पाचोरा – माझा स्वतःचा व परिवाराचा इतिहास स्वच्छ आणि कर्तृत्वगौरवाने उजळलेला असताना सुद्धा मागील पंधरा वर्षांपासून काही विघ्नसंतोषी, द्वेषभावना बाळगणारे आणि स्वतःच्या कमकुवतपणावर पांघरूण घालणारे काही तथाकथित सत्यान्वेषी लोक, माहिती अधिकाराचा (RTI) चुकीचा वापर करून एका कुटुंबाच्या आयुष्याचे प्रत्येक अंग चिरडून पाहण्याचा विफल प्रयत्न करत आहेत. परंतु आता वेळ आली आहे की या विघ्नसंतोषी मंडळींना स्पष्टपणे, ठामपणे आणि निर्भीडपणे थेट आव्हान देण्याची! हा जळजळीत ओपन चॅलेंज आहे – मी, स्वा.सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन यांचा सुपुत्र – आमच्या कुटुंबावर संशय घेणाऱ्या, माहिती अधिकाराअंतर्गत वारंवार अर्ज करणाऱ्या, परद्यामागून खेळ करणाऱ्या सगळ्यांना थेट आव्हान देत आहे! माझ्या वडिलांचा इतिहास उज्वल आहे. ते स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कागदोपत्री पुरावे, अधिकृत प्रमाणपत्रे, तसेच शासनमान्य छायांकित प्रती माझ्याकडे आहेत. त्याचप्रमाणे मी स्वतः शिक्षित असून माझे शिक्षण, माझ्या मालमत्तेचे दस्तावेज, माझी सामाजिक संस्था, माझे कार्यक्षेत्र याविषयीचे सर्व पुरावे मी जवळ बाळगले आहेत. माझ्या पत्नीचे शिक्षण, तिची नोकरी सेवा, पदस्थापना, याचे संपूर्ण अधिकृत दस्तावेजही माझ्याकडे सुरक्षित आहेत. परंतु मागील १५ वर्षांपासून एका बापाची औलात नसलेले काही लोक – काही थेट आणि काही अप्रत्यक्ष – सातत्याने माहिती अधिकाराचा आधार घेत माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याची तपासणी करण्याचा केविलवाणा आणि भ्याड प्रयत्न करत आहेत. या सगळ्या विघ्नसंतोषी तत्वांना माझा थेट सवाल आहे: तुमच्यात जर खरोखर हिंमत असेल, जर तुमच्या रक्तात पुरुषार्थ असेल, जर तुम्ही एकाच बापाची खरी औलाद असाल, तर तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात या! छुप्या मार्गाने माहिती काढण्याचे नाटके बंद करा! सर्व संशयी, तोंडावर गोड बोलणारे पण पाठीमागे वार करणारे, माझ्या कुटुंबाविषयी माहिती गोळा करणारे, हे लक्षात ठेवावं — “९ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ९ ते ११ या वेळेत, माझ्या निवासस्थानी (माझ्या दारात) स्वतःसह आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या!” तुम्हाला जी माहिती हवी आहे, ज्या कागदपत्रांच्या प्रती हव्या आहेत, त्यांची एक सुस्पष्ट यादी प्रत्यक्ष माझ्या हाती द्या. हे सर्व व्हिडीओ कॅमेऱ्यावर रेकॉर्ड होईल. तुमचं चेहरे, तुमचं बोलणं, आणि तुमचा हेतू – सर्व काही समाजासमोर उघड होईल! जर तुम्ही ९ ऑगस्टला प्रत्यक्ष तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात आले & भेट देऊन, कॅमेरासमोर माझ्या हाती कागदांची यादी सोपवलीत, तर १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 10-00 वाजता तुमच्या बायका पोरंसह सर्व कुटूंब माझ्या दारात आल्यास मी स्वतः तुमच्या कुटूंबाच्या हाती, माझ्या स्वखर्चाने, मागितलेल्या प्रत्येक माहितीची संपूर्ण प्रमाणित व छायांकित प्रती देईन. ते सुद्धा पुन्हा व्हिडीओ कॅमेऱ्याच्या उपस्थितीत, पारदर्शकतेने, पूर्ण खुलेपणाने – म्हणजे समाजालाही कळेल की कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं! माहिती अधिकार कायदा लोकशाहीतील एक मजबूत हत्यार आहे – पण दुर्दैवाने काही विघ्नसंतोषी आणि स्वार्थी व्यक्ती त्याचा गैरवापर करून वैयक्तिक सूडबुद्धीने वापर करतात. त्यांना इतकंच सांगायचं आहे – “आरटीआय म्हणजे कोणाच्या वैयक्तीक पातळीवर संशय घेण्याचं साधन नव्हे, ती एक जबाबदारी आहे!” माहिती मागणाऱ्याला अधिकार असतोच, पण माहिती देणाऱ्यावरही काही कायदेशीर बंधनं असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती मागितली आहे ते देऊ शकणार नाहीत पण मी मात्र त्या बंधनांना बगल देत, स्वतः पुढाकार घेऊन सर्व काही खुलेपणाने समाजासमोर ठेवायला तयार आहे. एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो – माझा इतिहास पारदर्शक आहे. माझ्या वडिलांनी देशासाठी लढा दिला, मी समाजासाठी काम करत आहे, आणि माझं कुटुंब स्वतःच्या कष्टावर उभं आहे. माझ्या मालमत्तेपासून ते शिक्षण, पत्नीसह कुटुंबातील प्रत्येक गोष्टीपर्यंत जेवढी माहिती तुम्हाला हवी आहे, तेवढीच माहिती मी देण्यास तयार आहे – एका बापाची औलाद असाल आणि आपल्या कुटूंबासह माझ्या कुटूंबाची माहिती घेण्यासाठी खऱ्या हिंमतीने सामोरे आलात, तरच! ते सुद्धा ९ ऑगस्टला यादी देणे & १५ ऑगस्टला घेणे व सर्व ऑन व्हिडिओ कॅमेरा ध्येय न्युजच्या कॅमेऱ्या समोर जे काही घडेल ते सर्व समाजासमोर येईल. या चॅलेंजला नकार दिलात, तर समाजाला स्वतःच ठरवू द्या की तुमची लायकी काय आहे. समाजात काही असे लोक असतात, जे स्वतः काही करत नाहीत, पण इतरांनी काय केलं ते शोधत बसतात. त्यांच्या स्वतःच्या पायात चप्पल नसते, पण दुसऱ्याच्या बुटांची किंमत ठरवतात. शेवटी पुन्हा एकदा ठणकावून सांगतो: “मी ओपन चॅलेंज देतो – जर तुमच्यात दम असेल, एका बापाची औलाद असाल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने एकच मर्दाने दिलेल्या गर्भातून जन्म घेतला असाल, तर माझ्या दारात या आणि सामोरे जा!” छुपा खेळ बंद करा… माहिती हवी असेल, तर थेट समोर या. द्वेष, हेवेदावे, ईर्षा आणि खोट्या प्रचाराच्या वावटळीत अडकून राहू नका. “मी, माझं कुटुंब, माझा इतिहास – हे सगळं माझ्या कपाळावर स्वाभिमानाने कोरलेलं आहे. त्यामुळे खोट्या शंकेची सावली देखील आम्हाला शिवू शकत नाही!” हा चॅलेंज समाजात पोचवा – कारण सत्य कधीच लपून राहत नाही! Dhyeya News & सा. झुंज संपादक संदीप दामोदर महाजन, पाचोरा *M0.73 8510 8510*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी अठरावे कविसंमेलन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. “मैत्री, देशभक्ती आणि मुक्त कविता” या त्रिसूत्री संकल्पनेवर आधारित या संमेलनात १६ निवडक कवींनी भावस्पर्शी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध वातावरणात भावनांची मुक्त अभिव्यक्ती अनुभवता आली. “कविता म्हणजे अंतःकरणाचा आवाज” या भूमिकेचा प्रत्यय या मंचावर आला. संमेलनाचे आयोजन “मैत्रीचे धन”, “भारत माझा देश आहे!” आणि “अंतरंगातील कवितागंध” या तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते. प्रथम सत्रात मैत्री या नात्याची निरपेक्षता, उबदारपणा आणि विश्वास रेखाटणाऱ्या कविता सादर झाल्या. दुसऱ्या सत्रात देशप्रेम, स्वातंत्र्यलढा आणि भारतीयत्वाच्या भावना असलेल्या रचना सादर झाल्या. शेवटच्या सत्रात वैयक्तिक अनुभव, सामाजिक भान आणि मुक्त अभिव्यक्ती यांचा मिलाफ असलेल्या कविता सादर करण्यात आल्या. या कविसंमेलनात प्रकाश बागडे, डॉ. मानसी पाटील, धनंजय पाटील, किशोरी पाटील, विवेक जोशी, कल्पना मापूसकर, विक्रांत लाळे, उत्तम कुलकर्णी, वैभवी गावडे, आश्विनी म्हात्रे, रविंद्र पाटील, डॉ. अनुज केसरकर, गुरुदत्त वाकदेकर आणि सनी आडेकर या कवींनी आपल्या विविध शैलीतील रचना सादर केल्या. विशेष सादरीकरणात चंद्रकांत दढेकर यांनी डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या ‘मैत्री’विषयक लेखाचे भावपूर्ण अभिवाचन करत श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला. कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून दिलीप राणे आणि संध्या दढेकर यांनी प्रत्येक सादरीकरणाचा रसग्रहणपूर्वक आनंद घेतला आणि कवींना सकारात्मक अभिप्राय देत प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात आले आणि एकत्रित छायाचित्राने या संमेलनाची स्मृती कायमस्वरूपी जपली गेली. रसिकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद, सभागृहातील शिस्तबद्धता आणि कविता सादरीकरणाचा दर्जा यामुळे अठरावे संमेलन संस्मरणीय ठरले. संपूर्ण कार्यक्रमासाठी संयोजन, वेळेचे नियोजन आणि साहित्यिक वातावरण यांचे उत्तम सूत्रसंचालन केले गेले. या यशस्वी संमेलनानंतर आयोजकांनी आगामी एकोणिसावे कविसंमेलन रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, सदर कविसंमेलनाचे सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. काव्यप्रेमींनी या संमेलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कविसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुज केसरकर, उत्तम कुलकर्णी, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील, वैभवी गावडे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा) आणि सनी आडेकर (सचिव – शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांनी विशेष मेहनत घेतली. मैत्रीचा गहिवर, देशभक्तीचा अभिमान आणि अंतर्मनातील संवेदनांचा स्पर्श घडवणारे हे संमेलन कविता, कवी आणि रसिक यांच्यातील बंध अधिक दृढ करणारे ठरले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजसेवेच्या क्षेत्रात गेली सहा दशके कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ सायन या संस्थेचा ६१ वा वर्धापनदिन आणि नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा माटुंगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने लायन राजेश रसिकलाल शाह यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजू मनवानी यांच्या शुभहस्ते अध्यक्ष व कार्यकारिणीने शपथ घेतली. यावेळी डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन फिरोज कात्रक यांनी १५ नवीन सदस्यांचे इंडक्शन करून क्लबच्या कार्याचा विस्तार साधला.
कार्यक्रमात लायन क्रिस्टीन स्वामीनाथन यांनी वर्ष २०२४-२५ या कार्यकाळाचा अहवाल प्रभावीपणे सादर केला. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लायन राजेश शाह यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “सायन क्लब आणि जीओ रोटी घर या माध्यमातून गरजू, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी सेवा हाच आमचा प्राधान्यक्रम राहणार आहे.”
क्लबच्या माध्यमातून झोपडपट्टी, वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पोस्ट ऑफिस, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि रस्त्यावरच्या मुलांसाठी अल्पोपहार व जेवणवाटपाचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तसेच वह्या, स्टेशनरी किट्स, छत्र्या, रेनकोट वाटप, आणि रुग्णांसाठी औषध पुरवठा यांसारखे प्रकल्पही चालू आहेत.
या समारंभास फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन पवन अग्रवाल, सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन हुजैफा घड़ियाली, अनेक पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर, लायन सदस्य आणि राजेश शाह यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन लायन संतोष चौहान, रीटा अतुल संघवी आणि राकेश सिंह यांनी केले. संपूर्ण सोहळा लायन वसंत खेतानी आणि रीना खेतानी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडला.
संयुक्त सचिव शेतल शाह यांनी आगामी उपक्रमांचा आढावा सादर केला, तर प्रदर्शन सचिव सोनी सिंह यांनी प्रमुख अतिथी व लायन सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संपूर्ण शपथविधी सोहळा हा सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा ठरला.
आपल्या आयुष्यात झाडं म्हणजे केवळ निसर्गाचा एक भाग नसून, ती आपल्याला माणसांविषयी काही खोल विचार करायला भाग पाडतात. झाडे निरपेक्षपणे आपलं देणं देतात—कधी फळं, कधी फुलं, कधी सावली, तर कधी काटे. आणि या विविध झाडांच्या गुणधर्मातून आपल्याला अनेक माणसांचे स्वभाव समजून घेता येतात. हा लेख या समांतरतेवर आधारित आहे—आपल्या अवतीभोवती असणाऱ्या झाडांप्रमाणे माणसेही अनेक प्रकारची असतात. काही लोक म्हणजे जणू आंबा, पिंपळ, बाभूळ, वड यांच्या गुणधर्मांनी युक्त. तर काही लोक, अशोकासारख्या झाडांप्रमाणे, केवळ स्वतःच्या सौंदर्याचा आनंद घेत जगणारे. त्यांचे अस्तित्व असते, पण त्यांच्या सहवासातून ना कोणाला दिलासा मिळतो, ना उपयोग, ना प्रेरणा. झाडांची वर्गवारी आणि त्यांची प्रतीके: १.) फळ देणारी झाडे – उपयुक्ततेचे प्रतीक:-आंबा, चिंच, पेरू, सीताफळ, नारळ यांसारखी झाडे केवळ स्वतः उगवत नाहीत, तर आपल्या साऱ्यांच्या उपयोगासाठी फळं देतात. ही झाडं उपयुक्ततेचं मूर्त रूप आहेत. त्यांच्या सान्निध्यात असणं म्हणजे पोषण, समाधान, आणि आभार. अशा झाडांसारखे माणसं समाजात असतात—ज्यांना मिळालेलं ज्ञान, पैसा, सन्मान हे सर्व ते दुसऱ्यांसाठी वापरतात. ते लोक दुसऱ्यांना संधी देतात, उभं करतात, वाढवतात. २.) फुलं देणारी झाडे – सौंदर्य व आनंदाचे प्रतीक: मोगरा, गुलाब, पारिजातक ही झाडं आपल्या जीवनात रंग भरतात. त्यांचा उपयोग केवळ सजावटीसाठी नसतो, तर सण-उत्सव, धार्मिक विधी, गंध-परंपरा यासाठीसुद्धा होतो. अशी झाडं आनंद निर्माण करतात. काही माणसं याच फुलांसारखी असतात—ते जिथे असतात तिथे हसवतात, प्रेरणा देतात, वातावरण प्रसन्न करतात. ३. सावली देणारी झाडे – आधाराचे प्रतीक: वड, पिंपळ, निंब, बकुळ यांसारखी झाडं उन्हाळ्यात पथिकांना थांबायला जागा देतात. ही झाडं कोणतेही शुल्क न आकारता, कोणताही हेतू न ठेवता, फक्त आधार देण्यासाठी असतात. काही माणसं अशीच असतात—ते आपल्याला ऐकतात, समजून घेतात, आपल्याला आधार देतात. ४.) काटेरी झाडे – रक्षणाचे प्रतीक: बाभूळ, काटेसावर, दुर्गम भागांतील झाडे ही काटेरी असतात. त्यांचा उपयोग शेतीच्या कुंपणासाठी होतो, सुरक्षिततेसाठी होतो. ही झाडं इतरांपासून स्वतःला व आपल्याला वाचवतात. माणसांतही काही जण असे असतात—थोडेसे उग्र स्वभावाचे, पण नेहमी आपल्याला संकटांपासून दूर ठेवणारे, खरे रक्षक. पण, ‘अशोक’ झाडंही असतात – ना फळं, ना फुलं, ना सावली, ना पक्षी अशोकाचं झाड सुंदर दिसतं, पण त्याला ना खायची फळं असतात, ना सुगंधित फुलं. त्याच्या फांद्या काटेरी नाहीत म्हणजे सुरक्षेसाठी उपयोगी नाहीत, आणि त्याच्या पानांवर पक्षीही बसत नाहीत. त्याचे सौंदर्य म्हणजे एक भास—स्वतःसाठी असलेली सजावट. अशी झाडं केवळ स्वतःच्याच अस्तित्वात रमलेली असतात. माणसांमध्येही अशोक वृत्तीची माणसं असतात. ही माणसं दिसायला चकचकीत, उच्चभ्रू वाटतात, बोलण्यात गोडसरपणा असतो, पण त्यांच्या सहवासातून काहीच मिळत नाही. ना सहानुभूती, ना मदत, ना प्रेरणा. ते स्वतःसाठी जगतात—त्यांचा आयुष्याचा उद्देश केवळ स्वतःचा फायदा आणि प्रतिष्ठा असतो. ते कोणावर विश्वास ठेवत नाहीत, कोणासोबत बांधिलकी ठेवत नाहीत, आणि कोणाचं दुःख समजून घेत नाहीत. अशा माणसांशी जवळीक म्हणजे एक मानसिक कोरडेपणाचा अनुभव. आपण निवड काय करतो? हा लेख इथेच अत्यंत महत्त्वाचा होतो. कारण तो केवळ इतरांची तुलना झाडांशी करून थांबत नाही, तर एक प्रश्न विचारतो—“आपण कोणत्या झाडांच्या सहवासात राहायचं ठरवतो?” म्हणजेच, आपली संगत कोणाशी आहे? अशा माणसांशी का, जे समाजासाठी काही देत नाहीत, की जे तुम्हाला आधार, फळं, सुरक्षा देतात? सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे, म्हणजे स्वतःही अधिक चांगलं होण्याची प्रेरणा. नकारात्मक लोकांच्या नुसत्या सौंदर्याचा आकर्षण म्हणजे अंतहीन मानसिक थकवा. चिंतन करण्यासारख्या गोष्टी: आजवर आपण ज्या माणसांशी संबंध ठेवले आहेत, त्यांच्यापैकी कितीजण फळ देणाऱ्या झाडांसारखे आहेत? आपल्याला कोणत्या झाडांसारखं व्हायचं आहे? आपणही केवळ स्वतःसाठी जगतो का? की दुसऱ्यांना काही देण्याचा प्रयत्न करतो? आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, समाजाला आपण काय शिकवतो? शेवटी एक आत्मपरीक्षण :झाड हे आपल्या जीवनाला जेवढं शिकवतात, तेवढं कदाचित कोणीही नाही. फळ देणाऱ्या झाडांना स्वतःचं फळ कधीच चाखता येत नाही. काटेरी झाड आपल्याला वाचवते पण स्वतः नेहमी वेदनेत असते. आणि सौंदर्याच्या झाडावर कधी कधी एकही जीव आधार घेत नाही. हे सर्व आपणच आहोत—कधी फळ देणारे, कधी काटेरी, कधी सावली, कधी स्वतःसाठी जगणारे. फरक इतकाच की आपण ठरवू शकतो की “कसल्या प्रकारचं झाड व्हायचं?” आणि त्याहून महत्त्वाचं – “कसल्या प्रकारच्या झाडांच्या संगतीत राहायचं?” स्वतःचे हित बघणं चुकीचं नाही. पण त्यासाठी इतरांपासून पूर्णपणे तुटलेलं असणं म्हणजे आयुष्याचा अर्थच गमावून बसणं. आपल्याला अशा व्यक्तींची गरज आहे, जे झाडांसारखे निःस्वार्थ आहेत—देतात, झेलतात, रक्षण करतात आणि प्रेम करतात. आणि आपणही तसंच झाड व्हायचा प्रयत्न करायला हवा. Dhyeya News & सा. झुंज संपादक: संदीप दा. महाजन, पाचोरा M0.73 8510 8510
मुंबई – येथील राजभवनात दिनांक 29 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या भव्य राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान समारंभात महाराष्ट्र पोलीस दलातील दोन अत्यंत निष्ठावान, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे हे दोघेही अधिकारी काही काळ पाचोरा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत होते. हे अधिकारी म्हणजे सध्या मुंबई शहरातील आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त शाम खंडेराव शिंदे (Mo.9049980533) आणि नागपूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओमप्रकाश गंगाधर कोकाटे (Mo.9923480804). सहायक पोलीस आयुक्त शाम शिंदे (Mo.9049980533) यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक भगूर गावात झाला. बालपणापासूनच सामाजिक भान, कष्टाची तयारी आणि जबाबदारीची जाणीव त्यांनी अंगीकारली. शिक्षणानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत 1991 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. पाचोरा पोलीस ठाण्यात PSI म्हणून त्यांनी काही काळ सेवा बजावली आणि त्यानंतर अमरावती, जळगाव, नाशिक, नवी मुंबई, मुंबई येथे विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून उल्लेखनीय कार्यगिरी बजावली. त्यांनी VVIP सुरक्षा विभागात तीन वर्षे सेवा बजावत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी पाच वर्षे सेवा देत अनेक धाडसी सापळा कारवाया केल्या. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवायांमुळे शासनाच्या तसेच जनतेच्या विश्वासात भर घालणारे काम त्यांनी केले. शाम शिंदे (Mo.9049980533) यांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाले असून आतापर्यंत २७८ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची सेवा कार्यक्षमता, धैर्य, पारदर्शकता आणि कायद्यावरील निष्ठा या गुणांमुळे पोलीस दलात त्यांच्याकडे आदर्श नेत्याच्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्या आचारसंहितेचा मूलमंत्र – “कर्तव्य सर्वोपरि” – त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि कृतीत प्रतिबिंबित होतो. समाजात भ्रष्टाचार आणि बेजबाबदारीबाबत चिंता असताना, शाम शिंदे (Mo.9049980533) यांच्यासारखे अधिकारी न्याय, नियम आणि सेवाभाव यांचा एक आदर्श म्हणून उभे राहतात. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे त्यांना राष्ट्रपतींकडून “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक” बहाल झाले – हे त्यांच्या संपूर्ण सेवाकार्यातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक आहे. दुसरे अधिकारी म्हणजे ओमप्रकाश गंगाधर कोकाटे (Mo.9923480804), मूळ अमरावती जिल्ह्यातील नायगाव येथील असून 1992 साली पोलीस सेवेमध्ये कॉन्स्टेबल म्हणून प्रवेश घेतला. अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्यांनी 1998 साली विभागीय परीक्षेत यश मिळवून PSI म्हणून पदोन्नती मिळवली. पाचोरा पोलीस ठाण्यात त्यांनी PSI म्हणून जबाबदारी पार पाडताना गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक पावले उचलली. त्यांची तीन दशकांची कारकीर्द अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, नाशिक, जळगाव व नागपूर या जिल्ह्यांमध्ये विविध तपास विभागांमध्ये कार्यरत राहिली. सध्या ते नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात. LCB विभागात काम करताना ओमप्रकाश कोकाटे (Mo.9923480804) यांनी सुसंघटित टोळ्यांविरोधात, गांजा वाहतूक, गायींची तस्करी, गंभीर गुन्हे, अपहरण, राजकीय गुन्हेगारी याविरोधात कार्यवाही करत असंख्य यश मिळवले. 2023 मध्ये ओडिशावरून येणाऱ्या ११०० किलो गांजाच्या साठ्याचा सुगावा घेऊन कारवाई केली, तर 2024 मध्ये वर्धा येथे गायींच्या तस्करीवर छापा टाकून ५४ गायी ताब्यात घेतल्या. त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्व, धाडस, वेगवान निर्णयक्षमता आणि नियोजनशक्तीमुळे ते पोलीस दलात सन्माननीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावावर आजवर ४५० हून अधिक पुरस्कार व सन्मानपत्रे आहेत. त्यात DG Insignia हे मानाचं चिन्हही आहे. समाजात आणि दलात त्यांच्याकडे एक कर्तव्यदक्ष, सेवाभाव असलेला अधिकारी म्हणून पाहिले जाते. दोन्ही अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाच्या स्वरूपात मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचा गौरव नाही, तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यशक्तीचा आणि जनतेच्या सुरक्षेच्या कार्याला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरची पावती आहे. विशेष म्हणजे शाम शिंदे (Mo.9049980533) आणि ओमप्रकाश कोकाटे (Mo.9923480804) या दोघांनीही आपल्या सुरुवातीच्या सेवेत पाचोरा पोलीस ठाण्यात PSI म्हणून काम केले असून आज हे दोघेही राष्ट्रपती पदकप्राप्त झाले आहेत, ही बाब पाचोरा शहरासाठी आणि तालुक्यासाठी विशेष अभिमानास्पद आहे. मुंबई येथील राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आयोजित राष्ट्रपती पोलीस पदक वितरण समारंभात १०६ जणांना विविध प्रकारच्या पदकांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ६४ शौर्यगौरव पदक, ४ विशेष सेवा पदक, आणि ३८ उपयुक्त सेवा पदकांचा समावेश होता. यावेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री युगेश कदम, मुख्य सचिव अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा (Meritorious Service Medal प्राप्त), आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पदकप्राप्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. अशा प्रेरणादायी आणि निष्ठावान अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावत राहते. शाम शिंदे (Mo.9049980533) आणि ओमप्रकाश कोकाटे (Mo.9923480804) यांचा प्रवास केवळ यशाचा नव्हे, तर नव्या पिढीला नैतिकता, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ ठरावा, हीच त्यांच्या गौरवाच्या क्षणी सुसंस्कृत समाजाची भावना आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकट करणाऱ्या आणि गुन्हेगारीला पायबंद घालणाऱ्या पोलिस यंत्रणेतील अधिकारी हे लोकशाही व्यवस्थेचे खरे रक्षक असतात. अशाच एका निष्ठावान, शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. नागपूर ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे (LB) वरिष्ठ पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गंगाधर कोकाटे साहेब यांना President’s Police Medal for Distinguished Service हा सर्वोच्च दर्जाचा सन्मान नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्रातील केवळ चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची या यादीत निवड झाली असून, नागपूर ग्रामीण विभागातून हे सन्मान मिळवणारे एकमेव अधिकारी कोकाटे साहेब ठरले आहेत. ओमप्रकाश कोकाटे साहेब यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील नायगाव. साध्या ग्रामीण कुटुंबात जन्मलेल्या कोकाटे साहेबांनी लहानपणापासूनच कठोर मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर प्रगतीचे शिखर गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगले. शिक्षणात प्रावीण्य असल्याने त्यांनी विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथून एम.ए. ही पदवी पूर्ण केली. सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव त्यांना लवकरच पोलीस सेवेकडे आकर्षित करून गेली. त्यांचा वैयक्तिक जीवनप्रवास अत्यंत शिस्तबद्ध, निष्ठावान आणि कुटुंबप्रेमी राहिला असून समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कार्यस्थळी ते प्रामाणिकतेचा, पारदर्शकतेचा आणि वेळेच्या काटेकोरपणाचा आदर्श मांडतात. ओमप्रकाश कोकाटे साहेब यांनी 1992 साली पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला. अत्यंत कष्टपूर्वक आणि निग्रहाने त्यांनी यंत्रणेत आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अंगभूत नेतृत्वगुणांच्या आणि उच्च शिस्तप्रियतेच्या जोरावर त्यांनी 1998 साली विभागीय परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती मिळवली. त्यांच्या तब्बल ३ दशकांच्या सेवेमध्ये ४५० हून अधिक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे त्यांना मिळाली आहेत. त्यात DG Insignia सारखा दर्जेदार राष्ट्रीय पोलीस पदक समाविष्ट आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि नागपूर या विविध जिल्ह्यांमध्ये सेवा बजावत गुन्हेगारीवर कठोर पावले उचलली आहेत. सध्या ओमप्रकाश कोकाटे साहेब हे नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. LCB हा विभाग गुन्हेगारी अन्वेषण, गुप्त माहिती गोळा करणे, टोळीयुद्ध, राजकीय गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. कोकाटे साहेब यांनी या विभागात जेवढ्या निग्रहीपणे काम केले आहे, तेवढे क्वचितच अधिकारी करतात. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कारवायांमध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये गायींच्या आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात वर्धा जिल्ह्यात Y-पॉईंटवर सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आणि ५४ गायी वाचवून ताब्यात घेतल्या. 2023 मध्ये ओडिशावरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ११०० किलो गांजाच्या वाहतुकीचा सुगावा घेत त्यांनी तपासात पुढाकार घेतला. अचूक माहिती आणि सटीक नियोजनाच्या जोरावर संपूर्ण गांजासाठा जप्त करत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. स्थानिक पातळीवर राजकीय गुन्हेगारांचे नेटवर्क, त्यांच्या हालचाली, निवडणूक काळातील बेकायदेशीर कृती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी विशेष गुप्त यंत्रणा आणि गस्त यंत्रणा विकसित केली. नागपूर ग्रामीणसह इतर जिल्ह्यांमध्ये खून, दरोडे, जबरदस्ती, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांनी यशस्वी तपास करून आरोपींना तातडीने अटक केली. त्यांनी चालवलेल्या या कारवाया तांत्रिक दृष्टिकोन, पुराव्यांवर आधारित कामगिरी आणि वेगवान निर्णयक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरल्या. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आणि अखिल भारतीय पोलीस यंत्रणेतील सेवा गुणांकनानुसार, ओमप्रकाश कोकाटे साहेब यांना President’s Police Medal for Distinguished Service हा मानाचा पुरस्कार 2025 मध्ये जाहीर झाला. ही एक अशी सेवा आहे, जी दीर्घ काळ निष्ठेने, सचोटीने आणि गुणवत्तेने बजावल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवते. त्यांच्या नावावर आजवर ४५० पेक्षा अधिक सन्मानपत्रे व रिवॉर्ड्स जमा झाले आहेत. त्यांच्या कामात स्पष्टता, जबाबदारी, निर्णयक्षमता, वेळेचं व्यवस्थापन, आणि सार्वजनिक हितासाठी धाडसी पावले उचलण्याची वृत्ती ही स्पष्टपणे जाणवते. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गंगाधर कोकाटे साहेब हे महाराष्ट्र पोलिस दलातील अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्या तळमळीने आपली सेवा दिली आहे, ती राष्ट्रपती पदकासारख्या सन्मानास पात्र ठरावी हे अगदी योग्य आहे. नागपूर ग्रामीण विभागासाठी ही मोठी गौरवाची बाब आहे की, त्यांच्या पोलीस दलातील एक अधिकारी राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झाला आहे. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समाजात सत्कार आणि गौरव होणे, हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. दिनांक 29 जुलै 2025 रोजी मुंबई येथील राजभवन मध्ये एक भव्य राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ६४ जणांना शौर्यगौरव पदक, ४ जणांना विशेष सेवा पदक आणि ३८ जणांना उपयुक्त सेवा पदक देण्यात आले. एकूण १०६ पुरस्कारप्राप्तांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य गृहमंत्री युगेश कदम, गृह विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा (ज्यांना Meritorious Service Medal प्राप्त झाला), तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व पुरस्कारप्राप्तांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. हा समारंभ पोलीस दलातील धैर्यगौरव, कार्यक्षमता व सेवा भावनेचा गौरव करणारा एक फारच महत्वाचा आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला. राष्ट्रपतींकडून प्राप्त झालेले “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक” हे कोकाटे साहेबांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आणि सर्वोत्तम मानांकन ठरले आहे. हे पदक केवळ पुरस्कार नसून पोलीस सेवेमधील उत्कृष्टतेचे आणि निष्कलंक सेवाभावाचे प्रतीक असल्याचे राज्यपाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले.