![]()
जळगाव जिल्ह्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे शेंदुर्णी हे गाव म्हणजे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातही अत्यंत प्रतिष्ठित नाव. शेंदुर्णी म्हटले की, त्या गावाच्या इतिहासात आणि वर्तमानात अढळ स्थान मिळवलेल्या गरुड कुटुंबियांची ओळख आपोआपच पुढे येते. या गरुड कुटुंबाने केवळ आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर समाजहितासाठी घेतलेल्या ध्येयवादी झपाट्यामुळे संपूर्ण खानदेशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच घराण्यातील वंदनीय स्व. गजाननराव गरुड यांचे संस्कार, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी ही आजही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरते. याच गरुड परिवारातील सुनीलदादा गरुड, आणि त्यांचे चतुर, संवेदनशील, सेवाभावी विचारसरणीचे सुपुत्र डॉ. सागरदादा गरुड यांच्यावर आज या संपूर्ण परंपरेचा वारसा जपण्याची जबाबदारी आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी ती जबाबदारी केवळ यशस्वीपणे पार पाडलीच नाही, तर त्या सेवेला एक वेगळेच व्यापक रूप दिले आहे.ते आपले काका संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यात ज्यांना युवकांचा खरा मित्र, गरजूंसाठी धावून जाणारा डॉक्टर, आणि भारतीय जनता पक्षाच्या तडफदार नेतृत्वाचे उदयोन्मुख प्रतीक म्हणून ओळखले जाते ते म्हणजे डॉ. सागर गरुड.
त्यांचा वाढदिवस, जो 30 एप्रीलला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या १ दिवस आधी येतो, तो दिवस एक साक्षात्कारच वाटावा, असा असतो. कारण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिवशी एकदिवस आधी जन्मलेली ही प्रतिभाशाली, संवेदनशील, आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणजे जनसेवेसाठी जन्मलेला एक खरा योध्दा आहे.
29 मे च्या मध्यरात्रीपासूनच पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानासमोर युवकांची उत्साहात गर्दी झाली होती. दोन्ही मतदारसंघातील विविध भागांमधून, अनेक युवक चारचाकी व दुचाकी वाहनांवर मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन सागरदादांचा वाढदिवस साजरा करत होते. युवकांच्या चेहऱ्यावरचा आत्मीयतेचा प्रकाश, एक आदर्शाची भेट घेण्यासाठी धावून आलेली तरुण मनं, आणि सागरदादांप्रती असलेली निखळ प्रेमभावना पाहून त्या रात्री पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वाढदिवसाची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे युवकांनी खास बनवलेला, डॉ. सागरदादा गरुड यांचा मोठा चार बाय तीन फुटाचा फोटो असलेला केक, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या केकवर सागरदादांची छायाचित्रित प्रतिमा म्हणजे एक श्रद्धा व आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतिक ठरली होती.
भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील ना.गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली सागरदादा यांचे कार्य पाहता, ते केवळ वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, राजकीय मार्गदर्शक आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ठसठशीत ओळख निर्माण करत आहेत. त्यांचे काका संजयदादा गरुड हे लोकप्रिय नेते असून, त्यांच्या छायेतून तयार झालेला डॉ. सागर गरुड हा एक असा नेतृत्वप्रवृत्तीचा तेजस्वी तारा आहे, जो राजकीय आकांक्षा असूनही त्याच्या कर्तव्यातून, वैद्यकीय सेवेतून, आणि सामाजिक कार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांचे कार्य हे केवळ व्यवसायिक नसून त्यामध्ये सेवा, तळमळ, आणि माणुसकीचा गंध आहे. गरीब, गरजू आणि सत्ताधारी राजकीय मंडळींपासून दूर असलेल्या सामान्य जनतेसाठी ते नेहमी उभे राहिले आहेत. रुग्ण कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, सागरदादांची वैद्यकीय सेवा म्हणजे त्यांच्यासाठी आशेचे दार ठरतो.
कोरोना काळ असो किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे, सागरदादांनी कधीही समाजसेवेपासून माघार घेतली नाही. एकीकडे डॉक्टर म्हणून सतत रुग्णांमध्ये राहून त्यांना उपचार देणं, तर दुसरीकडे युवकांच्या प्रश्नांसाठी, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, आरोग्य जनजागृतीसारख्या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेणे हे त्यांचे गुणविशेष आहेत.त्यांच्या वाढदिवशी विशेषतः राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उपचारांमुळे पुनर्जन्म मिळालेल्या अनेक रुग्णांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर सागरदादांना शुभेच्छा देणारे मेसेजेस, रील्स, फोटो कोलाजेस आणि व्हिडीओ क्लिप्सचा अक्षरशः पूर आला होता. त्यांच्या चहत्यांनी पोस्टर्स लावून, विविध सार्वजनिक ठिकाणी अन्नदान उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला.वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, हार घालणे, फोटोसेशन करणे एवढाच मर्यादित उत्सव नाही, तर तो त्या व्यक्तीच्या कार्याचा जाहीर गौरव असतो. आणि सागरदादा गरुड यांचा वाढदिवस ही केवळ औपचारिकता नव्हे, तर जनतेने त्यांच्या मनापासून केलेली कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. राजकीय स्वार्थाच्या या गढूळ वातावरणात जेव्हा डॉक्टर सागरदादा गरुड सारखी व्यक्तिमत्वं आपल्या कामातूनच आदर्श निर्माण करतात, तेव्हा समाजाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यांचे नाव सागर असले तरी त्यांच्या सेवाभावाची व्याप्ती सागराच्या खोलीपेक्षाही अधिक खोल आहे. त्यांची गाठ नुसती शेंदुर्णी किंवा पाचोऱ्यापुरती मर्यादित नाही, तर ती जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या हृदयात जाऊन पोहोचली आहे. ते राजकारणात नसूनही, हजारो युवक त्यांना आपला नेता मानतात आणि त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्यात असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ताकद आहे.आजच्या वाढदिवशी अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी त्यांच्या या सेवाभावी कामाचे कौतुक केले. एका साध्या कुटुंबातून आलेल्या सागरदादांनी डॉक्टर होणे, आणि मग यशस्वी हॉस्पिटल चालवणे, एवढ्यावर समाधान न मानता गरजूंकरिता मोफत आरोग्य शिबिरे, मोफत ऑपरेशन योजना, आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत उभे राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, याचा आज समाजाला विशेष अभिमान वाटतो.
त्यांच्या वाढदिवशी “आरोग्य हेच खरे धन” ही उक्ती समाजात प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सागरदादांना शुभेच्छा देताना अनेक रुग्णांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू पाहायला मिळाले. कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यापेक्षा अधिक प्रेम आणि आपुलकी डॉ. गरुड यांनी रुग्णांच्या मनात मिळवली आहे.आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘झुंज वृत्तपत्र’ आणि ‘ध्येय न्यूज परिवार’ यांच्यावतीने आम्ही डॉ. सागर गरुड यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, जनसेवेचे हे व्रत निरंतर चालू राहो आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे यश शतगुणित होवो, हीच प्रार्थना!
एकविसाव्या शतकात सेवाभावाने झेप घेणाऱ्या गरुडाप्रमाणे, डॉ. सागर गरुड हे नाव खऱ्या अर्थाने जनतेसाठी गरुड झेप घेणारे व्यक्तिमत्व बनले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






