पाचोरा – शहरात रात्रीच्या वेळी गेल्या दोन दिवसापासून क्रुझर आणि त्यामध्ये लॅपटॉप व टॅब हाताळणारे युवक संशयितरित्या फिरताना दिसून येत आहेत.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून पाचोरा शहरातील गो. से. हायस्कूल पासून पुनगाव रोडवरील सार्वजनिक लाईट बंद आहेत. त्याचा फायदा घेत गो. से. हायस्कूल भिंतलगत दि. 16 रोजी पत्रकार संदीप महाजन आपल्या निवासस्थानी जात असताना 10 ते 12 युवकांनी भरलेली एक क्रुझर गाडी आढळून आली. डी.वाय.एस.पी. ऑफिस समोर मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रूम, मतमोजणी व निवडणूक कर्मचारी कार्यालय असल्याने शंका आली परंतु कृषी उद्योग महामंडळाचे गोडाऊन निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे असल्याने पहिल्या दिवशी त्या कामकाजासाठी आलेले कोणी व्यक्ती असतील.. म्हणून महाजन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु तीच गाडी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच जागी उभी असल्याने दिसुन आले त्यामुळे पत्रकार महाजन यांना गौण खनिज माफीया असल्याचा संशय आला. त्यांनी त्या गाडीवर पाळत ठेवली, थेट सारोळा रोडवरील समर्थ लॉन्सच्या बाजूला असलेल्या प्रांगणात क्रूझर उभी असल्याचे दिसुन आले. मात्र क्रुझर चे सर्व लाईट व दरवाजे बंद असून आत मध्ये मात्र तीन लॅपटॉप व एक टॅब सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे पत्रकार महाजन यांनी स्वतः क्रुझर जवळ जात संबंधीत व्यक्ती चौकशी केली असता त्यांनी नांदगाव येथील असून लग्नाला आलो असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे क्रुझर वर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नव्हती, व समर्थ लॉन्स मध्ये विवाह देखील नव्हता. म्हणून सदरची क्रुझर व त्यामधील व्यक्ती संशयास्पद असून EVM हॅक नावाने लुट करणारी गँग तर नसावी..? किंवा एखाद्या उमेदवराने यु ट्युब करीता ट्रोल करणारी टीम कार्यरत तर नसावी असा संशय पत्रकार संदीप महाजन यांनी व्यक्त केला आहे. कारण निवडणूक काळात EVM हॅकच्या नावाने लूट करणाऱ्या टोळ्या पण मोठ्या प्रमाणात कार्यरत होतात. याची अनेक उदाहरणे यापुर्वी उघडकीस आले आहेत. म्हणून राजकीय क्षेत्रातील सर्वच उमेदवार व त्यांच्या संबंधित अशा बाबींपासून सावध राहाणे आवश्यक आहे. तर या क्रुझर संदर्भात सविस्तर तपास प्रशासनाकडून केला जावा. अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.