Home Blog Page 135

पाचोरा महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक  व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्गत संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा, जि. जळगाव येथे वार्षिक सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 16 व 17 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले आहे.
     कार्यक्रमाची सुरुवात 16 जानेवारी

2025, गुरुवारी सकाळी 10.30 वाजता होणार असून उद्घाटन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचे अध्यक्षस्थान मा. दादासाहेब सुभाषजी तोतला (चेअरमन, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती) भूषविणार आहेत, तर उद्घाटक म्हणून

मा. अशोक पवार साहेब (पोलीस निरीक्षक, पाचोरा) उपस्थित राहतील.
   यासोबतच प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. दादासाहेब खलील दादामियाँ देशमुख (चेअरमन, व्यवस्थापन समिती, श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा), मा. भाईसाहेब दुष्यंतभाई रावल (संचालक, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था) आणि मा. प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष बुधा पाटील (एस.एस.एम.एम. महाविद्यालय,

पाचोरा) यांचा समावेश असेल.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध कला व कौशल्यविषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धीमापन, वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, गीतगायन, रांगोळी, डिश डेकोरेशन, शेला-पागोटा, वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. या स्पर्धा 16 जानेवारी रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत संपन्न होणार आहे
     17 जानेवारी 2025, शुक्रवारी

सकाळी 10.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी अध्यक्ष म्हणून मा. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ (आमदार, पाचोरा-भडगाव) उपस्थित राहतील. याशिवाय मा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (प्रसिद्ध व्याख्याते व गझलकार, धुळे) आणि मा. धनंजय येरूळे साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून

लाभले आहेत.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने विशेष प्रयत्न केले आहेत. या समितीमध्ये मा. नानासाहेब संजय ओंकार वाघ (चेअरमन), मा. नानासाहेब व्ही.टी. जोशी (व्हा. चेअरमन, तसेच सिनेट सदस्य, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव), मा. दादासाहेब अॅड. महेश देशमुख (मानद सचिव) आणि अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
     कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. शिरीष बुधा पाटील (प्राचार्य), प्रा. डॉ. वासुदेव सोमाजी वले (उपप्राचार्य), डॉ. शरद पाटील (IQAC समन्वयप्रा.क), तसेच सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी व प्रा. राजेश वळवी यांच्यासह समस्त प्राध्यापक व कर्मचारी

वर्गाकडून करण्यात आले आहे.
     सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक चैतन्य वृद्धिंगत करणे हा आहे.
   स्थळ: महाविद्यालय मुख्य इमारत, भगवंत रोड, पाचोरा
वेळ: 16 व 17 जानेवारी 2025, सकाळी 10.30 वाजता
   महाविद्यालय प्रशासनाने या भव्य कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करावा. असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे

पाचोरामध्ये “अवध इंजिनियरिंग अँड डेव्हलपर्स” च्या 3BHK लक्झरी बंगल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार

0

Loading

पाचोरा – शहरातील तलाठी कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या अवध इंजिनियरिंग अँड डेव्हलपर्स या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या फेस 2, 3BHK लक्झरी बंगलो प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी, दि. 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
या प्रकल्पाच्या बांधकामासाठी

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आराखड्यांचा अवलंब करण्यात येत असून, ग्राहकांच्या अपेक्षांना आणि आवश्यकता पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. हा प्रकल्प श्रद्धा मार्बलच्या मागे, भडगाव रोड, पाचोरा येथे उभारला जात आहे.
कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रमुख सल्लागार:
या प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी तज्ञ मार्गदर्शकांची साथ मिळाली आहे. यामध्ये:
दिनेश पाटील सर (प्रसिद्ध वास्तूतज्ञ)
Er. कौस्तुभ पाटील (RCC डिझायनर)
शैलेश खंडेलवाल (श्रद्धा मार्बलचे व्यवस्थापक)
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
प्रकल्पामध्ये आधुनिक डिझाईन्स, प्रशस्त जागा, उच्च दर्जाचे बांधकाम

साहित्य आणि ग्राहक केंद्रित योजना यांचा समावेश आहे. तसेच या प्रकल्पाचे लोकेशन अत्यंत सोयीस्कर असून, येथील शांततामय वातावरण हे अधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
आपल्या उपस्थितीची विनंती:
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आपली उपस्थिती आणि शुभाशीर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विनीत
मोबा. 9420109477 / 9420347951
“अवध इंजिनियरिंग अँड डेव्हलपर्स” पाचोरा.

अजातशत्रु व्यक्तित्व को अंतिम विदाई – स्व. भिकचंद कपुरचंदजी मुथा सर का जीवनकार्य

0

Loading

पाचोरा – शहर के वरिष्ठ व्यक्तित्व, श्री गो. से. हाईस्कूल के पूर्व पर्यवेक्षक और पाचोरा जैन श्रावक संघ के वरिष्ठ सदस्य स्व. भिकचंद कपुरचंद मुथा ने 15 जनवरी 2025 को सुबह 5 बजे 76 वर्ष की आयु में अंतिम सांस ली। उनके निधन से पाचोरा शहर ने एक निस्वार्थ सेवाभावी, आदर्श शिक्षक और समाज का सच्चा आधारस्तंभ खो दिया है।
        अंतिम यात्रा का मूक साक्षी
स्व. मुथा सर की अंतिम यात्रा आज दोपहर 3:30 बजे संघवी कॉलोनी स्थित निवास स्थान से निकलेगी। उनके अंतिम संस्कार में शहर के विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति, जैन समाज के प्रमुख सदस्य और आम नागरिक बड़ी संख्या में शामिल होंगे। उनके कार्यों की याद में सभी ने उन्हें श्रद्धांजलि दी है। साप्ताहिक झुंज और ध्येय न्यूज परिवार भी इस दुख की घड़ी में सहभागी है और उनके परिवार को सांतवना प्रदान करने के लिए ईश्वर से प्रार्थना करता है।
      स्वतंत्रता सेनानी पिता की प्रेरणा और परिवार की जिम्मेदारी
    स्व. मुथा सर स्वतंत्रता सेनानी स्व. कपुरचंद नथमल मुथा के ज्येष्ठ सुपुत्र थे। उनके पिता ने देश के लिए जो योगदान दिया, वह स्व. मुथा सर के जीवन में प्रेरणा स्रोत बना। पिता के निधन के बाद उन्होंने अपने माता-पिता की भूमिका निभाते हुए अपनी मां, चार भाइयों और एक बहन की जिम्मेदारी अपने कंधों पर ले ली। परिवार के हर सदस्य की शिक्षा, नौकरी और विवाह की आवश्यकताएं उन्होंने निस्वार्थ रूप से पूरी कीं।
      बच्चों को स्वावलंबन का पाठ
स्व. मुथा सर ने अपने तीन बेटों – दीपक, रवि, और चेतन – को स्वावलंबन का पाठ पढ़ाया। उन्होंने अपने बेटों को स्कूल के दिनों से ही व्यवसाय का महत्व समझाया। उनके मार्गदर्शन में बेटों ने “अपेक्षित” और “बालविद्या” जैसी शैक्षिक सामग्री बेचने का कार्य शुरू किया। बाद में, उन्होंने “सत्यम पुस्तकालय” नामक एक प्रतिष्ठित व्यवसाय स्थापित किया, जो न केवल पाचोरा बल्कि पूरे जलगांव जिले में अपनी पहचान बना चुका है।
      शिक्षा और जरूरतमंद छात्रों के लिए योगदान
    श्री गो. से. हाईस्कूल में पर्यवेक्षक के रूप में काम करते हुए स्व. मुथा सर ने छात्रों की शैक्षणिक उन्नति के लिए कई पहल कीं। उन्होंने जरूरतमंद छात्रों को किताबें, कॉपियां और कपड़े वितरित किए। उनकी मदद का उद्देश्य केवल समाज को शिक्षा के प्रति जागरूक करना था। उन्होंने कई गरीब बच्चों को गोद लिया और उनकी शिक्षा पूरी होने तक उनकी मदद की। इस काम का कभी उन्होंने प्रचार नहीं किया।
     अन्नछत्र, पनपोई और ठंड में जरूरतमंदों की मदद
    बस स्टैंड के पास की पनपोई और जामनेर रोड पर अन्नछत्र स्व. मुथा सर की समाज सेवा के प्रतीक थे। इन दोनों उपक्रमों के माध्यम से उन्होंने प्यासे और भूखे लोगों की मदद की। सर्दियों में गरीबों को राहत पहुंचाने के लिए वे रात में कंबल लेकर निकलते थे। जहां भी ठंड में ठिठुरते हुए लोग दिखते, वे उनके ऊपर कंबल डालकर आगे बढ़ जाते। यह सेवा उन्होंने अपने अंतिम समय तक जारी रखी।
    जैन समाज के प्रति विशेष योगदान
पाचोरा जैन श्रावक संघ के वरिष्ठ सदस्य के रूप में उन्होंने धार्मिक कार्यों में महत्वपूर्ण भूमिका निभाई। वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था के सलाहकार के रूप में भी उन्होंने अपने अनुभव का लाभ समाज को दिया। जाति, धर्म या वर्ग का भेदभाव किए बिना उन्होंने हर जरूरतमंद की मदद की, जिससे उन्हें समाज में अपार सम्मान मिला।
     उनका अजातशत्रु व्यक्तित्व
स्व. मुथा सर वास्तव में अजातशत्रु थे। उनके व्यक्तित्व में निस्वार्थता और सादगी का अनूठा मेल था। उन्होंने अपने कार्य को कभी भी बड़ा दिखाने का प्रयास नहीं किया, बल्कि इसे समाज की भलाई के लिए किया। उनके शांत और सौम्य स्वभाव ने उन्हें सभी का प्रिय बना दिया।
      श्रद्धांजलि और स्मरण
स्व. भिकचंद कपुरचंद मुथा को श्रद्धांजलि अर्पित करते हुए यह कहना उचित होगा कि उनकी सेवाभावी सोच और कर्तव्यनिष्ठा का अनुसरण करना ही उनके प्रति सच्ची श्रद्धांजलि होगी। उनका निधन समाज के लिए अपूरणीय क्षति है, लेकिन उनकी शिक्षाएं और योगदान सदैव प्रेरणादायक बने रहेंगे।
ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करें।

आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका २०२५चे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते भव्य प्रकाशन

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि लोकांशी अधिक जवळीक साधण्यासाठी तयार केलेल्या “आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका २०२५” चे प्रकाशन पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या

हस्ते अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. या विशेष प्रसंगी तालुक्यातील नामांकित

पत्रकार, समाजसेवक आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
     यावेळी मंचावर व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका सल्लागार लक्ष्मण आबा सूर्यवंशी, कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत येवले, शहर संघटक दिलीप परदेशी, शहर सचिव निखिल मोर, तसेच पत्रकार जावेद शेख यांची उपस्थिती होती.
         आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका तयार करण्यामागे पत्रकारांची

मेहनत आणि एकजूट दिसून येते. 12 पानांच्या या दिनदर्शिकेत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील महत्त्वाची माहिती तसेच जाहिरातींमधून लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्याचा उद्देश साधण्यात आला आहे.
विशेषतः, दिनदर्शिका तयार करण्यासाठी माहिती संकलन, रचना, मुद्रण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी

पत्रकार प्रवीण बोरसे आणि पत्रकार दिलीप परदेशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सर्वांनी नमूद केले.
  आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पत्रकारांच्या या प्रयत्नाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका हा पाचोरा

तालुक्यातील एक आगळावेगळा उपक्रम असून पत्रकारांच्या एकजुटीचे द्योतक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो आणि पत्रकारितेची खरी ताकद जाणवते.”
यावेळी त्यांनी पत्रकारांच्या योगदानाला

सलाम करत त्यांच्यासोबत संवाद साधला व त्यांचे विचार ऐकले.
       प्रकाशन सोहळ्याला पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशबापु पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुनील शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच दिनदर्शिकेच्या गुणवत्ता आणि त्यामागील कष्टाची प्रशंसा केली.
     पत्रकार केवळ बातम्या

पुरवण्यापलीकडे जाऊन समाजउपयोगी उपक्रम राबवू शकतात, हे या दिनदर्शिकेच्या माध्यमातून सिद्ध झाले. आय लव्ह पाचोरा या नावाने जसे पाचोरा तालुक्यावरील प्रेम अधोरेखित होते, तसेच पत्रकारांनी केलेल्या अथक

परिश्रमातून एक आदर्श निर्माण केला आहे.
    हा प्रकाशन सोहळा पाचोरा तालुक्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरेल, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली. “आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका २०२५” तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

रोजगाराभिमुख व कौशल्यधिष्टित पिढी निर्माण करणारे शैक्षणिक धोरण – कुलगुरू प्रा विजय माहेश्वरी

0

Loading

पाचोरा – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर ऐनपूर महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात संपन्न
ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. विजय माहेश्वरी, कुलगुरू,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव यांच्या शुभहस्ते भागवत विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. रोजगाराभिमुख व कौशल्यधिष्टित पिढी निर्माण करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० आहे.भारतीय ज्ञान परंपरा, आंतरवासियता, प्रशिक्षण, जबाबदारी इत्यादी वैशिष्ट्ये असलेले हे शैक्षणिक धोरण आहे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा विजय माहेश्वरी यांनी उद्घाटनप्रसंगी केले.प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. तर पाहुणे परीचय कार्यशाळेचे समन्वयक डॉ एस ए पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील यांनी सांगितले की आमचे महाविद्यालय जरी ग्रामीण असले तरी आम्ही शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करु .प्रथम सत्रात वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्पिरीट या विषयावर दुसऱ्या सत्रात प्रा एस आर चौधरी , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी कौशल्य पूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रम या विषयावर मार्गदर्शन केले तसेच तिसऱ्या सत्रात प्रा राजेश जवळेकर, संचालक, नवोपक्रम,नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ कबचौउमवि जळगाव यांनी आंतरवासियता व प्रशिक्षण या विषयावर तर चौथ्या सत्रात प्रा जगदीश पाटील, प्रभारी अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा यांनी भारतीय ज्ञान परंपरा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रचना या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप चेअरमन श्री श्रीराम पाटील,सचिव संजय पाटील, प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वय डॉ एस ए पाटील,व प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली . परिसरातीलमहाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक, विद्यार्थी व पालक असे एकूण १६७ व्यक्तींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ जे पी नेहते व प्रा डॉ डी बी पाटील यांनी केले आभार उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले

पाचोरा येथे भव्य विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

0

Loading

पाचोरा, जि. जळगाव – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; आणि तालुका विधी सेवा समिती पाचोरा तसेच पाचोरा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित असून, रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
   या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी दि. १३ जानेवारी रोजी दिवाणी न्यायालय पाचोरा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील व इतर वकील बांधव उपस्थित होते. या परिषदेत न्या. जी. बी. औंधकर यांनी पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्ट आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
    न्या. औंधकर यांनी सांगितले की, “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ सुलभपणे मिळावेत आणि त्यांना कायदेशीर सहाय्यही उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
    या महाशिबिराचे उद्घाटन सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मंगेश एस. पाटील व सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. अभय एस. वाघवसे, उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. एस. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव हे राहणार आहेत.
   प्रमुख अतिथी म्हणून मा. आयुष प्रताप सिंह, जिल्हाधिकारी, जळगाव; मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव; आणि मा. अॅड. अमोल सावंत, पालक सदस्य, महाराष्ट्र बार कौन्सिल उपस्थित राहणार आहेत.
      विधी सेवा महाशिबिरामध्ये न्यायालयीन यंत्रणा व शासकीय योजना यांचा प्रभावी मेळ साधला जाणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ घेण्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
1. न्याय सहाय्य: वंचित व गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला व सेवा.2. शासकीय योजना व माहिती: महसूल, कृषी, वीज वितरण, आरोग्य, परिवहन, शिक्षण, पालिका विभाग, व इतर शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती.
3. प्रमाणपत्रे व कागदपत्रे: शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल माहिती.2. शासकीय योजना व माहिती: महसूल, कृषी, वीज वितरण, आरोग्य, परिवहन, शिक्षण, पालिका विभाग, व इतर शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती.
3. प्रमाणपत्रे व कागदपत्रे: शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेबद्दल माहिती.    यामध्ये विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारले जातील, जिथे नागरिकांना थेट संवाद साधता येईल.
    महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
    सर्व शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
   शासनाच्या विविध योजनांचे लाभ जसे की वीज बिल सवलत, कृषी अनुदान, शिक्षण विषयक योजना, अपंगांसाठी सेवा, महिला कल्याण योजना, आरोग्यविषयक सेवा व इतर अनेक सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.
   विविध योजना लाभार्थींसाठी उपस्थित राहणारे प्रमुख अधिकारी – जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरटीओ, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश.
         हे महाशिबिर जळगाव जिल्ह्यातील पहिलेच असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा कोणताही लाभार्थी वंचित राहू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
   कार्यक्रमाचे आयोजक:
मा. जी. बी. औंधकर, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पाचोरा; मा. एस. पी. सय्यद, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; अॅड. प्रविण पाटील, अध्यक्ष, तालुका वकिल संघ, पाचोरा.
      संपर्क व अधिक माहिती:
महाशिबिरासंदर्भातील अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वकील संघाचे प्रतिनिधी, तालुका विधी सेवा समिती सदस्य, तसेच शासकीय विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन..

0

Loading

भडगांव : शेतकरी सहकारी संघ संचलिका मा. नगरसेविका योजनाताई पाटील यांचे नववर्ष २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन निर्मल सिडस् संचालिका तथा शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे हस्ते भडगांव शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाले. प्रकाशन प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांनी नूतनवर्ष सर्वाना सुख समृद्धी, यश प्रगती व आरोग्यदायी जावो या शुभेच्छा दिल्या. तसेच योजना पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सदर प्रसंगी मा. नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक गोरख दादा पाटील, वंदे मातरम् प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळुंखे, युवासेना ता. प्रमुख चेतन पाटील, शहर प्रमुख चेतन पाटील, संघटक जिभाऊ महाजन, महीला जि. उपप्रमुख पुष्पाताई परदेशी, ता. उपप्रमुख गायत्री बिरारी, शहर उपप्रमुख सुरेखा वाघ, संघटक सोनाली चौधरी, समन्वयक योगेश पाटील, विश्वनाथ पाटील, उपप्रमुख पृथ्वीराज पाटील, शहर संघटक रोनित अहिरे, ता. संघटक भैय्या राजपूत, शहर उपप्रमुख यश बिरारी, संघटक रितेश महाजन, नवल राजपूत, सत्यजित पाटील, संकेत सोमवंशी, हेमंत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार मधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, की उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमवितो.
   
प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, “कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.”  सदर कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, “व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. सदर कार्यक्रमास आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.

बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदयनगर येथील बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केईएम हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, जे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत गणराज सभागृह, इमारत क्र.१६ च्या बाजूला, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, येथे आयोजित केले जाईल.

रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्त संकलन करणे आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यशस्वीरित्या रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला २४ इंची ट्रॅव्हल बॅग ही आकर्षक भेट दिली जाईल. रक्तदान शिबिराचे आयोजक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत.  हे शिबिर म्हणजे एका उदात्त कार्यात योगदान देण्याची आणि जीव वाचवण्याची सर्वोत्कृष्ट संधी आहे.

“आम्ही सर्वांना पुढे येऊन गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करतो,” असे बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रवक्ते म्हणाले. “प्रत्येक रक्तदान तीन जीव वाचवू शकते आणि आम्हाला आशा आहे की आमचे शिबिर लोकांना समाजाचे ऋण परतफेड करण्यास प्रेरित करेल. आम्ही सर्व रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे आवाहन करतो. तुमचे योगदान अनमोल जीव वाचवण्यास आणि समाजमनावर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकते.”

धाराशिव जिल्हयात ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन संपन्न

0

Loading

धाराशिव (गुरुदत्त वाकदेकर) : माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन थाटात संपन्न झाले. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.

कार्यक्रमाची सुरुवात कमल नलावडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. ग्रंथदिंडी डॉ. सुलभा देशमुख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन झाले. यावेळी  प्राचार्य. डॉ. सुभाष राठोड, प्रा . रणजित दांगट, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. हशमबेग मिर्झा, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, शिवाजीराव घुगे अणदूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
     
विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रा. रणजित दांगट यांच्या ‘आई समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी आई विषय अत्यंत अलवारपणे व जिव्हाळ्याने श्रोत्यांना समजावून सांगितला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असे म्हणून आयोजकांना धन्यवाद दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी “आमचे महाविद्यालय नेहमीच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले.”

सदर कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे
कौटूंबिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या महिला सेवाव्रतींना ‘मातोश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. सुलभा दिलीप देशमुख, धाराशिव (माजी प्राचार्य), डॉ. रेखा अनिल ढगे, (कवयित्री) धारशिव, तृप्ती जगदिश काटकर, कोल्हापूर यांचा समावेश होता. तर सुरभी बी. के. (गीतकार) वडगांव सिध्देश्वर, धाराशिव यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.

सदर संमेलनात ‘आई’ विषयावर घेतलेले कवी संमेलन अतिशय रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. शिवाजी गायकवाड होते. प्रमुख पाहूणे डॉ. रेखा ढगे आणि अरविंद हंगरगेकर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड यांनी आपल्या कवितेतून आई विषय मांडला. गेल्या चार वर्षापासून चालू असलेल्या आई एक महाकाव्य व आई समजून घेतांना कार्यक्रमासाठी आयोजकांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

कविसंमेलनामध्ये डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव, नागोराव सोनकुसरे, नागपुर, रुपेशकुमार जावळे, सुरभी भोजने वडगांव (सिध्देश्वर), गणेश मगर वाघोली, बाळासाहेब मगर धाराशिव, महाविद्यालयीन विद्यार्थीनी  शिवानी जगताप, स्नेहल जाधव, निकिता घुगे, निकिता जाधव, प्रज्ञा सुरवसे यांनी कविता सादर केल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संतोष पवार आणि  डॉ. सचिन देवव्दारे यांनी केले. तर आभार डॉ. तुळशिराम दबडे व डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले.
    
आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कल्पक कार्यक्रमाचे आयोजन रमेशराव पुदाले, सुनील उकंडे, कविता पुदाले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. डी. जी. जाधव, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. पी. एस. गायकवाड, प्रा. अशिष हंगरगेकर, डॉ. संतोष पवार व सर्व सदस्य माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान, नळदुर्ग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दु सुतार, सचिदानंद घुगे, भागीनाथ बनसोड, दतात्रय कांबळे, मधुकर माने, सचिन गायकवाड, भिमराव गवारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!