Home Blog Page 65

राज्य शासनाचा चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ६० व्या (२०२२) आणि ६१ व्या (२०२३) राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम, स्व. राज कपूर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर व छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कारांचे वितरण डोम

एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, संचालक बिभीषण चवरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रकर्मी, रसिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ पासून सुरू झालेली ही परंपरा आज वटवृक्षासारखी बहरली आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. मराठी कलाकारांनी छोट्या-मोठ्या पडद्यावर, ओटीटीवरही असामान्य कामगिरी केली आहे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, अनुपम खेर, महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे आणि भीमराव पांचाळे यांच्या योगदानाचे विशेष गौरव त्यांनी केला.

या सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेत्री काजोल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना तर छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांना प्रदान करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले की, मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी आता परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. राज्यभरातील चित्रीकरणासाठी सुलभ सुविधा पुरवण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. एफएम रेडिओवर मराठी गाणी व कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील नेटफ्लिक्सवरही मराठी चित्रपटांना स्थान मिळावे यासाठी चर्चाही केल्याचे ते म्हणाले.

६० वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ निवडण्यात आला. दिग्दर्शक प्रविण तरडे (धर्मवीर), सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), अभिजीत देशपांडे (हर हर महादेव) यांना दिग्दर्शनासाठी सन्मानित करण्यात आले. अभिनय विभागात प्रसाद ओक (धर्मवीर), अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी) यांना पुरस्कार प्राप्त झाले. संगीत विभागात निहार शेंबेकर (समायरा), मनिष राजगिरे (धर्मवीर), आर्या आंबेकर (चंद्रमुखी) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘समायरा’ (सामाजिक) आणि ‘गाभ’ (ग्रामीण) या चित्रपटांना देण्यात आले.

६० व्या पुरस्कारांत इतर विजेते असे – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘पॉन्डीचेरी’, क्रमांक ३ ‘हर हर महादेव’, सहाय्यक अभिनेता योगेश सोमण (अनन्या), सहाय्यक अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी), विनोदी अभिनेता संजय नार्वेकर (टाईमपास ३), प्रथम पदार्पण अभिनेता जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही), प्रथम पदार्पण अभिनेत्री ऋता दुर्गुळे (अनन्या), उत्कृष्ट कथा सुमीत तांबे (समायरा), पटकथा तेजस मोडक व सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), संवाद प्रविण तरडे (धर्मवीर), गीते अभिषेक खणकर (अनन्या), पार्श्वसंगीत हनी सातमकर (आतूर), पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), पार्श्वगायिका आर्या आंबेकर (चंद्रमुखी), अमित घुगरी (सोयरिक), नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), कला दिग्दर्शन महेश कुडाळकर (उनाड), छायालेखन अभिजीत चौधरी / ओंकार बर्वे (४ ब्लाइन्ड मेन), प्रियशंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही), संकलन एस. सुर्वे (काटा किर्रर्र), ध्वनिमुद्रण सुहाश राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), ध्वनिसंयोजन लोचन कानविंदे (हर हर महादेव), वेशभूषा उज्ज्वला सिंग (ताठकणा), रंगभूषा सुमेध जाधव / सौरभ कापडे (ताठकणा), बालकलाकार श्रीनिवास पोकळे (छुमंतर), अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय), प्रथम पदार्पण निर्मिती झेनिथ फिल्म्स (आतूर), प्रथम पदार्पण दिग्दर्शक प्रताप फड (अनन्या), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक ऋषी देशपांडे, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक अनुप जत्राटकर.

६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘भेरा’ निवडला गेला. दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे (भेरा), महेश लिमये (जग्गु आणि ज्युलिएट), सुधाकर रेड्डी (नाळ २) यांना दिग्दर्शनासाठी गौरविण्यात आले. अभिनय विभागात अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट) आणि रिंकू राजगुरू (आशा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत विभागात अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर), मोहित चौहान (घर, बंदूक, बिर्याणी), ऋचा बोंद्रे (श्यामची आई) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘आशा’ (सामाजिक), ‘जिप्सी’ (ग्रामीण) आणि ‘श्यामची आई’ (राष्ट्रीय सन्मान) या चित्रपटांना देण्यात आले.

६१ व्या पुरस्कारांत इतर विजेते – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘जग्गु आणि ज्युलिएट’, क्रमांक ३ ‘नाळ २’, विनोदी अभिनेता उपेंद्र लिमये (जग्गु…), विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत (झिम्मा २), सहाय्यक अभिनेता संतोष जुवेकर (रावरंभा), सहाय्यक अभिनेत्री उषा नाईक (आशा), बालकलाकार कबीर खंदारे, त्रिशा ठोसर (नाळ २), विशेष बालकलाकार भार्गव जगताप (नाळ २), कथा सुधाकर रेड्डी (नाळ २), पटकथा शशी खंदारे (जिप्सी), संवाद अंबर हडप व गणेश पंडित (जग्गु…), गीते वैभव देशमुख (नाळ २), पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर (नाळ २), नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे, संजीर हाउलदार (जग्गु…), कला दिग्दर्शन अमेय भालेराव (श्यामची आई), छायालेखन प्रविण सोनवणे (जिप्सी), संकलन अक्षय शिंदे (जिप्सी), ध्वनीमुद्रण कुणाल लोळसुरे (श्यामची आई), ध्वनिसंयोजन विकास खंदारे (जिप्सी), वेशभूषा मानसी अत्तरदे (जग्गु…), रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस), प्रथम पदार्पण अभिनेता दीपक जोइल (भेरा), अभिनेत्री श्रद्धा खानोलकर (भेरा), गौरी देशपांडे (श्यामची आई), प्रथम पदार्पण दिग्दर्शक आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट), प्रथम पदार्पण निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक दीपक पाटील, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक शशी खंदारे. विशेष सन्मान – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘श्यामची आई’.

आज दि.06/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – आज विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अचानक प्रवास संभवतो. नवीन ओळखी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. संयम बाळगा.
शुभ अंक: ७  शुभ रंग: गडद निळा

वृषभ – आर्थिक बाजू मजबूत राहील. घरातील कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार यशस्वी ठरतील.
शुभ अंक: ९  शुभ रंग: क्रीम

मिथुन – थोडीशी मानसिक तणावाची शक्यता. निर्णयात विलंब होईल. जुने प्रलंबित प्रश्न मिटू शकतात.
शुभ अंक: ५  शुभ रंग: पांढरा

कर्क – आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य अनुभवास येईल.
शुभ अंक: २  शुभ रंग: चंदेरी

सिंह – कार्यक्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना रुजतील. वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.
शुभ अंक: ३  शुभ रंग: केशरी

कन्या – खर्चाचे प्रमाण वाढू शकते. आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी. संयम आणि प्रसन्नतेने दिवस सांभाळा.
शुभ अंक: ६  शुभ रंग: फिकट तपकिरी

तुळ – भागीदारीत यश मिळेल. मनाजोगता निर्णय घेण्याची वेळ. सामाजिक संपर्क लाभदायक ठरेल.
शुभ अंक: ४  शुभ रंग: गहूवर्ण

वृश्चिक – मन स्थिर ठेवल्यास योग्य निर्णय होईल. मनातील भीती झटकून कार्याला सुरुवात करा. यश मिळेल.
शुभ अंक: ८  शुभ रंग: करडासावळा

धनु – आज मनासारखा दिवस. जुने मित्र भेटतील. कामात नवे मार्ग खुलतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक: १  शुभ रंग: लाल

मकर – कौटुंबिक आनंद लाभेल. व्यावसायिक कामांमध्ये यश. आर्थिक बाजू संतुलित राहील.
शुभ अंक: ७  शुभ रंग: राखाडी

कुंभ – आज कल्पकता आणि चिकाटी यामुळे यश मिळेल. वरिष्ठांशी संभाषण लाभदायक ठरेल.
शुभ अंक: ६  शुभ रंग: निळसर पांढरा

मीन – मनात आशावाद निर्माण होईल. कला, लेखन, संगीत क्षेत्रात यश. प्रवास शुभदायक ठरेल.
शुभ अंक: ९  शुभ रंग: फिकट गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचावे – नानासाहेब संजय वाघ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0

Loading

पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी “तयारी स्पर्धा परीक्षांची” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा, प्रशासनातील संधी, व स्वतःच्या करिअर घडविण्याच्या अनंत शक्यतांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. आपल्या भाषणात नानासाहेब वाघ म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमतांच्या बळावर स्वतःला सिद्ध केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा, जिद्द आणि कर्तृत्व दडलेले असते, केवळ त्या गुणांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असते.” ते पुढे म्हणाले, “आजच्या काळात करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत. केवळ डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्राध्यापक होणेच जीवनाचे उद्दिष्ट नसून, या व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रांत प्रगतीची दारे उघडी आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्यपूर्ण मेहनत घ्यावी. नोकरी लागल्यानंतरही थांबू नये, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, याचा विचार करून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.” नानासाहेब वाघ यांनी पुढे सांगितले की, “तळागाळातील विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करायला हवेत. आपल्या गावाचा, कुटुंबाचा आणि संस्थेचा अभिमान वाढवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची आवश्यकता देशाला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था आणि महाविद्यालयाचा संपूर्ण परिवार नेहमीच पाठीशी उभा असून, कुठलीही अडचण येऊ नये म्हणून संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी असते.” या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, विशेषतः यूपीएससी व एमपीएससीसारख्या प्रशासकीय परीक्षांबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर असलेल्या संधी त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.” प्रा. चिंचोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देत प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. दीपक कुमार या विद्यार्थ्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, “दिल्लीमध्ये चहाच्या टपरीवर काम करणारा दीपक कुमार याने अपार कष्ट घेत आयएएस झाल्याने त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरतो.” त्यांनी एरंडोल तालुक्यातील ताडेबामणे गावचे राजेश पाटील यांचे उदाहरण दिले. “एकेकाळी पाव विकणारा हा तरुण सध्या आयएएस अधिकारी म्हणून देशसेवा करत आहे,” असे सांगून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी कमलेश पारेख, रमेश घोलप आणि अन्सार शेख यांसारख्या विद्यार्थ्यांचेही उल्लेख केले, जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आले असूनही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन आज देशासाठी महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. तसेच अरुणीमा सिन्हा या विद्यार्थिनीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, “रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या अरुणीमाने शारिरीक मर्यादा झुगारून जगातील सर्वोच्च शिखरे सर केली आणि माऊंट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले.” प्रा. चिंचोले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपली आर्थिक परिस्थिती, शारीरिक अपंगत्व, किंवा सामाजिक मर्यादा ही आपल्याला थांबवू शकत नाहीत, जर मनात दृढ निश्चय असेल आणि दिशादर्शक योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणत्याही अडथळ्यावर मात करता येते.” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी, संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी आपल्या उपस्थितीत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन या सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी.एन. चौधरी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही केवळ भूतकाळातील विद्यार्थी म्हणून नव्हे तर वर्तमान आणि भविष्यकालीन पिढीसाठी देखील काम करत आहोत. आपल्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा देणे ही आमची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. जे. डी. गोपाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अँडव्होकेट महेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य केले. हा कार्यक्रम केवळ एक व्याख्यान सत्र नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित करणारा आणि वास्तवाशी जोडणारा एक प्रभावी उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनातील संघर्षांवर मात करत यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी, हीच अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. शिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देणे हे अशा कार्यक्रमांचे मोलाचे वैशिष्ट्य ठरते.

“गडकोटांचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करा!”श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) तर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेच्या वतीने फोटोग्राफी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन वेगवेगळ्या थीम निश्चित करण्यात आल्या आहेत – “युनेस्को हेरिटेज १२ किल्ले” आणि “महाराष्ट्रातील इतर किल्ले”. या माध्यमातून छायाचित्रकारांना ऐतिहासिक गडकोटांचा भव्यतेसह गौरव करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले असून, ३१ ऑगस्ट २०२५ ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. प्रत्येक थीमनुसार स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून त्यामध्ये पहिला क्रमांक ₹५,०००/-, दुसरा क्रमांक ₹३,०००/-, तिसरा क्रमांक ₹२,०००/-, तर प्रोत्साहनपर पारितोषिक ₹१,०००/- असे आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. निकाल ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल आणि पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील Google Form भरावा – https://forms.gle/Bv1KJN1Dk9UiYPRr8

अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास युक्ता गोठणकर यांच्याशी 8591747565 / 8691973874 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

इतिहास आणि छायाचित्रकलेचा संगम साधणारी ही स्पर्धा छायाचित्रकारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. तर चला गडकोटांचे वैभव तुमच्या नजरेतून जगाला दाखवा!

सायबर शिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार: वालिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पोदार स्कूलमध्ये प्रभावी जनजागृती सत्र

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक प्रभावी सामाजिक पुढाकार घेत, वालिया सी.एल. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालिया एल.सी. कॉलेज ऑफ आर्ट्स या महाविद्यालयांतील हरीश राजपूरोहित आणि बकेश कोटी या दोन विद्यार्थी प्रतिनिधींनी २६ जुलै २०२५ रोजी पोदार इंटरनॅशनल हायर सेकंडरी स्कूल येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पाडले.

हे सत्र महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सत्रात ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, पासवर्ड संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि जबाबदारीने इंटरनेटचा उपयोग या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संवादात्मक आणि सहभागी स्वरूप. उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्नोत्तर सत्र, दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे आणि उपयुक्त टिप्स यांद्वारे सायबर सुरक्षेचे प्रत्यक्ष आणि सुलभ स्वरूपात शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या शंका समाधानासह प्रत्यक्ष अनुभवही शेअर केले.

श्री. राजपूरोहित आणि श्री. कोटी यांचे मुद्देसूद सादरीकरण, स्पष्ट संवादशैली आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी याचे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही विशेष कौतुक केले. काही शिक्षकांनी अशा सत्रांची नियमित गरज अधोरेखित करत, सायबर सुरक्षा विषय अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, अशी सूचनाही दिली.

“सायबर शिक्षासाठी सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित हे सत्र विद्यार्थ्यांना सजग, जबाबदार आणि डिजिटलदृष्ट्या साक्षर नागरिक म्हणून घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त माहितीपूर्णच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या जागरूक, सुरक्षित आणि नैतिक डिजिटल व्यवहार करणारे नागरिक म्हणून घडतात, हे निश्चित.

पथनाट्याच्या माध्यमातून मानवी तस्करीविरोधात जनजागृती – वालिया महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानवी तस्करीच्या धोक्याविरोधात समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीच्या वालिया महाविद्यालय आणि प्रकृती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय पथनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्या डॉ. बागेश्री बांदेकर म्हणाल्या, “मानवी तस्करी थांबवणे हे कोण्या एका व्यक्तीचे काम नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.” तसेच, प्रकृती संस्थेच्या ‘यंग इंडिया अनचेंज्ड’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरविंद पांचाळ यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यांच्यातील संवेदनशीलता वाढीस लागते आणि अशा समस्या रोखण्यासाठी सक्षम पिढी घडते.” तसेच कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित बालन यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “अशा शिबिरांतून घडणारे स्वयंसेवक समाजकार्याच्या प्रवाहात पुढे येतात आणि परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलतात.”

या कार्यशाळेतील प्रमुख पथनाट्य मार्गदर्शक म्हणून सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) येथील मराठी विभागप्रमुख आदरणीय प्रा. जगदीश संसारे यांनी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादरीकरणाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके, संप्रेषण कौशल्य, शारीरिक अभिव्यक्ती व नाट्यकला यावर आधारित सत्रे घेतली. त्यांना सहाय्यक पथनाट्य प्रशिक्षक माधवी पवार यांनी मार्गदर्शनासाठी मोलाची साथ दिली.

प्रशिक्षणार्थींनी केवळ अवघ्या अर्ध्या तासाच्या सरावानंतर सादर केलेली सहा पथनाट्ये त्यांच्या कल्पकतेचे आणि सजगतेचे प्रभावी दर्शन घडवत होती. ज्यातून मानवी तस्करीविरोधातील सजगतेचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अतिशय समर्पितपणे काम पाहिले. समारोप प्रसंगी वालिया महाविद्यालयाच्या एन.एस.एस. जनरल सेक्रेटरी सदिच्छा कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक व शिबिरार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

आज दि.05/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष –मनात नवे उद्दिष्ट तयार होईल. वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. गुंतवणुकीपूर्वी विचार आवश्यक.
शुभ अंक: ३  शुभ रंग: तांबडा

वृषभ – आर्थिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक. नवीन योजनांची सुरुवात लाभदायक ठरेल.
शुभ अंक: ६  शुभ रंग: क्रीम

मिथुन – काही अडथळे जाणवतील पण प्रयत्न केल्यास मार्ग निघेल. मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतील.
शुभ अंक: ९  शुभ रंग: हिरवा

कर्क – जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. घरगुती निर्णयांसाठी चांगला दिवस. नोकरीतील बदलाचा विचार होईल.
शुभ अंक: २  शुभ रंग: पांढरा

सिंह – मान-सन्मान वाढण्याची शक्यता. कामाची प्रशंसा होईल. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंक: १  शुभ रंग: सोनेरी

कन्या – खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.
शुभ अंक: ८  शुभ रंग: राखाडी

तुळ – शांत राहा आणि संयम ठेवा. व्यावसायिक कामात यशाचे संकेत आहेत. नवे करार लाभदायक ठरतील.
शुभ अंक: ५  शुभ रंग: निळसर पांढरा

वृश्चिक – कार्यक्षेत्रात चांगली बातमी मिळेल. जुने वाद मिटतील. सकारात्मकता वाढेल.
शुभ अंक: ७  शुभ रंग: जांभळा

धनु – घरगुती निर्णयात वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. नवीन कामाचा प्रारंभ शक्य.
शुभ अंक: ४  शुभ रंग: केशरी

 मकर – नातेसंबंध सुधारतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक. थोडी चिंता होऊ शकते पण दिवस निघून जाईल.
शुभ अंक: ६  शुभ रंग: तपकिरी

कुंभ – सहकार्य वाढेल. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
शुभ अंक: ५  शुभ रंग: आकाशी

 मीन – गोड बोलणे फायदेशीर ठरेल. कामांमध्ये अडथळे दूर होतील. आत्मविश्वास टिकवा.
शुभ अंक: २  शुभ रंग: गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

“जर हिंमत असेल, तर दारात येऊन सामोरे या!” – माहिती अधिकार मागणाऱ्यांना एक निर्भीड आणि जळजळीत ओपन चॅलेंज!

0

Loading

पाचोरा – माझा स्वतःचा व परिवाराचा इतिहास स्वच्छ आणि कर्तृत्वगौरवाने उजळलेला असताना सुद्धा मागील पंधरा वर्षांपासून काही विघ्नसंतोषी, द्वेषभावना बाळगणारे आणि स्वतःच्या कमकुवतपणावर पांघरूण घालणारे काही तथाकथित सत्यान्वेषी लोक, माहिती अधिकाराचा (RTI) चुकीचा वापर करून एका कुटुंबाच्या आयुष्याचे प्रत्येक अंग चिरडून पाहण्याचा विफल प्रयत्न करत आहेत. परंतु आता वेळ आली आहे की या विघ्नसंतोषी मंडळींना स्पष्टपणे, ठामपणे आणि निर्भीडपणे थेट आव्हान देण्याची! हा जळजळीत ओपन चॅलेंज आहे – मी, स्वा.सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांचा सुपुत्र – आमच्या कुटुंबावर संशय घेणाऱ्या, माहिती अधिकाराअंतर्गत वारंवार अर्ज करणाऱ्या, परद्यामागून खेळ करणाऱ्या सगळ्यांना थेट आव्हान देत आहे! माझ्या वडिलांचा इतिहास उज्वल आहे. ते स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कागदोपत्री पुरावे, अधिकृत प्रमाणपत्रे, तसेच शासनमान्य छायांकित प्रती माझ्याकडे आहेत. त्याचप्रमाणे मी स्वतः शिक्षित असून माझे शिक्षण, माझ्या मालमत्तेचे दस्तावेज, माझी सामाजिक संस्था, माझे कार्यक्षेत्र याविषयीचे सर्व पुरावे मी जवळ बाळगले आहेत. माझ्या पत्नीचे शिक्षण, तिची नोकरी सेवा, पदस्थापना, याचे संपूर्ण अधिकृत दस्तावेजही माझ्याकडे सुरक्षित आहेत. परंतु मागील १५ वर्षांपासून एका बापाची औलात नसलेले काही लोक – काही थेट आणि काही अप्रत्यक्ष – सातत्याने माहिती अधिकाराचा आधार घेत माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याची तपासणी करण्याचा केविलवाणा आणि भ्याड प्रयत्न करत आहेत. या सगळ्या विघ्नसंतोषी तत्वांना माझा थेट सवाल आहे: तुमच्यात जर खरोखर हिंमत असेल, जर तुमच्या रक्तात पुरुषार्थ असेल, जर तुम्ही एकाच बापाची खरी औलाद असाल, तर तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात या! छुप्या मार्गाने माहिती काढण्याचे नाटके बंद करा! सर्व संशयी, तोंडावर गोड बोलणारे पण पाठीमागे वार करणारे, माझ्या कुटुंबाविषयी माहिती गोळा करणारे, हे लक्षात ठेवावं — “९ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ९ ते ११ या वेळेत, माझ्या निवासस्थानी (माझ्या दारात) स्वतःसह आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या!” तुम्हाला जी माहिती हवी आहे, ज्या कागदपत्रांच्या प्रती हव्या आहेत, त्यांची एक सुस्पष्ट यादी प्रत्यक्ष माझ्या हाती द्या. हे सर्व व्हिडीओ कॅमेऱ्यावर रेकॉर्ड होईल. तुमचं चेहरे, तुमचं बोलणं, आणि तुमचा हेतू – सर्व काही समाजासमोर उघड होईल! जर तुम्ही ९ ऑगस्टला प्रत्यक्ष तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात आले & भेट देऊन, कॅमेरासमोर माझ्या हाती कागदांची यादी सोपवलीत, तर १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 10-00 वाजता तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात आल्यास मी स्वतः तुमच्या कुटूंबाच्या हाती, माझ्या स्वखर्चाने, मागितलेल्या प्रत्येक माहितीची संपूर्ण प्रमाणित व छायांकित प्रती देईन. ते सुद्धा पुन्हा व्हिडीओ कॅमेऱ्याच्या उपस्थितीत, पारदर्शकतेने, पूर्ण खुलेपणाने – म्हणजे समाजालाही कळेल की कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं! माहिती अधिकार कायदा लोकशाहीतील एक मजबूत हत्यार आहे – पण दुर्दैवाने काही विघ्नसंतोषी आणि स्वार्थी व्यक्ती त्याचा गैरवापर करून वैयक्तिक सूडबुद्धीने वापर करतात. त्यांना इतकंच सांगायचं आहे – “आरटीआय म्हणजे कोणाच्या वैयक्तीक पातळीवर संशय घेण्याचं साधन नव्हे, ती एक जबाबदारी आहे!” माहिती मागणाऱ्याला अधिकार असतोच, पण माहिती देणाऱ्यावरही काही कायदेशीर बंधनं असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती मागितली आहे ते देऊ शकणार नाहीत पण मी मात्र त्या बंधनांना बगल देत, स्वतः पुढाकार घेऊन सर्व काही खुलेपणाने समाजासमोर ठेवायला तयार आहे. एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो – माझा इतिहास पारदर्शक आहे. माझ्या वडिलांनी देशासाठी लढा दिला, मी समाजासाठी काम करत आहे, आणि माझं कुटुंब स्वतःच्या कष्टावर उभं आहे. माझ्या मालमत्तेपासून ते शिक्षण, पत्नीसह कुटुंबातील प्रत्येक गोष्टीपर्यंत जेवढी माहिती तुम्हाला हवी आहे, तेवढीच माहिती मी देण्यास तयार आहे – एका बापाची औलाद असाल आणि आपल्या कुटूंबासह माझ्या कुटूंबाची माहिती घेण्यासाठी खऱ्या हिंमतीने सामोरे आलात, तरच! ते सुद्धा ९ ऑगस्टला यादी देणे & १५ ऑगस्टला घेणे व सर्व ऑन व्हिडिओ कॅमेरा ध्येय न्युजच्या कॅमेऱ्या समोर जे काही घडेल ते सर्व समाजासमोर येईल. या चॅलेंजला नकार दिलात, तर समाजाला स्वतःच ठरवू द्या की तुमची लायकी काय आहे. समाजात काही असे लोक असतात, जे स्वतः काही करत नाहीत, पण इतरांनी काय केलं ते शोधत बसतात. त्यांच्या स्वतःच्या पायात चप्पल नसते, पण दुसऱ्याच्या बुटांची किंमत ठरवतात. शेवटी पुन्हा एकदा ठणकावून सांगतो: “मी ओपन चॅलेंज देतो – जर तुमच्यात दम असेल, एका बापाची औलाद असाल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने एकच मर्दाने दिलेल्या गर्भातून जन्म घेतला असाल, तर माझ्या दारात या आणि सामोरे जा!” छुपा खेळ बंद करा… माहिती हवी असेल, तर थेट समोर या. द्वेष, हेवेदावे, ईर्षा आणि खोट्या प्रचाराच्या वावटळीत अडकून राहू नका. “मी, माझं कुटुंब, माझा इतिहास – हे सगळं माझ्या कपाळावर स्वाभिमानाने कोरलेलं आहे. त्यामुळे खोट्या शंकेची सावली देखील आम्हाला शिवू शकत नाही!” हा चॅलेंज समाजात पोचवा – कारण सत्य कधीच लपून राहत नाही!
Dhyeya News & सा. झुंज  संपादक संदीप दामोदर महाजन, पाचोरा
*M0.73 8510 8510*

“मैत्री, देशभक्ती आणि कवितेचा उत्सव” – अठराव्या कविसंमेलनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद!

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी अठरावे कविसंमेलन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. “मैत्री, देशभक्ती आणि मुक्त कविता” या त्रिसूत्री संकल्पनेवर आधारित या संमेलनात १६ निवडक कवींनी भावस्पर्शी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध वातावरणात भावनांची मुक्त अभिव्यक्ती अनुभवता आली. “कविता म्हणजे अंतःकरणाचा आवाज” या भूमिकेचा प्रत्यय या मंचावर आला. संमेलनाचे आयोजन “मैत्रीचे धन”, “भारत माझा देश आहे!” आणि “अंतरंगातील कवितागंध” या तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते. प्रथम सत्रात मैत्री या नात्याची निरपेक्षता, उबदारपणा आणि विश्वास रेखाटणाऱ्या कविता सादर झाल्या. दुसऱ्या सत्रात देशप्रेम, स्वातंत्र्यलढा आणि भारतीयत्वाच्या भावना असलेल्या रचना सादर झाल्या. शेवटच्या सत्रात वैयक्तिक अनुभव, सामाजिक भान आणि मुक्त अभिव्यक्ती यांचा मिलाफ असलेल्या कविता सादर करण्यात आल्या. या कविसंमेलनात प्रकाश बागडे, डॉ. मानसी पाटील, धनंजय पाटील, किशोरी पाटील, विवेक जोशी, कल्पना मापूसकर, विक्रांत लाळे, उत्तम कुलकर्णी, वैभवी गावडे, आश्विनी म्हात्रे, रविंद्र पाटील, डॉ. अनुज केसरकर, गुरुदत्त वाकदेकर आणि सनी आडेकर या कवींनी आपल्या विविध शैलीतील रचना सादर केल्या. विशेष सादरीकरणात चंद्रकांत दढेकर यांनी डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या ‘मैत्री’विषयक लेखाचे भावपूर्ण अभिवाचन करत श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला. कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून दिलीप राणे आणि संध्या दढेकर यांनी प्रत्येक सादरीकरणाचा रसग्रहणपूर्वक आनंद घेतला आणि कवींना सकारात्मक अभिप्राय देत प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात आले आणि एकत्रित छायाचित्राने या संमेलनाची स्मृती कायमस्वरूपी जपली गेली. रसिकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद, सभागृहातील शिस्तबद्धता आणि कविता सादरीकरणाचा दर्जा यामुळे अठरावे संमेलन संस्मरणीय ठरले. संपूर्ण कार्यक्रमासाठी संयोजन, वेळेचे नियोजन आणि साहित्यिक वातावरण यांचे उत्तम सूत्रसंचालन केले गेले. या यशस्वी संमेलनानंतर आयोजकांनी आगामी एकोणिसावे कविसंमेलन रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, सदर कविसंमेलनाचे सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. काव्यप्रेमींनी या संमेलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कविसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुज केसरकर, उत्तम कुलकर्णी, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील, वैभवी गावडे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा) आणि सनी आडेकर (सचिव – शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांनी विशेष मेहनत घेतली. मैत्रीचा गहिवर, देशभक्तीचा अभिमान आणि अंतर्मनातील संवेदनांचा स्पर्श घडवणारे हे संमेलन कविता, कवी आणि रसिक यांच्यातील बंध अधिक दृढ करणारे ठरले.

“लायन्स क्लब ऑफ सायन” चा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न – राजेश रसिकलाल शाह अध्यक्षपदी

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजसेवेच्या क्षेत्रात गेली सहा दशके कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ सायन या संस्थेचा ६१ वा वर्धापनदिन आणि नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा माटुंगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने लायन राजेश रसिकलाल शाह यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजू मनवानी यांच्या शुभहस्ते अध्यक्ष व कार्यकारिणीने शपथ घेतली. यावेळी डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन फिरोज कात्रक यांनी १५ नवीन सदस्यांचे इंडक्शन करून क्लबच्या कार्याचा विस्तार साधला.

कार्यक्रमात लायन क्रिस्टीन स्वामीनाथन यांनी वर्ष २०२४-२५ या कार्यकाळाचा अहवाल प्रभावीपणे सादर केला. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लायन राजेश शाह यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “सायन क्लब आणि जीओ रोटी घर या माध्यमातून गरजू, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी सेवा हाच आमचा प्राधान्यक्रम राहणार आहे.”

क्लबच्या माध्यमातून झोपडपट्टी, वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पोस्ट ऑफिस, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी अल्पोपहार व जेवणवाटपाचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तसेच वह्या, स्टेशनरी किट्स, छत्र्या, रेनकोट वाटप, आणि रुग्णांसाठी औषध पुरवठा यांसारखे प्रकल्पही चालू आहेत.

या समारंभास फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन पवन अग्रवाल, सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन हुजैफा घड़ियाली, अनेक पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर, लायन सदस्य आणि राजेश शाह यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन लायन संतोष चौहान, रीटा अतुल संघवी आणि राकेश सिंह यांनी केले. संपूर्ण सोहळा लायन वसंत खेतानी आणि रीना खेतानी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडला.

संयुक्त सचिव शेतल शाह यांनी आगामी उपक्रमांचा आढावा सादर केला, तर प्रदर्शन सचिव सोनी सिंह यांनी प्रमुख अतिथी व लायन सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संपूर्ण शपथविधी सोहळा हा सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा ठरला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!