ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, क. ब. चौ. उमवी, जळगाव, आणि केळी तंत्रज्ञान व विस्तार केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी शेतकरी सहायता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. भागवत भाऊ पाटील होते. प्रारंभी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी प्रास्ताविक करत कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. बबनराव काकडे, प्रांत अधिकारी, फैजपूर विभाग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुक्ताईनगर मतदारसंघाचे मा. आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य प्रकारे वापर करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मा. श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष मा. आर. एन. महाजन, संचालक मा. हरी भिका पाटील, मा. एन. व्ही. पाटील, मा. विकास भाऊ महाजन, मा. जगन्नाथ शामु पाटील, मा. डी. के. महाजन, मा. डॉ. सतीश पाटील, मा. काशिनाथ शामु पाटील, तसेच ऐनपूर गावाचे सरपंच मा. श्री. अमोल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यशाळेचे चार सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्रात मा. बबनराव काकडे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत हायटेक शेतीच्या महत्त्वावर भर दिला. अध्यक्षीय भाषणात मा. भागवत भाऊ पाटील यांनी दर्जेदार केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.द्वितीय सत्रात प्रा. अंजली मेढे, मृदा वैज्ञानिक, केळी संशोधन केंद्र, निमखेडी, जळगाव यांनी “केळी पिकासाठी जमिनीची काळजी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात प्रा. डॉ. व्ही. टी. गुजर, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, निमखेडी, जळगाव यांनी केळी पिकावरील रोग आणि चिलिंग दुष्परिणाम नियंत्रण याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.चौथ्या सत्रात प्रा. महेश महाजन, कृषी विज्ञान केंद्र, पाल यांनी पपई, टरबूज आणि मका या पिकांवरील रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला एकूण १५० शेतकरी, त्यात १३० पुरुष आणि २० महिलांचा सहभाग होता.कार्यशाळेचा समारोप संस्थेचे उपाध्यक्ष मा. आर. एन. महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आला. आपल्या समारोपपर भाषणात त्यांनी महाविद्यालयामार्फत शैक्षणिक उपक्रमांसोबतच समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी कसे लाभदायक ठरेल, यावर भर दिला. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. कार्यशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत उत्पादनवाढीसाठी प्रभावी मार्गदर्शन करणे हा होता, जो यशस्वीपणे साध्य करण्यात आला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
I’m impressed, I must say. Actually rarely do I encounter a blog that’s both educative and entertaining, and let me inform you, you’ve got hit the nail on the head. Your concept is outstanding; the problem is something that not sufficient individuals are talking intelligently about. I am very glad that I stumbled throughout this in my search for something relating to this.