Home Blog Page 55

आज दि.02/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – उत्साहात वाढ होईल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. मित्रांचा आधार मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – लाल

वृषभ – घरगुती वातावरण समाधानकारक राहील. पैशाचे व्यवहार जपून करा. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे. नातेवाईकांशी संवाद वाढेल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – प्रवास योग लाभदायक ठरेल. कामातील गती वाढेल. नवी नाती जुळतील. परिश्रमाला अपेक्षित फळ मिळेल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – वरिष्ठांचा सहकार्य लाभेल. मानसिक तणाव कमी होईल. घरातील सदस्यांच्या मदतीने कार्यसिद्धी होईल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबाचा आधार लाभेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कामात स्थैर्य लाभेल. संयमाने कार्य पूर्ण करा. अनावश्यक खर्च टाळा.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – आर्थिक बाबतीत लाभ मिळेल. मित्र-परिवाराकडून सहकार्य लाभेल. प्रवास आनंददायक ठरेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – कामात यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. घरगुती वातावरण आनंददायी राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – नवीन संधी उपलब्ध होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवाराशी वेळ घालवाल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबातील अडचणी दूर होतील. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायी ठरेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवावा. कामात प्रगती होईल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थ्यांना यश मिळेल. उत्साहवर्धक दिवस आहे. नवी योजना सुरू करता येतील. मित्रपरिवारासोबत आनंदी क्षण येतील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक वा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अनपेक्षित खर्च संभवतो. संयम व शांती ठेवा.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबरपर्यंत वाढली

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ ऑगस्ट होती; मात्र गणेशोत्सव, पाऊसमान आणि इतर कारणांमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांनी मुदतवाढ करण्याची विनंती केली होती.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या मागण्यांचा विचार करून जास्तीतजास्त संघांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्याचे निर्देश संचालनालयास दिले. त्यानुसार, राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे संचालक बिभीषण चवरे यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण राज्यभरातील नाट्यसंस्था आणि संघटनांना आता १० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक संघांनी https://mahanatyaspardha.com या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशिका सादर कराव्यात, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

सांस्कृतिक रंगभूमीवरील प्रत्येक संघासाठी ही संधी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, उत्साहवर्धक अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या कला रंगाने स्पर्धा रंगवण्यासाठी ही अंतिम संधी मोठ्या उत्साहाने वापरावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

पाचोरा शेतकरी अनुदान भ्रष्टाचार प्रकरणी सत्याचा शोध घेताना – पत्रकारितेतील नवा अध्याय

0

Loading

पाचोरा – मी कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही, कोणतीही लाचारी मान्य केली नाही. सत्याचा शोध घेताना अनेक आव्हाने आली, अनेक अडथळे आले, परंतु या साऱ्या परिस्थितीत मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नाही, तर समाजाच्या न्यायासाठी लढण्याची एक शपथ आहे, याचा प्रत्यय मला या प्रकरणात आला. पाचोरा शहराच्या पत्रकारितेत आजवर जे घडले नव्हते, ते घडले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानातील भ्रष्टाचार उघड करण्याचे, त्यासाठी लढा देण्याचे, आणि अखेरीस न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनीच केले. या वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचा मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. त्यांनी फक्त बातम्या दिल्या नाहीत, तर सत्य लोकांसमोर आणण्याचे कार्य केले. आयुष्यभर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा या उपकारांची परतफेड करण्याचा मी प्रयत्न करीन. पण इथेच थांबायचे नाही. काहींनी माझ्या लढ्याला दुजोरा दिला, बातम्या प्रसिद्ध केल्या, तर काहींनी जाणीवपूर्वक माझे नाव गाळले. कारण काय? तर माझे नाव दिल्यास मला श्रेय जाईल, याची त्यांना जळजळ होती. काही तर मोठ्या अपेक्षेने जळगाववरून आले, पण त्यांना ‘पाकीट पूर्तता’ न झाल्यामुळे त्यांनी माझ्या लढ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. हे पाहून मला आश्चर्य वाटले नाही, कारण अशा प्रवृत्ती नेहमीच असतात. मात्र यामुळे सत्य बदलत नाही. सूर्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नाही. त्याचप्रमाणे काहींनी नाव गाळले तरी जनतेला हे ठाऊक आहे की लढा कोण देत होते. पत्रकारितेतील हा अनुभव मला अधिक सजग आणि प्रगल्भ करणारा ठरला. कारण खरे पत्रकार तेच जे दबाव, स्वार्थ किंवा भीती यांना बळी न पडता सत्याचे धाडसाने उच्चारण करतात. या लढ्यात काही खुद्दार पत्रकार माझ्या सोबत उभे राहिलेच, शिवाय एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी माझ्या नावाचा विचार न करता, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून बातम्या दिल्या. काहींनी जरी माझे नाव न देता बातमी प्रसिद्ध केली तरी शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी पुढे आणला. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला नाही, कारण या लढ्याचा केंद्रबिंदू मी नव्हतो, तर शेतकऱ्यांचा न्याय हा होता. या भ्रष्टाचार प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे अनुदान जे बळीराजासाठी आणले गेले होते, ते काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व इतरांनी लाटले. या प्रकाराने माझ्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. पत्रकार म्हणून माझे कर्तव्य होते की हा प्रकार उघड करणे, आणि त्याविरोधात लढा देणे. उपोषण हे माझे अस्त्र होते, जे मी समाजहितासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी वापरले. आजवर अनेकदा मी समाजातील प्रश्न मांडले आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी आवाज उठवला. परंतु या वेळी विषय वेगळा होता. कारण हा प्रश्न केवळ माझ्या वैयक्तिक हिताचा नव्हता, तर हजारो शेतकऱ्यांच्या घामाने आलेल्या कष्टांचा आणि त्यांच्या हक्काचा होता. म्हणूनच ही मागणी मी स्वाभिमानाने केली. आणि यावेळीही मी स्पष्ट केले की, हक्काची मागणी करताना माझा स्वाभिमान दुखावला जाणार नाही. या लढ्यात मला अनेक अडचणी आल्या. काहींनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, काहींनी स्वार्थासाठी वेगळ्या माध्यमातून मला हाताळण्याचा प्रयत्न केला. पण मी तडजोड केली नाही. माझ्या या स्वाभिमानाला काही खुद्दार पत्रकारांनी न्याय दिला. त्यांनी सत्य प्रकाशित केले, शेतकऱ्यांचा आवाज बनले. या सर्व प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे योगदान आमदार किशोर आप्पा पाटील यांचे राहिले. त्यांनी कोणत्याही एकतर्फी बाजू न घेता संपूर्ण घटनेची माहिती घेतली. माझ्या उपोषणामागील कारणे त्यांनी समजून घेतली. ते माझ्या पाठीशी उभे राहिले, परंतु फक्त माझ्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी. त्यांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर काही तासांतच अधिकाऱ्यांच्या साक्षीने माझ्या सर्व मागण्या मान्य करून घेतल्या. यामुळे माझ्या उपोषणाची सांगता झाली. हा विजय केवळ माझा नाही, तर शेतकऱ्यांचा आहे. पत्रकार बांधवांचा आहे. सत्याला साथ देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांचा आहे. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, प्रामाणिकपणे, धैर्याने आणि स्वाभिमानाने लढा दिला तर न्याय मिळतोच. मी आज माझ्या पत्रकार बांधवांचा विशेष आभारी आहे. काहींनी नावे गाळली, दुर्लक्ष केले, परंतु त्यांच्याबद्दलही माझ्या मनात कृतज्ञता आहे. कारण त्यांनी मला आठवण करून दिली की, प्रत्येकाला आपापल्या वृत्तीप्रमाणे वागण्याची मोकळीक आहे. “मौका सबको मिलता है.” परंतु खरे मूल्य त्या लोकांचे आहे जे सत्याशी तडजोड करत नाहीत. आज जे घडले ते पाचोरा शहराच्या पत्रकारितेत एक नवा अध्याय आहे. या प्रकरणाने दाखवून दिले की पत्रकारितेची ताकद अजूनही जिवंत आहे. सत्ता, दबाव, पैसा यांना झुगारून दिलेले सत्याचे शब्द लोकांपर्यंत पोहोचतात, जनतेचा विश्वास जिंकतात आणि प्रशासनाला जागे करतात. या सर्व संघर्षानंतर माझ्या मनात समाधान आहे की मी माझे कर्तव्य केले. या मार्गावर सोबत उभे राहिलेल्या स्वाभिमानी पत्रकारांना, शेतकरी बांधवांना आणि आमदार किशोर पाटील यांना माझा मनापासून सलाम. कारण या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या न्यायाचा मार्ग मोकळा झाला. आणि मला खात्री आहे की हा लढा फक्त एका भ्रष्टाचाराविरुद्ध नाही, तर भविष्यातील पारदर्शक व्यवस्थेची पायाभरणी आहे. – संदीप दामोदर महाजन , पाचोरा 7385108510

इंडियन नेव्हीमध्ये सोमनाथ पाटील यांची नियुक्ती – वाडी शेवाळे गावाचा अभिमान उंचावला

0

Loading

वाडी शेवाळे (ता. पाचोरा) या छोट्याशा गावाने अभिमानाने डोके वर काढावे असा प्रसंग नुकताच घडला आहे. या गावातील शेतकरी संतोष रामदास पाटील यांचा मुलगा, मेहनती आणि अभ्यासू तरुण सोमनाथ संतोष पाटील याची निवड प्रतिष्ठेच्या इंडियन नेव्ही मध्ये एम.आर. (MR) या पदासाठी झाली आहे. लहानशा गावातून, साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश गावासह तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सोमनाथ हा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित वाडी येथील शां न. जैन माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून सध्या तो श्री एम. एम. महाविद्यालयात शिक्षण घेत होता. लहानपणापासूनच त्याने अभ्यासासोबतच मेहनतीचे संस्कार आत्मसात केले होते. त्याचे वडील संतोष पाटील व्यवसायाने शेतकरी तर आई गृहिणी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरी कधीही हार न मानता, “करून दाखवायचं” हे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून सोमनाथने वाटचाल केली. विशेष म्हणजे, शालेय शिक्षण घेत असताना तो गावात भाजीपाला विकून घरखर्चाला हातभार लावत असे. वयाच्या tender वयातच परिस्थितीची जाणीव ठेवून त्याने कामातून जीवनातील कष्ट ओळखले आणि त्याच कष्टातून पुढे जाऊन मोठे यश संपादन करायचे हे स्वप्न जोपासले. गावातील अनेकांना तो रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी भाजीपाला विकताना दिसे. परंतु त्याच्या मनात मात्र नेहमी मोठे ध्येय होते – देशसेवा. त्याची मेहनत आणि जिद्द अखेर फळास आली. इंडियन नेव्हीच्या परीक्षेत त्याने यश मिळवून एम.आर. या पदावर निवड मिळवली. या निवडीमुळे वाडी शेवाळे गावाचा गौरव उंचावला आहे. केवळ कुटुंबालाच नव्हे तर गावकऱ्यांनाही अभिमानाची जाणीव झाली आहे. दि 19 सप्टेंबर रोजी तो देशसेवेसाठी जाणार असुन या यशाचे औचित्य साधून वाडी शेवाळे येथील शां न. जैन माध्यमिक विद्यालयात सोमनाथचा जंगी सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रताप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेच्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व गुरुजनांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोमनाथच्या आई-वडिलांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सत्कार सोहळा सुरू होताच वातावरण भावनिक झाले. आपल्या मुलाचे स्वप्न साकार झालेले पाहून त्याचे वडील आणि आई यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. सोमनाथने भाषणात आपल्या कष्टमय प्रवासाचा उल्लेख करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. “परिस्थिती कशीही असो, सातत्याने मेहनत घेतल्यास आणि ध्येय डोळ्यांसमोर ठेवले तर यश नक्की मिळते. हे त्याचे जिवंत उदाहरण आहे,” असे तो म्हणाला सोमनाथ अधिक प्रगती करून आपल्या कुटुंबाचा, गावाचा, आणि संपूर्ण पाचोरा तालुक्याचा मान उंचावेल असा विश्वास गुरुजनांनी व्यक्त केला. सोमनाथच्या यशोगाथेतून एक महत्वाचा संदेश पुढे येतो – कठीण परिस्थिती किंवा साधी पार्श्वभूमी यामुळे यश अडत नाही. आत्मविश्वास, कष्टाची तयारी आणि ध्येयासाठी झगडण्याची हिंमत असेल तर कोणत्याही उंच शिखरावर पोहोचता येते. आज वाडी-शेवाळे गावातील प्रत्येक कुटुंब सोमनाथकडे अभिमानाने पाहत आहे. देशसेवेच्या मार्गावर पाऊल टाकलेल्या या तरुणाने आपल्या चिकाटी व मेहनतीने केवळ स्वतःचे जीवन उजळले नाही, तर गावातील तरुणांना नवे स्वप्न पाहण्याचे धैर्य दिले आहे.सोमनाथच्या नियुक्ती बद्दल व भविष्याच्या वाटचालीस झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा : शेतकऱ्यांच्या हितासाठी विनामूल्य न्यायालयीन लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. या घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नाकारला गेला असून, कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे.प्राथमिक स्वरूपात व प्रथम टप्प्यात या प्रकरणात 1 कोटी 20 लाखाच्या जवळपास अपहार केल्याचा गुन्हा दाखल होऊन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाचोरा न्यायालयातील विधी तज्ञ ॲड. सुनील पाटील (Mo 8888261883)
जिल्हा सत्र न्यायालयातील विधी तज्ञ जळगाव येथे ॲड. परेश पाटील (Mo 8625034444) आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील विधी तज्ञ ॲड. हर्षल रणधीर (Mo.9766399885 ) यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य लढाई लढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या प्रकरणात तीनही वकिलांनी घेतलेला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरतो आहे. कारण न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तो परवडणारा नसतो. पण या प्रकरणात शासनाच्या वतीने सरकारी वकील असले तरी त्यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या बाजूने मदतनीस म्हणून या वकिलांनी नि:शुल्क खटला लढवण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असुरक्षितता दूर झाली आहे. शेतकरी वर्गात या निर्णयाचे स्वागत होत असून, “आता आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी एकमुखाने मागणी केली जात आहे. कारण शासनाच्या योजनांवर डोळा ठेवून बनावट कागदपत्रांद्वारे केलेल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घोटाळ्याची सत्यस्थिती बाहेर आणण्यात आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा व अन्न – पाणी त्याग करून हा विषय उचलून धरला. शेतकरी वर्गाचे आवाज त्यांनी प्रामाणिकपणे माध्यमांतून पोहोचवले. तसेच आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधून घेण्यातही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. जनतेच्या हितासाठी धोका पत्करून आणि दबावाला बळी न पडता सातत्याने कार्य करणाऱ्या संदीप महाजन यांचे काम समाजमनात आदर निर्माण करणारे आहे. त्यामुळे आज न्यायालयीन लढाईसाठी सक्षम वकिलांचे समर्थन मिळाले असले तरी या प्रकरणाला गती देण्याचे श्रेय संदीप महाजन यांनाही जाते, पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या योजनांतील निधी हा त्यांचा जीवनदायी आधार आहे. नैसर्गिक संकटे, तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शासनाच्या योजनांकडे आशेने पाहतात. मात्र भ्रष्ट यंत्रणा आणि दलाल यांच्या संगनमताने तयार केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांचा हक्क हिरावला गेला. त्यामुळे आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये, असे सर्व स्तरांवरून सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील सुनावण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः अटकपूर्व जामिनावर होणाऱ्या युक्तिवादात सरकारी वकीलां सोबत या वकीलांची देखील ठाम भूमिका आरोपींच्या भवितव्याला निर्णायक ठरेल. शेतकरी वर्ग, सामाजिक संघटना व जनतेचे डोळे आता न्यायालयाच्या निर्णयावर खिळलेले आहेत. पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. परेश पाटील आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर या तिन्ही वकिलांची उपस्थिती शेतकऱ्यांच्या मनाला आत्मविश्वास देणारी आहे. तर आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचा जागृतीचा व सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणूनच हा लढा या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी बांधवांच्या विश्वासाला तडा गेला असला तरी, त्यांच्या बाजूने उभे ठाकलेले वकील आणि पत्रकार-आंदोलनकर्त्यांची एकजूट ही लढाईला नवी ताकद देणारी आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेली ही लढाई आता केवळ पाचोऱ्यापुरती मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी वर्गाने आता निर्धार केला आहे की, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. न्यायालयीन प्रक्रियेत तज्ज्ञ वकिलांचे नि:शुल्क योगदान आणि संदीप महाजन यांचे न थकता केलेले आंदोलन यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईला अपेक्षित यश मिळेल, अशी ठाम आशा व्यक्त होत आहे.

आज दि.01/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – कामकाजात उत्साह राहील. नवे संधी मिळतील. मित्रांचा सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य सांभाळा.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – व्यावसायिक कामात गती येईल. प्रवासाचे योग आहेत. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. संयम राखावा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – कामात अपेक्षित प्रगती मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. भावंडांशी संबंध सुधारतील. मानसिक शांती मिळेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – आत्मविश्वास वाढेल. परिश्रमाला योग्य फळ मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौतुक होण्याची शक्यता.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – नोकरी-व्यवसायात स्थिरता मिळेल. आरोग्याशी संबंधित त्रास संभवतो. कार्यक्षेत्रात संयम ठेवणे गरजेचे.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – मित्र-नातलगांचा आधार मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवासातून लाभ संभवतो. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – महत्वाची कामे यशस्वीपणे पार पडतील. गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता. संबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – कामात गती येईल. सामाजिक वर्तुळात मान-सन्मान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष टाळा. प्रवास टाळावा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – गृहकलह मिटेल. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक दृष्ट्या दिवस सामान्य राहील.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – उत्साहवर्धक दिवस. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवे प्रकल्प सुरू होऊ शकतात. मित्रांबरोबर वेळ आनंदात जाईल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – कामातील जबाबदाऱ्या वाढतील. अनपेक्षित खर्च संभवतो. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोर्‍याने गमावला समाजकारणाचा आधारवड – नानासाहेब शांताराम पाटील यांचे निधन

0

Loading

पाचोरा शहराने आज एक मानबिंदू गमावला आहे. तालुका व शहराच्या राजकारणात, समाजकारणात आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे, सर्वसामान्यांच्या मनात आपुलकी जिंकणारे आदरणीय नानासाहेब श्री. शांताराम सोनजी पाटील (वय ७८) यांचे पुणे येथे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२:४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पाचोरा तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. नानासाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचे मूर्त रूप होते. आयुष्यभर त्यांनी समाजकारणाला ध्येय मानले. पाचोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य आणि एस.एस. पाटील उद्योग समूहाचे संस्थापक व एम एस पी ग्रुपचे मार्गदर्शक या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सत्ता किंवा प्रतिष्ठा ही त्यांची कधीच लालसा नव्हती, तर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच त्यांचे राजकारण होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एक उद्योजक म्हणून पाचोरा व परिसरातील असंख्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. नानासाहेबांशी भेटणारा प्रत्येकजण त्यांना वडिलधाऱ्याप्रमाणेच सल्ला देणारे, संकटसमयी खांदा देणारे व खरी आत्मीयता दाखवणारे म्हणून अनुभवायचा. त्यांची कार्यपद्धती नेहमीच जमिनीशी जोडलेली होती. दिखाऊपणापासून दूर राहून, ‘सामान्य माणसाच्या हृदयाशी थेट संवाद’ साधण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांच्या दानशूर वृत्तीने कित्येक गरजूंना नवजीवन मिळाले. नानासाहेबांच्या निधनाने पाचोरा शहर एका मार्गदर्शक छायेला मुकले आहे. त्यांचे विचार, त्यांची तत्वनिष्ठ जीवनशैली आणि समाजाशी असलेले घट्ट नाते हे पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांचे पुत्र संजय शांताराम पाटील, प्रदीप शांताराम पाटील आणि मनोज शांताराम पाटील हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात वडिलांची परंपरा पुढे नेण्याचे कार्य करत असून, वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंत्ययात्रा आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२५, सोमवार रोजी दुपारी २:०० वाजता पाचोरा येथील निर्मल निवास, विवेकानंद नगर, भडगाव रोड येथील राहत्या घरून निघेल. अंत्यविधी पाचोरा येथील अमरधाम येथे पार पडेल. त्यांच्या जाण्याने पाचोर्‍याचे एक समाजभान असलेले नेतृत्व, दयाळू उद्योजक व सर्वसामान्यांचे आधारवड कायमचे हरपले आहे. त्यांच्या कार्याची व स्मृतींची परंपरा मात्र सदैव जिवंत राहील.
शांती शांती शांती
पाटील परिवाराच्या दुःखात झुंज वृत्तपत्र – ध्येय न्युज संपादक संदीप महाजन व परिवार सहभागी आहे

पाचोरा अनुदान घोटाळा तहसीलदारांनाही चौकशीत सह आरोपी करण्याची गरज

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – पाचोरा तहसिल कार्यालयातील तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकाशात आल्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला असला तरी या प्रकरणाची साखळी इतकी गुंतागुंतीची आहे की संपूर्ण रॅकेट उघडकीस आल्याशिवाय या घोटाळ्याचे मूळ उखडले जाणार नाही, असा ठाम सूर शेतकरी व नागरी समाजात उमटत आहे. सन २०१९ ते २०२५ या काळात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात अफाट गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीची रक्कम प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता दुसऱ्याच लोकांच्या खात्यात जमा करण्यात आली. इतकेच नव्हे तर शेतजमीन नसलेल्या, पात्रता नसलेल्या आणि आवश्यक कागदपत्रेही न सादर केलेल्या व्यक्तींची बनावट यादी तयार करण्यात आली. चौकशी अंती सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 122 आणि सन 2024-2025 मध्ये 225, अशा मिळून 347 जणांच्या नावावर शासनाने रक्कम पाठवली. या रकमेचा अपहार करून ₹1,20,13,517/- (एक कोटी वीस लाख तेरा हजार पाचशे सतरा रुपये) इतका शासकीय निधी हडपल्याचे महसुलच्या अंतर्गत तपासात स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यानंतर प्रशासनाने तत्काळ महसूल सहाय्यक अमोल भोई याचे निलंबन करून आणि चौकशी सुरू असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे पण या प्रकरणात एकट्या अमोल भोईला दोषी ठरवणे ही वस्तुस्थितीपासून पळवाट काढण्यासारखी बाब आहे. कारण – तहसिलदारांचे लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून संगणकीय फेरफार करण्यात आले, मग हे तपशील बाहेर कसे गेले? खोट्या पंचनाम्यांवर अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्या लावल्या गेल्या, त्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी का केली नाही? शासनाकडून आलेल्या रकमा चुकीच्या खात्यांवर जमा होत असताना कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही का? ही सर्व जबाबदारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येते. त्यामुळे सध्याचे व तात्कालीन तहसिलदार यांनाही ‘कर्तव्यात कसूर केली’ म्हणून निलंबित करून सह आरोपी करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अनुदान घोटाळा हा केवळ दोन-चार लोकांचा कारनामा नसून, त्यामागे व्यवस्थित आखलेले आणि जाळ्यासारखे पसरलेले रॅकेट आहे. महसूल विभागातील काही कर्मचारी, ई-सेवा केंद्र चालक, काही खातेदार व काही प्रभावी लोक यांचे संगनमत नसते, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा घोटाळा होणे शक्यच नव्हते. यामुळे चौकशी केवळ पृष्ठभागावर न राहता खोलवर व्हावी. आरोपींची साखळी कोणकोणत्या स्तरांपर्यंत जाते ते उघड व्हावे. शेतकरी समाजाची ठाम भूमिका आहे की, “अमोल भोई हा फक्त मोहरा आहे, खरी बाजी मारणारे अजून समोर आलेले नाहीत.” शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी सुरुवातीपासून या घोटाळ्याचा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मते अमोल भोई याचे निलंबन म्हणजे केवळ वरवरची कारवाई आहे. तहसिलदारांना चौकशीतून वगळणे म्हणजे मूळ गुन्हेगारांना वाचवणे आहे. गुन्ह्याचा तपास ईडी, SIT किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडे द्यावा, जेणेकरून सर्वांची साखळी उघड होईल. महाजन यांचे मत स्पष्ट आहे की, “शेतकऱ्यांचा पैसा लुटणारे कितीही मोठ्या खुर्चीत बसलेले असले तरी त्यांना वाचवणे सहन केले जाणार नाही. संपूर्ण रॅकेट उघड झालेच पाहिजे ” सध्या प्रशासन अमोल भोईच्या निलंबनाचा टेंभा मिरवत आहे. परंतु शेतकऱ्यांना यात न्याय दिसत नाही. कारण जेव्हा मूळ कर्तव्यचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत खरी चौकशी झाली असे म्हणता येत नाही. “शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे लाटून अधिकारी गोरगरीबांना लुटतात आणि नंतर वरवरच्या चौकशीचे नाटक करून जनतेला फसवतात. आम्हाला अशा टेंभ्याची गरज नाही, आम्हाला खरी कारवाई हवी आहे.” या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी १ सप्टेंबर २०२५ सकाळी 11-00 पासून तहसिल कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर प्रशासनात प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. सुट्ट्या, सणवार न बघता अधिकारी घाईघाईने कागदपत्रांची उडवाजोड करीत आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात जुनी थकबाकी टाकून “काम सुरू आहे” असे दाखवले जात आहे. पण शेतकरी समाजाला आता अशा दिखाव्याने फसवणे शक्य नाही. महाजन यांची मागणी आहे की जे पण तात्कालीन दोषी तहसिलदार असतील यांचे तात्काळ निलंबन करावे. त्यांना सह आरोपी करून तपासात समाविष्ट करावे. महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांची भूमिकाही चौकशीत आणावी. ईडी किंवा SITमार्फत संपूर्ण रॅकेटची चौकशी व्हावी. अनुदान यादी सर्व ग्रामपंचायतींना व पत्रकारांना अधिकृत स्वरूपात द्यावी. पाचोरा अनुदान घोटाळा हा फक्त भ्रष्टाचार नाही, तर शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ आहे. ही केवळ आकड्यांची लूट नसून, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची आणि त्यांच्या घामाच्या पैशावर केलेल्या डल्ल्याची कहाणी आहे. आज शेतकरी समाज एका निर्णायक वळणावर उभा आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे रॅकेट आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा हक्कासाठी उभा राहिलेला आवाज आहे. हा आवाज संदीप महाजन यांच्या आमरण उपोषणातून गगनभेदी होत आहे. आता प्रश्न एकच आहे – प्रशासन अमोल भोईच्या निलंबनावरच थांबणार का? की संपूर्ण रॅकेट उघड करून तहसिलदारांसह दोषींना शिक्षा देणार? शेतकऱ्यांच्या डोळ्यातील संताप पाहता, या प्रश्नाचे उत्तर देणे प्रशासनासाठी आता अपरिहार्य झाले आहे.

पाचोरा तहसिल कार्यालयातील कोट्यवधींचा अनुदान घोटाळा उघड – शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पत्रकार संदीप महाजन आमरण उपोषणास बसणार

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर शासनाकडून मंजूर झालेले नैसर्गिक आपत्तीमधील अनुदान परस्पर दुसऱ्यांच्या खात्यात वळवून अफाट गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल १ कोटी २० लाखांचा अनुदान घोटाळा समोर आल्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 428/2025, भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 316(4), 316(5), 318(4), 335, 336(2)(3), 340(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, फिर्याद तहसिलदार विजय शिवाजी बनसोडे (वय 41, रा. तहसिलदार कार्यालय, पाचोरा, जि. जळगाव) यांनी दिली आहे. फिर्यादींच्या निवेदनानुसार, सन 2022 ते 2024 या काळात तत्कालीन महसुल सहाय्यक अमोल सुरेश भोई यांनी संगनमताने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांच्या मदतीने मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. शेतकऱ्यांची पात्रता नसतानाही बनावट याद्या तयार करण्यात आल्या. सन 2022-23 मध्ये 122 व्यक्ती व सन 2024-25 मध्ये 225 व्यक्ती अशा एकूण 347 जणांच्या खात्यावर शासनाने रक्कम पाठवली. परंतु या व्यक्तींनी कधीही शेती केली नव्हती तसेच आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नव्हती. याचबरोबर जून ते ऑक्टोबर 2022 दरम्यान झालेल्या पंचनाम्यांच्या अभिलेखात खोटे दस्तऐवज तयार करण्यात आले, अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या लावण्यात आल्या व संगणकीय प्रणालीमध्ये तहसिलदार यांचे लॉगिन आयडी-पासवर्ड वापरून फेरफार करण्यात आला. या कारवायांद्वारे आरोपींनी तब्बल ₹1,20,13,517/- (अक्षरी – एक कोटी वीस लाख तेरा हजार पाचशे सतरा रुपये) शासकीय निधीचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे. अनुदानाची रक्कम प्रथम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून त्यानंतर संबंधित आरोपींनी त्या खातेदारांशी संपर्क साधून ती रक्कम काढून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. महसुल सहाय्यक अमोल सुरेश भोई व गणेश हेमंत चव्हाण यांच्यासह इतर काही अधिकारी-कर्मचारी व ई-सेवा केंद्र चालकांचा सहभाग असल्याची शंका बळावली आहे. सन २०१९ पासून २०२५ पर्यंत मंजूर झालेले अतिवृष्टी अनुदान अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेच नाही. अनेक शेतकरी आपल्या नावावर मंजूर झालेले पैसे दुसऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याच्या तक्रारी करत महसूल कार्यालयाच्या उंबरठ्यावर भटकत राहिले. मात्र, कारवाई केवळ नोटिसा बजावण्यापुरतीच मर्यादित राहिली. चुकीच्या खात्यात गेलेली रक्कम मूळ शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. हा प्रकार थेट फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत येतो, तरीही सर्व प्रकरणांवर योग्य ती कारवाई झालेली नाही. अखेर पीडित शेतकऱ्यांनी डॉ. सागरदादा गरुड यांच्या माध्यमातून पत्रकार संदीप महाजन यांची भेट घेतली व संपूर्ण कागदपत्रांसह वस्तुस्थिती कथन केली. त्यानंतर संदीप महाजन यांनी या गंभीर गैरव्यवहाराचा पाठपुरावा सुरू केला. त्यांनी प्रशासनासमोर पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत – (१) दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन. (२) फौजदारी गुन्हा नोंदवून ईडी, SIT किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी. (३) चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे. (४) सन २०१९-२० पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान वितरणाची संपूर्ण तपासणी. (५) सर्व अनुदान यादी पीडीएफ स्वरूपात प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, कोतवाल, सोसायटी चेअरमन व पत्रकारांपर्यंत पोहोचविणे. महाजन यांनी स्पष्ट केले आहे की – “गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींची खरी साखळी अद्याप

उघड झालेली नाही. ही चौकशी केवळ पृष्ठभागावर राहू नये म्हणून मी दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पाचोरा तहसिल कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषणास सुरुवात करणार आहे. तोपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत मी उपोषण सोडणार नाही.” महाजन यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, शनिवार-रविवार अशा सुट्ट्यांकडे दुर्लक्ष करून अधिकारी-कर्मचारी रात्री-अपरात्री शेतकऱ्यांच्या घरी पोहोचू लागले. काही शेतकऱ्यांच्या खात्यात मागील काळातील थकबाकी अनुदानाची रक्कम आत्ता जमा करण्यात आली, तर काहींना अनुदानाच्या यादीत नावे देऊन खात्री दिली गेली. तरीदेखील संपूर्ण पारदर्शकता व शेतकऱ्यांचा विश्वासार्ह हक्क अजूनही प्रलंबित आहे. महाजन यांनी मागणी केली आहे की प्रत्येक गावातील शेतकरी अनुदान यादी स्वतः पडताळून पाहू शकतील अशी सोय करावी. किती अनुदान मंजूर झाले, किती वितरित झाले आणि किती बाकी आहे याचा स्पष्ट लेखाजोखा महसूल प्रशासनाने पीडीएफ स्वरूपात जाहीर करावा. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत. या घोटाळ्यामुळे प्रशासनातच नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्येही मोठा आक्रोश आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे पाचोरा तालुका तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून, १ सप्टेंबरपासून सुरू होणारे संदीप महाजन यांचे आमरण उपोषण प्रशासनासाठी कसोटी ठरणार आहे.

आज दि.31/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज मन शांत व सकारात्मक राहील. जुनी कामे पूर्णत्वाकडे जातील.
नवीन योजनांना सुरुवात करण्याचा दिवस.
शुभ अंक: ३
शुभ रंग: केशरी

वृषभ:
कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.
शुभ अंक: ७
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
नवीन लोकांच्या संपर्कात याल. आर्थिक बाबतीत काही निर्णय फायदेशीर ठरतील.
संधी ओळखून कृती करा.
शुभ अंक: १
शुभ रंग: पांढरा

कर्क:
घरात वडिलधाऱ्यांची साथ लाभेल. मानसिक तणाव कमी होईल.
सामाजिक कामात पुढाकार घ्याल.
शुभ अंक: २
शुभ रंग: राखाडी

सिंह:
प्रभावशाली व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता.
तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देईल.
शुभ अंक: ९
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
आजचा दिवस शांततेने घालवा. अनावश्यक खर्च टाळा.
शुभचिंतकांचा आधार लाभेल.
शुभ अंक: ६
शुभ रंग: निळा

तूळ:
व्यवसायिक निर्णय योग्य ठरतील. मित्रांचा सहकार्य लाभेल.
जुने मतभेद मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे.
शुभ अंक: ५
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो, पण तुम्ही तो पार कराल.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम बाळगा.
शुभ अंक: ८
शुभ रंग: तपकिरी

धनु:
प्रवासाचे योग संभवतात. एखादी चांगली बातमी मिळेल.
मन प्रसन्न राहील, कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: ४
शुभ रंग: केशरी

मकर:
महत्त्वाचे कागदपत्र हाताळताना सावध राहा.
थोडा वेळ स्वतःसाठी काढा. जुने प्रश्न मिटतील.
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

कुंभ:
कल्पकतेमुळे प्रशंसा मिळेल. आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता.
दिवस उत्साहवर्धक आहे.
शुभ अंक: २
शुभ रंग: फिकट निळा

मीन:
नवीन संधीची सुरुवात होईल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील.
शुभ विचारांवर लक्ष केंद्रित ठेवा.
शुभ अंक: ६
शुभ रंग: पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!