Home Blog Page 87

आज दि 04 /06 /2025 चे प्रत्येक राशी निहाय आजचे भविष्य

Loading

1) मेष (Aries): आजचा दिवस व्यावसायिक निर्णयांसाठी अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

2) वृषभ (Taurus): मन थोडं अस्थिर राहील, संयम आवश्यक आहे. जुने प्रश्न चर्चेने मिटवता येतील. घरात आनंददायी वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

3) मिथुन (Gemini): नवीन संधी मिळू शकतात. प्रवास संभवतो. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतो, शांततेने संवाद साधा. आर्थिक खर्च वाढू शकतो.

4) कर्क (Cancer): आज मनोबल वाढेल. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन योजना मनात येतील.

5) सिंह (Leo): महत्वाची कामे पुढे ढकलावीत. गैरसमज टाळा. सामाजिक क्षेत्रात तुमची छाप पडेल. व्यायाम व आहार संतुलित ठेवा.

6) कन्या (Virgo): निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. भागीदारीत लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. मनःशांती लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

7) तुला (Libra): आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंददायी घटना घडतील. जोडीदाराशी सहकार्य वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाटेल.

8) वृश्चिक (Scorpio): जुनी थकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासामुळे यश मिळेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. पैशांचे व्यवहार सावधपणे करा.

9) धनु (Sagittarius): मनात उत्साह असेल. कामात नवीन जबाबदाऱ्या येतील. वादापासून दूर रहा. आज अनपेक्षित लाभ संभवतो. प्रवासात काळजी घ्या.

10) मकर (Capricorn): घरगुती निर्णयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. जुने काम पूर्ण होईल.

11) कुंभ (Aquarius): आज कामात समाधान मिळेल. नवे संबंध निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आप्तेष्टांकडून मदत मिळेल.

12) मीन (Pisces): आज मनोबल उच्च राहील. कला व सर्जनशीलतेत प्रगती होईल. घरात शांतता राहील. दैनंदिन कामात यश लाभेल. प्रेमसंबंधात सकारात्मकता येईल.

सिटीझन पोर्टल कोलमडल्याने प्रॉपर्टी मिसिंग दाखला मिळवण्यात नागरिकांची त्रेधा; पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी

Loading

पाचोरा – नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात, अनेकवेळा ओळखपत्र, मालमत्ता कागदपत्रे, मोबाईल, बँक पासबुक, बॅग किंवा अन्य महत्त्वाच्या वस्तू हरवल्या जातात. अशा प्रसंगी प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला अत्यंत गरजेचा असतो. याआधारे संबंधित व्यक्ती नवीन कागदपत्रे, सिमकार्ड, ओळखपत्र किंवा इतर बदल्या सुलभतेने करून घेऊ शकते. पूर्वीच्या काळात अशा घटनांमध्ये नागरिक थेट संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष तक्रार दाखल करत असत. त्यावर तातडीने प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला देण्यात येत असे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळत असे. मात्र, सध्याच्या काळात पोलिस प्रशासनाने अनेक सुविधा डिजिटल माध्यमावर आणल्या आहेत. त्यातच प्रॉपर्टी मिसिंगची तक्रारही आता ऑनलाईनच दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारच्या सिटीझन पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. पोर्टलवर लॉगिन करून तक्रार नोंदवायची आणि त्यानंतर दाखला स्वतःच प्रिंट करून घेता येतो, अशी पद्धत सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना नागरिकांच्या सोयीसाठी राबवली गेल्याचे सांगितले गेले होते. परंतु वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. अनेक दिवसांपासून सिटीझन पोर्टल नीट कार्यरत नाही. अनेक वेळा साइट लोड होत नाही, ‘Internal Server Error’, ‘Request Timeout’, ‘Page Not Found’ असे त्रुटी संदेश दाखवले जातात. काही वेळा लॉगिन होत नाही, तर काही वेळा सर्व माहिती भरून ‘Submit’ बटण क्लिक करताच पोर्टल कोलमडते. परिणामी, नागरिक तासन्‌तास प्रयत्न करत राहतात, तरीही तक्रार दाखल होत नाही. विशेषतः ज्यांची कागदपत्रे हरवली आहेत किंवा महत्त्वाची मालमत्ता मिसिंग झाली आहे, अशा व्यक्तींसाठी प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला हा प्राथमिक आवश्यक कागदपत्र आहे. त्याविना आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मोबाईल सिम रिअक्टिवेशन, बँकेची सेवा, गॅस कनेक्शन अशा कोणत्याही सेवा मिळवणे शक्य होत नाही. परिणामी नागरिक आर्थिक, सामाजिक व शासकीय गैरसोयींचा सामना करत आहेत. अनेक नागरिकांनी हे लक्षात आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पूर्वीप्रमाणे दाखला देण्याची विनंती केली. परंतु, आता ऑनलाईन सिस्टमच बंधनकारक असल्याने, पोलिसांकडून सरळ सांगितले जात आहे की ‘ऑनलाईन तक्रार नोंदवूनच दाखला मिळेल’. त्यामुळे नागरिक एकप्रकारे अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पोर्टल चालत नाही, आणि दुसरीकडे प्रत्यक्ष तक्रार नोंदवता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत सामान्य माणूस अडकलेला आहे.
सामान्य नागरिकांचे मत स्पष्ट आहे – तंत्रज्ञानाचा वापर स्वागतार्ह असला, तरी तंत्रज्ञान प्रभावी नसेल, तर त्याचा वापर बंधनकारक करण्यात अर्थ नाही. सिटीझन पोर्टल कार्यक्षम नसताना ऑनलाईनच तक्रारीची सक्ती ही अन्यायकारक आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेची नीट माहिती नाही. अनेकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा अडथळा आहे. अशा परिस्थितीत त्यांना शहरातील इंटरनेट केफे किंवा एजंटांकडे जावे लागते. तिथे आर्थिक शोषणही होत आहे.
या पार्श्वभूमीवर आता पोलिस विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभाग यांनी एकत्र येऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिटीझन पोर्टल तात्काळ सुस्थितीत कार्यान्वित करावे किंवा पर्यायी पद्धत विकसित करावी. जोपर्यंत तांत्रिक अडथळा पूर्णपणे दूर होत नाही, तोपर्यंत नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दाखला मिळण्याची पूर्वीची पद्धत सुरू ठेवावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

मदत छोटी, बदल मोठा ब्रीदवाक्य घेऊन शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रेरणेतून ‘जीवनशक्ती मायक्रो फायनान्स’चा ६ जून रोजी उद्घाटन सोहळा

Loading

पाचोरा – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन निमित्ताने ‘जीवनशक्ती मायक्रो फायनान्स व अर्थ विकास फाउंडेशन, पाचोरा’ या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थेच्या नव्याने साकारत असलेल्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. “मदत छोटी, बदल मोठा” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु झालेल्या या संस्थेच्या कार्याची दिशा आणि दृष्टी दोन्ही या नव्या कार्यालयातून अधिक व्यापक होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ही संस्था ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल, महिलांसह गरजू घटकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जसुविधा, मार्गदर्शन, आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. या नव्या कार्यालयामुळे संस्थेच्या कार्याचा विस्तार अधिक प्रभावीपणे व विश्वासार्हतेने होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उद्घाटन मा. आप्पासो. संतोष रूपचंद पाटील आणि मा. तात्यासो. रामदास रूपचंद पाटील यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विशेषतः पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. आप्पासो. किशोर धनसिंग पाटील, माजी आमदार मा. भाऊसो. दिलीप वाघ, तसेच शैक्षणिक, प्रशासकीय, कृषी, पोलीस, आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.यात मा. उत्तमभाऊ राठोड (अध्यक्ष, मा.वि.शि.मं.),
मा. नानासो. संजय वाघ (चेअरमन, पी.टी.सी. पाचोरा),मा. भुषण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा भाग),मा. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा),
मा. विकास पाटील साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी),
मा. वैशालीताई सूर्यवंशी (संचालिका, निर्मल सिडस्), मा. अमोलभाऊ शिंदे (मा. तालुकाध्यक्ष, भाजपा),मा. हेमराजदादा राठोड (सचिव, मा.वि.शि.मं.),
मा. करणदादा पवार (मा. नगराध्यक्ष, पारोळा),
मा. नानासाहेब प्रतापराव हरी पाटील (अध्यक्ष, किसान संस्था भडगाव),
मा. बापूसाहेब गणेश पाटील (सभापती, कृ.उ.बा. समिती),
मा. धनंजय येरूळे (उपविभागीय पोलीस अधिकारी),मा. आर. आर. पाटील (सहाय्यक निबंधक),मा. अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा),मा. मंगेश देवरे (मुख्याधिकारी, नगरपरिषद पाचोरा),
मा. समाधान पाटील (गट शिक्षणाधिकारी, पाचोरा), मा. श्री. रमेश जाधव (तालुका कृषि अधिकारी)
यासह शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढणार असून संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुक्यातून मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात व फाउंडेशनसाठी विशेष योगदान देणारे व कार्यक्रमासाठी निमंत्रक
सौ. नूतन व श्री. दीपक मुळे,सौ. वैशाली व श्री. मनोज पाटील सर,
सौ. सोनाली व श्री. संदीप मालपुरे,सौ. जयश्री व श्री. जगदीश पाटील सर,
सौ. रेखा व श्री. राहुल बोरसे सर,सौ. अविना व श्री. विकास पाटील सर यांनी आपण सर्वांना खास निमंत्रित केले असून
कार्यक्रम स्थळ: जीवनशक्ती मायक्रो फायनान्स, तळमजला, गाळा नं. ४९, नवकार प्लाझा, मार्केट कमिटी समोर, पाचोरा, जि. जळगाव येथे उपस्थिती द्यावी
या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केवळ एका वास्तूचे नव्हे, तर संकल्पनेचे उद्घाटन आहे – जिथून शेकडो कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रवास सुरू करतील. ‘जीवनशक्ती’च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुलभ, पारदर्शक व गरजूंना केंद्रस्थानी ठेवून पार पडत आहेत. ग्रामीण भागात आर्थिक समावेशनासाठी ‘जीवनशक्ती’ने घेतलेला हा पुढचा टप्पा महत्त्वपूर्ण आहे.
म्हणून आपण फक्त या सोहळ्यात सामील होणे, हे फक्त कार्यालय पाहणे नाही, तर एका प्रेरणादायी योजनेच्या उभारणीचा साक्षीदार होणे आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती आयोजकांनी केली आहे.
शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या प्रेरणेतून सुरू होणारा हा आर्थिक सामाजिक विकासाचा संकल्प, ‘जीवनशक्ती’च्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरणार आहे. ग्रामीण परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेचा पुढचा प्रवास निश्चितच अधिक उज्ज्वल, सशक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे, यात शंका नाही.संस्थेच्या पुढील वाटचालीस झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

ना.धों. महानोर पुरस्कारासाठी शिफारशी मागविण्याचे आवाहन— शेती-पाणी व्यवस्थापन व साहित्य क्षेत्रातील युवा प्रतिभेचा सन्मान

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शेती, पाणी व्यवस्थापन आणि मराठी साहित्य या अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजशील क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्या पिढीतील प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कविवर्य ना.धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार’ यंदा दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या पुरस्कारांची औपचारिक घोषणा चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी पूर्वीच केली असून, पुरस्कार वितरण समारंभ १७ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
पुरस्कारासाठी शिफारशी मागविण्यात येत असलेली क्षेत्रे :
सन २०२५ साठी खालील दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या युवकांची शिफारस मागविण्यात येत आहे —
१. शेती व पाणी व्यवस्थापन :
नवोन्मेषी, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक व आधुनिक शेतीपद्धतींचा समन्वय साधणारे प्रयोगशील शेतकरी
एकूण २ शेतकरी (१ पुरुष आणि १ महिला)
२. मराठी साहित्य :
समतामूल्यांना अधोरेखित करणारे, मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आणि कोणत्याही प्रकारच्या सामाजिक विषमतेस विरोध करणारे साहित्यिक
एकूण ३ कवी आणि १ कादंबरीकार
शिफारशी करताना लक्षात घेण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी :
वयमर्यादा : १ सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. हे पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान कार्यकर्त्यांसाठी आहेत.
शेती व पाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पारंपरिकतेसोबत आधुनिकता, प्रयोगशीलता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचा समन्वय साधलेला असावा.
साहित्य क्षेत्रात, पुरस्कार हे कोणत्याही एका पुस्तकापुरते मर्यादित नसून, लेखक वा कवी यांच्या एकूण साहित्यिक योगदानाच्या मूल्यांकनावर आधारित असतील.
शिफारस करताना उमेदवाराच्या कार्याची थोडक्यात पार्श्वभूमी, त्याचे समाजावर झालेले परिणाम, कार्याची ठळक वैशिष्ट्ये आणि साहित्य वा शेतीसंबंधी कार्याची सविस्तर माहिती दिली जाणे आवश्यक आहे.
शिफारशी पाठविण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२५
शिफारशी खालील माध्यमांद्वारे स्वीकारण्यात येतील :
Google Form लिंक : https://forms.gle/KrzrVBuqirJBnxPA6
ईमेल : admin@chavancentre.org
WhatsApp क्रमांक : +91 8169493161
पुरस्कार वितरण समारंभ :
या पुरस्कारांचे वितरण १७ सप्टेंबर २०२५ रोजी, मा. शरदराव पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भव्य समारंभात संपन्न होईल.
युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यासपीठ :
या पुरस्काराच्या माध्यमातून शेती, पाणी व्यवस्थापन आणि मराठी साहित्य क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या युवकांचे कार्य समाजासमोर येणार असून, त्यांच्या कार्यास मान्यता व प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाविषयी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी संयुक्तपणे व्यक्त केले की, “हा पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान कार्यकर्ते व साहित्यिकांना प्रेरणा देणारा ठरेल आणि त्यांच्या सामाजिक भान असलेल्या कार्यास नवी दिशा मिळेल.”
संपर्कासाठी :
पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी व शंका निरसनासाठी वरील ईमेल किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.

“शून्याचा अर्थ शोधणारा संशोधक – पाचोऱ्याचा अभिमान : डॉ. किरण वाणी यांना पीएचडी पदवी

Loading

पाचोरा तालुक्याला शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारी अत्यंत गौरवास्पद अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. पाचोरा येथील रहिवासी आणि अभ्यासू वृत्तीचा युवा वैज्ञानिक डॉ. किरण वाणी यांना खगोल भौतिकविज्ञान या उच्च दर्जाच्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. संशोधनाच्या मार्गावर अविरत झगडणारा, जिज्ञासू वृत्तीचा किरण वाणी हा आज देशातील सर्वोच्च खगोल संस्थांमध्ये एक मान्यताप्राप्त पोस्ट-डॉक्टरल संशोधक म्हणून कार्यरत असून, त्याच्या या यशामुळे केवळ पाचोऱ्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल झाले आहे.
    डॉ. किरण वाणी यांचा जन्म पाचोरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अरुण वाणी हे समाजात अत्यंत प्रतिष्ठित

व्यक्ती असून त्यांनी आपल्या मुलामध्ये शिस्त, जिज्ञासा आणि अभ्यासाची नितांत निष्ठा बालपणापासून रुजवली. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण काळात किरण यांचा ओढा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शाखेपेक्षा थेट शास्त्रीय संशोधनाच्या दिशेने होता. इतर विद्यार्थी पारंपरिक मार्ग निवडत असताना, किरण यांना अंतराळातील गूढ रहस्ये, ताऱ्यांचे जीवनचक्र, ब्लेझार्ससारख्या उच्च-ऊर्जेच्या खगोलीय घटकांची कार्यपद्धती आणि गॅलॅक्सींचे स्वरूप या सगळ्यांविषयी विलक्षण आकर्षण होते.
  ही ओढ हळूहळू त्याच्या अभ्यासात, वाचनात, प्रकल्पांमध्ये आणि करिअरच्या दिशादर्शक निर्णयांमध्ये प्रकट होऊ लागली. शालेय स्तरावर विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग, विज्ञानविषयक निबंध आणि चर्चांमध्ये सहभागी होणं यामुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
   डॉ. किरण वाणी यांचा खगोल विज्ञानातील गाढ अभ्यास आणि निस्सीम आवड पाहता त्यांची निवड आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (ARIES), नैनीताल या भारत सरकारच्या महत्त्वाच्या संशोधन संस्थेत 2020 मध्ये झाली. येथे त्यांनी 2020 ते 2025 या कालावधीत “अ‍ॅक्टिव्ह गॅलॅक्सी” या विषयावर सखोल संशोधन केले.
     ARIES संस्थेत डॉ. हरित्मा गौर या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली त्यांनी अस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विभागात कार्य केले. विशेषतः “Active Galaxies” या विषयावरील त्यांचे कार्य हे अत्यंत उल्लेखनीय ठरले. अ‍ॅक्टिव्ह गॅलॅक्सी म्हणजे अशा गॅलॅक्सी ज्या त्यांच्या मध्यभागी असलेल्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल मुळे उच्च उर्जा उत्सर्जन करतात. या अशा गॅलॅक्सीमधून येणाऱ्या विविध प्रकारच्या किरणोत्सर्गाचे निरीक्षण करून त्यामागील यंत्रणा, त्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि उत्क्रांती याबाबतची माहिती मिळवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.
   या संशोधनासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खगोल वेधशाळांमधून डेटा प्राप्त करून, त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास त्यांनी केला. या संपूर्ण संशोधन कालावधीत किरण वाणी यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्तीही प्राप्त केली होती.
   ARIES मधील व्यावहारिक संशोधनासोबतच, डॉ. किरण वाणी यांनी पीएचडीसाठी “Studies of Flux and Spectral Variability of Blazars” या अत्यंत आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण विषयाची निवड केली. या संशोधनाचे मार्गदर्शन नांदेड विद्यापीठातील प्रा. डॉ. एम. के. पाटील यांनी केले. ब्लेझार्स हे ब्रह्मांडातील सर्वात तेजस्वी आणि उर्जा-प्रचंड स्रोतांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रकाशमानतेतील (Flux) आणि वर्णपटातील (Spectral) अनियमिततेचा अभ्यास करून डॉ. किरण वाणी यांनी अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले. विशेषतः त्यांच्या संशोधनाने ब्लेझार्सच्या वर्तनातील विविध सुसंगत पॅटर्न्स, त्यांच्याशी संबंधित ध्रुवीकरण आणि स्पेक्ट्रल फ्रिक्वेन्सीमध्ये दिसणारे बदल यांची वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केली. त्यांच्या या अभ्यासामुळे खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात नवीन संशोधनदिशा उघडल्या गेल्या आहेत. त्यांच्या संशोधन प्रबंधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, काही आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्धही झाले आहेत. सध्या डॉ. किरण वाणी हे भारतातील अत्युच्च दर्जाच्या खगोलशास्त्र संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (IIA), बंगळुरु येथे पोस्ट-डॉक्टरल संशोधक म्हणून कार्यरत आहेत. येथे त्यांचे संशोधन आणखी गहिरं आणि परिणामकारक ठरत असून, आधुनिक उपकरणांचा आणि जागतिक स्तरावरील खगोल संशोधन समुदायाचा लाभ त्यांना मिळत आहे.  “Multi-wavelength Observational Studies of Blazar Emission Mechanism” या व्यापक विषयाभोवती केंद्रित आहे. या माध्यमातून डॉ. किरण वाणी हे भारताच्या अंतराळ संशोधनामध्ये महत्त्वाची भर घालत आहेत. “इंजिनिअरिंग आणि मेडिकल या पारंपरिक क्षेत्रांपेक्षा वेगळी वाट निवडण्याची प्रेरणा मला बालपणातच मिळाली होती. माझं स्वप्न नेहमीच अंतराळाच्या रहस्यांचा मागोवा घेण्याचं होतं. संशोधन क्षेत्र हे खडतर असलं तरी समाधानकारक आणि आत्मिक समाधान देणारं आहे,” असं डॉ. किरण वाणी यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, भारतात तरुणांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अधिक संख्येने यावं, यासाठी शासनाने संशोधनासाठी अधिक निधी आणि प्रेरणा द्यायला हवी. शाळा-कॉलेजांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. किरण वाणी यांच्या या थोर यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि वैज्ञानिक वर्तुळात त्यांचं नाव आदराने घेतलं जात आहे. पाचोरा तालुक्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या आई-वडिलांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. किरण यांचे गुरू, मार्गदर्शक आणि सहकारी देखील त्यांच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत.
अशा बुद्धिमान, सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या आणि भारतीय खगोल विज्ञानाच्या भविष्यासाठी झटणाऱ्या तरुण वैज्ञानिकाला आज देशाच्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळणं हे पाचोऱ्यासाठी गौरवाची बाब आहे. डॉ. किरण वाणी यांचे यश हे केवळ त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वाचे प्रतीक नसून, नव्या पिढीतील तरुणांनी वैज्ञानिक क्षेत्रात उत्कृष्टता गाठू शकते याचा वस्तुपाठ आहे. खगोल भौतिकविज्ञानासारख्या विशिष्ट आणि गुंतागुंतीच्या विषयात त्यांनी दाखवलेली निष्ठा, चिकाटी आणि अभ्यास त्यांच्या भविष्याच्या यशाचा मजबूत पाया आहे.
  “शून्याचा अर्थ शोधणारा संशोधक – पाचोऱ्याचा किरण वाणी” या शीर्षकाने डॉ. किरण वाणी यांची ही यशोगाथा विज्ञानप्रेमी आणि युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, याची खात्री आहे.

आज दि 03 /06 /2025 चे प्रत्येक राशी निहाय आजचे भविष्य

Loading

१. मेष (Aries):
आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नवे करार किंवा व्यावसायिक संधी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. कौटुंबिक सौख्य टिकवण्यासाठी संयमाने संवाद साधा.

२. वृषभ (Taurus):
आज तुमच्याकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.

३. मिथुन (Gemini):
कामाच्या ठिकाणी तुमचे विचार सकारात्मक बदल घडवतील. प्रवास घडू शकतो. कौटुंबिक विषयात थोडे तणाव जाणवू शकतात.

४. कर्क (Cancer):
आज तुमच्या कल्पकतेचा चांगला उपयोग होईल. कला, लेखन किंवा अध्यात्मिक कामात रस वाढेल. मन:शांती लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

५. सिंह (Leo):
महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. यश मिळवण्यासाठी धैर्याची गरज भासेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.

६. कन्या (Virgo):
व्यवसायात स्थिरतेची लक्षणे आहेत. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. सायंकाळी अचानक लाभाची शक्यता आहे.

७. तुळ (Libra):
आज मानसिक स्थैर्य गरजेचे आहे. नोकरीतील बदलाचा विचार होऊ शकतो. प्रेमसंबंधात थोडी असमजूत निर्माण होऊ शकते.

८. वृश्चिक (Scorpio):
आत्मपरीक्षणासाठी योग्य दिवस. जुने अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण सुखद वाटेल

९. धनु (Sagittarius):
धाडसी निर्णय आज यश देऊ शकतात. तुमचं मत मांडताना स्पष्टता ठेवा. मित्रपरिवारात गोड संवाद होईल.

१०. मकर (Capricorn):
कामात स्थिरता वाटेल. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक पावले टाका. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

११. कुंभ (Aquarius):
सर्जनशीलतेला चालना मिळेल. नवे शिकण्याची संधी मिळेल. वैयक्तिक आयुष्यात समजूतदारपणा गरजेचा आहे.

१२. मीन (Pisces):
आज मन काहीसं अस्थिर राहू शकते. आपल्या मतांवर ठाम राहा, पण इतरांचेही ऐकायला शिका. अध्यात्मिक आकर्षण वाढेल.

“प्रफूल्ल संघवी अध्यक्ष, समाज में नवचेतना!”

Loading

पाचोरा के सामाजिक कार्यकर्ता, पूर्व नगरसेवक तथा विभिन्न क्षेत्रों में अपनी छाप छोड़ने वाले प्रतिष्ठित उद्योजक प्रफुल्लकुमार (पप्पू भाऊ) जवाहरलाल संघवी को दिनांक 1 जून को ‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला, पाचोरा’—इस शताब्दी पार कर चुकी प्रतिष्ठित सामाजिक संस्था—के अध्यक्ष पद पर सर्वसम्मति से नियुक्त किया गया है। संस्था की नियमित बैठक में यह चयन जैन समाज के प्रमुख मार्गदर्शकों और सदस्यों की उपस्थिति में संपन्न हुआ। उनके इस चयन से पाचोरा जैन समाज में आनंद और उत्साह का वातावरण है।
प्रफुल्लकुमार संघवी केवल नाम से ही नहीं, बल्कि अपने कार्यों से भी एक आदर्श व्यक्तित्व माने जाते हैं। पूर्व नगरसेवक के रूप में उन्होंने पाचोरा शहर के विकास हेतु विशेष योगदान दिया। सामाजिक कार्यों में सक्रिय भूमिका निभाते हुए उन्होंने कई जनहितैषी उपक्रम हाथ में लिए। जरूरतमंदों और छात्रों के लिए शैक्षणिक सहायता, स्वास्थ्य शिविर, जलसंवर्धन, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम जैसे अनेक क्षेत्रों में उन्होंने महत्वपूर्ण कार्य किया है।
प्रफुल्लकुमार संघवी ‘महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा’ के भी संचालक हैं। सहकार क्षेत्र में उन्होंने पारदर्शिता, विश्वास और उचित प्रबंधन के सिद्धांतों पर कार्य करते हुए संस्था की आर्थिक वृद्धि और सदस्यों के हितों से संबंधित निर्णयों में सक्रिय सहभागिता निभाई है। उनकी कार्यकुशलता के कारण संस्था की विश्वसनीयता निरंतर बढ़ रही है।
निर्माण क्षेत्र में वे MSP बिल्डकॉन और साई इन्फ्रा के माध्यम से उल्लेखनीय कार्य कर रहे हैं। ईमानदारी, प्रतिबद्धता और गुणवत्ता पर आधारित उनकी कार्यशैली ने पाचोरा तालुका में निर्माण व्यवसाय में विश्वास का एक नया आधार स्थापित किया है। विभिन्न आवासीय और व्यावसायिक प्रकल्पों के माध्यम से उन्होंने क्षेत्र की सुंदरता को बढ़ाया है और रोजगार निर्माण में भी योगदान दिया है।
‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला, पाचोरा’ संस्था पिछले सौ वर्षों से अधिक समय से सामाजिक, शैक्षणिक और सांस्कृतिक क्षेत्र में कार्यरत है। यह संस्था जैन समाज की संस्कृति का संरक्षण, नैतिक शिक्षा का प्रचार और विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए कार्य कर रही है। संस्था के इतिहास में अनेक दानवीर व्यक्तियों का योगदान रहा है और आज भी यह संस्था पारंपरिक मूल्यों और आधुनिक आवश्यकताओं के बीच संतुलन साधते हुए आगे बढ़ रही है।
1 जून को हुई बैठक में प्रफुल्लकुमार संघवी का सर्वसम्मति से अध्यक्ष पद पर चयन हुआ। इस अवसर पर समाज के कई प्रमुख गणमान्यजन उपस्थित थे जिनमें रतनचंदजी संघवी, डॉ. जवाहरजी संघवी, किशोरजी संघवी, पूर्व अध्यक्ष बबलू संघवी, महेंद्र शेठ संचेती, कांतीलालजी जैन, जीवन जैन, प्रफुल्लजी बांठीया, दिनेश बोथरा, मिलिंद संघवी, नितीन संघवी, प्रदीपकुमार संघवी तथा अन्य मान्यवर सम्मिलित थे।
प्रफुल्लकुमार संघवी के अध्यक्ष बनने से समाज में सकारात्मक ऊर्जा का संचार हुआ है। उनके अनुभवसम्पन्न नेतृत्व में जैन पाठशाला के माध्यम से समाजहित के नए उपक्रम, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधाएं और नैतिक शिक्षा के प्रचार पर विशेष बल दिया जाएगा, ऐसी उम्मीद व्यक्त की जा रही है। विशेषकर युवाओं को प्रोत्साहन देना, महिलाओं के आत्मनिर्भरता हेतु योजनाएं लाना, पर्यावरण अनुकूल परियोजनाओं को बढ़ावा देना तथा विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए नई योजनाएं आरंभ करना—इन उद्देश्यों के लिए उन्होंने प्रयास शुरू कर दिए हैं।
प्रफुल्लकुमार संघवी के इस चयन की सर्वत्र सराहना हो रही है। पाचोरा तालुका के जैन समाज के विभिन्न घटकों, सामाजिक संस्थाओं, व्यापारी संगठनों, शैक्षणिक क्षेत्र के विद्वानों और सामान्य नागरिकों ने भी उनके अध्यक्ष पद पर चयन का स्वागत किया है। इस चयन को एक प्रेरणादायक नेतृत्व के समाज सेवा में पुनः सक्रिय होने के रूप में देखा जा रहा है।
पाचोरा शहर और तालुका के जैन समाज में उनके नेतृत्व से नवचेतना उत्पन्न होने के संकेत मिल रहे हैं। सामाजिक सेवा, शिक्षा, स्वास्थ्य, संस्कार और धर्मप्रसार जैसे सभी क्षेत्रों में आधुनिक दृष्टिकोण से कार्य करने वाला यह नेतृत्व समाज को एक नई दिशा देने के लिए तैयार है।
प्रफुल्लकुमार (पप्पू भाऊ) संघवी सामाजिक सजगता, व्यावसायिक ईमानदारी और नेतृत्व गुणों का उत्कृष्ट उदाहरण हैं। जैन समाज की अत्यंत प्रतिष्ठित और ऐतिहासिक संस्था ‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला’ के अध्यक्ष पद पर उनका चयन एक प्रेरणादायी युग का प्रारंभ होगा, ऐसी आशा की जा रही है। पाचोरा जैन समाज के उज्ज्वल भविष्य के लिए यह चयन निश्चित ही एक मील का पत्थर सिद्ध होगा। उनके आगामी कार्यों के लिए जैन समाज समेत सम्पूर्ण पाचोरा नगर की शुभकामनाएं उनके साथ हैं

आज दि 02 /06 /2025 सोमवार रोजीचे प्रत्येक राशी निहाय भविष्य

Loading

१. मेष (Aries):
आज तुम्हाला नवी जबाबदारी मिळू शकते. कामात यश मिळेल. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
२. वृषभ (Taurus):
प्रेमसंबंधात थोडे विसंवाद संभवतात. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. घरात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा.
३. मिथुन (Gemini):
नवीन संधी चालून येतील. नात्यांमध्ये गोडवा राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. दिवस उत्साहवर्धक राहील. प्रवासाचे योग आहेत.
४. कर्क (Cancer):
कामात मेहनत जास्त घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. मन शांत ठेवणे गरजेचे आहे.
५. सिंह (Leo):
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधात यश.
६. कन्या (Virgo):
अचानक खर्च संभवतो. भावंडांशी मतभेद टाळा. सरकारी कामात विलंब होऊ शकतो. संयमाने काम घ्या. जुनी गोष्ट त्रास देऊ शकते.
७. तुला (Libra):
व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. नवीन करार फायदेशीर ठरतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनःशांती मिळेल.
८. वृश्चिक (Scorpio):
कामाचा ताण जाणवेल. थोडे भावनिक असाल. जोडीदाराशी संवाद वाढवा. आरोग्यावर लक्ष द्या. जुने मित्र भेटतील.
९. धनु (Sagittarius):
नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन जीवनात स्थैर्य येईल. काही चांगले निर्णय घेण्याची संधी मिळेल.
१०. मकर (Capricorn):
प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. आर्थिक निर्णय सकारात्मक ठरतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

११. कुंभ (Aquarius):
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. मन प्रसन्न राहील. अभ्यासात यश मिळेल.
१२. मीन (Pisces):
आरोग्यावर खर्च संभवतो. कामात अडथळे येतील. जवळच्या व्यक्तीची मदत होईल. शांतपणे निर्णय घ्या. सकारात्मक विचार ठेवा.

परिश्रमाच्या घामातून उभे राहिलेली लेवे गुर्जर स्नेहवर्धक मंडळाची स्वाभिमानाची वास्तू – संपादकीय

Loading

लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी खारघर (नवी मुंबई) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे भव्य लोकार्पण आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन म्हणजे समाजाच्या आत्मभानाचे, बांधिलकीचे आणि जिवंत आशेचे दृश्यरूप होत. मुंबईसारख्या जागेच्या तुटवड्याने ग्रासलेल्या महानगरात लेवे गुजर समाजाच्या ऐक्याने उभारलेली ही वास्तू म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर अनेक पिढ्यांच्या कष्टांची, निष्ठेची आणि समाजविषयीच्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे.
ही वास्तू म्हणजे एखाद्या निव्वळ भिंतींचा समूह नाही, तर ती आहे एक विचार, एक भावना, एक संकल्पना – जी कुणा एका व्यक्तीच्या डोक्यात जन्माला आली आणि अनेकांनी ती आपल्या घामाच्या थेंबांनी प्रत्यक्षात उतरवली. ही कल्पना केवळ समाजासाठी होती. कोणत्याही एकट्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी नव्हे, कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नव्हे, कोणत्याही लोभस प्रपंचासाठी नव्हे – ही कल्पना होती संपूर्ण गुजर समाजाच्या उत्कर्षासाठी, एकत्रतेसाठी आणि सामाजिक योगदानाच्या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी.
लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी भव्य मंदिराच्या उभारणीमागे असलेली कहाणी ही संघर्षाची आहे, कठोर मेहनतीची आहे, अपमान पचवून पुढे जाण्याची आहे. या कल्पनेला मूर्त रूप देणाऱ्यांनी अनेक घरांचे उंबरठे झिजवले. काहींनी स्वागत केले, काहींनी दुर्लक्ष केले, काही ठिकाणी अभिमानाने योगदान मिळाले, तर काहींनी उपहास केला. पण या सर्व अनुभवांची परिणती आज लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबईच्या एका गौरवशाली वास्तूमध्ये झाली आहे. त्यामुळे आज या प्रत्येक समाजहितैषी, स्वप्नवत विचारांच्या माणसाला त्रिवार वंदन करावेसे वाटते.
यासाठी लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ त्या पद्धतीने रात्रंदिवस झटले, त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रेरित होऊन समाजाच्या घराघरात जाऊन देणग्या मागितल्या, लोकांना विश्वास दिला. हे काम सहजसोपं नव्हतं. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमीच अविश्वासाच्या सावलीत होते. “हे शक्य आहे का?”, “आपणच कशाला पुढे जायचं?”, “कुणी मदत करेल का?” – असे अनेक प्रश्न समोर उभे असतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजेच खऱ्या अर्थाने नेतृत्व. आणि या समाज मंदिराच्या उभारणीमागे असलेलं हे नेतृत्व हे शब्दशः नाव नोंदवण्यासारखं नाही, तर त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा हेच आजच्या समाजासाठी दीपस्तंभ आहे.आणि हा संपूर्ण भार उचलला समाजाच्या प्रत्येक घटकाच्या जोरावर लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळाने
खारघरमध्ये तब्बल आठ कोटी रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू म्हणजे एकात्मतेचा पुतळा आहे. कोणी थोडे दिले, कोणी फार; कोणी स्वतःच्या वेळेचे योगदान दिले, कोणी श्रमदान केले, कोणी मनापासून समाजासाठी काहीतरी केले. हे कोणत्याही एका गटाचं किंवा व्यक्तीच नव्हतं. हे संपूर्ण लेवे गुजर समाजाचं कार्य होतं – आणि म्हणूनच ही वास्तू त्यांचं प्रतीक आहे.
या वास्तूच्या उभारणीत केवळ देणगीदारांचेच नव्हे, तर कार्यकर्त्यांचे, दूरवर राहून धडपड करणाऱ्यांचे, समाजातून प्रेरणा देणाऱ्यांचे आणि ज्यांनी आडूनसुद्धा पाठिंबा दिला त्यांचेही श्रेय आहे. समाज कार्यामध्ये केवळ समोर दिसणाऱ्यांचेच नव्हे, तर पार्श्वभूमीत राहून काम करणाऱ्यांचे योगदान अधिक मोठं असतं. कारण ते कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर – “कुणी बघो की न बघो, आपण मात्र आपले काम करून जायचं.”
कोणत्याही कार्यामध्ये चुका होतातच. पण त्या चुका केवळ त्या लोकांपासूनच होतात, जे काही तरी करण्याचा प्रयत्न करतात. हाताळणीच्या पातळीवर थोड्या चुका झाल्या असतील, संवादात तफावत राहिली असेल, पण या चुका हेतुपुरस्सर नव्हत्या – हे समजून घेणं ही सुद्धा समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. काम करणाऱ्यांच्या हातूनच चुका होतात जे काहीच करत नाहीत त्यांच्याकडे नव्हे तर जे करतात त्यांच्याकडे बोट ठेवण्यासाठीच हात मोकळे असतात.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या लढ्यापासून तर संत महात्म्यांचा इतिहास आद आहे समाजात काही नकारात्मक वृत्ती असतातच – त्या नेहमी दुसऱ्याच्या चुकांवर बोट ठेवतात, कोणताही सकारात्मक बदल डोळ्यांना खुपतो. पण म्हणून आपलं कार्य थांबायला नको. अशा लोकांकडे दुर्लक्ष करत समाजहितासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक घटकाला आपल्या कडून मनःपूर्वक सलाम.
ही वास्तू म्हणजे संस्कृतीचा किल्ला आहे, समाजाच्या प्रतिष्ठेचा स्तंभ आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. येथे केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक सेवा, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, वृद्धसेवा अशा अनेक उपक्रमांची योजना आहे. त्यामुळे ही वास्तू म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी साकारलेले एक केंद्र आहे. समाज मंदिर ही संज्ञा येथे केवळ पूजास्थळ म्हणून वापरली गेलेली नाही, तर ती एक सर्वसमावेशक सामाजिक केंद्र म्हणून उदयास आलेली आहे.
आज समाजात अनेक संस्था, ट्रस्ट, मंडळं कार्यरत आहेत. पण त्या केवळ नावापुरत्या असतात. त्यांच्या ध्येयधोरणांची दिशा अधांतरी असते. लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांनी उभारलेले खारघरमधील लेवे गुजर समाज मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधिलकी आहे, निष्ठा आहे, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे – इथे आत्मभान आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ज्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले ते सुद्धा केवळ एक कार्यक्रम नव्हता. ती स्मरणिका म्हणजे समाजाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा दस्तावेज आहे. यामध्ये समाजातील कार्यकर्त्यांचे योगदान, सामाजिक उपक्रमांची यशोगाथा, प्रेरणादायी लेख, समाजघटकांचे विचार – या सर्व गोष्टी नोंदविल्या आहेत. या स्मरणिकेचे संपादन केलेल्या मंडळींनी हे कार्य अत्यंत अभ्यासपूर्वक, चिकाटीने आणि नि:स्वार्थ वृत्तीने पार पाडले आहे. ही स्मरणिका म्हणजे नव्या पिढीला समाजाची जाणीव करून देणारे एक अमूल्य साधन आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत ज्या मंडळींनी भूमी मिळवून दिली, बांधकामासाठी सहकार्य केले, अंतर्गत सजावटीपासून ते कार्यक्रमाच्या व्यवस्थेपर्यंत जीव ओतून काम केले – त्या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. त्यांना केवळ धन्यवाद देऊन विसरून चालणार नाही. त्यांच्या योगदानाची दखल ही समाजाची जबाबदारी आहे. कारण हे कार्य केवळ त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी नव्हते – ते एक सामाजिक कर्तव्य होते, ज्याला त्यांनी आनंदाने स्वीकारले.म्हणून भविष्यात समाजाच्या प्रत्येक गावात जेव्हा जेव्हा कार्यक्रम समाजाच्या स्तरावर आयोजित केले जातात त्या कार्यक्रमात
लेवा गुर्जर स्नेहवर्धक मंडळ मुंबई यांचा सत्कार होणे कर्मप्राप्त आहे खारघर येथे झालेल्या
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाले. पदाधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे नेतृत्व, आणि कार्यकर्त्यांचे समर्पण यामुळेच हा सोहळा केवळ एक समारंभ न राहता एक ऐतिहासिक पर्व ठरला. मंचावर विचार मांडणाऱ्या वक्त्यांनी समाजाला दिशा दिली, प्रेरणा दिली, आणि भविष्यातील वाटचालीचा आराखडा सुद्धा सादर केला. उपस्थितांच्या डोळ्यांत उत्साह होता, मनात अभिमान होता, आणि ओठांवर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा होती.
कार्यक्रमाच्या समारोपाला एक घोषवाक्य उच्चारले गेले – “समाजासाठी समर्पण, संस्कृतीसाठी मंदिर, आणि एकतेसाठी सोहळा” – हे घोषवाक्य केवळ घोषवाक्य नव्हतं, तर हे लेवे गुजर समाजाच्या स्वाभिमानाचं स्फूर्तिवाक्य ठरलं. ते ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी होतं – समाधानाचं, स्वाभिमानाचं आणि सामूहिक प्रयत्नांच्या यशाचं.
खारघरमधील ही वास्तू म्हणजे आजच्या समाजाला दिलेला एक आरसा आहे – जो सांगतो, की एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही. आजच्या फोडाफोडीच्या काळात ही वास्तू एकतेचा, समर्पणाचा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा स्तंभ ठरतो आहे. या कार्यामध्ये कोणाचं नाव असेल किंवा नसेल, त्याला महत्त्व नाही. महत्त्व आहे त्या भावनेचं – की मी समाजासाठी काहीतरी केलं, मी इतिहासाच्या निर्मितीचा भाग ठरलो.
या साऱ्याचा विचार करता, हा संपादकीय लेख म्हणजे केवळ कौतुक नव्हे, तर एक प्रेरणागाथा आहे. समाजाने आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवत वर्तमानात एक आशावादी आणि सशक्त पाऊल उचललं आहे. आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी त्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात समाजबांधवांना त्रिवार मुजरा करावा लागतो – ज्यांच्या श्रम, श्रद्धा, निष्ठा आणि आर्थीक समर्पणातून ही गौरवशाली वास्तू साकारली गेली.
Dhyeya News & सा. झुंज संपाद संदीप दा. महाजन, पाचोरा
M0.73 8510 8510

लेवे गुजर समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन जल्लोषात संपन्न –

Loading

खारघर, नवी मुंबई – समाजसेवेच्या प्रेरणेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकार झालेल्या लेवे गुजर समाज मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आणि लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळा ३० मे २०२५ रोजी सायंकाळी खारघर येथे दिमाखात आणि हजारो समाजबांधवांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला. सुमारे ८ कोटी रुपये खर्चून उभारलेले हे समाज मंदिर म्हणजे लेवे गुजर समाजाच्या एकतेचा, प्रयत्नशीलतेचा आणि सामाजिक समर्पणाचा भक्कम पुरावा आहे. मुंबईसारख्या महानगरात असे भव्य समाज मंदिर उभारणे ही स्वतःमध्ये ऐतिहासिक कामगिरी असून, हे मंदिर समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एक आधारकेंद्र ठरणार आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल) ) यांची उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख मंचावर भागवत विश्वनाथ पाटील (निंबोल) राजीव रघुनाथ पाटील, शांताराम महाजन (शिरपूर), नंदकिशोर भागवत महाजन (तांदळवाडी), रामभाऊ त्र्यंबक पाटील (निंबोल), अनिल श्रावण महाजन (वाघोदा), श्री किशोर जगन्नाथ पाटील (वाघोदा)अनिल दत्तात्रय पाटील (रावेर), बाळुभाऊ महाजन (लोणी), मनोज विनायक पाटील फोपनार
किशोर भगवान चौधरी (पिंपरी नांदु), श्रीराम गरबड महाजन (अंतुर्ली), श्री गणेश राजाराम पाटील (दापोरा ),अरूण नारायण पाटील (दापोरा), किरण रविंद्र पाटील (निंमदड), एन. व्ही. पाटील सर (ऐनपूर), प्रविण गंभीर पाटील (जळगाव), संजय राजाराम चौधरी (अहिरवाडी), शरद तुकाराम महाजन (अंतुर्ली), प्रदीप गंभीर पाटील (कुभांरखेडा), आर. एन. महाजन जामनेर कर(संभाजीनगर), नंदलाल पाटील सर (गोरगावले)
श्री विजय जगन्नाथ पाटील निंबोल,श्री विशाल गंभीर पाटील (केऱ्हाळा) डॉ संजय हरी पाटील (केऱ्हाळा)
यांचा उपस्थितीत समाजाला दिशा देणाऱ्या विचारांचे आणि अनुभवांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर व श्री भागवत विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
आणि ,सुनील एकनाथ पाटील (कुंभार खेडा)श्री सहदेव पाटील (चहार्डी) व राजेंन्द्र लक्ष्मण पाटील (हिवरखेडा) यांनी संपादन केलेली ही स्मरणिका समाजाच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा दस्तावेज आहे. कार्यकर्त्यांच्या समर्पणभावनेपासून समाजप्रमुखांच्या प्रेरणादायी लेखनापर्यंत विविध पैलूंनी समृद्ध असलेली ही स्मरणिका समाजासाठी एक अमूल्य ठेवा ठरली आहे.
सदर भुखंड मिळविणेसाठी श्री संजय मधुकर पाटील (वाघोदा) यांनी मदत केली.
या इमारतीच्या बांधकामासाठी श्री भाऊराव आनंदा महाजन कर्की ,व श्री विनायक नारायण पाटील जामनेर श्री ईश्वर रघुनाथ पाटील (दापोरा) याचं विशेष सहकार्य लाभले,श्री गणेश पाटील इंटिरियर डिझाईनर (एरंडोल) यांनी कुठलाही मोबदला न घेता मदत केली.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेटाने आणि उत्साहाने पार पाडले. अध्यक्ष जी. एम. पाटील, उपाध्यक्ष मोहन मोतिराम पाटील, सभापती भागवत हरी पाटील, सचिव रोहिदास देवचंद चौधरी, खजिनदार सुनील तुकाराम महाजन, सुनिल एकनाथ पाटील यांचे नेतृत्व कौतुकास्पद राहिले.
उपखजिनदार सुनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यकारी मंडळातील उपसभापती एन. एम. पाटील (परधाडे), उपसचिव के. टी. पाटील (दुसखेडा), श्री एल व्ही महाजन उपसचिव (वाघोदा), श्री राजेंद्र महाजन (उत्राण) श्री सुधाकर सिताराम पाटील (तादंलवाडी) श्री एम.डी.पाटील (एरंडोल)यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले.
सौ. क्रांती पाटील (जळगाव) आणि सौ. कविता महाजन (कल्याण) यांनी समालोचन करून कार्यक्रमास वैचारिक समृद्धी दिली.
सौ. साधना राजेंद्र पाटील (हिवरखेडा), शैलाताई चौधरी (अध्यक्ष, माहेर महिला मंडळ, जळगाव), सौ.संध्याताई रविंद्र पाटील (उपाध्यक्ष) यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.समांरभ यशस्वीपणे पार करणेसाठी श्री पवन पाटील अहिरवाडी, श्री दिपक रविंद्र पाटील ह.मु खारघर (चांगदेव), श्री निळकंठ चौधरी वाघोदा व महेश महाजन अहिरवाडी , श्री महेश महाजन (तादंलवाडी)
यांनी विशेष परिश्रम घेतले.उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात मंदिराच्या भविष्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. हे मंदिर केवळ धार्मिक विधींसाठी मर्यादित न राहता शैक्षणिक, आरोग्यविषयक, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, वृद्धांसाठी आधार सेवा यांसारख्या उपक्रमांचे केंद्र राहणार आहे. दिशा-दर्शन, आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, समाजजोडणी उपक्रम इत्यादींचा येथे सातत्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक, संभाजीनगर, पुणे व जळगाव येथील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून लेवे गुजर समाजबांधवांनी उपस्थिती लावली. एकमेकांना भेटण्याचा, सामाजिक बंध दृढ करण्याचा आणि भावनिक नाते घट्ट करण्याचा हा सुवर्णक्षण ठरला. एकात्मतेची आणि ऐक्याची भावना या कार्यक्रमातून उमटताना दिसली लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पार पडलेला हा लोकार्पण सोहळा म्हणजे समाजाच्या स्वाभिमानाचा, बंधुत्वाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेल्या सामूहिक पावलांचा प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी “समाजासाठी समर्पण, संस्कृतीसाठी मंदिर, आणि एकतेसाठी सोहळा” या घोषवाक्याचा गजर करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यकारी मंडळाच्या वतीने सर्व समाजबांधवांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन समाजाच्या स्वाभिमानात भर टाकल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!