आई सप्तश्रृंगी माता मंदिराचा जिर्णोद्धार आणि पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

0

पाचोरा (कृष्णापुरी): श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी मंदिराचा जिर्णोद्धार व पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, शोभायात्रा, होमपूजा, वास्तुपूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात: सोहळ्याची सुरुवात १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कळस व शोभायात्रेने होणार आहे. शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून, देवीच्या पालखीचे उत्साहात दर्शन घडणार आहे.मुख्य विधी: १६ ऑक्टोबर रोजी होमपूजा आणि वास्तुपूजा होणार असून, १७ ऑक्टोबर रोजी पुनःप्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी पार पडेल. त्यानंतर पूर्णाहुती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती: या पवित्र सोहळ्याला महंत विष्णूदासजी महाराज (राममंदिर संस्थान, पाचोरा) आणि प.पू. गोविंदगिरी महाराज (नवनाथ आश्रम, जुवार्डी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.भक्तीमय कार्यक्रम: १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. ज्योतीताई पाचोरेकर व ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर यांचे किर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे.
श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ कृष्णापुरी, पाचोरा यांनी सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन पुण्य प्राप्त करावे, असे आवाहन केले आहे.
या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे व आशीर्वाद मिळवावा, असे आयोजकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here