Home Blog Page 35

उत्राणच्या वाळू ठेक्याने पाचोऱ्याची शांतता उडवली – रात्रभर डंपर, प्रशासनाचे मौन, नागरिकांचा आक्रोश

0

Loading

पाचोरा – शहरातील हनुमानवाडी, गो.से. हायस्कूल, शिंदे हायस्कूल आणि पुनगाव रोड या मार्गावर गेल्या महिनाभरापासून रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपर वाहनांचे अक्षरशः थैमान सुरू आहे. रात्री 9.30 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत या मार्गावर डंपरची अखंड परेड सुरू असते. वेग, आवाज आणि धुळीचे साम्राज्य एवढे वाढले आहे की नागरिकांच्या घरांची खिडकी थरथरते, भिंतींवर कंपन जाणवतात, आणि झोप तर दूर, शांततेचा क्षणही मिळत नाही. काही रहिवाशांनी सांगितले, “दररोज रात्री डंपरचा असा गडगडाट होतो की, जणू आपल्या घराखाली रेल्वे जातेय. सकाळपर्यंत डोळ्यांना झोपच लागत नाही.” या डंपरचे ओव्हरलोड वजन पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका ट्रकवर पंधरा ते वीस टनांपेक्षा जास्त वाळू भरली जाते, आणि त्यातून लाखोंचा बेकायदेशीर नफा मिळतो. दिवसाढवळ्या तपासणी टाळण्यासाठी संपूर्ण व्यवहार रात्रीच्या अंधारात केला जातो. त्यामुळे सकाळी या मार्गांवर वाळू सांडून पडलेली असते. रस्त्यावरून चालताना असे वाटते जणू काही रस्त्यावर वाळूचीच पेरणी करण्यात आली आहे. ही वाळू दुचाकी आणि सायकलस्वारांसाठी सापळा ठरते. छोट्या अडथळ्यावरसुद्धा वाहनांचा तोल जातो आणि अपघात होतात. विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज गो.से. हायस्कूल, शिंदे हायस्कूल आणि पुनगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शाळा व कॉलेजकडे जातात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, “सकाळी रस्ता ओलांडताना भीती वाटते. वाळू सांडलेली असल्याने दुचाकी घसरते, आणि मागून येणाऱ्या डंपरचा वेग पाहून जीव भांड्यात येतो.” तरीही, कोणत्याही अधिकाऱ्याने या मार्गावर प्रत्यक्ष पाहणी केली नाही, ही बाब सर्वात धक्कादायक आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या शांततेत होणारा या डंपरचा गडगडाट नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतोय. प्रचंड धूळ उडाल्यामुळे दमा, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास वाढले आहेत. वृद्ध आणि लहान मुले सर्वाधिक त्रस्त झाली आहेत. नागरिक सांगतात, “रात्री झोप लागत नाही. मुलांना अभ्यास करता येत नाही. खिडक्या बंद करून बसलं तरी धुळीचा त्रास कमी होत नाही. सकाळी उठल्यावर अंगावर वाळूचे कण दिसतात. हा भाग जणू खाणीच्या काठावर असल्यासारखा वाटतो.” रहिवाशांनी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याला अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, पण परिणाम शून्य. प्रशासनाने एकदाही ठोस कारवाई केली नाही. नागरिकांचा संशय आहे की, प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये काहीतरी “देऊन-घेऊन” करार झालेला दिसतो. म्हणूनच, लोक तिखट भाषेत म्हणतात, “जर हे सगळं देऊन-घेऊन चालत असेल, तर दिवसा सगळं बिनधास्त चालू द्या; पण निदान रात्रीच्यावेळी आमच्या निद्राभंगाचा सौदा तरी करू नका. आम्हाला शांत झोप हवी, बाकी देवाणघेवाणचं राजकारण तुम्ही सांभाळा.” या प्रकरणातील सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे काही नागरिकांनी या वाहतुकीचे स्पष्ट CCTV फुटेज व व्हिडिओ पुरावे जमा केले आहेत. रात्रीच्या वेळी एकामागोमाग एक डंपर कसे शहराच्या मार्गावरून जातात, वाळू सांडतात, आणि पुन्हा रिकामे परत येतात हे सर्व फुटेजमध्ये दिसते.काही नागरिकांनी सांगितले की, “ध्येय अकॅडमी”च्या दालनात या सर्व वाहतुकीचे CCTV रेकॉर्ड जतन करून ठेवलेले आहेत. पण प्रशासनाला दाखवून काही उपयोग नाही, कारण अधिकारी आणि ठेकेदारांचे नाते सर्वश्रुत आहे. जे अधिकारी कारवाईसाठी पुढे येतात, त्यांची बदली होते, आणि बाकीचे शांत बसतात. दुसरीकडे, नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की काही लेखणीचे शिलेदार, म्हणजेच पत्रकारितेशी संबंधित काही मंडळी, ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सन्मानपत्र, जाहिराती आणि पुरस्कार विक्री सोहळा करीता देणग्यांच्या बदल्यात ही माहिती गप्प ठेवतात. त्यामुळे नागरिक म्हणतात, “आम्ही पुरावे देऊ तरी कोणत्या माध्यमाला विश्वास ठेवायचा? बातमी छापली जाईल की पुरस्कारासाठी गप्प राहतील?” या संशयामुळे नागरिकांकडून प्रशासनाला थेट पुरावे देण्याची हिंमतही होत नाही. शहरातील परिस्थिती अशी झाली आहे की, सामान्य नागरिकांना प्रशासन, पत्रकारिता आणि ठेकेदार या तिघांवरही विश्वास राहिलेला नाही. दिवसेंदिवस वाढणारी वाळू वाहतूक, रात्रीचा गोंधळ, आणि प्रशासनाचे मौन — या तिहेरी आघाडीमुळे पाचोऱ्याची शांतता अक्षरशः उडाली आहे. एकेकाळी शैक्षणिक आणि न्यायिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता डंपरच्या आवाजाने दणाणले आहे. रात्री नागरिकांच्या घरात दिवे बंद असले तरी रस्त्यावर इंजिनांचा गर्जना आणि धुळीच्या ढगांमुळे हा भाग धुरकट झाल्यासारखा दिसतो. प्रशासनाच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही, तर जनतेच्या मानसिक आरोग्याचा, सामाजिक सुरक्षिततेचा आणि प्रशासनावरील विश्वासाचा आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले, “पूर्वी रात्री या रस्त्यांवर चालताना वाऱ्याचा गारवा मिळायचा, आता त्या जागी वाळूचे वादळ आणि डंपरचा गडगडाट मिळतो. प्रशासन फक्त कागदावर सक्रिय आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. लोक त्रस्त झालेत, पण ऐकणारा कोणी नाही.” या सर्व प्रकारांमुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लोक म्हणतात की, महसूल व पोलीस यंत्रणांनी जर लवकरच ठोस कारवाई केली नाही, तर आम्हीच रस्त्यावर उतरून या वाहतुकीला अडवू. या परिस्थितीत शहरातील तरुण आणि समाजसेवकही सज्ज आहेत. आता ही लढाई फक्त वाळूविरुद्ध नाही, तर अन्याय आणि निष्क्रिय यंत्रणेच्या विरोधात आहे. पाचोऱ्याच्या नागरिकांची सहनशीलता संपत चालली आहे. एका बाजूला ठेकेदारांचा नफा आणि प्रशासनाचे मौन, आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा त्रास — या असमतोल व्यवस्थेचा अंत होणे आवश्यक आहे. जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर पुढील काळात पाचोऱ्यातील नागरिकांच्या आक्रोशाचा आवाज नक्कीच राज्यभर ऐकू येईल.
क्रमशः – पुढील भागात : गिरणा नदीत पाणी असूनही अनधिकृत सर्रास बोटींचा वापर करून होत असलेला वाळू उपसा, प्रशासनाचे मौन आणि माफियांचा खेळ

म्हसास ग्रामपंचायतीतील शासकीय जमिनीचा घोटाळा उघड — खोटी कागदपत्रे, बनावट लाभार्थी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा संगनमताचा खेळ!

0

Loading

जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील म्हसास ग्रामपंचायतीत शासकीय जमिनींच्या वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फसवणूक, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत म्हसास गावातील जागरूक नागरिक मुकेश मच्छिंद्र गांगुर्डे यांनी जिल्हाधिकारी मिनल करणवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीत त्यांनी दोषी ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी आणि संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. गांगुर्डे यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या संगनमतातून शासकीय जमिनींवर बोगस लाभार्थ्यांच्या नावाने खोट्या प्रतिज्ञापत्रांचा आधार घेऊन जमीन वाटप करण्यात आली. गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन असल्याचे स्पष्ट असूनही, या जमिनीचा गैरवापर करून ती २१ बनावट लाभार्थ्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अधिकाऱ्यांनी शासनाला खोटी माहिती देत अशा व्यक्तींनाच भूमिहीन दाखवले, ज्यांच्याकडे आधीपासून स्वतःच्या मालकीची घरजमीन आहे. शासनाच्या निधीचा व जमिनीचा अशा प्रकारे दुरुपयोग करणे ही थेट भ्रष्टाचाराची उदाहरणे असल्याचे गांगुर्डे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. तक्रारीनुसार, २१ मे २०२४ रोजी म्हसास ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला. त्यात म्हसास आणि रामेश्वर ही संयुक्त ग्रामपंचायत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, सरकारी नोंदींनुसार दोन्ही स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. तरीदेखील ग्रामपंचायतीने खोटा ठराव मंजूर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही पडताळणी न करता तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढे पाठवला. ही कारवाई म्हणजे थेट प्रशासनिक शिथिलतेचे उदाहरण असल्याचे गांगुर्डे यांनी नमूद केले आहे. गांगुर्डे यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाला चुकीची माहिती देत गावात शासकीय जमीन उपलब्ध नाही असे दाखवले. परंतु प्रत्यक्ष पाहणीअंती ३५० एकरांहून अधिक शासकीय जमीन गावात असल्याचे समोर आले. ही जमीन जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने भ्रष्टाचाराचे स्पष्ट संकेत मिळतात. उपलब्ध जमीन असूनही, खोट्या लाभार्थ्यांना जागा देण्यात आल्या आणि त्यामुळे शासनाची फसवणूक झाली. या प्रक्रियेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केला आहे. गांगुर्डे यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, लाभार्थ्यांनी शासनास दिलेल्या प्रतिज्ञापत्रात “माझ्या नावावर कोणतीही जमीन किंवा घर नाही” असे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्ष तपासात हे सर्व लाभार्थी म्हसास गावातील वडीलोपार्जित जमिनीचे मालक असल्याचे उघड झाले. हेच लाभार्थी गट क्रमांक ७०/अ ११ ते ७०/अ ३० या दरम्यानच्या शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करून राहत असल्याचे देखील समोर आले. ग्रामपंचायतीने या व्यक्तींच्या समर्थनार्थ बनावट छायाचित्रे आणि दिशाभूल करणारे अहवाल सादर करून अधिकाऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणात गटविकास अधिकारी व काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने शासकीय जमीन खाजगी फायद्यासाठी वापरल्याचे स्पष्ट संकेत तक्रारीतून दिसतात. शासनाच्या जमिनींच्या वाटपात झालेली ही बेपर्वाई म्हणजे सामान्य जनतेच्या विश्वासघातासमान आहे. “हा संपूर्ण प्रकार शासन, प्रशासन आणि ग्रामपंचायतीतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतातून रचलेला घोटाळा आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि चौकशी स्वतंत्र व निपक्षपाती अधिकाऱ्यांकडून व्हावी,” अशी मागणी मुकेश मच्छिंद्र गांगुर्डे यांनी केली आहे. या तक्रारीनंतर म्हसास व पाचोरा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये “शासनाची जमीन लाटणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे” अशी मागणी जोर धरत आहे. आता जिल्हाधिकारी मिनल करणवाल यांचे कार्यालय या गंभीर तक्रारीवर काय भूमिका घेते आणि चौकशी किती तत्परतेने सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य नागरिकांची अपेक्षा एकच — शासनाच्या जमिनींवरील हा गैरव्यवहार उघडकीस यावा, दोषींना शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा बसावा.

आज दि.08/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवे कार्य यशस्वी होईल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरात स्नेह आणि सौख्य राहील. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: कामात अनपेक्षित यश मिळेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. प्रवासाची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भावनिक निर्णय टाळा. संध्याकाळी मन शांत राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्वासाने पुढे जा.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: आजचा दिवस सकारात्मक आहे. जुनी कामे पूर्ण होतील. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक प्रगती होईल. भागीदारीत यश मिळेल. नवे करार फायदेशीर ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज भावनांवर संयम ठेवा. कामात थोडा ताण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्थैर्य राखा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवे कार्य हाती घेण्यास योग्य दिवस. प्रवासाचा योग आहे. आत्मविश्वास आणि नशिब दोन्ही साथ देतील. शुभवार्ता मिळेल.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: प्रयत्नांना यश लाभेल. कामात स्थैर्य येईल. घरात समाधानाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आज तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. मित्रांसोबत स्नेह वाढेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: आज मन प्रसन्न राहील. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यातील शेतकरी अनुदान घोटाळा : सत्ताधारी व विरोधक दोघेही प्रसार माध्यमांवर अग्रेसर पण कृतीत शुन्य शेतकऱ्यांनीच आता न्यायासाठी एकत्र यावे

0

Loading

पाचोरा- तालुक्यात झालेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्याने शेतकऱ्यांच्या मनात मोठी नाराजी निर्माण झाली आहे पण या प्रकरणात ना सत्ताधारी पक्ष काही कृती करताना दिसत आहेत, ना विरोधक खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही बाजू फक्त वृत्तपत्रं, टीव्ही आणि सोशल मीडियावर बोलतात, पण प्रत्यक्षात कुणी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. कोणीही ठोस कृती करतांना दिसत नाही बोलून सहानुभूती दाखवणे सोपे आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरच्या स्तरावर प्रयत्न करणे हेच आज गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सांगतले जाते की तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला  पण आतापर्यंत फक्त तीन-चार लोकांची नावे कागदावर दाखवून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.त्यांची कृती व कारवाई देखील संशोस्पद आहे कारण तपासात काय प्रगती झाली प्रकरण कुठपर्यंत आले याची आर्थिक गुन्हा शाखेकडून कोणतीही वेळोवेळी प्रसिध्दीसाठी दिली जात नाही ज्यांनी खरोखर पैसे खाल्ले, ते मात्र अजूनही पडद्यामागेच आहेत.मोकाट फिरत आहे आणि अजुनही असा प्रकार चालला तर खरे आरोपी मोकाट फिरतील आणि शेतकऱ्यांचा हाच काय? भविष्यातील पैसा परत मिळणे अशक्य होईल. जालना जिल्ह्यात याच प्रकारचा घोटाळा झाला होता, पण तिथे तपास जबाबदारीने झाला. जे दोषी होते त्यांचे तपासात पूर्ण रॅकेट बाहेर आले आणि सर्व तपास पारदर्शकपणे झाला. पण पाचोऱ्यात मात्र सर्व काही “तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही रडलो असल्यासारखं करू” या म्हणीप्रमाणे चाललंय. काही दिवस गदारोळ होतो, माध्यमं बातम्या देतात, राजकारणी स्टेटमेंट देतात, आणि मग पुन्हा शांतता. असं करून न्याय कधीच मिळत नाही, आणि दोषींना बळ मिळतं.प्राप्त माहितीनुसार जे आरोपी अद्याप न्यायालयीन कष्टडीत आहेत त्यांना लवकरच जमीन मिळण्याच्या हालचाली देखील सुरू झाले आहेत किंबहुना तशी लाईन लागली अर्थात लावण्यात आली आहे आज शेतकऱ्यांना फक्त एकच चिंता आहे — “आमचे पैसे कधी मिळणार?” पण शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचे पैसे खाणाऱ्या सर्व गुन्हेगारांना कडक शासन होणे गरजेचे आहे हे चीड मनात ठेवून रस्त्यावर येणे गरजेचे आहे नव्हे तर सत्ताधारी विरोधकांना जाब देखील विचारणे महत्त्वाचे आहे जेणेकरून पुन्हा दुसऱ्याने असे प्रकार करण्यास उत्पन्न होणार नाही अनेक आज शेतकऱ्यांनी पीक घेतलं, कर्ज घेतलं, पण अनुदानाचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. घर चालवायचं, बँकेचे हफ्ते भरायचे, मुलांना शिकवायचं — आणि वर सरकार सांगतं की अनुदान दिलंय! मग तो पैसा गेला कुठं? हे प्रश्न विचारून – विचारून शेतकरी थकले आहेत. खरं सांगायचं तर शेतकऱ्यांचा पैसा चोरी करणं म्हणजे त्यांच्या कष्टाची थट्टा करणं आहे. कोणत्याही माणसाचा जीव मेहनतीत असतो, आणि जेव्हा त्याचे पैसे लाटले जातात तेव्हा तो मनाने खचतो. शेतकऱ्यांचा पैसा खाल्लेला कोणीही असो,मग तो सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता असो की विरोधकांचा नातेवाईक असो त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. ज्यांनी अशा लोकांना थेट किंवा अप्रत्यक्ष मदत केली, त्यांनाही कायद्याने आरोपी केलं गेलं पाहिजे. या प्रकरणाचे श्रेय कोण घेतो कोणाचे नाव पुढे येते हे महत्त्वाचे नाही पण सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आता शब्दांच्या पलीकडे जाऊन काम व कृती करावी लागेल. फक्त चर्चेत राहण्यासाठी स्टेटमेंट देऊन उपयोग नाही. प्रशासनावर दबाव आणणे, चौकशीची मागणी करणे आणि दोषींना अटक करणे हेच आता महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः संघटित होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी पाचोराच नव्हेे तर संपूर्ण महाराष्ट्रभर गावपातळीवर, तालुकापातळीवर एकत्र येऊन मागणी करायला हवी की 2019 पासून आजपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाची यादी सार्वजनिक करावी. ही यादी प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती PDF स्वरूपात पोहोचली पाहिजे. प्रत्येकाला आपल्याला किती अनुदान मिळाले, कोणत्या खात्यात जमा झाले, आणि ते खरोखर जमा झाले का हे समजायला हवं. माहिती खुली झाल्यावर कोणाचा पैसा कुठे गेला हे स्पष्ट होईल. आज काही शेतकरी शांत आहेत, पण त्यांच्या मनात राग आहे. ते म्हणतात — “आम्हाला कुणाचं राजकारण नको, आमचा पैसा परत मिळाला पाहिजे.” सत्ताधारी असो वा विरोधक, दोघांनाही आता शेतकऱ्यांचा विश्वास परत जिंकायचा असेल तर काम करून दाखवावं लागेल. “संदीप महाजन दुसरा होऊ नये” हा इशारा लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण ज्यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला, त्यांनी आपल्या खर्चाने, वेळाने, आणि धोका पत्करून हे सत्य बाहेर आणलं. उद्या अशा संदीप महाजन सारख्या धाडसी लोकांना साथ न दिली, तर पुन्हा कोणीही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवायला तयार होणार नाही. यासाठी या लढ्यात कोणतेही पक्ष, धर्म किंवा जातीतले भेद विसरून सर्व शेतकरी एकत्र आले पाहिजेत. हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली नको, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असावं. प्रत्येकाने आपल्या पातळीवरून जबाबदारी घ्यायला हवी. कुणी माध्यमांतून आवाज उठवू शकतो, कुणी प्रशासनाला निवेदन देऊ शकतो, तर कुणी माहिती मिळवून ती लोकांसमोर आणू शकतो. अशा पद्धतीने एकत्र काम केलं तरच दोषी पकडले जातील आणि शेतकऱ्यांचा पैसा परत मिळेल.अजूनही वेळ गेलेली नाही. जर आता आपण जागे झालो नाही, तर उद्या आणखी मोठा घोटाळा होईल आणि पुन्हा शेतकरीच फसतील. या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता होय पोलीस व संबंधित प्रशासनाने तपासाच्या व कृतीची वेळो-वेळी लोकांसमोर स्पष्ट माहिती ठेवावी. जे लोक दोषी आहेत, त्यांची नावे जाहीर करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा पैसा म्हणजे त्यांच्या घामाचं चीज आहे, ती कुणाच्याही खिशात जाऊ नये. शेवटी सांगायचं तर हा फक्त पैशाचा विषय नाही, तर हा शेतकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न आहे. शेतकरी आपला हक्क मागतोय, काही भीक नाही. त्यांना न्याय मिळवून देणे ही सत्ताधाऱ्यांची, विरोधकांची आणि नागरिकांची जबाबदारी आहे. आता वेळ आहे — पाचोऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन आवाज उठवण्याची, आपला हक्क मागण्याची. अन्यथा हा घोटाळा फक्त फाइलमध्ये बंद राहील.खरे आरोपी मोकाट फिरतील आणि आपले कष्टाचे पैसे कायमचे हवेत विरतील. शेतकरी जागा झाला की कोणताही भ्रष्टाचार टिकू शकत नाही — आणि आज तीच वेळ आली आहे.

आज दि.07/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक प्रगतीची चिन्हे दिसतील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: आर्थिक स्थैर्य वाढेल. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. नवे संपर्क उपयुक्त ठरतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: संवादकौशल्यामुळे यश मिळेल. कामात उत्साह राहील. प्रवासाची शक्यता आहे. मानसिक स्थैर्य राखा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: आजचा दिवस मिश्र राहील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरगुती विषयांवर संयम ठेवा. संध्याकाळी समाधान लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा आणि मान वाढेल. कामात गती येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: कामातील काटेकोरपणा टिकवा. जुन्या अडचणी दूर होतील. आरोग्य सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायिक क्षेत्रात प्रगतीची संधी. मित्रपरिवाराचा आधार लाभेल. मन आनंदी राहील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज भावनिक स्थैर्य आवश्यक आहे. नोकरीत ताण जाणवू शकतो. संयम ठेवा आणि वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: आजचा दिवस अनुकूल आहे. नवे काम सुरू करण्यास योग्य वेळ. प्रवास किंवा भेटीगाठी लाभदायक ठरतील.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नांमुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. कुटुंबात समाधान लाभेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आज नवे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक बाबतीत लाभ होईल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत राहील. घरातील सौख्य वाढेल. जुने काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.06/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आजचा दिवस यशस्वी ठरेल. कामात नवे अवसर मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: नोकरीत जबाबदारी वाढेल. प्रयत्नांना यश लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: आज आपल्या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग होईल. व्यावसायिक व्यवहार यशस्वी ठरतील. प्रवासाचा योग संभवतो.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: घरगुती वातावरणात शांतता राहील. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: प्रतिष्ठा वाढेल. अधिकारी वर्गाकडून मान्यता मिळेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. आत्मविश्वास टिकवा.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: आज महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य वेळ नाही. संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: आजचा दिवस आनंददायी राहील. सामाजिक क्षेत्रात सक्रियता वाढेल. आर्थिक बाबतीत प्रगतीची शक्यता.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात काटेकोरपणा ठेवा. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: तुमचा उत्साह वाढेल. नवे प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस. घरगुती वातावरण आनंदी राहील. प्रवास यशस्वी ठरेल.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचा विश्वास जिंकता येईल. कुटुंबात स्नेह वाढेल. आरोग्याबाबत समाधानी राहाल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आज बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. मित्रांकडून पाठबळ मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक चिंतनात मन रमेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. मन:शांती मिळेल. दिवस अनुकूल राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.05/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आर्थिक बाबतीत लाभदायक वेळ आहे. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होईल. काही जुने काम पूर्ण होतील. प्रवास फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: आज तुमचा निर्णयक्षमता वाढेल. नवे संबंध जुळतील. आर्थिक स्थैर्य मिळेल. मनातील गोंधळ दूर होईल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: दिवस काहीसा मिश्र असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. भावनिक विषयांवर संयम ठेवा. संध्याकाळी मन प्रसन्न होईल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ संभवतो. नवे उपक्रम सुरू करण्यासाठी चांगला दिवस.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: आज कामात स्थैर्य येईल. जुन्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक सौहार्द टिकेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: नवे मित्र जोडले जातील. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. व्यवसायिक निर्णय लाभदायक ठरतील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: अनपेक्षित खर्च संभवतो. नोकरीत थोडा ताण येऊ शकतो. निर्णय घेताना विचारपूर्वक वागा. संयम राखा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: आज प्रवासाचा योग आहे. नवे प्रकल्प यशस्वी होतील. शिक्षण करिअरच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. शुभवार्ता मिळेल.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील परिश्रमाला चांगले फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कौटुंबिक सौख्य वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: तुमचे विचार आज इतरांवर प्रभाव टाकतील. मित्रपरिवाराचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय लाभदायक ठरतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचारांना चालना मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. जुनी कामे पूर्ण होतील. मन शांत राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

भव्य परिवर्तन मेळावा : आगामी निवडणुकांकरीता भाजपाचे रणशिंग पाचोरातून फुंकले जाणार

0

Loading

पाचोरा – येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पाचोरा-भडगाव तालुक्यात शक्ती प्रदर्शनाचे रणशिंग फुंकले आहे. जनतेच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा “भव्य परिवर्तन मेळावा” दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता समर्थ लॉन्स, सारोळा रोड, पाचोरा येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन करणार आहेत. या परिवर्तन मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा.खा. स्मिताताई वाघ, खासदार, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार मंगेशदादा चव्हाण (आमदार, चाळीसगाव), मा. श्री. डॉ.राधेश्याम चौधरी (जिल्हा अध्यक्ष, भाजपा), मा.श्री. दिलीपभाऊ वाघ (मा.आमदार, पाचोरा-भडगाव), मा.श्री. सुभाषभाऊ पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा व मा.सभापती) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भाऊसो. अ. रहिम बागवान (जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा), मा. ताईसो. वैशाली सुर्यवंशी (भाजपा नेत्या, पाचोरा-भडगाव), मा.श्री. भाऊसो. डि.एम. पाटील (मा.जि.प. सदस्य), मा.श्री. भाऊसो. कांतीलाल जैन (माजी कोषाध्यक्ष, भाजपा जळगाव), मा.श्री. संजय मन्साराम राठोड (विमुक्त भटके जमाती अध्यक्ष), मा. श्री. जमिलदादा तडवी (अजू जमाती अध्यक्ष) या मान्यवरांचे उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याद्वारे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद निर्माण करणे, आगामी निवडणुकांकरिता पक्षाची भूमिका स्पष्ट करणे आणि जनतेच्या समस्यांवर ठोस भूमिका मांडणे हा प्रमुख उद्देश आहे. पक्षातील सर्व अंगीकृत आघाड्या, महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी तसेच अनुसूचित जाती-जमातीचे कार्यकर्ते एकत्रित येऊन जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा निर्धार या परिवर्तन मेळाव्यात व्यक्त केला जाणार आहे. या कार्यक्रमात मा.श्री. अमोलभाऊ शिंदे (युवा नेते, पाचोरा-भडगाव), मा. श्री. संजयनाना वाघ (भाजपा नेते), मा.श्री. अजय भास्कर अहिरे सर (अनु जाती जिल्हा उपाध्यक्ष), मा.सौ. ज्योतीताई भामरे (जिल्हा उपाध्यक्षा, भाजपा जळगाव), मा.श्री. प्रताप नाना पाटील (भाजपा नेते, पाचोरा-भडगाव), मा.श्री. संजय शांताराम पाटील (भाजपा नेते), मा.श्री. अमोल नाना पाटील (जिल्हा सरचिटणीस, भाजपा जळगाव), मा. सौ. सरलाताई राजेंद्र पाटील (जिल्हा उपाध्यक्षा, भाजपा जळगाव), मा.श्री. मधुकर पाटील काटे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा व मा.जि.प. सदस्य), मा.श्री. भाऊसो. रमेश वाणी (व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष), मा.श्री. आबासो. भागवत महालपुटे (जेष्ठ भाजपा नेते) आणि मा. श्री. विजय कडू पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा) यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मा.श्री. दिपकभाऊ माने, तसेच मा.श्री. गोविंद शेलार मंडळ आणि मा.सौ. शोभाताई शांतीलाल तेली (अध्यक्ष, पिपळगाव हरे.मंडळ) यांच्या पुढाकाराने संपूर्ण मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून, पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व भाजपा अंगीकृत आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जलसंपदा मंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन आपल्या ओजस्वी भाषणातून भाजपा कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांकरिता सज्जतेचा संदेश देणार आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात आणि केंद्रात भाजपाने केलेल्या जनहितकारी कामांचा आढावा घेत पुढील राजकीय दिशा निश्चित करण्याचा हेतू या सभेमागे आहे. कार्यक्रमाचे स्वरूप उत्साही आणि प्रेरणादायी असणार असून, पाचोरा तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा जोश निर्माण करणारा हा मेळावा ठरणार आहे. पक्षातील सर्व घटक एकत्र येऊन जनतेच्या अपेक्षा आणि विकासाच्या संकल्पनेभोवती भाजपा पुन्हा एकदा मजबूत होण्याचा संदेश या सभेद्वारे दिला जाणार आहे. भाजपाच्या मजबूत संघटनशक्तीला बळकटी देणारा हा “भव्य परिवर्तन मेळावा” पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या राजकीय इतिहासातील एक नवा अध्याय ठरेल, अशी सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली आहे. स्थळ : समर्थ लॉन्स, सारोळा रोड, पाचोरा. दिनांक : ५ नोव्हेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाजपा पक्षाच्या या परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

आज दि.04/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आज कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. परिश्रमाला यश लाभेल. कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: लाल

वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. घरगुती निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्य सामान्य राहील.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: आज नवे करार किंवा व्यवहार करताना दक्षता घ्या. काही जुनी कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास टिकवा. प्रवास टाळावा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मनातील गोंधळ दूर होईल. मित्रांचा आधार लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: तुमची प्रतिमा उंचावेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवे प्रकल्प हाताळण्यास अनुकूल वेळ. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या: आजचा दिवस शांततेत घालवा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: भागीदारीत यश मिळेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक प्रगतीची संधी. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: आज भावनिक गोष्टींवर नियंत्रण ठेवा. नवीन ओळखीत सावधगिरी बाळगा. जुने अडथळे दूर होऊ शकतात.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नोकरीत आणि व्यवसायात सकारात्मक बदल होतील. मित्रपरिवाराचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग उत्तम.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: कामातील ताण कमी होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरात समाधान राहील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: तुमचे नियोजन फलदायी ठरेल. नवे संधी मिळतील. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. आत्मविश्वास टिकवा.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: आज मन प्रसन्न राहील. सर्जनशीलतेला चालना मिळेल. जुनी इच्छा पूर्ण होईल. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.03/11/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष: आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कामात उत्साहाने सहभागी व्हाल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: लाल

वृषभ: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासाचे नियोजन शक्य आहे.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन: संवाद कौशल्यामुळे यश मिळेल. कार्यालयीन तणाव कमी होईल. नवे संधीचे दरवाजे उघडतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क: आजचा दिवस शांततेत जाईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. मानसिक शांती लाभेल.
शुभ अंक: 2 शुभ रंग: निळा

सिंह: आज प्रयत्नांना यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाने काम करा.
शुभ अंक: 9 शुभ रंग: केशरी

कन्या: आज कामात स्थैर्य मिळेल. नियोजनबद्ध प्रयत्न यशस्वी होतील. घरात स्नेह वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: फिकट हिरवा

तुळ: नोकरीत बढती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता. प्रियजनांकडून आनंददायी बातमी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
शुभ अंक: 3 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनिक संतुलन राखा. वादविवाद टाळा. महत्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता. आत्मविश्वास ठेवा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: काळा

धनु: नवीन उपक्रमांसाठी शुभ दिवस. प्रवास योग येईल. शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभदायी ठरेल.
शुभ अंक: 4 शुभ रंग: पिवळा

मकर: आज कामात सातत्य ठेवा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात समाधान राहील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: करडा

कुंभ: आज नवे विचार डोक्यात येतील. समाजात मानसन्मान वाढेल. जुने संबंध पुनर्स्थापित होतील. आनंददायी वातावरण राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

मीन: अध्यात्मिक विचार वाढतील. प्रवासात यश मिळेल. जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मन शांत राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!