मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख नेते खासदार अरविंद सावंत यांनी युवासेना, माऊली प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. २२२ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. सर जे. जे. रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिराचा उद्देश रक्तदानाला प्रोत्साहन देणे आणि रुग्णालयांमधील रक्ताची कमतरता दूर करणे हा आहे. समाजकारणाचे खंबीर पुरस्कर्ते असलेले खासदार अरविंद सावंत यांनी समाजाला पुढे येऊन रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. “या उदात्त कार्याला पाठिंबा देण्यासाठी इतके लोक एकत्र येत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो”, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले. “रक्तदान हे एक निःस्वार्थी कृत्य आहे ज्यामुळे असंख्य लोकांचे जीव वाचू शकतात. मी प्रत्येकाने रक्तदान करावे आणि गरजूंना मदत करावी असे आवाहन करतो.”
रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले, ज्यामध्ये २८३ युनिट रक्त जमा झाले. वैद्यकीय व्यावसायिक आणि युवासेना, माऊली प्रतिष्ठान, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. २२२ मधील स्वयंसेवकांसह कार्यक्रमाचे सुरेख आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानाचे महत्त्व आणि नियमित रक्तदात्यांची गरज यावर या शिबिरात प्रकाश टाकण्यात आला. सदर शिबिरास खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीमुळे समाजात जागरुकता वाढण्यास मदत झाली आणि अधिकाधिक लोकांना पुढे येऊन रक्तदान करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्र २३ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध २० नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
*स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:*
सोम. २३ डिसें. २०२४, सायं. ७ वा. कॅनिबल लेखक : डॉ. तृप्ती झेमसे दिग्दर्शक : अभिषेक भगत टाऊन लायब्ररी, नवी मुंबई मंगळ, २४ डिसे. २०२४, सायं. ७ वा. मोक्ष लेखक: महेंद्र कुरघोडे दिग्दर्शक : विराज नारायण नारिंग्रेकर स्टेट बैंक ऑफ इंडिया, मुंबई मेट्रों सर्कल, मुंबई शुक्र. २७ डिसें. २०२४, स. ११:३० वा. ज्योतिषाचे तीन तेरा लेखक व दिग्दर्शक : राजेश मयेकर स्वयंदीप प्रतिष्ठान, मुंबई शुक्र. २७ डिसें. २०२४, सायं. ७ वा. मराठी माणूस नॉट अलाऊड लेखक व दिग्दर्शक : शशांक वामनोलकर सम्यक कालांश प्रतिष्ठान, मुंबई शनि. २८ डिसें. २०२४, स. ११:३० वा. घर त्या तिघांचं लेखक व दिग्दर्शक : आबा पेडणेकर साई कला व सांस्कृतिक ट्रस्ट, मुंबई शनि. २८ डिसें. २०२४, सायं. ७ वा. द हंग्री क्रो लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : सुरेश गांगुर्डे मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन, मुंबई सोम. ३० डिसें. २०२४, स. ११:३० वा. कायाप्पाचा पाडा लेखक: देवेंद्र काळसेकर दिग्दर्शक : नम्रता काळसेकर सह प्रमुख कामगार अधिकारी, पूर्व उपनगरे बृहन्मुंबई म.न.पा. सोम. ३० डिसें. २०२४, सायं. ७ वा. गलती से मिस्टेक लेखक व दिग्दर्शक : प्रतिमा कांबळे प्रभात मित्र मंडळ, मुंबई मंगळ. ३१ डिसें. २०२४, स. ११:३० वा. तुझ्या रुपात मी… लेखक व दिग्दर्शक : संदेश जाधव प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई बुध. १ जाने. २०२५, स. ११:३० वा. मीठ आणि भुसा लेखक व दिग्दर्शक : विठ्ठल सावंत पटेलवाडी मित्र मंडळ, मुंबई बुध. १ जाने. २०२५, सायं. ७ वा. वा गुरु लेखक : डॉ. चंद्रशेखर फणसळकर दिग्दर्शक : गिरीश मयेकर मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, मुंबई गुरु. २ जाने. २०२५, स. ११:३० वा. इम्युनिटी (द व्हाईस ऑफ टॉलरन्स) लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : महेंद्र दिवेकर मोरगा प्रतिष्ठान, मुंबई गुरु. २ जाने. २०२५, सायं. ७ वा. इन्शाअल्ला लेखक: चेतन दातार दिग्दर्शक : सुशील इनामदार बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई शुक्र. ३ जाने. २०२५, स. ११:३० वा. वारुळ लेखक : राजेंद्र पोळ दिग्दर्शक : मिलिंद सावंत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई शुक्र. ३ जाने. २०२५, सायं. ७ वा. संघर्ष जगण्याचा.. लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा लेखक: युवराज संतोष दिग्दर्शक: सुभाष गोतड कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शनि. ४ जाने. २०२५, स. ११:३० वा. धुमशान लेखक: मनोहर कदम दिग्दर्शक: आत्माराम धर्णे अरुणोदय नगर मित्र मंडळ, मुलुंड (पूर्व) शनि. ४ जाने. २०२५, सायं. ७ वा. स-टायर लेखक: डॉ. मंगेश क्षीरसागर दिग्दर्शक : अशोक साळवी अनुराग, मुंबई रवि. ५ जाने. २०२५, सायं. ७ वा. ढाई अक्षर प्रेम के लेखक व दिग्दर्शक : डॉ. शिरीष ठाकूर अमृत कलश फाऊंडेशन, मुंबई सोम. ६ जाने. २०२५, सायं. ७ वा. मी तर बुआ अर्धा शहाणा लेखक : राजा पारगावकर दिग्दर्शक : दशरथ कीर आकांक्षा फाऊंडेशन, मुंबई बुध. ८ जाने. २०२५, सायं. ७ वा. ओअॅसिस लेखक : इरफान मुजावर दिग्दर्शक : सुगत उथळे सचिवालय जिमखाना, मुंबई
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्य संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच https://www.rangabhoomi.com/tickets/63rd-haushi-marathi-rajya-natya-spardha/ “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे.
पाचोरा शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनेक घटनांमध्ये श्री दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदा भडगाव रोडवरील जुने दत्त धाम मंदिर येथे झालेल्या श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने एक प्रेरणादायक धार्मिक कार्यक्रम पार पडला. श्रद्धा मार्बलचे संचालक श्री शैलेश खंडेलवाल आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जया खंडेलवाल यांच्या हस्ते या वर्षीच्या श्री गुरु दत्ताची पूजा व आरती संपन्न झाली.मंदिराचा ऐतिहासिक वारसाभडगाव रोडवरील
जुने दत्त धाम मंदिर पाचोरा शहरातील धार्मिक आस्था आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. या मंदिराची स्थापना 1967 साली श्री बाळकृष्ण पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्या दिवसापासून मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पुजारी कुटुंबीय अत्यंत निष्ठेने सांभाळत आहेत. त्यांनी मंदिराचा धार्मिक वारसा फक्त जपला नाही, तर वाढवण्याचेही कार्य केले आहे.दरवर्षी श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्त पारायण, नित्य आरती आणि पूजा मोठ्या उत्साहात संपन्न होते. यासाठी पुजारी कुटुंबीय विशेष काळजी घेतात. श्री बाळकृष्ण पुजारी यांच्यानंतर
त्यांचे चिरंजीव प्रशांत पुजारी आणि अभिषेक पुजारी यांनी हा धार्मिक वारसा पुढे चालवला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवा आणि निष्ठेमुळे या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.खंडेलवाल परिवाराचा गौरवशाली सहभागया वर्षीच्या दत्त जयंती कार्यक्रमासाठी पुजारी कुटुंबीयांनी खंडेलवाल परिवाराला विशेष मान दिला. श्री शैलेश खंडेलवाल आणि जया खंडेलवाल यांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने आरती केली. खंडेलवाल परिवार पाचोरा येथील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रणी भूमिका बजावत आले आहेत. श्रद्धा मार्बल या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक यश मिळवल्याबरोबरच सामाजिक योगदान देण्याची परंपरा देखील कायम ठेवली आहे.धार्मिक कार्यक्रमाचे महत्त्वश्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम धार्मिक आस्थेसोबतच एकतेचे प्रतीक मानला जातो. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तगणांची रीघ लागलेली होती. पारायण, भजन, कीर्तन आणि आरती यांसारख्या विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.विशेष म्हणजे, खंडेलवाल परिवाराच्या हस्ते झालेली आरती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यांच्या समर्पणामुळे पाचोरा शहरातील धार्मिकतेला नवा उंचाव मिळाला. कार्यक्रमानंतर मंदिर व्यवस्थापन समितीने खंडेलवाल परिवाराचे आभार मानले आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.खंडेलवाल परिवाराचे योगदानखंडेलवाल परिवार फक्त धार्मिक कार्यातच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असतो. गरजूंसाठी मदत, शैक्षणिक प्रोत्साहन, आणि शहराच्या विकासासाठी घेतलेले पुढाकार यामुळे हा परिवार पाचोरा शहरात विशेष ओळख निर्माण करू शकला आहे. त्यांच्या या कामगिरीने त्यांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे प्रशंसनीय कार्य मंदिर व्यवस्थापनासाठी पुजारी कुटुंबीयांनी घेतलेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. 1967 पासूनची ही परंपरा जपणे आणि प्रत्येक वर्षी धार्मिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करणे हे सोपे काम नाही. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच जुने दत्त धाम मंदिर हे पाचोरा शहरातील भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे. श्री दत्त जयंतीचा उत्सव दरवर्षी अधिक भव्य आणि भक्तिपूर्ण करण्याचा संकल्प पुजारी आणि खंडेलवाल परिवाराने व्यक्त केला आहे. यामुळे पाचोरा शहरातील लोकांमध्ये धार्मिकतेबरोबरच सामाजिक ऐक्याचाही संदेश पसरतो.भडगाव रोडवरील जुने दत्त धाम मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर ते पाचोरा शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. खंडेलवाल आणि पुजारी कुटुंबीयांनी ज्या प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केले, ते नक्कीच प्रेरणादायक आहे. त्यांच्या या योगदानामुळे पाचोरा शहराचा धार्मिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.
पाचोरा – प्रांत अधिकारी भुषण आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उपविभागात महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिज चोरी विरोधात मोठी मोहीम राबवून एकाच वेळी 7 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही कारवाई पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापे मारून संबंधित वाहनांना ताब्यात घेण्यात आले. घोडदे येथून सुरूवात – 2 ट्रॅक्टर जप्त घोडदे गावातून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पथकाने पकडले. या वाहनांना आयटीआय येथे जमा करण्यात आले. कारवाईसाठी भरत पाटील (मंडळ अधिकारी, कोळगाव), ग्राम महसूल अधिकारी शुभम चोपडा, योगेश पाटील, संजय सोनवणे, समाधान हुलुहुले, पाशा हलकारे, महसूल सहाय्यक महादु कोळी, महसूल सेवक किरण मोरे व समाधान माळी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. परधाडे गावात मोठी कारवाई – 4 ट्रॅक्टर जप्त .मौजे परधाडे येथेही अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर छापे मारण्यात आले. त्यापैकी 2 ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले, तर उर्वरित दोन ट्रॅक्टर पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या मोहिमेत विनोद कुमावत (निवासी नायब तहसीलदार, पाचोरा), आर. डी. पाटील (मंडळ अधिकारी, पाचोरा) तसेच अतुल पाटील, निखिल बळी, अमोल शिंदे, आदित्य सुरनर, अजमलशा मकानदार, तेजस भराटे, प्रदीप काळे व वाहनचालक विश्वेश यांनी विशेष मेहनत घेतली. कराब येथील कारवाई – 1 ट्रॅक्टर जप्त -मौजे कराब येथून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर पकडण्यात आले. हे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी भरत पाटील (कोळगाव), ग्राम महसूल अधिकारी समाधान हुलुहुले, योगेश पाटील, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी व लोकेश वाघ यांनी सहभाग घेतला. गिरड येथे तीन ट्रॅक्टर पकडले -गिरड गावातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईचे नेतृत्व तहसीलदार शीतल सोलट मॅडम यांनी केले. या मोहिमेत सुधीर सोनवणे, समाधान हुलुहुले, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महादू कोळी व लोकेश वाघ यांनी सहकार्य केले. महसूल विभागाची कडक भूमिका -महसूल विभागाने या कारवायांमध्ये कौशल्यपूर्ण नियोजन व समन्वय साधून गौण खनिज चोरीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर संदेश दिला आहे. प्रांत अधिकारी भूषण अहिरे पाचोरा – भडगाव येथील दोघंही तहसील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम करत मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे. महसूल विभागाच्या या कारवाईने पाचोरा तालुक्यात अवैध खनिज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या कडक कारवायांचा इशारा दिला आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील चिमुकल्या दत्त मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक आपले कार्य सुरू करत नाही, ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडित चालू आहे. या मंदिराने केवळ धार्मिक महत्त्वच जपलेले नाही, तर सर्वधर्मीय एकतेचा संदेशही दिला आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनने यंदाही उत्साहात आणि भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला.दत्त जयंतीचे विशेष आयोजन पी. आय. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी महसूल विभाग, न्यायालय, होमगार्ड, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार परिवार यांना निमंत्रित करण्यात आले. यावर्षीचा विशेष आकर्षण म्हणजे ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.कार्यक्रमात ह.भ.प. योगेश महाराज आणि पाचोरा पोलीस विभागाचे ए.एस.आय. निवृत्ती मोरे यांनी धार्मिक कीर्तन सादर केले. त्यांच्या कीर्तनातून “सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा” आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यात आला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
सामाजिक सलोख्याची जपणूक दत्त जयंती निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाल्याचे या सोहळ्यात दिसून आले. विशेषतः महाप्रसादाच्या वितरणात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर इतर नागरिक व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना सन्मानाने महाप्रसादासाठी आमंत्रित करण्यात आले.
पी. आय. अशोक पवार यांची अनुकरणीय कार्यशैली पी. आय. अशोक पवार यांची कार्यशैली या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरली. जणू काही ते कार्यक्रमाचे आयोजक नसून कुटुंबप्रमुख असल्याचा भाव निर्माण झाला. त्यांनी प्रत्येक उपस्थित व्यक्तीचे स्वागत करत कार्यक्रमाची सूत्रे समर्थपणे हाताळली. एवढेच नव्हे, तर वर्दळीतही पोलीस स्टेशनचे नियमित कामकाज प्रांगणातच एकाग्रतेने पूर्ण करत असलेल्या पवार साहेबांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.एकात्मतेचा संदेश पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने साजऱ्या झालेल्या या दत्त जयंती सोहळ्याने केवळ धार्मिक भावना वाढवल्या नाहीत, तर सर्वधर्मीय एकतेचा संदेशही दिला. पोलीस प्रशासनाचे समाजाशी असलेले दृढ नाते आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न, हा कार्यक्रम यशस्वी ठरवणारा ठरला. पाचोरा पोलीस स्टेशनने एकत्रितपणे केलेला हा उपक्रम इतर पोलीस प्रशासनासाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृतीसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. आर. महाजन यांनी भूषवले होते. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.डॉ. डी. बी. पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानात जागतिक स्तरावर एड्सने निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणावर प्रकाश टाकत, या आजाराविषयी असलेले गैरसमज व अज्ञान कसे दूर झाले याची माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, विविध स्वयंसेवी संस्थांपासून ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांपर्यंत सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे समाजात एड्सविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना या आजारासाठी उपलब्ध असलेल्या उपचारपद्धती व प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत रा. से. यो. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी रेड रिबन क्लबच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थितांना एड्ससारख्या आजारासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. डॉ. पाटील यांच्या या सूचनेला प्रतिसाद देत स्वयंसेवकांनी आपापल्या स्तरावर जनजागृतीसाठी काम करण्याची तयारी दर्शवली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. पी. आर. महाजन यांनी विद्यार्थ्यांना ‘माहिती हीच शक्ती’ असल्याचे सांगून एड्स या आजाराविषयी आवश्यक ते मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली आणि या आजाराचा सामना करण्यासाठी विद्यार्थी व स्वयंसेवकांनी ठाम भूमिका घ्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रेखा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच. एम. बावीस्कर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये एड्ससंबंधी जागरूकता निर्माण झाली. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
पाचोरा – न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. बी. औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०६ इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात १ कोटी १८ लाख ८१ हजार १९९ रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९७ प्रकरणांचा निपटारा होवून यात ६० लाख ५७ हजार ३५० रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण १ कोटी ७९ लाख ३८ हजार ५४९ रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता लोकन्यायालयाचे पंच अॅड. ऋषभ पाटील, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, सचिव अॅड. निलेश सूर्यवंशी, सह सचिव अॅड. अंबादास गिरी, वकिल संघाचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, कर्मचारी, बी. एस. एन. एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा येथील श्री दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवाराच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव, पारायण प्रसाद व पालखी मिरवणुकीचा भव्य आणि भाविक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जन्मोत्सवाचा कार्यक्रम: श्री दत्त जन्मोत्सव मिती मार्गशीर्ष शुद्ध १४, शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री दत्त मंदिरात साजरा होणार आहे. या पवित्र सोहळ्यात दत्त भक्तांनी सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे दर्शन घ्यावे. पारायण प्रसाद कार्यक्रम: श्री दत्त पारायण प्रसादाचा कार्यक्रम मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभदिनी, रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत संपन्न होणार आहे. या निमित्ताने प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे. श्री दत्त पालखी मिरवणूक: श्री दत्त पालखी मिरवणूक ही रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता श्री दत्त मंदिर, वाणी गल्ली, पाचोरा येथून सुरू होईल. या मिरवणुकीत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, ही विनंती आहे. भोजन व्यवस्था:श्री दत्त पारायण प्रसाद सोहळ्यानंतर रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थळ: श्री दत्त मंदिर, वाणी गल्ली, पाचोरा, जि. जळगाव. विश्वस्थ दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवार यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. भाविक व समाज बांधवांसाठी ही पर्वणी असणार असून, या निमित्ताने एकत्र येऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद घ्यावा. श्री दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवार आपले स्वागत करण्यासाठी तत्पर आहे. सर्वांना हार्दिक निमंत्रण! आयोजकांकडून करण्यात आले आहे या संदर्भात ध्येय न्युज & साप्ता झुंज ने अधिक माहिती घेतली असता प्राचीन श्री दत्त मंदिर संस्थान, पाचोरा: ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा परिचय असा प्राप्त झाला श्री दत्त मंदिर, पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. वाणी गल्लीतील विठ्ठल मंदिराशेजारी स्थित हे मंदिर पाचोरा शहरातील सर्वांत जुने व प्राचीन देवालय मानले जाते. शके १८४६ मध्ये बांधले गेलेले हे मंदिर त्या काळातील श्रीमंत वाणी कुटुंबीयांच्या उदारतेचा व श्रद्धेचा प्रतिक आहे. कै. चिंतामण कृपारामशेठ वाणी यांच्या स्मरणार्थ कै. के. बळवंत इच्छारामशेठ व कै. शंकर इच्छारामशेठ वाणी यांनी हे मंदिर बांधून श्री दत्त चरणी अर्पण केले आहे. मंदिराच्या स्थापनेचा उल्लेख आजही मंदिरावरील शिलालेखातून पाहता येतो. मंदिराच्या वार्षिक खर्चासाठी कृष्णापुरी शिवारातील शेती (सर्वे नं. १२/१३) बहिरम नावाने दान करण्यात आली आहे. मंदिराचे स्थापत्य व वैशिष्ट्ये श्री दत्त मंदिर हे स्थापत्यदृष्ट्या दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिर चौकोनी आकाराचे असून घडीव दगडांनी बांधण्यात आले आहे. गाभाऱ्याच्या वरील भागावर भव्य व उंच कळस आहे, ज्यावर पूर्वी आकर्षक नक्षीकाम होते. मात्र, आधुनिक काळात त्यावर प्लास्टर केल्यामुळे नक्षीकाम लुप्त झाले आहे. मंदिरासमोर विस्तीर्ण ओटा आहे, ज्यावर सुमारे ५०० माणसे बसू शकतात. हा ओटा भजन, कीर्तन, व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी नियमित वापरला जातो. मंदिराच्या आवारात भाविक, वाटसरू, व पदयात्री यांना विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते, ही परंपरा जुनी आहे. धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडतात. त्यापैकी प्रमुख उत्सव रामनवमी, गोकुळाष्टमी, व दत्त जयंती आहेत. विशेषतः मार्गशीर्ष शुद्ध १५ रोजी होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला मोठे महत्त्व आहे. दत्त जयंतीचा मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजता दत्त जन्मोत्सवाने सुरू होतो. यावेळी प्रवचन, कीर्तन, व भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी दत्त पारायण सोहळा संपन्न होतो, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री श्री दत्त पालखी वाजत गाजत मिरवणुक निघते विशेष कार्यक्रम आणि यज्ञसोहळे इ.स. १९७९ मध्ये, दत्त जयंती निमित्ताने श्री शतचंडी स्वाहा:कार यज्ञ सोहळा संपन्न झाला. हा सप्ताहभर चालणारा कार्यक्रम पाचोरा व आसपासच्या भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आळंदी येथील वे.शा.सं.१०८ श्री विष्णू ज्ञानेश्वर चक्रांकित महाराज यांच्या प्रवचनामुळे या कार्यक्रमाला अध्यात्मिक उंची प्राप्त झाली. यावेळी भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक व लघुरुद्र सोहळा पार पडला, ज्याने भक्तांची मनोभावे पूजेसह श्रद्धा दृढ झाली. मंदिर व्यवस्थापन व देखभाल श्री दत्त मंदिराची व्यवस्थापन व देखभाल श्री दत्त देवस्थान ट्रस्टद्वारे केली जाते. या ट्रस्टचे सदस्य म्हणजे श्री. भरत सिनकर, श्री. रत्नाकर सिनकर, व त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिराची सेवा व व्यवस्था काळजीपूर्वक पार पाडली आहे. त्याचप्रमाणे, मंदिरातील पूजाअर्चा आणि धार्मिक विधींची जबाबदारी श्री. चंद्रकांत वसंत जोशी व त्यांच्या कुटुंबीयांवर आहे. दररोजच्या धार्मिक क्रियाक्रमांत दत्तात्रेयास नैवेद्य, प्रसाद व आरतीचा समावेश होतो. भक्तांची उपस्थिती व भाविकांची श्रद्धा हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. श्री दत्त मंदिराचे समाजातील स्थान हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून पाचोरा शहरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वाटसरू व भाविकांसाठी विश्रांती, उपासनेचे केंद्र, व नियमित धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे हे मंदिर भक्तगणांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. उपसंहार श्री दत्त मंदिर, पाचोरा हे केवळ एक प्राचीन देवालय नाही तर इतिहास, धर्म, व सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचा स्थापत्यशास्त्रातील कलात्मक नमुना, धार्मिक परंपरा, व श्रद्धेने परिपूर्ण वातावरण यामुळे ते भाविकांचे आकर्षण ठरले आहे. या मंदिराची सेवा व देखभाल करणाऱ्या व्यक्तींचे योगदान, तसेच भाविकांच्या श्रद्धेमुळे श्री दत्त मंदिर हे अजूनही सन्मानपूर्वक उभे आहे. हे मंदिर भाविकांसाठी केवळ उपासनेचे ठिकाण नाही, तर सामाजिक ऐक्याचा व परंपरेचा स्त्रोत आहे. भाविक व इतिहासप्रेमींनी या मंदिराला नक्कीच भेट द्यावी, कारण हे ठिकाण श्रद्धा व इतिहास यांचे अनोखे दर्शन घडवते.
काल दिनांक 14 डिसेंबर रोजी पाचोरा येथील पत्रकार अनिलआबा येवले यांच्या Citizen Journalism पत्रकारिते बाबत लेख लिहील्या नंतर अनेकांनी त्या लेखाचे कौतुक केले तर काहींनी Citizen Journalism म्हणचे काय ? या संदर्भात माहीती विचारली म्हणुन खास माहीतीस्तव Citizen Journalism म्हणजे काय ? यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे Citizen Journalism बाबत मराठीत सांगायचे झाले तर “नागरिक पत्रकारिता” अर्थात या पत्रकारीते संदर्भात पाचोरा शहरातील 4 पत्रकारा शिवाय पाचवा पत्रकार शोधुन सापडणार नाही कॉपी पेस्टव्याल्यां मध्ये तर नाहीच नाही & पावत्या फाडून पुरस्कार वाटणारे अर्थात विकणरे & ब्रेकींग न्युज व्दारे पोटभरणाऱ्यां पत्रकारांचा याच्याशी दुर पर्यत संबध नाही कारण Citizen Journalism पत्रकारीता लोकांचा आवाज आणि लोकशाहीची नवी दिशा आहे Citizen Journalism (नागरिक पत्रकारिता ) म्हणजे सामान्य नागरिकांनी पत्रकार म्हणून काम करत बातम्या गोळा करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्या समाजापर्यंत पोहोचवणे. पारंपरिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांप्रमाणे नागरिक पत्रकार बनण्यासाठी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाची गरज नसते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रचंड प्रसारामुळे नागरिक पत्रकारितेला नवी उंची आणि प्रभाव मिळाला आहे. या माध्यमातून सामान्य लोक आपल्या स्थानिक आणि व्यक्तिगत अनुभवांवर आधारित मुद्दे जागतिक स्तरावर पोहोचवतात. नागरिक पत्रकारिता कशी घडते? 1. बातम्या गोळा करणे: नागरिक पत्रकार म्हणून काम करणारे लोक एखाद्या घडामोडीचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात. ते त्या घटनेचे फोटो, व्हिडिओ किंवा इतर माहिती संकलित करतात. उदाहरणार्थ, एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणाहून घेतलेली प्रत्यक्ष माहिती. 2. सामायिकरण: संकलित केलेली माहिती सामाजिक माध्यमांवर (जसे की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) शेअर केली जाते. काही लोक ब्लॉग्स, वैयक्तिक वेबसाईट्स किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सवरही आपले अनुभव लिहितात. 3. विचारांची मांडणी: संकलित माहितीवर नागरिक स्वतःचे विचार मांडतात, विश्लेषण करतात आणि विशिष्ट मुद्द्यांवर चर्चेला वाव देतात. नागरिक पत्रकारितेची वैशिष्ट्ये: 1. उपलब्धता: कोणताही नागरिक, फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने पत्रकार बनू शकतो. यासाठी महागड्या साधनांची किंवा माध्यमांच्या आधाराची गरज नसते. 2. विविधता: देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या स्थानिक बातम्या, त्या भागातील समस्या आणि लोकांच्या भावना अधिक स्पष्टपणे मांडल्या जातात. 3. स्वातंत्र्य: पारंपरिक माध्यमांमध्ये संपादकीय नियंत्रणामुळे अनेकदा विशिष्ट मुद्दे दडपले जातात. मात्र नागरिक पत्रकारितेमध्ये असे नियंत्रण नसल्यामुळे स्वातंत्र्याने मत मांडले जाते. नागरिक पत्रकारितेचे फायदे: 1. जलद माहितीचा प्रसार: मोठ्या माध्यमसंस्थांपेक्षा नागरिक पत्रकार अनेकदा अधिक वेगाने आणि थेट माहिती पोहोचवतात. 2. लोकांचे व्यासपीठ: सामान्य लोकांच्या समस्या, अनुभव आणि स्थानिक मुद्दे प्रकाशझोतात येतात. 3. दुर्लक्षित विषयांवर लक्ष: पारंपरिक माध्यमांकडून दुर्लक्षित केलेले सामाजिक, सांस्कृतिक किंवा स्थानिक प्रश्न या माध्यमातून चर्चेत येतात. नागरिक पत्रकारितेची आव्हाने: 1. चुकीची माहिती: अनेकदा पुरेशा संशोधनाअभावी अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवली जाते, ज्यामुळे गैरसमज पसरू शकतो. 2. सत्यता तपासण्याची कमतरता: माहितीचे सत्यापन करण्यासाठी पारंपरिक माध्यमांमध्ये असलेल्या संपादकीय प्रक्रियेचा अभाव नागरिक पत्रकारितेत जाणवतो. नागरिक पत्रकारिता ही लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्याचे एक प्रभावी साधन ठरते. ती पारंपरिक माध्यमांची पूरक असून, सामान्य लोकांचे आवाज मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत पोहोचवते. मात्र, या पत्रकारितेचा योग्य वापर होण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने आणि सत्यता तपासून माहिती प्रसारित करणे आवश्यक आहे. यामुळेच, नागरिक पत्रकारिता ही समाज आणि माध्यमांमधील संवादाचा एक महत्त्वाचा दुवा ठरते.
Dhyeya News & झुंज वृत्तपत्र संपादक. संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव (M.A.B.Ed) & Journalism M0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510 यांचे . शासकीय जाहीरात यादीवरील मान्यता प्राप्त पाचोरा येथून प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे साप्ता.झुंज चा वर्ष 17 अंक क्र. 37 दि. 14 डिसेंबर 2024 आपणास सस्नेह सादर करीत आहे
भडगाव ( प्रतिनिधी )मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या आणि सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात भडगाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाचोरा-भडगावचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील आणि पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.प्रशिक्षणार्थींनी मांडलेल्या निवेदनानुसार, या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय पदांवर कायमस्वरूपी नियुक्त करून त्यांच्या भविष्यास सुरक्षित करण्याची गरज आहे. या नियुक्तीद्वारे राज्याच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रशिक्षणार्थी तयार होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींनी मांडलेल्या निवेदनानुसार, या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय पदांवर कायमस्वरूपी नियुक्त करून त्यांच्या भविष्यास सुरक्षित करण्याची गरज आहे. या नियुक्तीद्वारे राज्याच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रशिक्षणार्थी तयार होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही बेरोजगार तरुणांना कार्यक्षम व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी राबवली जाते. या योजनेमुळे तरुणांना शासकीय सेवेत स्थान मिळवून राज्याच्या प्रगतीत योगदान देण्याची संधी मिळते. मात्र, अनेक प्रशिक्षणार्थींची नियुक्ती अद्याप प्रलंबित असल्यामुळे या योजनेचा उद्देश पूर्ण होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी मुख्यमंत्री, संबंधित विभाग, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे आपले निवेदन सादर केले आहे. यामध्ये, त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षणार्थींच्या स्वाक्षऱ्या असून, यात चेतन महाजन, रितेश माळी, तन्मय पाटील, सतीश माळी, रहीम पिंजारी, किरण परदेशी, राहुल नरवाडे, नेहा भोई, काजल पाटील, जितेंद्र परदेशी, आकांक्षा ठोंबरे, लकीचंद पाटील, समाधान बोराडे, शरद वाघ, प्रशांत पाटील, सागर शेजवळकर, गीतेश शेजवळकर, नूतन पाटील, सोपान महाजन यांच्यासह इतर अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सरकारने या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.