पाचोरा -आज मंगळवार, 10 डिसेंबर 2024
शेतकऱ्यांचा भाजीपाला लिलावात अगदी कमी दराने विकला जात असताना बाजारात ग्राहकांना मात्र याच भाजीपाल्याला अधिक किंमत मोजावी लागते.असे परिस्थिती पाचोरा शहरात दिसत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना मिळणारे कवडीमोल भाव आणि ग्राहकांच्या खिशावर बसणारा भार यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. या परिस्थितीचा बेरोजगार तरुणांनी विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा माल आणि बाजारात ग्राहकांना मिळणाऱ्या भावांची तुलना केली असता, भाजीपाल्याचा दर हा शेतमालाची प्रत, साठवणूक, वाहतूक खर्च, आणि मधला दलालीचा भाग यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. हे निश्चित परंतु दर , खर्च , दलाली & नफा याला देखिल मर्यादा आहेत
सर्वत्र जळगाव जिल्हयात लिलावातील शेतमालाचे भाव बघीतले तर
आज शेतकऱ्यांच्या लिलावात भाजीपाल्याचे 1 कॅरेटचे व KG चे भाव खालीलप्रमाणे होते:
सफेद वांगी: ₹150 – ₹200
लाल वांगी: ₹100 – ₹150
भरीत वांगी: ₹100 – ₹200
कारले: ₹20 – ₹25
गिलक (डोंडकं): ₹20
दोडके: ₹25 – ₹30
चवळी: ₹25
वाल: ₹8 – ₹12
गवार: ₹40 – ₹50
भेंडी: ₹25 – ₹30
टमाटे: ₹400 – ₹500
जाड मिरची: ₹30 – ₹35
बारीक मिरची: ₹25 – ₹30
खिरे: ₹8 – ₹12
दुधी भोपळा: ₹100 – ₹200
कटूरले: ₹70 – ₹90 प्रति किलो
पोकळा: ₹5 – ₹8 प्रति जोड
मिश्रित भाजीपाला कॅरेट: ₹100 – ₹150
ग्राहकांच्या खिशावर ताण
सर्वसामान्य बाजारात मात्र या भाजीपाल्याचे दर दुप्पट – तिप्पट किंवा त्याहून अधिक असतात. उदाहरणार्थ, लिलावात ₹25 च्या आसपास असणारी भाजी बाजारात ₹50-₹60 च्या दराने विकली जाते. टमाट्याचा विचार केला तर, शेतकऱ्यांना ₹400 च्या आसपासचा दर मिळतो; मात्र ग्राहकांना तो ₹600-₹800 पर्यंत मोजावा लागतो.
मध्यस्थ दलालांचा प्रभाव
शेतकऱ्यांच्या उत्पादनांपासून बाजारापर्यंतच्या प्रवासात मध्यस्थ दलाल आणि वाहतूक यंत्रणा मोठी भूमिका बजावतात. शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्याने त्यांचे उत्पन्न मर्यादित राहते, तर ग्राहकांना महागाईचा फटका बसतो.
बेरोजगार तरुणांसाठी संधी
ही परिस्थिती बदलण्यासाठी बेरोजगार तरुणांनी थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मॉडेल राबविण्याचा विचार करावा. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळेल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात माल उपलब्ध होईल. तसेच, स्थानिक स्तरावर विक्रीव्यवस्था उभारल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
शेवटचा विचार
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा आणि ग्राहकांनाही स्वस्तात भाजीपाला मिळावा, यासाठी सरकारनेही पुढाकार घेऊन दलाली टाळण्यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. शेती हा देशाचा कणा असून त्याला बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्रित होऊन स्वतः किरकोळ विक्रीची आवश्यकता आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.