आयपीएस परीक्षेत नेत्रदीपक यश; तरुणांसाठी ठरला प्रेरणास्थान लालबाग-काळाचौकीचा गौरव – मोक्ष राणावत यांचा सत्कार

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लालबाग काळाचौकी परिसरातील सुपुत्र मोक्ष राणावत याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून परिसराचं नाव उज्वल केलं आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उमेश येवले, इस्रार खान, रवींद्र कदम, राजेंद्र खानविलकर आणि राज जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची तसबीर आणि आदरणीय खासदार शरदचंद्र पवार लिखित ‘लोक माझे सांगती’ हा प्रेरणादायी ग्रंथ मोक्ष राणावत यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आला.

मोक्ष राणावत यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी ठरला आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मोक्ष यांनी अभ्यासाची सातत्यपूर्ण शिस्त, अपार जिद्द आणि समाजसेवेची तळमळ या गुणांच्या जोरावर युपीएससी परीक्षेत यश संपादन केलं. अभ्यासाच्या कठीण टप्प्यांत त्यांनी स्वतःला सकारात्मक ठेवत, प्रत्येक अपयशाकडे शिकण्याच्या संधीसारखं पाहिलं. अनेक वेळा सामाजिक कामांच्या अनुभवातून त्यांनी देशासाठी काम करायची प्रेरणा मिळवली.

आज मोक्ष आयपीएस अधिकारी म्हणून केवळ आपल्या परिसराचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचेही अभिमान ठरले आहेत.
त्यांच्या यशामागे अपार परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा आहे.

सत्कार समारंभाने परिसरात नवचैतन्य निर्माण केलं असून, अनेक तरुणांनी मोक्ष यांना ‘आदर्श’ मानत प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here