Breaking

जागतिक महिला दिवस शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उत्साहाने साजरा

0

झुंज & ध्येय न्युज पाचोरा, 12 मार्च: शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, पाचोरा येथे नुकताच जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सीमा पाटील, तालुका एज्युकेशन ऑफिसर, पाचोरा, सौ. संगीता रवींद्र पाटील, सरपंच, गोराडखेडा, सौ. कल्पना ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच, गोराडखेडा, सौ. सुरेखा जोशी, मुख्याध्यापिका, कालीदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा, श्री. निलेश पांडे, संस्थेचे सचिव आणि श्री. डी. ए. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या पूजनेने झाली. त्यानंतर

आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. श्री. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक करताना महिला विषयी समाजाची मनोवृत्ती आणि समस्यांवर मार्गदर्शन केले.सौ. सीमा पाटील यांनी महिलांचे कर्तृत्व आणि धाडस या विषयावर उपस्थित महिला वर्गांशी संवाद साधला. त्यांनी

उपस्थित महिलांना मोलाचे संदेश देत आजकाल महिलांनी आपला जास्त वेळ मोबाईल आणि टीव्हीवरील मालिका बघण्यात न घालवता तो वेळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन केले. महिलांनी फक्त फुल आणि घर यामध्ये न गुंतता मुलांवर आध्यात्मिक संस्कार करून मुलांमध्ये एकत्र

कुटुंब रुजवावे असे सांगितले.सौ. सुरेखा जोशी यांनी महिलांचे सशक्तीकरण कसे करता येईल यावर भर दिला. याप्रसंगी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, मेडल आणि कॉफी प्रदान करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी महिलांवर आधारित भाषणे आणि गीत-नाटिका सादर करून महिलांप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमासाठी

मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.श्री. निलेश पांडे यांनी सलग चौदा वर्ष दहावीचा निकाल शंभर टक्के लागला याबद्दल कार्यक्रमातून महिला शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. महिला शिक्षकांनी या कार्यक्रमात एक नाटिका सादर केली त्यातून त्यांनी महिलांचे गुणगान गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. स्मिता जगताप आणि सौ. कल्पना पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. एन. डी. पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here