान ग्रुपचा कार्यक्रम नेहमीसारखा थाटात पण वेगळेपणाने झाला. गावातील माजी सैनिकांनी आणि सध्या सेवेत असलेल्या जवानांनी आपल्या पगारातून पैसे जमवून चार गावातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य दिलं. गावातील मुलांनी पाठीवर नवीन बॅग, हातात वही-पेन घेत हसतमुखाने फोटो काढले. त्यांचा आनंद पाहून, ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य म्हणाले, “हा आमच्या शौर्याचा खरा मोबदला आहे.”
कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय – अनोखी तिरंगा रॅली
मतिमंद विद्यार्थ्यांसोबत काढलेली तिरंगा रॅली हा दिवसाचा एक हृदयस्पर्शी क्षण होता. या मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि हातात घट्ट पकडलेला तिरंगा पाहून अनेकांनी त्यांच्या सोबत घोषणांत भाग घेतला. शहराध्यक्ष दीपक माने आणि इतर मान्यवरही या रॅलीत पायदळ चालले. शहरातील लोकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभं राहून मुलांवर फुलांची उधळण केली.
शारदा इंग्लिश मीडियम स्कूल – कला, संस्कार आणि देशप्रेम
शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ध्वजारोहणावेळी विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्राने सुरुवात केली. लहान मुलांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून देशभक्तीपर नृत्य सादर केलं. पंचायत समिती समन्वयक साळुंखे यांनी भाषणात सांगितले, “देशप्रेम फक्त युद्धभूमीवर नाही, तर आपल्या रोजच्या प्रामाणिकपणातही दिसले पाहिजे.” कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला चॉकलेट देण्यात आले, आणि शाळेच्या प्रांगणात मुलांचा आनंदी गजर घुमला.
समारोप – स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ
आजचा दिवस पाचोरा तालुक्यातील प्रत्येकासाठी विशेष होता. फक्त ध्वज फडकवणे नव्हे, तर त्याच्या प्रत्येक रंगाचा अर्थ मनाशी बाळगणे – केशरी रंगाची शौर्यगाथा, पांढऱ्या रंगातील सत्य-शांततेचा संदेश, आणि हिरव्या रंगातील समृद्धीचा संकल्प – हेच आज सर्वत्र दिसून आले. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने तिरंग्याला सलामी देताना मनाशी एकच वचन घेतले – “देशासाठी जगू, देशासाठी घडू.”

ताज्या बातम्या

error: Content is protected !!