भारतासह तब्बल 51 देशात कार्यरत असलेल्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या पाचोरा कार्यकारिणीचा जाहिर सत्कार

0

पाचोरा : जगातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पाचोरा तालुक्यातील नवनिर्वाचित कार्यकारिणीचा जाहिर सत्कार समारंभ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. समता सैनिक दलाच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
     संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष श्री. कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर

करण्यात आली आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचा समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात येणार आहे.
    पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली ‘व्हाईस ऑफ मिडिया’ ही संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संघटनेची मोठ्या प्रमाणावर व्याप्ती वाढत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने

राज्यातील ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या हक्कांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
   श्री. अनिल म्हस्के यांनी ११ मार्च २०२३ रोजी बारामती येथे झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी यापूर्वी विदर्भ अध्यक्ष आणि राज्य उपाध्यक्ष पदांवर कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांसाठी विमा सुरक्षा कवच, समस्या निवारण परिषद, तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले गेले आहेत.
        पाचोरा तालुक्यातील नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीतील सदस्यांना संघटनेच्या उद्दिष्टांनुसार कार्य करण्यासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. समता सैनिक दलाच्या वतीने

त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या उपक्रमांचा जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील थोडक्यात आढावा –
संघटनेने पत्रकारांसाठी राबविलेले महत्त्वाचे उपक्रम हे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
विमा सुरक्षा योजना: पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी विमा सुविधा.
प्रशिक्षण कार्यशाळा: पत्रकारांना नवीन तंत्रज्ञान व कायद्याची माहिती देण्यासाठी शिबिरे.
यापूर्वी शिर्डी येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.                                                             .जागतिक पातळीवरील पत्रकारितेची स्थिती

अत्यंत गंभीर आणि आव्हानांनी भरलेली आहे. सत्य आणि निर्भीड पत्रकारितेला दुय्यम स्थान देत अनेक देशांमध्ये सोयीस्कर पत्रकारितेला प्राधान्य दिले जात आहे. जिथे पत्रकार किंवा माध्यमसंस्था लोकांसाठी काम करतात किंवा चळवळ म्हणून कार्यरत राहतात, तिथे त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत, जगभरातील पत्रकार ‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या छत्राखाली एकत्र येत आहेत.                                           ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी डलास येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेवेळी हे मत व्यक्त केले. या परिषदेत ५१ देशांतील ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष सहभागी झाले होते. या परिषदेत पत्रकारितेला संरक्षण देण्यासाठी सर्व देशांनी नवीन नियमावली तयार करावी, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.                                         जागतिक परिषदेत विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी या परिषदेत झिम्बाब्वेचे अध्यक्ष त्सित्सी पी. मशिरी, इथिओपियाचे अध्यक्ष त्सेगेये वोंडवोसन बेकले, बांगलादेशच्या अध्यक्ष फरजाना बिंते हुसैन, केनियाच्या अध्यक्ष किंगवा कामेनकू, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हसीबुल्ला सादात, नेपाळच्या अध्यक्ष सुष्मा गौतम, मोरोक्कोचे अध्यक्ष सामी एल मौदनी, नेदरलँड्सचे अध्यक्ष अयाझ उर रहमान, म्यानमारचे अध्यक्ष मोहम्मद झोनाईद आणि पॅलेस्टाइनचे अध्यक्ष यूसुफ हबाश यांसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.                               परिषदेत बोलताना संदीप काळे म्हणाले, “आधुनिक काळात अनेक देशांमध्ये सरकारे व राजकीय शक्ती पत्रकारांवर दबाव टाकत आहेत. पत्रकारांना धमक्या, अटक, सेन्सॉरशिप यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. युद्धप्रसंग असो किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन असो, पत्रकार सातत्याने जीव धोक्यात घालून काम करत आहेत.”
         “डिजिटल माध्यमांच्या उदयानंतर पारंपरिक माध्यमांची आर्थिक स्थिरता कमकुवत झाली आहे. कमी वेतन, अस्थिर नोकऱ्या, ठोकठोक करारावर आधारित रोजगार हे गंभीर मुद्दे बनले आहेत. फेक न्यूज आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर यामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांना ऑनलाईन ट्रोलिंग, धमक्या व हिंसेला सामोरे जावे लागते.”  संदीप काळे यांनी २०२३ मधील पत्रकारांच्या स्थितीवर प्रकाश टाकत काही धक्कादायक आकडे सादर केले:१२० पत्रकारांचा मृत्यू: काम करताना मृत्यूमुखी पडले.५४७ पत्रकार तुरुंगात: सत्य मांडल्यामुळे कारावास.४००० पत्रकारांची नोकरी गमावली: सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे.३५०० पत्रकार हिंसा व धमक्यांचा सामना करत आहेत.याशिवाय, चीनमध्ये १२१ पत्रकार तुरुंगात आहेत, तर म्यानमारमध्ये ६९ पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. ६,५०० गुणवत्ता असलेल्या पत्रकारांना त्यांच्या बेधडक लिखाणामुळे नोकऱ्या दिल्या जात नाहीत.                                           संदीप काळे यांनी पुढे सांगितले की, “‘व्हाईस ऑफ मिडिया’ ही पत्रकारांसाठी केवळ एक संघटना नसून चळवळ बनली आहे. पत्रकारांनी एकत्र येऊन या व्यासपीठाचा आधार घ्यावा. पत्रकारितेच्या हक्कांसाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना समर्थन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेचे पुढील अधिवेशन २५ मार्च २०२५ रोजी जपानमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.’व्हाईस ऑफ मिडिया’च्या या परिषदेत पारित ठरावानुसार, सर्व देशांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी नवीन नियम व कायदे तयार करणे आवश्यक आहे. सत्य मांडणाऱ्या आणि निर्भीड पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ही लढाई चालूच राहील, असा निर्धार पत्रकारांनी व्यक्त केला.                                           पाचोरा येथील कार्यक्रमाचे विशेषत्व हा सत्कार समारंभ फक्त औपचारिकता न राहता पत्रकारांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील पत्रकार व मान्यवर एकत्र येऊन संवाद साधतील व पत्रकार संघटनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे राबवले जाईल.
कार्यक्रमाचे तपशील
दिनांक: रविवार, ५ जानेवारी २०२५
वेळ: सकाळी ११ वाजता
स्थळ: शासकीय विश्रामगृह, पाचोरा
कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here