Home Blog Page 63

पुनगांव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान – शैक्षणिक यशाचा गौरव आणि राष्ट्रभक्तीचा संगम

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पुनगांव येथे १५ ऑगस्ट हा दिवस भारतीय जनतेच्या हृदयात एक विशेष स्थान राखून आहे. हा दिवस केवळ एका दिनदर्शिकेतील तारखेसारखा नसून, तो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची, संघर्षाची आणि त्यागाची आठवण करून देणारा पवित्र क्षण आहे. १९४७ साली आपण ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झालो आणि स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस आपण अभिमानाने साजरा करतो. गावोगावी, शहरोगावी, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांत आणि संस्थांमध्ये ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडतात. मात्र पुनगांव ग्रामपंचायतीने यंदाचा स्वातंत्र्यदिन एक वेगळ्या पद्धतीने, प्रेरणादायी आणि स्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त पुढाकाराने, यावर्षीचा ध्वजारोहण सोहळा गावातील उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडणार आहे. म्हणजेच, पुनगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ज्या विद्यार्थ्यांनी २०२५ मध्ये १२वी किंवा पदवी (ग्रॅज्युएशन)च्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले आहेत, त्यांना या मानाचा सन्मान मिळवण्याची संधी आहे. हा उपक्रम केवळ एका विद्यार्थ्याच्या हातून ध्वजारोहण करण्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि मेहनतीचा गौरव करणारा आहे. निवड प्रक्रियेचे स्वरूप आणि अटी या मानासाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद शाळा, पुनगांव येथे जमा करणे आवश्यक आहे. सर्व अर्जांची तपासणी करून, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची निवड केली जाईल. येथे एक महत्त्वाची अटही आहे – विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण पुनगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत झालेले असणे बंधनकारक आहे. यामागील उद्देश असा आहे की, गावातील मूळ शैक्षणिक संस्कार घेऊन मोठे झालेले विद्यार्थीच या सन्मानाला पात्र ठरावेत. गावाच्या प्रगतीकडे नेणारे पाऊल सरपंच सौ. सुनिता चिंतामण पाटील यांनी सांगितले, “गावातील विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले, त्यांचा सन्मान झाला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा आत्मविश्वासच त्यांना पुढील मोठ्या उद्दिष्टांकडे घेऊन जातो. ध्वजारोहणाचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा हा क्षण संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरेल.” उपसरपंच मनोज मोरे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले, “शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करणे हा गावाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या ऐतिहासिक दिवशी हा सन्मान मिळणे, हा त्या विद्यार्थ्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरेल.” शालेय व्यवस्थापन समितीचा सहभाग आणि संदेश शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गुणपत्रिका वेळेत जमा करून या उपक्रमात सहभाग नोंदवावा. समितीचे मत आहे की, “ही संधी फक्त एका विद्यार्थ्यासाठीच नसून, संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उत्सव आहे. जो विद्यार्थी ध्वजारोहणाचा मान मिळवेल, तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.” समितीने असेही स्पष्ट केले आहे की, निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच निर्णय घेतला जाईल. कार्यक्रमाची रूपरेषा आणि सांस्कृतिक सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून राष्ट्रगीत गायले जाईल. यानंतर देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्यलढ्यावरील लघुनाटिका, विद्यार्थ्यांची भाषणे, वादविवाद स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सन्मानित विद्यार्थ्याचा परिचय ध्वजारोहणाचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक कारकीर्द, त्याने घेतलेली मेहनत, पालकांचे योगदान आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याविषयी कार्यक्रमात विशेष उल्लेख केला जाईल. हा परिचय केवळ एक माहिती नसून, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. शालेय व्यवस्थापन समितीच्या मते, अशा उपक्रमांमुळे गावातील प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून मोठ्या यशासाठी प्रयत्नशील राहतो. गावातील शैक्षणिक वातावरणाला चालना पुनगांव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम गावात शिक्षणाबद्दल आदर आणि आकर्षण वाढवणारा ठरेल. अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेचा योग्य सन्मान मिळत नाही. मात्र, अशा उपक्रमांमुळे त्यांची दखल घेतली जाते आणि समाजात त्यांचे कौतुक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागते आणि पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिक तत्पर होतात. भविष्यासाठी आदर्श उपक्रम हा उपक्रम केवळ यंदापुरता मर्यादित राहू नये, तर दरवर्षी याच पद्धतीने गावातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. यामुळे शिक्षणाची पातळी उंचावेल, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होईल आणि पुनगांव ग्रामपंचायत ‘शिक्षणप्रेमी’ गाव म्हणून अधिक ओळख निर्माण करेल. शेवटी, सरपंच सौ. सुनिता चिंतामण पाटील, उपसरपंच मनोज मोरे, सर्व सन्माननीय सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रिकेच्या प्रती जमा करण्याचे आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर शिक्षण, प्रगती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम साजरा करण्याचा आहे.

हुतात्मा स्मारकाजवळील अतिक्रमण न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रभक्तीपर गीतांनी जनजागृती आंदोलन

0

Loading

पाचोरा – शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा व स्वातंत्र्यलढ्याच्या अभिमानाचा प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ पुन्हा एकदा अतिक्रमणाचे सावट गडद झाले आहे. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेची वाताहत झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत असून, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी या गंभीर समस्येकडे पाचोरा नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोपर्यंत सदरचे अतिक्रमण काढले जात नाही तो पर्यंत दररोज नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून जनजागृती आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हुतात्मा स्मारक हे केवळ पाचोराच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे स्मारक आहे. जिल्ह्यात फक्त पाचोरा व आडगाव येथेच अशा स्वरूपाचे स्मारक असल्याने, येथे अतिक्रमण व अस्वच्छतेचे प्रमाण वाढणे हे नागरिकांच्या भावनांशी थेट जोडलेले प्रकरण आहे. या स्मारकाचा परिसर स्वच्छ, शिस्तबद्ध व अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.
पूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महादेव मंदिर व सुलभ शौचालयापर्यंत संपूर्ण परिसर केवळ एका तासात अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. मात्र, अलीकडच्या काळात पुन्हा येथे बेकायदेशीरपणे लोटगाडी, खोके, टरबुजविक्री (या अतिक्रमणाची सुरुवात माजी नगरसेवक यांच्या आशीर्वादाने खास टरबूज विक्रीच्या दुकानांपासूनच झाली हे लक्षणिय आहे ) त्यानंतर व्यापाऱ्यांनी व टोकर, कलताण लावुन, टपरी ठेऊन जागा अडवून बसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, रिक्षा स्टॅण्डजवळील चालकांना नियमानुसार रिक्षा उभ्या करण्यास अडचणी येत आहेत, वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत आणि कचराकुंडीमुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय, येथे गटई कामगारांना देण्यात येणारे पत्र्याचे स्टॉलसुद्धा नियमांचे उल्लंघन करून बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. नियमानुसार, अशा स्टॉलसाठी जी जागा मागितली जाते ती नगरपालिका प्रशासनाने संबंधितास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने किंवा मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी. मात्र, सदर ठिकाणी हे सर्व नियम धाब्यावर बसवून स्टॉल ठेवण्यात आला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या आडोशाला किंवा त्याच्या नावाखाली संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वतःचा फायदा करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. या जागेचा कोणताही भाडेपट्टा किंवा मालकीहक्क नगरपालिका प्रशासन देऊ शकत नसल्याने, त्या पत्र्याच्या स्टॉलसह सर्व अतिक्रमण तातडीने हटविणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या परिसरात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्यालय, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहत नाही, तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे स्मारकाचे सौंदर्य मलिन होत आहे. हे केवळ नियमांचे उल्लंघन नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचा अवमान आहे, असे महाजन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
महाजन यांनी मागणी केली आहे की –
1) हुतात्मा स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने हटवावे.
2) परिसराची स्वच्छता व सौंदर्यीकरण कायम ठेवावे.
3) अतिक्रमणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेखीची व्यवस्था करावी.
4) रिक्षा स्टॅण्ड व पार्किंगसाठी शिस्तबद्ध नियोजन करावे.
या निवेदनाची प्रत पाचोरा प्रांताधिकारी व जळगाव जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली असून, आता प्रकरण वरच्या स्तरावर पोहोचले आहे. नगरपालिका प्रशासनाने निवेदनानंतर साफसफाईची काही कामे हाती घेतली असली तरी स्मारकाच्या लगतचे अतिक्रमण मात्र जैसे थे आहे. त्यामुळेच, जर 14 ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून बलिदान दिलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देत जनजागृती आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा महाजन यांनी दिला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे. हुतात्मा स्मारक परिसरात अतिक्रमण होणे ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणारा हा परिसर म्हणजे आपल्या शहराचा सन्मान आहे आणि त्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा देशप्रेमी नागरिकांनी दिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, नगरपालिका व जिल्हा प्रशासन या जनभावनांचा आदर करून स्वातंत्र्यदिनाच्या आधीच ठोस कारवाई करते की आंदोलनानंतरच कारवाईला गती मिळते.

आज दि.12/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज नवे कार्य आरंभ करण्यास अनुकूल दिवस आहे. उत्साहात वाढ होईल. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. वैचारिक स्पष्टरूप येईल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: भगवा

वृषभ
कामात स्थैर्य लाभेल, पण आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. संयमाने बोलणे आवश्यक. खर्चांवर मर्यादा ठेवा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: क्रीम

मिथुन
व्यवसायात लाभदायक संधी मिळू शकते. संवादात गोडवा ठेवा. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: पानसरी हिरवा

कर्क
कुटुंबातील मतभेद टाळावेत. मानसिक तणाव संभवतो. घरगुती खर्च वाढू शकतो. वादातून दूर राहा.
शुभ अंक: 2 शुभ रंग: पांढरा

सिंह
सृजनशीलतेला वाव मिळेल. अधिकार प्राप्त होण्याची शक्यता. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. नवीन यशाचा दिवस.
शुभ अंक: 1 शुभ रंग: सोनेरी पिवळा

कन्या
प्रशासकीय कामात यश मिळेल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. प्रवासातून लाभ होईल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: राखाडी

तुळ
सामाजिक सन्मानाची शक्यता आहे. थोडी मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात संवाद वाढवा. संयम आवश्यक.
शुभ अंक: 9 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
गोपनीय बाबी गुपित ठेवा. कामात काटेकोरपणा आवश्यक. वरिष्ठांशी मतभेद टाळा. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
शुभ अंक: 4 शुभ रंग: गडद जांभळा

धनु
धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. मानसिक समाधान लाभेल. प्रवास शक्यतो टाळा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: पिवळसर नारिंगी

मकर
नवीन संकल्पना प्रभावी ठरतील. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ
आजचा दिवस बऱ्यापैकी संमिश्र आहे. जोखीम घेणे टाळा. कार्यक्षेत्रात संयम आवश्यक. आर्थिक गणित सांभाळा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: निळसर करडा

मीन
तणावात निर्णय घेणे टाळा. काही जुने मित्र संपर्कात येतील. मनातील विचार शांतपणे मांडा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: आकाशी निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि जनतेचा विश्वास – पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांच्या अल्पावधीत ठसा उमटवणारी वाटचाल

0

Loading

पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांची नियुक्ती होऊन अवघा अल्पकाळ झाला असला, तरीसुद्धा त्यांच्या कार्यशैलीचा ठसा संपूर्ण तालुक्यात महत्वपूर्ण उमटत आहे. ते आज गुन्हेगारांच्या हृदयात भीती निर्माण करणारे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास आणि आपुलकी निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. पोलीस दलातील संख्या तुलनेने कमी असतानाही, त्यांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे की, खरी ताकद मनापासूनच्या निष्ठेत, सततच्या उपस्थितीत आणि तातडीने न्याय देण्याच्या वृत्तीत असते. त्यांच्या कारकिर्दीत, फक्त गुन्ह्यांची आकडेवारी वाढवणे किंवा औपचारिक नोंदी करणे हा उद्देश राहिलेला नाही, तर प्रत्येक घटनेतून नागरिकांचा विश्वास संपादन करणे हा त्यांच्या कामाचा मुख्य पाया बनला आहे. राहुलकुमार पवार साहेब हे केवळ आपल्या दालनात बसून आदेश देणारे अधिकारी नाहीत, तर ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा अंदाज घेणारे आणि प्रत्येक घटनेत स्वतः सहभाग घेणारे अधिकारी आहेत. पाचोरा शहर व परिसरातील सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना ते विशेषतः रात्रीच्या गस्तीस महत्त्व देतात. रात्रीचा काळ हा अनेकदा गुन्हेगारी हालचालींसाठी अनुकूल मानला जातो, मात्र पवार साहेब यांच्या नियमित, नियोजनबद्ध आणि ठाम गस्तींमुळे गुन्हेगारांची हालचाल आटोक्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथके केवळ मुख्य रस्त्यांवरच नव्हे, तर गल्लीबोळ, ओसाड जागा, संवेदनशील ठिकाणे आणि गावाबाहेरील हद्दीतही सतत फिरत असतात. त्यांची एक खास कार्यशैली म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटण्याची आणि त्यांचे म्हणणे स्वतः ऐकून घेण्याची तयारी. पोलीस स्टेशनमध्ये एखादा तक्रारदार आल्यास, त्याची तक्रार केवळ लिखित स्वरूपात घेऊन, ‘एनसी’ नोंदवून प्रकरण संपवण्याची पद्धत पवार साहेब यांनी बदलली आहे. त्यांच्या मते, ‘एनसी’ म्हणजे फक्त आकड्यांची भर नाही, तर प्रत्येक घटनेत योग्य ती कारवाई होऊन पीडित व्यक्तीला दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करण्यावर त्यांचा भर असतो. या दृष्टिकोनामुळे पोलीस दलाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पवार साहेब यांनी फक्त पोलीस दलावरच नाही, तर स्थानिक नागरिकांवरही विश्वास ठेवला आहे. ते सतत नागरिकांशी संवाद साधतात, त्यांचे प्रश्न जाणून घेतात आणि आवश्यक असल्यास त्वरित उपाययोजना करतात. ‘जनतेचा पोलीस’ म्हणून त्यांची ओळख निर्माण होण्यामागे हाच नागरिकाभिमुख दृष्टिकोन आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत, पोलीस भाषेचा ठप्पा हा औपचारिकतेसाठी नसून, तो कायदेशीर प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण भाग ठरतो, ज्यामुळे प्रकरणाला न्याय मिळतो. पाचोरा परिसरातील विविध गुन्ह्यांवर त्यांनी तातडीने केलेली कारवाई ही त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष आहे. चोरी, मारामारी, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा विविध गुन्ह्यांवर पवार साहेब यांनी कठोर पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, कारवाईनंतर संबंधितांना न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणे यात त्यांची भूमिका निर्णायक ठरते. गावोगावी, बाजारपेठेत, चौकाचौकात त्यांच्या कार्याविषयी नागरिक बोलतात. “पवार साहेब आल्यापासून गुन्हेगारांना वचक बसला आहे” असे म्हणणे आज सहज ऐकायला मिळते. दुसरीकडे, एखाद्या सामान्य माणसाला अडचण आली, की “थेट पवार साहेबांना भेटा” असा सल्ला लोक देतात. ही लोकप्रियता केवळ पदाच्या जोरावर आलेली नाही, तर त्यांच्या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि धाडसी कामगिरीमुळे निर्माण झालेली आहे. राहुलकुमार पवार साहेब यांनी पोलीस दलातील मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करून दाखवला आहे. पोलीस संख्या कमी असतानाही, त्यांनी ड्यूटीचे वेळापत्रक असे आखले आहे की, प्रत्येक वेळेला संवेदनशील भागात पोलिसांची उपस्थिती राहते. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांची तपासणी अधिक जलद आणि अचूक करण्यावरही त्यांचा भर आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि गुन्हेगारांचा डेटाबेस अद्ययावत ठेवणे यामुळे अनेक प्रकरणे सोडविण्यात मदत झाली आहे. पवार साहेब यांच्या अल्पावधीतल्या कार्यकाळात पोलिसांनी केवळ गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवले नाही, तर समाजातील विविध घटकांशी समन्वय साधत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कामही केले आहे. शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देणे, वाहतूक शिस्त पाळण्याबाबत जनजागृती करणे, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रम राबवणे हे त्यापैकी काही ठळक उपक्रम आहेत. याशिवाय, शहरात एखादी आपत्कालीन घटना घडली, अपघात झाला किंवा कुठे आग लागली, तर पवार साहेब स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतात आणि आवश्यक ती मदत पुरवतात. अशा प्रसंगी, “साहेब स्वतः आले” ही भावना पीडितांच्या मनातील असुरक्षितता कमी करते आणि त्यांना दिलासा देते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलीस स्टेशन आज ‘फक्त तक्रारी घेणारे ठिकाण’ न राहता, नागरिकांना आधार, मदत आणि न्याय मिळवून देणारे केंद्र बनले आहे. या बदलामुळे नागरिकांचा सहभाग वाढला आहे, कारण लोकांना खात्री आहे की त्यांच्या तक्रारींवर न्याय मिळेल. गुन्हेगारांवर कठोर हात आणि नागरिकांशी मैत्रीपूर्ण वर्तन – या संतुलित धोरणामुळे राहुलकुमार पवार साहेब यांनी केवळ काही महिन्यांतच पाचोरा पोलीस स्टेशनला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांच्या अल्प कार्यकाळातच नागरिकांचा विश्वास जिंकून, गुन्हेगारीवर आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे – हे त्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून पार पाडले आहे. अशा प्रकारे, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब हे केवळ एका तालुक्याचे पोलीस अधिकारी नसून, जनतेचे मित्र, गुन्हेगारांचे कर्दनकाळ आणि खऱ्या अर्थाने ‘जनतेचा पोलीस’ ठरले आहेत. त्यांच्या अल्पावधीतल्या कार्यामुळे पाचोरा पोलीस स्टेशन आज नागरिकांसाठी विश्वासार्ह ठिकाण बनले आहे आणि हा विश्वास टिकवून ठेवणे हीच त्यांची खरी यशोगाथा आहे.

हुतात्मा स्मारक परिसरात पुन्हा अतिक्रमण; स्वच्छता व पार्किंगची व्यवस्था कोलमडली, तात्काळ कारवाईची मागणी

0

Loading

पाचोरा – शहरातील ऐतिहासिक व अभिमानाचे प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचे सावट पसरले असून, परिसरातील स्वच्छता व वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृती जपणाऱ्या या स्मारकाच्या जतनासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हुतात्मा स्मारक हे केवळ पाचोराचेच नव्हे तर जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण स्मारक आहे. जिल्ह्यात केवळ पाचोरा व आडगाव येथेच अशा प्रकारचे स्मारक उभारले गेले असून, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून देणारा हा परिसर भावनिक दृष्ट्या नागरिकांशी जोडलेला आहे. या स्मारकाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, येथे स्वच्छता, शिस्त व अतिक्रमणमुक्त वातावरण राखणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. पूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी या परिसरातील अतिक्रमणावर कठोर कारवाई करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील महादेव मंदिरापासून सुलभ शौचालयाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. ही कारवाई केवळ एका तासात पूर्ण झाली होती आणि संबंधित कर्मचाऱ्यांना भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. मंदिरालगत कचराकुंडी निर्माण होऊन परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. रिक्षा स्टॅण्डजवळील चालकांना आपल्या रिक्षा नियमानुसार उभ्या करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आहे. सदर परिसरात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्यालय असल्याने, येथे नागरिक, विविध विभागांचे अधिकारी व मान्यवरांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पार्किंगची जागा उपलब्ध राहत नसल्याने येथील येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे परिसराचे सौंदर्य देखील मलिन होत आहे, जे या ऐतिहासिक स्थळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र या नात्याने संदीप महाजन यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अतिक्रमण व अस्वच्छता ही केवळ नगररचना व स्वच्छता नियमांचे उल्लंघन नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचा अवमान आहे. त्यामुळे पाचोरा नगरपालिका प्रशासनाने — अतिक्रमण तातडीने हटवणे, परिसराची स्वच्छता व सौंदर्यीकरण कायम ठेवणे, अतिक्रमणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेखीची व्यवस्था करणे, रिक्षा स्टॅण्ड व पार्किंगसाठी शिस्तबद्ध नियोजन करणे, या बाबींवर तातडीने ठोस व परिणामकारक पावले उचलावीत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, सदर निवेदनाची प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाचोरा प्रांत अधिकारी तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ नगरपालिका नव्हे, तर वरच्या स्तरावरील प्रशासनालाही याची माहिती मिळाल्याने कारवाईस गती मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांचे मत आहे की, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री राहून चालणार नाही, तर प्रत्यक्ष पातळीवर कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. हुतात्मा स्मारकासारख्या ठिकाणी अतिक्रमण होणे आणि अस्वच्छता वाढणे हा नागरिकांच्या जाणीवजागृतीचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा दोन्हीचा प्रश्न आहे. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणारा परिसर म्हणजे आपल्या शहराचा सन्मान आहे, आणि त्याचा अपमान सहन केला जाणार नाही,” असेही अनेक नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून, हुतात्मा स्मारक परिसर पुन्हा अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ करावा, अशी एकमुखाने मागणी होत आहे. आता पाहावे लागेल की, पाचोरा नगरपालिका व जिल्हा प्रशासन या मागणीवर किती तातडीने कारवाई करते आणि शहराचा हा ऐतिहासिक अभिमान पुन्हा एकदा सन्मानपूर्वक उभा राहतो की नाही.

मालिनी किशोर संघवी महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम यशस्वी; डिजिटल युगातील सुरक्षिततेचा प्रभावी संदेश

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मालिनी किशोर संघवी कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स (ऋतंभरा), विलेपार्ले पश्चिम येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र प्रभावीपणे पार पडले. या उपक्रमाचे आयोजन क्विक हील आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त सहयोगाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा कालावधी सुमारे दोन तास होता, ज्यामध्ये सायबर सुरक्षा विषयक विविध पैलू सविस्तरपणे मांडले गेले. कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. वालिया सी. एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल. सी. कॉलेज ऑफ आर्ट्स येथील विद्यार्थिनी, समर्पित सायबर वॉरियर्स सुमेरा शेख आणि क्लॅरिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र पार पडले.

डिजिटल युगातील वाढत्या सायबर धोके, ऑनलाईन फसवणूक, डेटा प्रायव्हसी, फिशिंग यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः फिशिंग टाळण्याच्या उपाययोजना, सुरक्षित संकेतशब्दांची निर्मिती, आणि ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याबाबत उपयोगी टिप्स दिल्या गेल्या. तसेच, सायबर हायजिन आणि डिजिटल सुरक्षिततेसंबंधी प्रत्यक्ष उदाहरणे, संवादात्मक चर्चा आणि उपयोगी टिप्स या माध्यमातून विद्यार्थ्यांना सजग करण्यात आले.

कार्यक्रमात सहभागी एक विद्यार्थिनी म्हणाली, “आजच्या डिजिटल युगात अशा प्रकारचे सत्र फार गरजेचे आहेत. आम्हाला ऑनलाईन धोके कसे टाळायचे याची सखोल माहिती मिळाली.” तर शिक्षकांनी नमूद केले, “विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांनी त्यांचा आत्मविश्वास वाढतो.”

महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणाल्या, “सायबर सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी फार उपयुक्त ठरतात. या सत्रामुळे डिजिटल युगात सुरक्षिततेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे.” विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या जनजागृती कार्यक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व अशा सत्रांची शैक्षणिक संस्थांमध्ये नितांत गरज असल्याचे अधोरेखित केले.

सत्राचा समारोप करताना सुमेरा शेख यांनी “सायबर सुरक्षा हे केवळ एक कौशल्य नसून आजच्या युगात एक अत्यावश्यक गरज आहे,” असे सांगितले. महाविद्यालयात अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम सतत चालू ठेवण्याचे नियोजन असून, पुढील काळात अधिक व्यापक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सायबर सुरक्षेबाबत सजगतेत नक्कीच वाढ होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. डिजिटल युगात सुरक्षिततेचा प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे.

पाचोरा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांवर नागरिकांचा आवाज – नगरपालिका प्रशासनास तातडीने कारवाईची मागणी

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – शहरातील विविध भागांतील नागरिकांनी स्वच्छतेशी संबंधित गंभीर समस्या मांडत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार वजा विनंती अर्ज सादर केले आहेत. यामध्ये गटारींची अर्धवट स्थिती, डासांचे वाढते प्रमाण आणि रस्त्याच्या कडेला साचलेले गवत यांसारख्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात, श्री. गो. से. हायस्कूल पासून रिंग रोड साई प्रोव्हीजन कॉर्नरपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या गटारी कोणत्याही ट्यूब लेव्हलने न करता अर्धवट सोडण्यात आल्याची तक्रार आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे गटार सफाई कामगार काम टाळतात, परिणामी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पाईपलाईनच्या ठिकाणी किमान एक फूट खोल ‘यू’ आकाराचे गटार तयार झाले असते, तर पाणी व घाण सहज वाहून गेली असती. मात्र, हे काम अर्धवट असल्यामुळे श्री. गो. से. हायस्कूलच्या पुढील व मागील कोपऱ्यांवरील गटारी जॉईंटचे कामही अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात घाण पुन्हा गटारात जाऊन अस्वच्छतेची परिस्थिती

अधिकच बिघडते आहे. नागरिकांनी तातडीने तळापासून गटार साफ करून उचलण्याची तसेच संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांना सक्त सूचना देण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या प्रकरणात, गणेश कॉलनी परिसरातील डासांचे प्रचंड प्रमाण नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याची बाब मांडण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या भागात कीटकनाशक फवारणी न झाल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना दिवस-रात्र डासांचा

त्रास सहन करावा लागत असून परिस्थिती असह्य झाली आहे. त्यामुळे तातडीने फवारणी करून डासांचे निर्मूलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रकरणात, गो. से. हायस्कूल कॉर्नर ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील गेटपर्यंतच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या गवत व घाण काढण्याच्या कामातील ढिलाई नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरली आहे. काही ठिकाणी गवत काढण्यात आले असले तरी, अनेक ठिकाणी आजही गवत पूर्ववत स्थितीत आहे. विशेष म्हणजे, काढलेले गवत व घाण उचलली न गेल्यामुळे ती जागेवरच पडून आहे, ज्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत, उर्वरित गवत व घाण काढण्यासह आधीच काढलेले गवत त्वरित उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. या सर्व तक्रारींमधून हे स्पष्ट होते की, पाचोरा शहरातील काही भागांमध्ये स्वच्छतेची कामे नियोजनबद्ध, तांत्रिक पद्धतीने आणि वेगाने न केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात या समस्या अधिक तीव्र होतात, त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रत्यक्ष कामात सुधारणा दिसून येत नाही. त्यामुळे समस्यांवर फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कार्यवाही व्हावी.” नगरपालिका प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील स्वच्छतेची ही लढाई केवळ कचरा, गटार व गवतपुरती मर्यादित नसून, ती नागरिकांच्या आरोग्य व जीवनमानाशी थेट संबंधित आहे, हे या प्रकरणांतून अधोरेखित होते.

पिंपळगाव हरे येथील पोलीस कर्मचारी पाचोरा पोलीस हद्दीतील कामांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप; जिल्ह्याबाहेर बदलीची मागणी

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – पिंपळगाव हरे येथे कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी वारंवार पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. संबंधित कर्मचारी आपल्या मूळ कार्यक्षेत्राबाहेर हस्तक्षेप करून स्थानिक कारवाई, चौकशी आणि गुन्हे नोंदविण्याच्या प्रक्रियेत प्रभाव टाकत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. नव्हेतर सोशल मिडीवर प्रसिद्धीचा व जनसेवेचा बादशहा ठरला आहे या पार्श्वभूमीवर, त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स व लोकेशनची

निश्चित पातळीवर तपासणी करून सत्यता पडताळण्यात यावी, तसेच त्याची बदली केवळ पिंपळगाव हरेच्या कार्यक्षेत्राबाहेर न करता थेट जिल्ह्याबाहेर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पिंपळगाव हरे येथे नोकरी करणारा हा पोलीस कर्मचारी वारंवार पाचोरा तालुक्यातील पोलीस कारवाईंमध्ये सहभागी होताना दिसतो. पाचोरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील अनेक संवेदनशील प्रकरणांत त्याची उपस्थिती नोंदली गेल्याचेही बोलले जाते. या कारणास्तव पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील काही गुन्ह्यांच्या तपासात निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून, “एखादा पोलीस कर्मचारी ज्या ठिकाणी अधिकृतपणे कार्यरत नाही, त्या ठिकाणी तो सतत हजेरी लावून हस्तक्षेप करणे हे केवळ सेवाभार उल्लंघन नाही, तर जनतेच्या विश्वासाला धक्का देणारे आहे,” असे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात

त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही सादर केले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स व लोकेशन तपासण्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे की, त्याच्या पाचोरा परिसरातील सततच्या उपस्थितीचे तांत्रिक पुरावे मिळावेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि लोकेशन हिस्ट्री तपासली गेल्यास, तो नेमक्या कोणत्या वेळेस पाचोरा हद्दीत होता आणि कोणाशी संपर्क साधत होता, हे स्पष्ट होईल. अशा प्रकारची माहिती न्यायालयीन आणि प्रशासनिक चौकशीत महत्त्वपूर्ण ठरू शकते. स्थानिक पातळीवर या विषयाची चर्चा चांगलीच रंगली आहे. काही नागरिकांनी या हस्तक्षेपामुळे काही गुन्ह्यांच्या तपासात राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थ जपला गेला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. तर काही जणांनी हा प्रकार संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारा असल्याचे सांगून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “जर एखादा कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रापलीकडे कामांमध्ये सतत हस्तक्षेप करत असेल, तर ते शिस्तभंगाचे प्रकरण असून, त्याची बदली ही अपरिहार्य ठरते. मात्र या प्रकरणात त्याची बदली केवळ पिंपळगाव हरेच्या कार्यक्षेत्राबाहेर न करता थेट जिल्ह्याबाहेर करण्यात यावी, अन्यथा या हस्तक्षेपाला पूर्णविराम लागणार नाही.” या प्रकरणात नागरिकांची एकच अपेक्षा आहे – वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू करून, सर्व तांत्रिक पुरावे गोळा करावेत आणि संबंधित कर्मचाऱ्याची बदली जिल्ह्याबाहेर करावी. तसेच, त्याला स्पष्ट सूचना द्याव्यात की आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील कोणत्याही तपासात किंवा कारवाईत अनधिकृत हस्तक्षेप केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल. आता सर्वांचे लक्ष वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ते या प्रकरणाकडे केवळ तक्रारीच्या स्वरूपात पाहतात की, जनतेच्या विश्वासाच्या मुद्द्याशी जोडलेल्या गंभीर घटनेच्या रूपात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर चौकशीत आरोपांना पुष्टी मिळाली, तर संबंधित कर्मचाऱ्याची बदली ही केवळ प्रशासकीय निर्णय न राहता, पोलीस दलाच्या पारदर्शकतेचा व निष्पक्षतेचा संदेश देणारा ठरेल.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला 2 कोटींच्या खंडणीची धमकी; पारदर्शक तपास व लोकशाही मार्गाने आंदोलनाची तयारी

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. टाक यांच्या संदर्भात घडलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत डॉ. टाक यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन

कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांनी दिनांक 25 जुलै 2025 रोजी सामूहिक निवेदन सादर करत कसून व पारदर्शक तपासाची मागणी केली. पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये प्रमुख चार मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. पहिल्यांदा, सदर प्रकरणातील दोषींना ओळखून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. दुसरे म्हणजे, तपास प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्वसामान्य नागरिकांच्या

मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तिसरा मुद्दा म्हणून, या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सायबर गुन्हे अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी झाली. तर चौथ्या मुद्द्यात, सामाजिक, मानसिक व नैतिक दृष्ट्या धोकादायक अशा गुन्ह्यांविरोधात व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली. पत्रकारांच्या मते, या प्रकारचे गुन्हे केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेवरच आघात करत नाहीत, तर समाजातील विश्वासार्हतेलाही तडा देतात. विशेषतः आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि संवेदनशील पदांवरील व्यक्तींना लक्ष्य करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढत चालल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला हलक्यात घेण्याऐवजी सखोल तपास व कठोर कारवाईची गरज आहे. दरम्यान, या प्रकरणातील निवेदनावर झालेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी ‘केंद्राचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005’ अंतर्गत एक औपचारिक अर्ज पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. अर्जदार संदीप दामोदर महाजन यांनी त्यांच्या अर्जात, 1 जुलै 2025 पासून आजपर्यंत या प्रकरणावर झालेल्या सर्व कार्यवाहीची माहिती व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांच्या छायांकित प्रती मागितल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही कागदपत्रे वरिष्ठ अधिकारी, न्यायालयीन प्रक्रिया आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच, आवश्यक ती फी भरण्याची तयारीही दर्शवली आहे. अर्जदाराच्या मते, पारदर्शक तपास आणि वेळेवरची कारवाई हेच अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. या संदर्भातील दस्तऐवजांची प्रमाणित नक्कल उपलब्ध झाल्यास केवळ प्रकरणातील सत्य समोर येईल असे नाही, तर दोषींवर कारवाईचा मार्गही सुकर होईल. संपूर्ण प्रकरणातून हे स्पष्ट होते की, पत्रकार संघटना व नागरिक एकत्र येऊन समाजातील नैतिकता व कायद्याचा सन्मान राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तथापि, आता सर्वांची नजर पोलिस प्रशासनाकडे लागली असून, या प्रकरणातील दोषींना कधी आणि कशा प्रकारे न्यायाच्या कक्षेत आणले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे डॉक्टर समुदायातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्यसेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर झाल्यास, त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा घटनांना गांभीर्याने घेत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाचोरा आणि परिसरातील नागरिकांना आता केवळ तपासाच्या निष्कर्षांचीच नव्हे, तर दोषींवर कठोर कारवाई झाल्याची खात्री पटविणारी कार्यवाही पाहायची आहे. पत्रकार संघटनेकडून झालेली ही एकत्रित भूमिका, नागरिकांचा दबाव आणि लोकशाही मार्गाने आंदोलनाची तयारी यामुळे प्रकरणाला आवश्यक ती गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनानेही पारदर्शकता, तत्परता आणि न्याय यांचे पालन करून समाजातील विश्वास दृढ करण्याची संधी गमावू नये, हा संदेश या निवेदनातून स्पष्ट होत आहे.

न्यायाचे प्रहरी, कविमनाचे माणूस पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची स्वातंत्र्यदिन निमित्त आर जे तेजस्विनी यांनी घेतलेली विशेष मुलाखत

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) – १५ ऑगस्ट — भारताचा स्वातंत्र्यदिन. देशाच्या सीमारेषेवर जवान आपल्या प्राणाची आहुती देतात, तर देशाच्या आत गुन्हेगारी, दहशतवाद, बॉम्बस्फोट याविरुद्ध लढणारेही वीर असतात. अशाच एका वीर, न्यायासाठी जीवन पणाला लावणाऱ्या पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी आज मनमोकळा संवाद साधूया.

मुलाखतीच्या दिवशी, सभागृहात प्रवेश करताना माझ्या नजरेने त्यांचं स्मितहास्य टिपल. कोर्टात कठोर आणि निर्धाराने उभा राहणारा हा माणूस, विद्यार्थ्यांच्या गर्दीत अगदी शांतपणे बसलेला दिसला. त्या क्षणी मला जाणवलं — ही मुलाखत केवळ प्रश्नोत्तर नसेल, तर ती एक प्रवासकथा असेल.
तेजस्विनी: साहेब, पद्मश्री, झेड प्लस सिक्युरिटी असूनही तुम्ही इतके साधेपणाने, मनमोकळेपणाने भेटलात. या साधेपणाचं रहस्य काय?
ॲड. निकम: (हसत) “पदव्या, सुरक्षा – या माझ्या कामाचे उपफळ आहेत. खरा सन्मान तो आहे जो लोकांच्या मनात असतो. आई-वडिलांनी साधेपणाचे संस्कार दिले, आणि जळगावच्या मातीने ते घट्ट रुजवले.”
तेजस्विनी: सरकारी वकील म्हणून कामकाज कसं असतं?
ॲड. निकम: “सरकारी वकिलाचं काम फक्त कोर्टात युक्तिवाद करणं नसतं. ते एक संपूर्ण टीमवर्क असतं – पोलीस तपास करतात, सरकार मार्गदर्शन करतं आणि आम्ही न्यायालयात पुरावे सादर करतो. उलट तपासणी करताना गुन्हेगाराची खरी मानसिकता उघड करणं हे सर्वात महत्त्वाचं. अनेकदा त्या संवादातूनच आरोपीला आपल्या गुन्ह्याची जाणीव होते.”
टाइमलाइन – आयुष्याच्या मोठ्या खटल्यांची झलक
१९९३ – मुंबई बॉम्बस्फोट खटला; २५०+ मृत्यू, ७००+ जखमी.
२००८ (२६/११) – मुंबई दहशतवादी हल्ला; १६६ मृत्यू, ३००+ जखमी.
२०१० – अजमल कसाब दोषी ठरला; फाशी सुनावली.
२०१६ – पद्मश्री सन्मान प्राप्त.
तेजस्विनी: १९९३ चा बॉम्बस्फोट आणि २६/११ चा हल्ला – या दोन्ही खटल्यांत तुमचा अनुभव कसा होता?
ॲड. निकम: “१९९३ चा बॉम्बस्फोट – मुंबईसाठी तो काळ असह्य वेदनेचा होता. प्रत्येक पुरावा जणू काचेचा तुकडा – जपून हाताळावा लागला. तर २६/११ च्या हल्ल्यात, अजमल कसाबला दोषी ठरवणं ही फक्त कायदेशीर नव्हे तर राष्ट्रीय सन्मानाची लढाई होती. पाकिस्तानात जाऊन त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडणं – हे माझ्या कारकिर्दीचं अभिमानास्पद पान आहे.” “२६/११ च्या खटल्यादरम्यान, पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही आणि तपास पथकांनी अनेक रात्र जागून काढल्या. कोर्टात दाखल होणाऱ्या प्रत्येक दस्तऐवजाच्या मागे तासन्‌तास पडताळणी, भाषांतर, तांत्रिक तपासणी झाली. हा भाग लोकांना दिसत नाही, पण हाच न्यायप्रक्रियेचा कणा असतो.”
“देशभक्ती केवळ सीमा राखणाऱ्यांत नाही, तर न्यायासाठी लढणाऱ्यांतही तितकीच असते.” – ॲड. उज्ज्वल निकम
तेजस्विनी: लोक म्हणतात – कोर्टात तुम्ही कठोर, पण बाहेरच्या जगात मृदू आणि कविमनाचे…
ॲड. निकम: (डोळ्यात हलकी चमक) “होय, कोर्टात मी कठोर असतो कारण तिथे माझा धर्म न्याय आहे. पण आयुष्यात मला कविता, गाणी आणि नातवंडांसोबत वेळ घालवायला आवडतो. माझ्या पत्नी ज्योतीताई, आई-वडिलांचे संस्कार, आणि जळगाव – हे माझं आधारस्थान आहे.”
तेजस्विनी: कोर्टातील एक लक्षात राहिलेली घटना?
ॲड. निकम: “एका खटल्यात, आरोपी उलट तपासणीत एवढा कोलमडला की शेवटी म्हणाला – ‘सर, मी खरंच चुकीचं केलं.’ त्या क्षणी जाणवलं – शिक्षा ही फक्त न्याय देण्यासाठी नसते, ती माणसाला सुधारणारी असते.”
तेजस्विनी: कायदे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
ॲड. निकम: “कायदा हा केवळ पुस्तकातील ज्ञान नाही, तर न्याय देण्याची कला आहे. सचोटी, अभ्यास, आणि संयम – हे तीन गुण असतील तर तुम्ही मोठे वकील बनाल.
तेजस्विनी: नवीन युगातील गुन्हेगारीचे आव्हान?
ॲड. निकम: “सायबर क्राईम ही आजची मोठी समस्या आहे. हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल पुरावे – नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे. कायदा आणि तंत्रज्ञान या दोन्हींची माहिती ठेवणं आता काळाची गरज आहे.”
तेजस्विनी: ॲड. उज्ज्वल निकम हे न्यायासाठी निर्भयपणे उभे राहणारे, कठोर युक्तिवाद करणारे, पण अंतःकरणाने संवेदनशील; कवितेत रमणारे. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगते — सत्य, सचोटी आणि सेवा या तिन्ही गोष्टी हातात असतील, तर कोणत्याही रणांगणात विजय मिळवता येतो. ही मुलाखत घेताना मला जाणवलं “दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.”

ताज्या बातम्या

error: Content is protected !!