Home Blog Page 33

आज दि.18/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी लाभदायक ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.17/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात गती येईल. नवीन संधी लाभदायक ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात यश मिळेल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा आणि मान वाढेल. कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवे कार्य सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास फायदेशीर ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा निवडणूक : उमेदवारांची ओळख नव्हे, तर ‘पैसा’च ठरतो अंतिम निकष

0

Loading

पाचोरा – नगर पालिका निवडणूक यंदा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच नगराध्यक्ष पद तसेच सर्व प्रभागातील उमेदवार थेट पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत. आतापर्यंत अनेक जण स्थानिक आघाड्यांवर, तर काही स्वतंत्र चिन्हांवर रिंगणात उतरत होते. परंतु यंदाची लढत सरळ आणि स्पष्ट — कोणतीही आघाडी नाही, तडजोड नाही, फक्त पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि मतदारांच्या न्यायालयात त्यांची सरळ चाचणी. परंतु या सर्वांपेक्षा अधिक चर्चा आहे ती मतदारांच्या बदललेल्या प्रवृत्तीची. गेल्या काही निवडणुकांत दिसलेला अनुभव असा की पाचोरा शहरात साधारणतः ९५ टक्के मतदार एखाद्या उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, पक्षनिष्ठा, जुनी कार्यकर्त्यांची परंपरा किंवा विकास कामांचा लेखाजोखा पाहून मतदान करत नाहीत. मतदानाच्या आधीच्या रात्री व पहाटेपर्यंत कोण उमेदवार किती खर्च करतो, किती ‘संपर्क’ साधतो आणि किती ‘व्यवस्था’ करतो यावरच बहुतेक 50% सर्वात मोठा निर्णय घेतला जातो. अर्थात ते सुद्धा “रात गयी बात गयी” होते “झाले – केले ते सर्व गेले पाण्यात” मतदानाच्या दिवशी सात नंतर कोणता उमेदवार काय & किती देतो ते सुद्धा स्वतंत्र मतदाराच्या हातातच म्हणजे घरातील प्रमुख किंवा इतर सदस्यांच्या हातात नाही जसा जसा सूर्यास्त होतो तसे तसे मतांचे भाव वाढतात हीच मतदारांच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी ‘योग्यता’ बनलेली असते. यामुळे प्रत्येक उमेदवाराला प्रत्यक्ष राजकीय शक्तीपेक्षा आर्थिक शक्तीची तयारी करूनच रिंगणात उतरावे लागते. आज घडीला सर्वच आघाड्यांचे दावेदार याच मानसिकतेने स्वतःची तयारी करताना दिसत आहेत. पाच वर्षांची कामे, सार्वजनिक जीवनातील सुख दुःखामध्ये मदत जबाबदाऱ्या, किंवा नागरिकांसाठी केलेली पायाभूत सोय — हे सर्व दुय्यम ठरले आहे. उलट, कोणत्याही छोट्या–मोठ्या सामाजिक प्रसंगात विजयी झालेले लोकप्रतिनिधी हजेरी न लावल्यास मतदार नाराज होतात. लग्न, बारसे, मृत्यू, सुख-दुःख, गल्लीतल भंडारा अगदी साध्या पाहुणचारापर्यंत लोकप्रतिनिधींनी वेळ काढून यायलाच हवे, अशी प्रबळ अपेक्षा समाजात निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे निवडणूक लागताच उमेदवारांनी प्रत्यक्ष घरी येऊन पायऱ्या चढून मत मागावे, हे ‘अधिकार’ म्हणून अनेक मतदार मानू लागले आहेत. अशा अपेक्षांचा आणि व्यवहारांचा भार कोणत्याही लोकप्रतिनिधीवर अवास्तवपणे वाढत आहे.अर्थात कोणीही निवडून गेल्यानंतर हजाराचे लाख करतात – लाखांचे कोटी करतात हे उघड डोळ्यांनी मतदार सुद्धा पाच वर्षे पाहतात मात्र मतदारांनीही सध्याच्या परिस्थितीचे, शहराच्या गरजांचे आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत व आरोग्यात्मक परिस्थितीचे भान ठेवून अपेक्षा ठेवणे कितपत आवश्यक आहे, हे आत्मपरीक्षण आज अत्यंत गरजेचे ठरत आहे. लोकशाही ही सेवा, मूल्ये आणि विकास यांवर उभी असते. परंतु पाचोरामध्ये निवडणूक म्हणजे प्रत्येक सेकंदाला पैसे देणार ‘नवा भिडू, नवा राज’ अशी वर्षानुवर्षे तयार झालेली मानसिकता आता बदलण्याची वेळ आली आहे. दहशद & पैशाच्या जोरावर गुंडांचा सुद्धा राजकारणात शिरकाव होऊ लागला आहे म्हणुन पाचोऱ्याच्या भविष्यासाठी मतदारांनी योग्य विचार करून, फक्त पैशाच्या आधारे नव्हे तर शहराच्या विकासाला व संस्कृती सह शांततेला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे, हेच खरे लोकशाहीला बळकट करणारे पाऊल ठरेल.

शेंदुर्णी सोसायटीचा अभिमान — निकम दाम्पत्याची विभागस्तरीय दुहेरी निवड

0

Loading

पाचोरा – शेंदुर्णीसह जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी असा उल्लेखनीय यशाचा मान प्रा. वर्षा अविनाश निकम आणि अविनाश वासंती आत्माराम निकम या निकम दाम्पत्याने पटकावला आहे. शिक्षक अधिकारी स्पर्धा 2025-26 अंतर्गत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या विविध उपस्पर्धांमध्ये या दाम्पत्याने आपली चमकदार कामगिरी नोंदवत विभागस्तरावर भक्कमपणे निवड मिळवली आहे. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेडचे दोन्ही कर्मचारी असलेल्या या दाम्पत्याकडे आता पंचक्रोशीचे लक्ष वेधले गेले आहे. प्रथम प्रा. वर्षा अविनाश निकम यांचा उल्लेख करावाच लागेल. अ. र. भा. गरुड कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील या गुणी शिक्षिकेने काव्यवाचन – स्वरचित स्पर्धेत जिल्हास्तरावर उत्तुंग कामगिरी करत नाशिक विभागातील अंतिम निवडीत आपले स्थान पक्के केले आहे. त्यांच्या आवाजातील भावस्पर्शी सादरीकरण, स्वतःच्या लेखणीतून उतरलेले आशयगर्भ काव्य आणि भाषेवरील विलक्षण प्रभुत्व यामुळे परीक्षक वर्गाचे लक्ष त्यांच्या कामगिरीकडे वेधले गेले. शिक्षण संस्कारांबरोबरच कलाविष्कारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रा. वर्षा निकम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे अविनाश वासंती आत्माराम निकम हे अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रे ता. पाचोरा येथील सहायक शिक्षक आहेत. बाल मानसशास्त्र – केस स्टडी या अत्यंत अभ्यासू आणि सखोल समज आवश्यक असलेल्या उपस्पर्धेत त्यांनी जिल्ह्यातून उत्तुंग कामगिरी करत विभागस्तरावर निवड संपादन केली आहे. बालकांच्या मनोवृत्तीचा, शिकण्याच्या शैलीचा आणि परिस्थितीनुरूप बदलणाऱ्या भावनिक-मानसिक गरजांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्या आधारे सादर केलेली केस स्टडी परीक्षकांना अत्यंत प्रभावी वाटली. आधुनिक शिक्षणपद्धतीत बाल मानसशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या क्षेत्रात त्यांनी सिद्ध केलेली प्रावीण्यता त्यांच्या अध्यापनातील बांधिलकीचे प्रतीक ठरते. निकम दाम्पत्याच्या या दुहेरी यशाने शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेडचा मान अधिक उंचावला आहे. दोन्ही पती-पत्नी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातील अंतिम स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यांच्या पुढील सादरीकरणाची उत्सुकता संपूर्ण जिल्हाभर पसरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डाएट प्राचार्य, मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी यांनी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कामगिरीची दखल संस्थेतही मोठ्या आनंदाने घेण्यात आली. संस्थेचे चेअरमन आद. दादासाहेब संजयदादा गरूड, उपाध्यक्ष आबासाहेब भिमराव शेळके, सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरूड, वसतिगृह सचिव गो. गो. सुर्यवंशी तसेच संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दाम्पत्याचे अभिनंदन केले. सोसायटीचे दीर्घकाळापासून सुरु असलेले शैक्षणिक कार्य, शिक्षकांना मिळणारे पोषक वातावरण आणि नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणारी शैक्षणिक संस्कृती या यशाला बळ देणारी ठरल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. निकम दाम्पत्याचा हा दुहेरी विजय त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचा, सातत्यपूर्ण अभ्यासाचा आणि शैक्षणिक संस्कारांचा उत्कृष्ट नमुना आहे. एकीकडे काव्यवाचनातील साहित्यिक अभिव्यक्ती आणि दुसरीकडे बाल मानसशास्त्रातील शास्त्रीय दृष्टी — या दोन्ही परस्पर भिन्न क्षेत्रांत त्यांनी केलेला वेधक अभ्यास आणि उत्कट सादरीकरण जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरले आहे. पंचक्रोशीत या यशाची चर्चा सुरू असून, येणाऱ्या विभागीय स्पर्धेत निकम दाम्पत्य आणखी मोठे यश मिळवेल अशी आशा व शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

आज दि.16/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश लाभेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक प्रगती संभवते. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.15/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना यश लाभेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: संवादकौशल्यामुळे लाभ मिळेल. कामात गती येईल. प्रवास लाभदायक ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश लाभेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक प्रगती संभवते. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवे कार्य सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आदिवासी जननायक धरती आबा बिरसा मुंडा : अन्यायाविरुद्ध तेजस्वी झुंज

0

Loading

आदिवासी जमातीचे खरे जननायक, अन्यायाविरुद्ध जाज्वल्य संघर्ष करणारे आणि झारखंडच्या सुपुत्रांचा अभिमान ठरलेले धरती आबा बिरसा मुंडा यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित झाले. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध झारखंड प्रदेशातून उभारलेले त्यांचे आंदोलन, समाजाला एकत्रित करून मुलभूत हक्कांसाठी लढण्याचा धाडसी मोर्चा आणि अत्यंत कमी वयात प्रखर नेतृत्व देत उलगुलानाचे आरंभकर्ता म्हणून त्यांनी इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. बिरसा सुगना मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहातू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई करमी मुंडा, तर भावंडांत पासना व चंपा अशी नावे आहेत. निसर्गपूजक, जंगलांचे रक्षण करणारी व वनसंपदेवर जगणारी मुंडा जमात पिढ्यानपिढ्या जंगलात राहत होती. शेती आणि जंगलातील उपजिविकेवर आधारित जीवनशैलीत वाढलेले बिरसा बालपणापासूनच बुद्धिमान, संवेदनशील आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण होते. आर्थिकदृष्ट्या अतिशय कठीण परिस्थितीत सुगना मुंडा मजुरी करून कुटुंब सांभाळत होते. त्या वातावरणात वाढत असताना बिरसा काही काळ मामाकडे आयुबहातू येथे राहिले. साल्गा गावातील जयपाल नाग यांच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. याच काळात जर्मन मिशनऱ्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना विविध प्रलोभने देऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात होते. कुटुंबावर आलेल्या परिस्थितीत बिरसाचे संपूर्ण कुटुंब ख्रिश्चन करण्यात आले आणि त्यांना ‘बिरसा डेव्हिड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लुथन मिशन स्कूलमध्ये पाठवण्यात आले. चाईबासातील शिक्षणकाळातच बिरसा मुंडा यांना मिशनरी व ईस्ट इंडिया कंपनीकडून चालविल्या जाणाऱ्या अत्याचारांची तीव्र जाणीव झाली. आदिवासी समाजावर लादले जाणारे अमानुष कर—जन्मावर कर, मृत्यूवर कर, त्यांच्या परंपरेवर नियंत्रण, जंगल-जमिनीवर कब्जा—यामुळे आदिवासी समाजाचा कणा मोडण्याची वेळ आली होती. बिरसा मुंडा यांच्यासारख्या जागृत नेतृत्वाने या अन्यायाचा तीव्र विरोध केला. निसर्ग, परंपरा, स्वाभिमान आणि जलजंगलजमीन या आदिवासींच्या हक्कांवर अन्याय होत असल्याने त्यांनी व्यापक जनजागृती सुरू केली. वैष्णव संतांच्या शिकवणीचा प्रभाव असल्याने त्यांनी प्रारंभी अहिंसेचा मार्ग स्वीकारून समाजात एकात्मतेची भावना निर्माण केली. परंतु इंग्रजांनी आदिवासींच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी ‘उलगुलान’ या महासंग्रामाची हाक दिली. 23 ऑगस्ट 1895 रोजी इंग्रज कमिश्नरांनी त्यांना अटक करण्याची योजना आखली, मात्र आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे समाजात निर्माण झालेला जागरूकता लाटेमुळे इंग्रजांना त्यांना सहज गाठणे कठीण गेले. बिरसा मुंडा यांनी हजारो आदिवासी बांधवांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध बंड पुकारले, जेलभरो आंदोलन केले आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंग्रज प्रशासन हादरले. भारतमातेच्या मुक्तीसाठी आणि आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी त्यांनी प्राणपणाने झुंज दिली. परंतु संघर्षाच्या या लढ्यात 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. रांची येथील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आणि 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूवरील संशयास्पद परिस्थिती आजही चर्चा व संशोधनाचा विषय आहे, पण त्यांच्या शौर्याचा प्रकाश मात्र कधीच मंदावलेला नाही. आज 15 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात ‘बिरसा मुंडा जयंती’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटक, म्हैसूर, कोडगू, गुजरात, महाराष्ट्र यांसह देशभरातील आदिवासी जमाती त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. झारखंडची राजधानी रांची येथील कोकार येथे त्यांचे समाधीस्थळ आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ कृषी विद्यापीठास तसेच रांची विमानतळास ‘बिरसा मुंडा’ हे नाव देण्यात आले आहे. ‘गांधी से पहले गांधी’ आणि ‘उलगुलान एक क्रांति’ हे चित्रपट तसेच ‘अरण्ये अधिकार’ ही ऐतिहासिक कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असून या कादंबरीला 1979 चा बंगाली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. न्याय, स्वाभिमान, बंधुत्व आणि संघर्षाचे तेजस्वी प्रतीक म्हणून बिरसा मुंडा यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील दुर्मिळ, अमर आणि प्रेरणादायी असे स्थान कायम राखून आहे. राम सखाराम जाधव माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपरखेड, ता. भडगाव, जि. जळगाव मो. 9850669485 / 7821036132

आज दि.14/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कामात नवीन संधी मिळतील. प्रयत्नांना यश लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा पाठिंबा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवा, मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. प्रयत्नांना यश लाभेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक प्रगती संभवते. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवे कार्य सुरू करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील संबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुध्दिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती मिळेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

गो.से. हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक रमेश दत्तात्रय दलाल यांचे निधन

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गो.से. हायस्कूल पाचोरा येथे अनेक वर्षे निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा दिलेले सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक रमेश दत्तात्रय दलाल यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात तसेच पाचोरा शहरातील सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी 9:48 वाजता, बांद्रा पूर्व कलानगर येथील गुरुनानक हॉस्पिटल येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि एक शांत, संयमी, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले.
रमेश दत्तात्रय दलाल यांनी गो.से. हायस्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून काम करताना शाळेच्या कार्यालयीन व्यवस्थापनाला नवी दिशा दिली. कागदपत्रांची शिस्त, विद्यार्थ्यांच्या नोंदींचे काटेकोर पालन, शाळेतील विविध विभागांमध्ये तालमेल राखणे आणि सहकारी शिक्षक-कर्मचाऱ्यांना दिलेली मदत या सर्व गोष्टींसाठी त्यांची विशेष ओळख होती. कार्यालयीन जबाबदाऱ्या अत्यंत शांत, संयमित आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडणे ही त्यांची कार्यशैली होती. त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्याविषयी शाळेत, संस्थेमध्ये आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना कायम होती.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच गो.से. हायस्कूलमधील माजी सहकारी, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच पाचोरा शहरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले. विशेष म्हणजे, अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या आठवणी शेअर करताना दलाल हे नाव नेहमीच कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे प्रतीक राहिल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलणे, त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांत मदत करणे, पालकांना योग्य मार्गदर्शन करणे अशा अनेक बाबींमुळे ते सर्वांचे आवडते लिपिक झाले होते.
घरगुती आयुष्यातही ते अत्यंत शांत, साधे आणि प्रेमळ स्वभावाचे होते. बांद्रा येथील उपचारादरम्यान सतत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या मोठी होती, यावरून त्यांच्या सामाजिक संपर्काची आणि मान-सन्मानाची स्पष्ट जाणीव होते.
त्यांच्या निधनामुळे पाचोरा शहराने एक कर्तव्यदक्ष, मितभाषी आणि आदर्श कार्यालयीन कर्मचाऱ्याला गमावले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणताही दिखावा नव्हता; साधेपणा हीच त्यांची खरी ओळख होती. शाळेच्या कार्यालयीन तपशीलांपासून ते संस्थेच्या कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी दाखवलेली अचूकता आजही सहकाऱ्यांच्या लक्षात राहील.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10:00 वाजता, संत गाडगेबाबा नगर, पाचोरा – रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. कर्तव्यनिष्ठ सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात जी जागा निर्माण केली, त्याचा प्रत्यय अंत्ययात्रेदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या नागरिकांमधून नक्कीच दिसेल.
रमेश दत्तात्रय दलाल यांचे निधन हे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, गो.से. हायस्कूल आणि पाचोरा शहरासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांच्या स्मृती सदैव जिवंत राहतील—त्यांच्या कामातून, त्यांच्या संस्कारांतून आणि त्यांनी पेरलेल्या माणुसकीच्या बीजांतून. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

आज दि.13/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. कार्यात प्रगती मिळेल. नवीन संधी लाभदायक ठरतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात गती येईल. नवे संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक प्रसन्नता टिकवा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. मानसिक स्थैर्य आणि संयम ठेवा.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. कामातील यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवे प्रकल्प हाताळण्यास शुभ दिवस.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: नियोजनबद्ध प्रयत्न फळ देतील. घरातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य सुधारेल. जुनी कामे पूर्ण होतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक कार्यात सक्रियता वाढेल. मित्रांचा पाठिंबा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. अनपेक्षित खर्च टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रम सुरु करण्यास अनुकूल दिवस. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी राहील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबात समाधान राहील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनःशांती लाभेल. दिवस संतुलित राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!