Breaking

भडगाव तालुक्यातील गिरणा-तितुर नदी संगम जवळ अवैध वाळूचा हॉस्पॉट तहसिलदार सागर ढवळे यांनी केली कारवाई

0

भडगाव -तालुक्यातील बांबरुड येथील गिरणा व तितुर नदीच्या संगम जवळ अवैध वाळू उपसा मागील काही दिवसांपासून सुरू होता. या ठिकाणी दररोज जे.सी.बी.द्वारे अनेक ट्रॅक्टर वाळूचा उपसा करून बांबरुड शिवारात थप्पा मारला जात होता. याची माहिती भडगाव तहसिलदार सागर ढवळे यांना लागताच आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या पथकाने ट्रॅक्टर वर कारवाई केली. हे समजताच या ठिकाणाहून जे.सी.बी, चार ट्रॅक्टर पाळले असून याचा शोध सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.


या बाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. आज तहसिलदार सागर ढवळे, टोणगाव तलाठी-राहूल पवार , भातखंडे तलाठी-सूनिल मांडोळे, वाडे तलाठी- आर.सी.माने,वाहन चालक- विष्णू तायडे, वडजी तलाठी व्ही.पी.शिंदे यांच्या पथकाने गिरणा व तितुर नदीच्या संगम जवळ अवैध वाळू उपसा करत असलेले ट्रॅक्टर पकडले व ते तहसील येथे जमा केले. या वर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. तसेच या ठिकाणी जे.सी.बी, चार ट्रॅक्टर पाळले असून हा स्पॉट आता वाळू माफियासाठी हॉस्पॉट ठरला आहे. या ठिकाणाहून वाळू उचलून बांबरुड शिवारात थप्पा मारून तेथून रवाना होत असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here