![]()
पाचोरा – तालुक्यातील वरखेडी येथील महासर राईस मिलवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता कारवाईपेक्षा तिचे श्रेय नेमके कोण घेणार, याचीच चर्चा परिसरात रंगू लागली आहे. राज्यस्तरावर एकाच वेळी विविध संबंधित कंपनीच्या गोडाऊन व कार्यालयांवर छापे टाकून कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात असताना, आपले पाकीट सुरू होईल, आपली पण पावती आता मोठ्या रकमेची फाटेल , मी कोणाची चहा पण पीत नाही असे सांगत भावनिक कारणाने मोठी रक्कम उसनवारीच्या नावाने मागायची व ती रक्कम बुडीत यादीत टाकायची असे स्थानिक पातळीवर काहीजण या कारवाईचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी सोशल मीडियावर सातत्याने वेगवेगळ्या बातम्या व पोस्ट प्रसिद्ध करत असल्याचे चित्र आहे. ही कारवाई वरिष्ठ स्तरावरून नियोजित पद्धतीने झाल्याची चर्चा असतानाही काही व्यक्ती “मी ई-मेल केले होते”, “मी तक्रार केली होती”, “माझ्या पाठपुराव्यामुळेच कारवाई झाली” अशा स्वरूपाचे दावे करत स्वतःची भूमिका ठळक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून अद्याप या कारवाईसंदर्भात अधिकृत प्रेस नोट अथवा सविस्तर सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध झालेले नसल्याने कारवाईचे नेमके कारण, स्वरूप, निष्कर्ष आणि त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया याबाबत अंतिम अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, कारवाईची कार्यवाही सुरू असताना महासर राईस मिलचे मालक किंवा भागीदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणताही दबाव आणण्याचा अथवा कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई दरम्यान घडलेल्या घटनांपेक्षा त्यानंतर ” बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना” अशा सोशल मीडियावर सुरू झालेल्या असंबधित श्रेयवादाला अधिक महत्त्व मिळत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीचा मागोवा घेत असल्याचे भासवत दररोज नव्या पद्धतीने बातम्या प्रसारित करत आहेत. हे का?आणि कशासाठी? आणि कोणता स्वार्थासाठी हे नव्याने सांगणे गरजेचे नाही “ये पब्लिक है बाबू सब जानती है” एका घटनेवर वारंवार वेगवेगळ्या शब्दांत वृत्त प्रसिद्ध होत राहिल्यास त्यामागील उद्देशाबाबतही नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पत्रकारितेचा मुख्य आधार अधिकृत माहिती, प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि संबंधित यंत्रणेची भूमिका हा असतो. त्यामुळे अधिकृत कागदपत्रे अथवा विभागाचे निवेदन प्राप्त होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या दाव्यावरून कारवाईचे श्रेय निश्चित करणे कितपत योग्य, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या आणखी एका चर्चेलाही वेगळे वळण मिळाले आहे. “पाचोरा शहर व परिसरातील सर्व पत्रकार माझ्या संघटनेच्या किंवा माझ्या अंडरमध्ये आहेत” असा दावा करणारे आता भूमिगत झाले आहे वस्तुस्थिती अशी आहे की पाचोरा शहर व परिसरातील प्रत्येक पत्रकाराचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र माध्यम आणि स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे. कोणताही पत्रकार एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक नियंत्रणाखाली किंवा एखाद्या संघटनेच्या आर्थिक छत्राखाली काम करतो, असा सरसकट निष्कर्ष काढता येणार नाही. अखेर कारवाई कोणाच्या तक्रारीमुळे झाली, यापेक्षा प्रशासनाने केलेल्या कारवाईत नेमके काय निष्पन्न झाले, हेच जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे.





























