कायदा, प्रामाणिकता आणि समाजसेवेचा संगम – ॲड. निलेश राजेंद्र सुर्यवंशी यांची भारत सरकारकडून नोटरी पदी नियुक्ती ही जिल्ह्याचा अभिमान!

Loading

पाचोरा – पाचोरा शहर व तालुक्याच्या इतिहासात, समाजाच्या प्रत्येक थराशी जिव्हाळ्याने जोडलेले आणि कायद्याच्या व्यासपीठावर स्वतःचं एक स्वतंत्र आणि अढळ स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध वकील ॲड. निलेश राजेंद्र सुर्यवंशी यांची नुकतीच भारत सरकारकडून ‘नोटरी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक केवळ त्यांच्याच नव्हे, तर संपूर्ण पाचोरा-भडगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या वकिली क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. त्यांच्या प्रामाणिक सेवाभाव, कायद्याच्या सखोल जाणिवा आणि समाजासाठी सतत कार्यरत राहण्याच्या वृत्तीचा हा सन्मान आहे.
ॲड निलेश सुर्यवंशी यांचा पारिवारिक पाश्वभूमी शेती व निसर्ग प्रेमी आहे. त्यांचे वडील भैय्यासाहेब राजेंद्र सीताराम सुर्यवंशी (राजूभैय्या) हे पाचोरा तालुक्यातील एक आदर्श शेतकरी व सर्वमान्य सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे गावोगाव आपुलकीने घेतले जाणारे हे नाव त्यांच्या सुपुत्रांमध्येही कर्मशीलतेच्या रूपाने झळकते. राजू भैय्यांच्या जीवनप्रवासातील शिस्त, कष्ट, समाजाभिमुख दृष्टी आणि प्रामाणिकपणा याचेच प्रतिबिंब निलेश सुर्यवंशी यांच्या प्रत्येक कार्यामध्ये दिसून येते.
ॲड निलेश सुर्यवंशी यांचे प्राथमिक शिक्षण पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील समाज विकास विद्यालय येथे झाले. पुढे त्यांनी एम.एम. कॉलेज, पाचोरा येथून बारावी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात विधी शिक्षण घेतले आणि वकिलीचे स्वप्न सत्यात उतरवले. शिक्षणाच्या काळातही त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव ठळकपणे दिसून आली.
ॲड निलेश सुर्यवंशी यांनी आपल्या वकिली कारकिर्दीची सुरुवात छ. संभाजीनगर येथून केली. लवकरच त्यांचे कार्यक्षेत्र पाचोरा, भडगाव आणि जळगाव या ठिकाणी विस्तारले. पाचोरा कोर्टसमोरील त्यांच्या कार्यालयाबरोबरच नवकार प्लाझा येथेही त्यांचे दुसरे कार्यालय कार्यरत आहे. आजवर त्यांनी हजारो गुन्हेगारी, नागरी, कौटुंबिक, जमीन व संपत्ती विषयक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली असून त्यांच्या वकिली सेवेमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला गेला आहे.
त्यांनी केवळ कायदेशीर सेवा दिली नाही, तर अनेक गरीब, वंचित, शोषित नागरिकांना विनामूल्य कायदेशीर सल्ला देऊन न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या सेवा वृत्तीमुळे परिसरातील नागरिक त्यांच्याकडे अढळ विश्वासाने येतात.
भारत सरकारने ॲड निलेश सुर्यवंशी यांची ‘नोटरी’ म्हणून केलेली नियुक्ती ही त्यांच्या १५ वर्षांच्या सतत न्यायासाठीच्या लढ्याची आणि कायद्याच्या आस्थेची मान्यता आहे. हे पद केवळ औपचारिक जबाबदारी नव्हे, तर न्याय प्रक्रियेला नागरिकांपर्यंत पोहोचवणारा एक सशक्त माध्यम आहे. यामुळे सामान्य नागरिकांना विविध कायदेशीर कागदपत्रांच्या पडताळणी, प्रतिज्ञापत्र, खात्रीपत्र, अनुबंध यांसारख्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे.
वकिली व्यवसायाच्या व्यापात असूनही ॲड निलेश सुर्यवंशी यांचे सामाजिक कार्य देखील उल्लेखनीय आहे. शिक्षण प्रसार, जनजागृती उपक्रम, महिला हक्क, पर्यावरण संरक्षण आणि गरजूंसाठी विनामूल्य कायदेशीर सेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांनी अनेकदा ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये जाऊन सामान्य नागरिकांना कायद्याची माहिती दिली आहे. समाजात कायद्याची जाण असावी आणि कोणताही व्यक्ती अन्यायाला बळी पडू नये, यासाठी त्यांची धडपड सतत सुरू आहे.
ॲड निलेश सुर्यवंशी यांचा संयमी, विनम्र आणि शिस्तप्रिय स्वभाव त्यांच्या यशामागील एक महत्त्वाचा घटक आहे. कोणतीही घाई न करता, शांतपणे आणि सखोल अभ्यास करून ते प्रत्येक प्रकरण हाताळतात. यामुळेच त्यांच्यावर नागरिक, सहकारी वकील वर्ग, अधिकारी आणि समाजमाध्यमे यांचा भरवसा आहे.
नोटरी नियुक्तीचा सन्मान मिळाल्यानंतरही ॲड निलेश सुर्यवंशी यांचा दृष्टिकोन केवळ पदावर केंद्रित नसून, अधिकाधिक गरजूंना न्याय मिळवून देण्याचा आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘कायदा हा केवळ पुस्तकापुरता विषय नसून, तो समाजाच्या प्रत्येक थरात न्याय, समता आणि प्रतिष्ठा देण्याचे प्रभावी माध्यम आहे.’ त्यांनी भविष्यात वकिली व्यवसायाबरोबरच समाजात कायद्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी कार्यशाळा, शिबिरे, सल्ला केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड निलेश सुर्यवंशी यांना आजवर अनेक सामाजिक संस्था, कायदेशीर संघटना आणि स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींनी सन्मानित केले आहे. त्यांचे नाव आता केवळ एका वकिलापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते, न्यायाचे प्रवक्ते आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून देखील ओळखले जात आहेत.
ॲड निलेश सुर्यवंशी यांचा जीवनप्रवास हा प्रामाणिकतेचा, संघर्षाचा, सेवाभावाचा आणि समाजहिताच्या कार्याचा उत्तम आदर्श आहे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ व्यक्तिगत उन्नतीसाठी न करता समाजासाठी केला. अशा व्यक्तिमत्त्वाची भारत सरकारकडून नोटरी पदावर नियुक्ती होणे हे नक्कीच प्रेरणादायक असून नवतरुण वकीलांसाठी एक दिशादर्शक उदाहरण आहे.
अशा या कर्तृत्ववान ॲड. निलेश राजेंद्र सुर्यवंशी यांच्या कार्याचा आणि समर्पणाचा आदरपूर्वक उल्लेख करताना प्रत्येक जिल्हावासी अभिमानाने म्हणतो की, “हा आमचा मुलगा आहे.” त्यांच्या कार्याची पताका भविष्यातही अशीच उंच राहावी, त्यांनी अधिकाधिक लोकांना न्याय मिळवून द्यावा आणि वकिली, समाजसेवा आणि कायदेविषयक कार्यात सातत्याने नवे यश संपादन करावे, हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज परिवारा तर्फे हार्दीक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here