भव्य परिवर्तन मेळावा : आगामी निवडणुकांकरीता भाजपाचे रणशिंग पाचोरातून फुंकले जाणार

0

Loading

पाचोरा – येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पाचोरा-भडगाव तालुक्यात शक्ती प्रदर्शनाचे रणशिंग फुंकले आहे. जनतेच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा “भव्य परिवर्तन मेळावा” दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता समर्थ लॉन्स, सारोळा रोड, पाचोरा येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन करणार आहेत. या परिवर्तन मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा.खा. स्मिताताई वाघ, खासदार, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार मंगेशदादा चव्हाण (आमदार, चाळीसगाव), मा. श्री. डॉ.राधेश्याम चौधरी (जिल्हा अध्यक्ष, भाजपा), मा.श्री. दिलीपभाऊ वाघ (मा.आमदार, पाचोरा-भडगाव), मा.श्री. सुभाषभाऊ पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा व मा.सभापती) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भाऊसो. अ. रहिम बागवान (जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा), मा. ताईसो. वैशाली सुर्यवंशी (भाजपा नेत्या, पाचोरा-भडगाव), मा.श्री. भाऊसो. डि.एम. पाटील (मा.जि.प. सदस्य), मा.श्री. भाऊसो. कांतीलाल जैन (माजी कोषाध्यक्ष, भाजपा जळगाव), मा.श्री. संजय मन्साराम राठोड (विमुक्त भटके जमाती अध्यक्ष), मा. श्री. जमिलदादा तडवी (अजू जमाती अध्यक्ष) या मान्यवरांचे उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याद्वारे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद निर्माण करणे, आगामी निवडणुकांकरिता पक्षाची भूमिका स्पष्ट करणे आणि जनतेच्या समस्यांवर ठोस भूमिका मांडणे हा प्रमुख उद्देश आहे. पक्षातील सर्व अंगीकृत आघाड्या, महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी तसेच अनुसूचित जाती-जमातीचे कार्यकर्ते एकत्रित येऊन जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा निर्धार या परिवर्तन मेळाव्यात व्यक्त केला जाणार आहे. या कार्यक्रमात मा.श्री. अमोलभाऊ शिंदे (युवा नेते, पाचोरा-भडगाव), मा. श्री. संजयनाना वाघ (भाजपा नेते), मा.श्री. अजय भास्कर अहिरे सर (अनु जाती जिल्हा उपाध्यक्ष), मा.सौ. ज्योतीताई भामरे (जिल्हा उपाध्यक्षा, भाजपा जळगाव), मा.श्री. प्रताप नाना पाटील (भाजपा नेते, पाचोरा-भडगाव), मा.श्री. संजय शांताराम पाटील (भाजपा नेते), मा.श्री. अमोल नाना पाटील (जिल्हा सरचिटणीस, भाजपा जळगाव), मा. सौ. सरलाताई राजेंद्र पाटील (जिल्हा उपाध्यक्षा, भाजपा जळगाव), मा.श्री. मधुकर पाटील काटे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा व मा.जि.प. सदस्य), मा.श्री. भाऊसो. रमेश वाणी (व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष), मा.श्री. आबासो. भागवत महालपुटे (जेष्ठ भाजपा नेते) आणि मा. श्री. विजय कडू पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा) यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मा.श्री. दिपकभाऊ माने, तसेच मा.श्री. गोविंद शेलार मंडळ आणि मा.सौ. शोभाताई शांतीलाल तेली (अध्यक्ष, पिपळगाव हरे.मंडळ) यांच्या पुढाकाराने संपूर्ण मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून, पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व भाजपा अंगीकृत आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जलसंपदा मंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन आपल्या ओजस्वी भाषणातून भाजपा कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांकरिता सज्जतेचा संदेश देणार आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात आणि केंद्रात भाजपाने केलेल्या जनहितकारी कामांचा आढावा घेत पुढील राजकीय दिशा निश्चित करण्याचा हेतू या सभेमागे आहे. कार्यक्रमाचे स्वरूप उत्साही आणि प्रेरणादायी असणार असून, पाचोरा तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा जोश निर्माण करणारा हा मेळावा ठरणार आहे. पक्षातील सर्व घटक एकत्र येऊन जनतेच्या अपेक्षा आणि विकासाच्या संकल्पनेभोवती भाजपा पुन्हा एकदा मजबूत होण्याचा संदेश या सभेद्वारे दिला जाणार आहे. भाजपाच्या मजबूत संघटनशक्तीला बळकटी देणारा हा “भव्य परिवर्तन मेळावा” पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या राजकीय इतिहासातील एक नवा अध्याय ठरेल, अशी सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली आहे. स्थळ : समर्थ लॉन्स, सारोळा रोड, पाचोरा. दिनांक : ५ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाजपा पक्षाच्या या परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here