शिक्षणसंस्कारांची उज्ज्वल परंपरा – एसएससी परीक्षेत पिटीसी संस्थेची यशोशिखराकडे दमदार वाटचालसंस्थेच्या विविध शाळांनी घवघवीत यश संपादन करत शिक्षणविश्वात नवा आदर्श निर्माण केला

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही गेल्या अनेक दशकांपासून आपल्या कार्यकर्तृत्वाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव ठरली आहे. संस्थेच्या शाळांनी घडवलेल्या हजारो विद्यार्थी, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शाळांची गुणवत्ता आणि व्यवस्थापनाची निष्ठा – या सर्व गोष्टींमुळे पिटीसी ही संस्था फक्त शिक्षण संस्था नसून शैक्षणिक संस्कृतीचे मंदिर ठरली आहे. यावर्षी २०२५ साली घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल हा त्याच उज्ज्वल परंपरेचा साक्षात पुरावा ठरला आहे.
संस्थेच्या एकूण ९ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून घवघवीत यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आपली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या व्यवस्थापनाची शिस्तीची फळं जनतेसमोर मांडली आहेत.
१) श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा
संपूर्ण पाचोरा शहरात शैक्षणिक सन्मान प्राप्त असलेल्या या हायस्कूलचा निकाल ९५.९०% इतका लागला असून, भाग्यश्री सुनील चौधरी ९५.६०% गुणांसह प्रथम आली आहे. तिच्यानंतर मानसी सुनील पाटील (९५.२०%) व ईश्वरी ज्ञानेश्वर कुमावत (९४.८०%) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या यशाने विद्यालयाच्या शिस्तीची आणि गुणवत्ता शिक्षणाची मोहोर अधोरेखित केली आहे.
२) सौ. सु. गी. पाटील विद्यालय, भडगाव
९५ टक्क्यांचा भक्कम निकाल देत या विद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. चिन्मय संदीप पाटील (९७.८०%), ध्रुवेश राकेश राजपूत (९७.२०%) आणि कृष्णा संतोष पाटील (९७%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
३) डॉ. राम मनोहर लोहिया विद्यालय, बांबरुड (राणीचे)
या ग्रामीण भागातील शाळेने देखील ९५.९०% इतका वाखाणण्याजोगा निकाल दिला. राठोड विशाल विजय (९१.४०%) प्रथम, पाटील नक्षत्रा दिवाकर (८६%) द्वितीय आणि काळे पंकज रविंद्र (८५%) तृतीय आले आहेत. ही आकडेवारी सांगते की पिटीसी संस्थेचे शिक्षण हे फक्त शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण विद्यार्थ्यांनाही उज्ज्वल भवितव्य देणारे आहे.
४) एच. बी. सांघवी हायस्कूल, खेडगाव नंदीचे
या शाळेचा निकाल ९६.६६% असून, रईस युनूस पिंजारी (८७.४०%), मानसी प्रशांत पाटील (८५.६०%) आणि रोशनी देविदास महाजन (८३.८०%) यांनी यशाचे शिखर गाठले आहे.
५) शां. न. जैन माध्यमिक विद्यालय, वाडी
या शाळेचा ९३.७५% निकाल देखील शैक्षणिक उत्कृष्टतेची ग्वाही देतो. जागृती नामदेव तायडे (८५.२०%), ममता ज्ञानेश्वर पाटील (८१.८०%) आणि आसिफ शरद तडवी (८०.२०%) हे विद्यार्थी यामध्ये आघाडीवर राहिले.
६) सु. वि. माध्यमिक विद्यालय, माहेजी
९०.९०% निकालासह ही शाळा यशाच्या उंबरठ्यावर असून, रिया शेख युनिस (९४.२०%), विनय संजय शिरसाठ (८१.६०%) व अनिकेत प्रवीण भोई (७८.८०%) हे यशस्वी विद्यार्थी.
७) आदर्श माध्यमिक विद्यालय, कुर्‍हाड खुर्द
संपूर्ण संस्थेतील सर्वोत्तम निकाल ९९.२६% याच विद्यालयाने प्राप्त केला आहे. शैलेश भरत राठोड (९२.२०%), जीवन गणेश पाटील (८७%) आणि ललित दीपक माळी (८३.८०%) यांनी ही यशोगाथा लिहिली आहे.
८) श्रीमती च. ही. राजपूत विद्यालय, दहीगाव संत
या विद्यालयाने ९५% निकाल दिला असून कुणाल बाळकृष्ण पाटील (७३.८०%) प्रथम, आनंदसिंग समाधान पाटील द्वितीय आणि सौरभ समाधान सोनवणे तृतीय आले आहेत.
९) महात्मा फुले हायस्कूल, भोजे चिंचपूरे
८९.४७% निकालासह रेणुका संदीप भिवसने (८१%), कुणाल एकनाथ जाधव व तेजस कैलास माळी (८०.२०%) द्वितीय, व कुणाल खुशाल हिवाळे (७८%) तृतीय स्थानावर.
१०) पोस्ट बेसिक विद्यालय, सातगाव डोंगरी
७८.७८% निकालासह लालीराम ईश्वर बारेला (६८.६०%), अतुल लहानू तडवी (६६.८०%) व रोशनी चंपालाल पावरा (६३.२०%) ही विद्यार्थी यशस्वी ठरले.
या भव्य यशामागे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव ॲड. महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी आणि सर्व संचालक मंडळाचे प्रभावी नेतृत्व व शाळा समित्यांचे योगदान हेच मुख्य घटक आहेत. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजांचा विचार करत सातत्यपूर्ण मेहनत घेतली.
पिटीसी संस्थेच्या शाळांमध्ये फक्त पुस्तकी शिक्षणच नाही, तर मूल्यशिक्षण, चारित्र्यविकास, सांस्कृतिक घडामोडी आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी सर्वांगीण प्रणाली आहे. त्यामुळेच हे निकाल केवळ आकड्यांमध्ये मर्यादित न राहता शाळेच्या मूल्यांचा परावश दर्शवतात.
पिटीसी सारख्या ग्रामीण भागात कार्यरत संस्थेचा पाया मजबूत असल्यामुळेच हजारो गरीब, मध्यमवर्गीय पालकांच्या घरात ज्ञानाचा दीप पेटतो आहे. संस्थेने हे यश आपल्या चिकाटीने, गुणवत्ता शिक्षणाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मिळवले आहे – याचा प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांना अभिमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here