Breaking

पाचोरा महिला दिनानिमित्त स्वामी समर्थ सेवा मार्गाकडून आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिर

0

पाचोरा – झुंज & ध्येय न्युज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार स्वामी समर्थ सेवा मार्गाने पाचोरा येथील संघवी कॉलनी सेवा केंद्रात मुली आणि महिलांसाठी एका दिवसाचे आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले. या शिबिरात कु. गौरी पाटील ,कु.राधिका पाटील ,कु. तेजस्विनी भोई, कु. गायत्री चव्हाण यांच्यासह या प्रशिक्षणात 300 हून अधिक उत्साही महिलांनी सहभाग घेऊन आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःला सक्षम बनवण्याची दिशा निश्चित केली.
सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी अनुभवी आणि कुशल प्रशिक्षकांची टीम नियुक्त करण्यात आली होती लाठी-काठी आणि कराटे या दोन्ही शास्त्रांमध्ये प्रशिक्षण दिले गेले आत्मरक्षणाची मूलभूत माहिती आणि विविध तंत्रांचा सराव करण्यावर भर देण्यात आला समारोप प्रसंगी वैशालीताई पाटील, भाग्यश्री गणेश पाटील, आशाताई भुजेंग, सोनाली देवरे, वैशाली महाजन, सुभाषदादा पाटील,राजू काळे, मनीष बाविस्कर,
राम जळतकर ,राजपूत सर, प्रा.डी पी.वाणीसर, सुधीर महाजनसर ,गजेंद्र चौधरीसर ,राहुल सर , सौ. नंदा मिस्त्री ताई, सौ. महाजन ताई
यांच्यासह अनेक भावीक मान्यवर नागरिक उपस्थितीत होते
या कार्यक्रमामध्ये, समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या पाच महिलांचा मार्गातर्फे सत्कार करण्यात आला.या सत्कारांद्वारे इतर महिलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महिलांनी प्रशिक्षणाचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी मागणी केली प्रशिक्षकांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना सतत सराव करण्याचे आवाहन केले.
स्वामी समर्थ सेवा मार्गाने महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित केलेले हे आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिर निश्चितच एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, आणि त्यांना स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता प्राप्त झाली. स्वामी समर्थ सेवा मार्गाने अशा उपक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या शिबिरातून महिलांमध्ये सकारात्मक बदल घडून येतील आणि त्या समाजात अधिक सक्षम होण्यास मदत होईल अशा उपस्थीताकडून प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here