Breaking

पाचोरा शहरातील मुख्य सार्वजनीक रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांवर सलग तिसऱ्या दिवशी देखील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धडक कार्यवाही

पाचोरा:-येथील पाचोरा नगरपरिषदेर्फे पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनीक रस्त्यावर अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी / फेरिवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे / टपरी धारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनीक रस्त्यातच लावण्यात येत

यामुळे शहरातील सार्वजनीक रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, ॲम्बुलन्स, विविध शासकिय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे आदी घटना नित्याच्याच झालेल्याची उदा. आजही डोळ्यासमोर आहेत.

त्यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून मुख्याधिकारी बाविस्कर यांनी धडक मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी स्वत: हजर राहून पाचोरा शहरातील भडगांव रोड, रेस्ट हाऊस कडे जाणारा ङिपी.रोड, व इतर भागातील सार्वजनीक रहदारीस अडथळा आणणारे हातगाडीचालक व्यावसाईक / टपरीधारक /दुकानापुढे / रहीवाशी इमारतींच्या पुढे केलेले अनाधिकृत शेड / ओटे इ. यांचे अनाधिकृत अतिक्रमण निष्कासीत केले.


शहरातील मुख्य सार्वजनीक रहदारीवर झालेल्या या कार्यवाहीचे शहरातून सुज्ञ नागरीकांकडून कौतूक होत असून यापुढे देखील अशा प्रकारची धडक कार्यवाही अशीच सुरु राहणार असून कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले.


सदर अतिक्रमणावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस कर्मचारी सुनील ताराचंद पाटील, बापु शामु महाजन, सचिन पाटील, विजयसींग पाटील, होमगार्ड दिपमाला नन्नवरे, सोनाली पाटील, योगिता मराठे, पाचोरा नगरपरिषेदे प्रशासकिय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले, दगडु शिवाजी मराठे, कर निरीक्षक, श्री.दत्तात्रय जाधव, लेखापाल, मधुकर सुर्यवंशी,अभियंता (स्थापत्य), हेमंत क्षिरसागर,सहा.नगररचनाकार,साईदास ममराज जाधव,कर निर्धारण अधिकारी, मानसी भदाणे,नगररचनाकार, हिमांश जैस्वाल,उपअभियंता स्थापत्य, प्रकाश शंकर पवार, लिपीक, शाम ढवळे, लिपीक,.शामकांत पांडुरंग अहिरे, लिपीक,शरद दामू घोडके, लिपीक,चंद्रकांत भगवान चौधरी, लिपीक,विजय पिराजी बाविस्कर, लिपीक,अनिल मेघराज पाटील, कों.लिपीक,विलास प्रभाकर देवकर,लिपीक,पांडुरंग एकनाथ धनगर, लिपीक,भागवत पाटील, फायरमन, विशाल मराठे, लिपीक, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप धर्मराज गायकवाड, सुभाष बागुल, शरद मधुकर नागणे, ,युवराज जगताप,नरेश आदीवाल,संदिप जगताप,सुकदेव ठाकुर,भिकन पंडीत गायकवाड,,सचिन जगताप,युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार,वाल्मिक नामदेव गायकवाड,मुकादम,निळकंठ ब्राम्हणे, मुकादम,युसुफ अजीज पठाण आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here