![]()
पाचोरा – जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या तब्बल ३५ कोटींच्या जवळपास अनुदान घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवली असतानाच पाचोरा तालुक्यातही याच धर्तीवर गंभीर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले अनुदान हा जीवदायी श्वास असताना त्यावर भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याची वस्तुस्थिती आता टाळता येणार नाही. फक्त सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता थेट इतरांच्या खिशात गेल्याचे पुरावे प्रकाशात आले आहेत. ही बाब केवळ दोन-चार शेतकऱ्यांपुरती मर्यादित नसून पाचोरा तालुक्यातील अष्टपैलू भागभर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पत्रकार संदीप दामोदर महाजन यांच्याकडे शेतकऱ्यांनी कागदपत्रे, उतारे व पुरावे जोडून तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. महाजन यांना मिळालेल्या दस्तऐवजांवरून हा प्रकार किती मोठा व संगनमताने घडवून आणला गेला आहे हे चांगल्याप्रकारे स्पष्ट होते. यामुळे आता फक्त डिपार्टमेंटल चौकशीत वेळ घालवण्यापेक्षा या प्रकरणाचा तपास थेट एसआयटी, आर्थिक गुन्हा शाखा (EOW), सीआयडी, ईडी व अँटीकरप्शन विभागाकडून व्हावा अशी महाजन यांची ठाम मागणी आहे. कारण, महसूल विभागातील हा अपहार फक्त तलाठी, ग्रामसेवक किंवा दोन-चार कारकुनांपुरता मर्यादित नसून यामध्ये टप्प्याटप्प्याने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका बळावत आहे. त्यामुळे तहसीलदारांपासून संपूर्ण महसूल यंत्रणेची सखोल चौकशी अत्यावश्यक ठरत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थोड्याफार रकमा खात्यात जमा करून “सर्व काही नीट सुरू आहे” असा दिखावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचे पैसे कुठे गेले, कोणाच्या खिशात शिरले आणि कोणत्या अधिकार्यांनी गिळंकृत केले, याचे सत्य अजूनही गडद अंधारातच आहे. शेतकरी बांधवांनो, जालना घोटाळ्यानंतर आता पाचोरा तालुक्यातील हा अनुदान घोटाळा प्रकरण तितकाच गंभीर आहे. आपणच जागरूक राहून आपल्याकडील माहिती, पुरावे व कागदपत्रे पुढे आणली तरच ह्या भ्रष्ट माफियांचे जाळे उघडकीस येईल. अन्यथा आपल्याच हक्काचे पैसे कायमचे गडप होतील. व ही मालिका सुरूच राहील
निर्धार पक्का १ सप्टेंबर पासून उपोषण होणारच आणि आता मागणी एकच :– सन २०१९ पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान वाटपाची गावनिहाय यादी तातडीने जाहीर व्हावी. सर्व आरोपींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी











ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






