दोंडाईचा श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – दोंडाईचा जि धुळे ता. २ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलांच्या एकात्मतेचा आणि सौभाग्याचे प्रतीक असलेल्या हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. राऊळ नगर येथील शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात संक्रांतीच्या निमित्ताने

पारंपरिक पद्धतीने तिळगूळ वाटप आणि विशेष भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
   समाजातील दिवंगत बांधवांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शितलताई राजेंद्र कोंटुरवार, प्रतिष्ठित समाजसेवक श्री. राजेंद्र कोंटुरवार, तसेच इतर प्रमुख

पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
    संक्रांत हा केवळ सण नसून समाजातील बंधुभाव वाढवण्याचा संदेश देणारा मंगल काळ असतो. या निमित्ताने महिलांसाठी विशेष सन्मान आणि भेटवस्तूंचे आयोजन करण्यात आले होते. महिला मंडळाच्या वतीने उपस्थित महिलांना “सनमाईकाईकाई” या आकर्षक पूजेच्या पाटांचे वितरण करण्यात आले. ही भेट केवळ स्मृतीचिन्ह नव्हे, तर समाजातील एकता आणि

धार्मिक संस्कृती जोपासण्याचे प्रतिक ठरली.
      या प्रसंगी श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शितलताई कोंटुरवार, श्री. राजेंद्र कोंटुरवार, समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग शिंपी, अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी मध्यवर्ती संस्थेचे प्रा. प्रकाश भांडारकर, माजी अध्यक्ष श्री. हरीदास जगताप, सेक्रेटरी श्री. चंद्रकांत कापुरे, सह सचिव श्री. राजेंद्र कोंटुरवार, तसेच अनेक समाजबांधव उपस्थित होते.
    महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या

यशस्वितेसाठी मेहनत घेतली.
अध्यक्षा: सौ. शितल राजेंद्र कोंटुरवार
उपाध्यक्ष: सौ. पुनमताई नरेंद्र साळुंखे
खजिनदार: सौ. रत्नाताई राजेंद्र चित्ते
महिला आघाडी, धुळे जिल्हा सचिव: सौ. सुरेखाताई मधुकर जाधव
कार्यकारिणी सदस्य: सौ. भाग्यश्रीताई चित्ते, सौ. संगीताताई पवार, सौ. मिनाक्षीताई पवार, सौ. सारीखाताई बाविस्कर, सौ. रेखाताई गवळे, सौ. ज्योत्स्नाताई सोनवणे, सौ. कल्पनाताई जाधव यावेळी उपस्थित महिलांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत हळदी-कुंकू लावण्यात आले आणि “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” हा संदेश देत गोडधोड पदार्थ वाटप करण्यात आले. महिलांनीपारंपरिक वेशभूषेत आणि हसतमुख वातावरणात एकमेकींशी संवाद साधला.
    महिला मंडळाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान दिले आहे. यंदाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण महिला मंडळाचे श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाजाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
   कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” या संक्रांतीच्या मंत्राने संपूर्ण सभागृह गाजून गेले.
    श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाला ध्येय न्युज & सा झुंज परिवार पाचोरा जि जळगाव तर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here