Breaking

व्यक्ती एक भूमिका चार ; नाव आहे मुफ्ती हारून…! – सुरेश उज्जैनवाल

0

” जिवन, मानवी प्रतिष्ठेचा आदर,
विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर.. या सह
धर्म आणि विवेकाच्या स्वातंत्र्याचा आदर… असा आपल्या भूमिकेचा सिद्धांत सातत्याने मांडणारे मुस्लिम धर्म गुरू जळगाव चे मुफ्ती हारून नदवी
यांचा आज वाढ दिवस. ते आज वयाच्या ४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढ दिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन….
मुफ्ती हारून एक उत्तम धार्मिक प्रवचनकार, निर्भिड पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता आणि सांसारिक व्यक्ती आहेत.अल्पावधीत या व्यक्तीने आपल्या प्रभावी आणि वेगळ्या वक्तृत्व शैलीने आपला जबरदस्त ठसा मुस्लिम समाजावर निर्माण केला आहे. केवळ भारतातच नव्हे तर मध्य पूर्वेच्या ( सौदी अरेबिया) देशात धार्मिक प्रवचनकार म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. भारतातील केरळ राज्य वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये त्यांना मुस्लिम समुदाया कडून प्रवचनासाठी बोलावले जाते. आकर्षक आणि प्रभावी वक्तृत्व शैली उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, अरबी आणि फारसी (पर्शियन ) या भाषा त्यांना अवगत आहेत. रावेर ही त्यांची जन्म भूमी असून प्राथमिक शिक्षण रावेर येथे तर उर्वरित शिक्षण तत्कालीन औरंगाबाद आणि उच्च शिक्षण लखनऊ येथे झाले. त्यांनी उर्दू आणि अरबी या भाषेत एम.ए . केले आहे. इस्लाम धर्मा विषयीचा अभ्यास आणि गुणवत्ता बघून त्यांना मुफ्ती ही धर्म गुरू ची पदवी १९९७ मध्ये बहाल करण्यात आली. तेव्हा पासून त्यांनी धार्मिक प्रवचनकार म्हणून स्वत: ला वाहून घेतले आहे. मुस्लिम धर्म गुरूंचा जिल्ह्यातील इतिहास पहाता ते पहिलेच धर्म गुरू असावेत ज्यांची प्रवचने देश आणि देशाबाहेर ऐकली जातात किंवा त्यांना आमंत्रित केले जातात.
…. इतर धर्मीय संत, साधू, मुनीं शी जवळ चे सबंध…
मुफ्ती हारून हे राष्ट्रीय एकता सद्भावना मिशन दिल्ली चे सक्रिय सदस्य असून राष्ट्रीय एकता मिशन च्या माध्यमातून विविध धर्मीय साधू, संत,मुनी यांच्या संपर्कात ते असतात, विशेषत: जैन मुनी कमल मुनिजी महाराज, बाबा सत्यनारायण दास जी, बलसाड (गुजरात)चे श्री.शिवजी महाराज, संभाजी शिर्के महाराज, दिवंगत भय्युजी महाराज यांच्याशी ही घनिष्ठ संबंध होता.
वढोदे (फैजपूर) येथे डिसेंबर २०२२ मध्ये संत जनार्दन स्वामी यांनी भरविलेल्या समरसता कुंभ मध्ये येवून संत जनार्दन स्वामी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या .
मुफ्ती हारून केवळ धर्मोपदेशक नव्हे तर समाजातील युवका चांगले नागरिक कसे घडतील या साठी मार्गदर्शन करतात, विशेषत: शिक्षणा शिवाय प्रगती नाही हे ते आपल्या भाषणातून उत्तम रित्या पटवून देतात.समाजात वाढती व्यसनाधीनता हा त्यांच्या साठी चिंतेचा विषय असून धार्मिक शिकवणी बरोबरच व्यसन मुक्तीची चळवळ ही त्यांनी सुरू केली आहे. त्या साठी इस्लाम धर्माने कोणतेही अमली पदार्थ सेवन करणे निषिद्ध ठरविले आहे. आपला धर्म आज्ञाधरकपना शिकवितो,आदर,प्रेम,परोपकार, शांतता, सुरक्षितता आणि सर्वांची समृध्दी हाच “इस्लाम”शब्दाचा शाश्वत अर्थ असल्याचे ते प्रवचनाच्या माध्यमातून पटवून देतात. ईकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये ते १४ वर्ष अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवीत होते.
….. व्हायरल न्युज चे १५ लाख सब क्रायबर….
मुफ्ती हारून नदवी गेल्या सात वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत, नदवी टाइम्स या नावाचे साप्ताहिक सह त्यांनी ऊर्दू हिंदीत सुरू केलेलेस्वत:चे न्युज पोर्टल( यु ट्यूब चॅनल) कमालीचे लोक प्रिय झाले आहे, त्यांच्या न्युज पोर्टलचे
१५ लाखा पर्यंत दर्शक असून हा एक विक्रमच म्हणता येईल. ते स्वत: न्युज एंकर प्रमाणे बातम्या सांगतात, त्यात देश विदेशातील बातम्या विश्लेषणसह सांगण्याची पद्धत फारच आगळी वेगळी असते.विशेष म्हणजे ते कागदावर बातम्या लिहून सांगत नाही,तर घडलेल्या घटना, प्रसंगाचे वर्णन संवाद पद्धतीने सांगता. विशेष म्हणजे ते आठवड्याचे
पाच दिवस दौऱ्यावर, प्रवासात असतात,पण दैंनदिन बातम्या देण्यात कधी ही खंड पडला नाही. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांची धडाडी लक्षात घेवून पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप काळे साहेब यांनी त्यांना तीन वर्षांपूर्वी संघटनेच्या ऊर्दू विंगचे राष्ट्रिय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
….. हा देखिल एक योगायोग….
मुफ्ती हारून यांचा वाढ दिवस १२ मार्च …आणि १२ मार्च पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र मास रमजान सुरू होत आहे. ते अत्यंत मिळाऊ आणि नम्र असून आपल्या धर्मासह इतर धर्मा बद्दल ही त्यांच्यात आदरभाव दिसून येतो … ⭐ या सोबत एक आठवणीने त्यांच्या बाबत सांगवेशे वाटते ते त्यांच्या प्रत्येक सभेत पुढील शेर सांगण्यास विसरत नाही म्हणुनच ते सर्व जाती- धर्मिय संत महात्मे, राजकीय, शासकीय, सामाजीक स्तरावर प्रत्येक घटकाशी संलग्न आहेत किंबहुना त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत

“दुनिया में अमन प्यार के क़िस्से लिखेगा कौन,
आपस में कट मरेंगे तो आखिर बचेगा कौन 
होंगे ना तुम तो लाएंगे तुमसा कहाँ से हम होंगे ना हम तोआपको भाई कहेंगा कौन” 

या मित्रास वाढ दिवसाच्या मन: पूर्वक शुभेच्छा…
-सुरेश उज्जैनवाल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here