Breaking

रब्बी हंगामासाठी गिरणेतुन तीन आवर्तन सुटणार ना.गुलाब भाऊंच्या प्रयत्नांना यश

0

भडगाव (ध्येय न्युज ब्युरोचिफ सागर महाजनसह प्रतीनिधी माधव जगताप

जळगाव दि.8 – पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने गिरणा नदीचे एक अधिकचे आवर्तन उद्याच सुटणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गिरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यात ना.पाटील यांनी एक आवर्तन अधिकचे सोडण्यात यावे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सदर बैठ्कीस ना.गुलाबराव पाटील यांच्या समवेत दिंड़ोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार, आ.चिमणराव पाटील, आ.अनिल पाटील नांदगावचे आमदार सुहास कांदे, गोपाळ चौधरी आदी उपस्थीत होते.
सदर बैठकीत गिरणा कालवा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तनांचे नियोजन केले असल्याचे मंत्री महोदयांना सांगितले. परंतु शेतकऱ्याची बिकट परिस्थिती पाहता ना.पाटील यांनी एक आवर्तन अधिकचे सोडण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. त्याची दखल घेत गिरणेचे एक आवर्तन उद्याच सोडण्यात येणार आहे.
या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.वंजारी, कार्यकारी अभियंता श्री.बहरे, उप अभियंता श्री.अत्तरदे, श्री.कोळंबे हे अधिकारी उपस्थीत होते. प्रकल्प आवर्तनाचे सादरीकरण योगेश पाटील यांनी केले.

*शेतकऱ्यांना आनंद*

वाढीव आवर्तन हे उन्हाळ्यात येत असल्यामुळे विहिरिंची खालावलेली जल पातळी वाढुन हंगामी पिकांना मोठा फ़ायदा होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात अधिक आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here