जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी कामाला लागा=राष्ट्रवादी आढावा बैठकीत जिल्हा निरीक्षक भास्कर काळे यांचे आवाहन

0

पाचोरा – निवडणुकांची रणधूमाळी सुरू होत असून जळगाव जिल्ह्या शरदचंद्र पवारांना मानणाराअसल्याने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी कंबर कसून कामाला लागा.  पक्ष संघटनाचा पाया मजबूत ठेवा. स्थानिक समित्या प्रबळ करा असे आवाहन करून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासात्मक निर्धार  पक्षाचे जिल्हा निरीक्षक भास्कर काळे यांनी केले.विधानसभा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 17 रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
निरीक्षक भास्कर काळे यांच्या उपस्थितीत व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली महालपुरे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक झाली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी , शिवकुमार देवकाते , संजय वाघ , खलील देशमुख , व्ही टी जोशी , डॉ संजीव पाटील , शिवदास पाटील , अशोक पाटील , सुरेश पगारे , राजेंद्र पाटील ,सागर अहिरे , सिताराम पाटील ,एन सी पाटील , प्रकाश भोसले , प्रकाश पाटील , संग्रामसिंग सूर्यवंशी , भूषण वाघ  , राहुल पाटील , भगवान मिस्तरी , सतीश चौधरी , मधुकर पाटील , ललित वाघ , वासुदेव महाजन , अशोक मोरे ,  अजहर खान ,सत्तार पिंजारी, भागवत महालपुरे , शिवा पाटील , सागर पाटील , अशोक पाटील , बाळकृष्ण पाटील , सुदाम वाघ ,सुधीर पाटील , कुंदन पाटील ,हेमराज पाटील ,राहुल पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते. निरीक्षक भास्कर काळे यांचा दिलीप वाघ यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते दिलीप वाघ यांचा सत्कार करण्यात आला. भास्कर काळे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यां कडून पक्ष संघटन व विविध समित्या संदर्भातील तालुका निहाय आढावा घेतला.
शालिग्राम मालकर यांनी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावा संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी भूषण पाटील ,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळावी असा संकल्प निरीक्षकां समोर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
दिलीप वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतात ही आरपारची लढाई असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. धनशक्ती विरुद्ध साम दाम दंड भेद नितीने लढण्याचा  निर्धार करून आमदार किशोर पाटील यांच्या एकूणच कारकिर्दीवर व ध्येयधोरणांवर  टीका केली.आडवा बैठकीनंतर शिवकुमार देवकाते यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्यभरातील पक्षाच्या वाढत असलेल्या प्रभावा संदर्भात माहिती दिली. शालिग्राम मालकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ माणिक पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here