Breaking

भडगावात “माऊली रक्तदान शिबिरा”त १९० रक्तदात्यांचा सहभाग” (ध्येय न्युज ब्युरो चिफ सागर महाजनसह प्रतिनीधी माधव जगताप)

0

भडगाव – गेल्या ४ वर्षांपासून भडगाव शहरव परिसरात विविध सामाजिक, विधायक व कृतीशील उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने संत गाडगेबाबा जयंती निमित्त ” माऊली रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला भडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १९० रक्तदात्यांनि रक्तदान केले. भडगाव शहरात आयोजित एखाद्या शिबिरास एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रथमच मिळाला. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.भडगावातील भवानी बागेसमोर असणाऱ्या निदान हॉस्पिटलमध्ये दि. २३ फेब्रुवारी ( रविवार ) रोजी संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन माऊली फाउंडेशन चे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या मातोश्री गुंताबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. गेल्या दोन वर्षात घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे यंदाच्या शिबिरात अधिकाधिक रक्तदाते सहभागी होतील, यादृष्टीने फाउंडेशनचे महिनाभरापासून प्रयत्न सुरु होते. शिबिरात मंगला व युवराज सूर्यवंशी, पल्लवी व देवेंद्र पाटील, शीतल व दीपक पाटील तसेच आशाबाई व मांगो महाजन या दाम्पत्यानी जोडीने रक्तदान केले. रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी होण्यासाठी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह अनेक महिला, व्यावसायिक , शेतकरी , शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. यात १८ वर्षाच्या तरुणांपासून ते ७३ वर्षाच्या वृद्धांनी ही उपस्थिती दिली.मात्र काहींना प्रकृतीच्या व इतर कारणाने नकार देण्यात आला. इच्छुक रक्तदात्यांना आवाहन करण्यासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते हाजी जाकीर कुरेशी, योगेश शिंपी यांनी कॉर्नर सभा घेत इच्छूक रक्तदात्यांच्या गृहभेटी घेतल्या. तर प्रतिभा कुळकर्णी, मनिषा पाटील, करीमा खान, पूनम अग्रवाल, संजय सपकाळे, आनंद चावरेकर यांनी रक्तदात्यांच्या नोंदणीचे काम केले. युवराज सूर्यवंशी, रविंद्र कुळकर्णी, सागर सूर्यवंशी, सागर

निकुंभ, डॉ.निलेश महाजन, पवन पाटील, गजेंद्र पाटील, वैशाली
पाटील, वैशाली शिंदे , लक्ष्मीबाई सूर्यवंशी, पल्लवी पाटील, दीपमाला शिंपी, डॉ.स्मिता महाजन, डॉली पाटील, आकाश पाटील,एकनाथ पाटील, विशाल सोनवणे शंकर मोरे,प्रकाश पाटील,गणेश पाटील,भाग्यश्री पाटील, सोनाली थडकर, सुजित दूडे,सौरभ देशमुख, प्रतीक जैन शोभाबाई महाजन , सचिन महाजन यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम
घेतले.
सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना कॉफी, बिस्किटे, सुका मेवा, फळं तसेच सहभागाबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले .
समारोप प्रसंगी सलग तिसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केले. त्याबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने माऊली फाउंडेशन चा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here