Breaking

नगरदेवळा येथे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस.आर.पी प्लाटुनची जुगार अड्डयावर धाड 8 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त
आर्मी जवान मृत्यु प्रकरणी दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा – संदीप महाजन यांची मागणी

पाचोरा —तालुक्यातिल नगरदेवळा आखतवाडे शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस.आर.पी प्लाटुन तुकडी व भडगाव पोलिस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने छापा टाकला.या छाप्यात ७ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या ३१ मोटरसायकली सोबत १ लाख २१५८० रूपये रोख व २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले. या गोपनिय कारवाईत रोख रक्कमसह मुद्देमालाची रक्कम ही ८ लाख ८१५५७० रूपयांची कारवाही चकित करणारी आहे.या कारवाईमुळे नगरदेवळा औ.पो.पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहा. फौजदार ज्ञानेश्वर पाटील व कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालिबाबत व कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित होत आहे.
या कार्यवाई प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपींना जामीनीवर सोडण्यात आले घटनास्थळी ताब्यात घेतलेली दहा हजार रूपये किंमतीची एक ईन्व्हर्टर बॅटरी, ३१ मोटरसायकली नगरदेवळा औ.पोस्ट पोलिस स्टेशन ताब्यात ठेवल्या आहेत.
याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, १३ मे रोजी राञी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी फोन द्वारे नगरदेवळा ते आखतवाडे रस्त्यालगत काही नागरिक बेकायदेशिर रित्या एकञ जमले असुन जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाली आहे. या ठिकाणावर छापा मारुन कारवाई करण्याचे आदेश दिले सोबत जळगाव येथुन आर.सी.पी. प्लाटुन तुकडी पाठवित असल्याचेही कळविले. पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी लगेच भडगाव पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक आनंद पटारे,पोलिस काॅस्टेबल इश्वर पाटिल,नितिन रावते व लक्ष्मण पाटिल यांना कॅबिनला बोलवुन या गोपनिय कारवाईची माहीती दिली व जळगाव येथुन येणार्‍या आर.सी.पी. प्लाटुनची वाट पाहत थांबले.राञी १२:१० वाजता पोलिस अधिक्षक यांनी पाठवलेली प्लाटुन व भडगाव येथिल निवडक कर्मचारी व महीला पोलीस कर्मचाऱ्यांना घेउन पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळाकडे मार्गक्रमण केले.पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे त्या निंबुच्या बागेत लाईट लाउन जुगार खेळला जात होता. तर शेताच्या बांधावर मोटारसायकली उभ्या करून ठेवल्या होत्या. अशोक उतेकर यांनी यावेळी दोन तुकड्यांमध्ये कर्मचारी विभागुन शेताच्या दोन बाजुंनी छापा टाकला.या छाप्यात २१ जण पोलिसांच्या ताब्यात आले तर काहीजण अंधाराचा फायदा घेउन पळुन जाण्यात यशस्वी झाले.यावेळी ताब्यात घेतलेल्या २१ जणांना नगरदेवळा औ.पो. पोलिस स्टेशनला आणण्यात आले.सोबतच शेताच्या बांधावर असलेल्या ३१ मोटरसायकलीही पौलिस स्टेशनला आणल्या गेल्या या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ मोटरसायकली पुढिल प्रमाणे
MH-19-AC-4231 (हिरोहोंडा विस हजार)
MH-19-DA-6557 (हिरो कंपनी तिस हजार)
MH-19-BP-0791(हिरोहोंडा विस हजार)
MH-19-BE-8073(बजाजर अठरा हजार)
MH-19-BA-3644(बजाजर विस हजार)
MH-19-AA-4500(हिरोहोंडा अठरा हजार)
MH-19-DL-0839 (हिरो पंचविस हजार)
MH-19-AV-4326 (हिरो तिस हजार)
MH-04-EM-5002(हिरोहोंडा विस हजार)
MH-19-DA-0867 (बजाज पंचविस हजार)
MH-05-AC-4795 (हिरो विस हजार)
MH-19-CK-5498( बजाज पस्तिस हजार)
MH-19-CD-3184 (होंडा तिस हजार)
MH-19-AT-3840 (हिरोहोंडा विस हजार)
MH-19-DB-4032 (होंडा तिस हजार)
MH-19-CC-3897(बजाज विस हजार)
MH-19-DF-0497 (हिरोहोंडा विस हजार)
MH-19-DL-9440 (हिरो पंचविस हजार)
MH-19-BH-5138(TVS स्टार विस हजार)
MH-15-R-5290 (होंडा तिस हजार)
MH-19-CD-8529 (होंडा तिस हजार)
MH-19-DA-8222 (हिरो तिस हजार)
MH-19-AU-0849 (होंडा विस हजार)
MH-19-DM-4364 (बजाज विस हजार)
MH-19-DH-6916 (होंडा तिस हजार)
MP-68-ME-4635 (होंडा तिस हजार)
MH-19-CQ-5669 (हिरो पंचविस हजार)
विना नंबरची सुझुकी मॅक्स १०० (विस हजार)
या प्रकरणी २१ जणांविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस काॅस्टेबल स्वप्निल बाळासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादिनुसार भाग ०६ गुरनं १८७/२१ महाराष्ट जुगार अॅक्ट कलम १२(अ),भादवी कलम १८८,२६९,२७० सह महा.पोलिस कायदा कलम ३७(१)३ चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी पुढिल तपास पोलीस उपनिरिक्षक श्री.नलावडे हे करित आहेत.

या प्रकरणी पळून गेलेले आरोपीवर उपलब्ध असलेल्या गाडयांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात यावा
तसेच दिनांक १३/ ५/२०२१ रोजी नगरदेवळा येथील पत्याच्या क्लबवर पडलेल्या धाडीच्या शेतात प्रमोद दिनकर पाटील पिंप्रीॅहाट येथील ARMY जवानाचा मृत्यू झाला. ध्येय न्युजच्या प्राप्त माहीती नुसार याक्लबच्या धाडीशी किंवा पत्ते खेळण्याच्या प्रकरणाचा आर्मी जवानाचा काहीही एक संबध नसला तरी सदरचा मृत्यु क्लब सुरू असलेल्या शेताच्या विहीरीत पडून कसा झाला या मृत्यूस जबाबदार कोण? हा प्रश्न आज उपस्थित होत आहे.
तरी या नगरदेवळा पत्त्याच्या क्लबवरील धाडी प्रसंगी & आर्मी जवानाच्या मृत्यु प्रकरणी क्लब चालक, शेत मालक & त्यास छुपी अलिखीत मान्यता देणारे व कर्तव्यात कसुर करणारे सहा. फौज. ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच क्लब चालक & नगरदेवळा औ.पो. पोलीस स्टेशनचे प्रमुख सहा. फौज.ज्ञानेश्वर पाटील यांच्या मोबा.चे CDR उपलब्ध करुन त्यां आधारे त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्याआधारे कारवाई व सदरचा तपास स्थानीक गुन्हा शाखे मार्फत करण्याची मागणी ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांनी केली आहे.


नगरदेवळा औ.पो. पोलीस स्टेशन हद्दीत स्थानीक पाचोरा डी.वाय. एस.पी.& पाचोरा पो.स्टे. पी.आय.सह त्यांच्या सहकाऱ्यांना अंधार ठेवुन नगरदेवळा औ.पो. पोलीस स्टेशन हद्दीत सहा.फौजदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आशिर्वादाने खुलेआम अवैध धंदे व अन्याय अत्याचार सुरु असल्याचे ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांच्याकडे माहिती प्राप्त होताच त्यांनी दि 8 मे रोजी मा. जिंल्हा पोलीस अधिक्षक साहेबांसह सर्व वरीष्ठ मान्यवरांकडे Email व रजि. पोस्टव्दारे तक्रार करून दिनांक 9 मे रोजी रुग्णवाहिकेच्या आगीच्या बातमी सोबतच नगरदेवळा पो.स्टे.हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे व अन्याय अत्याचाराची माहीती देणे बाबत आवहान केले होते त्याचा परिपाक म्हणुन सहा. फौ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या आशिर्वादाने खुले असणारे अवैध धंद्याच्या माहीती सोबतच एक कोंबडी प्रकरणाचीही माहीती प्राप्त झाली या सर्वाबाबतही तक्रार करणार असल्याचे संदीप महाजन यांनी सांगीतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here