Home Blog Page 57

शेतकरी बांधवांनो जागे व्हा! जालना ३५ कोटींचा घोटाळा कसा उघडकीस – पाचोर्‍यातही अनुदान वितरणात मोठा गैरव्यवहार?

0

Loading

← Back

Thank you for your response. ✨

पाचोरा – शेतकरी बांधवांनो, आपल्या हक्काच्या पैशावर प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांनी गदा आणली आहे. जालना जिल्ह्यात फक्त एका वर्षात तब्बल ३५ कोटींचा अनुदान घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार थेट शेतकऱ्यांच्या न्यायावरचा घाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पाचोरा तालुक्यातही याच धर्तीवर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले ७० कोटींच्या अनुदानापैकी काही लाख रुपये परस्पर इतरांच्या खात्यात वळवून हडप करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकरी बांधवांनो, फक्त दोन-चार शेतकऱ्यांनी धाडसाने तक्रार दिली आणि महसूल प्रशासन गडबडीत सर्व कामाला लागले. आता कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दारापुढे जाऊन खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. पण हा तात्पुरता उपाय आहे. मोठ्या प्रमाणावर अनुदान कोठे गेले? किती रक्कम कोणत्या अधिकाऱ्यांनी गिळंकृत केली? हे सत्य बाहेर आलेच पाहिजे. यासाठी मागणी केली जात आहे की सन २०१९-२० पासून ते २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेल्या सर्व अनुदानांची वर्षनिहाय यादी PDF स्वरूपात जाहीर व्हावी. प्रत्येक गावाच्या स्वतंत्र यादीत लाभधारकाचे नाव, मंजूर झालेली रक्कम, प्रत्यक्ष दिलेली रक्कम आणि न मिळाल्यास कारण याची स्पष्ट नोंद असावी. ही यादी गावोगावी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी तसेच स्थानिक पत्रकार यांना व्हॉट्सअॅपवर पाठवावी. शेतकरी बांधवांनो, आपण प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. सध्याचे पैसे मिळाले असतील, पण मागील वर्षांचे काय? आपल्या जवळ असलेली माहिती, कागदपत्रे आणि पुरावे यांची प्रत जोडून ती पत्रकार संदीप दामोदर महाजन, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा – Mo. 7385108510, 7588645907 यांच्याकडे द्यावीत. जालना घोटाळ्याचा स्फोट राज्यभरात झाला आहे. त्याच धर्तीवर पाचोर्‍यातील सत्य बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या आपलेच भविष्य धोक्यात येईल. म्हणूनच आता जागे व्हा, संघटित व्हा आणि आपल्या हक्काच्या न्यायासाठी लढा उभारा!

आज दि.27/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
दिवस उत्साहवर्धक आहे. कामातील अडथळे दूर होतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल.
शुभ अंक: ६
शुभ रंग: गुलाबी

वृषभ:
सतत विचार करत राहू नका. मन शांत ठेवा. आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या.
शुभ अंक: ३
शुभ रंग: पांढरा

मिथुन:
एखाद्या व्यक्तीच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील. नवे कार्यारंभ शक्य.
शुभ अंक: ९
शुभ रंग: फिकट पिवळा

कर्क:
जुन्या ओळखी उपयोगी ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: ५
शुभ रंग: राखाडी

सिंह:
धाडसाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
शुभ अंक: १
शुभ रंग: भगवा

कन्या:
दिवस योजनांप्रमाणे चालेल. आरोग्यात सुधारणा. नात्यांमध्ये मधुरता निर्माण होईल.
शुभ अंक: ४
शुभ रंग: फिकट हिरवा

तूळ:
गोंधळ टाळा. संयम ठेवा. गैरसमजाचे निराकरण स्वतःहून करा.
शुभ अंक: ७
शुभ रंग: जांभळा

वृश्चिक:
विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक प्रवासाची शक्यता. महत्वाचे काम पुढे ढकलावे लागेल.
शुभ अंक: २
शुभ रंग: गडद निळा

धनु:
जुने प्रयत्न यश देऊ शकतात. थोडी मेहनत अधिक फळ देईल. मित्रांकडून मदत मिळेल.
शुभ अंक: ८
शुभ रंग: पिवळा

मकर:
कार्यक्षेत्रात अपेक्षित बदल संभवतात. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. घाई टाळा.
शुभ अंक: ६
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सायंकाळी मानसिक आनंद मिळेल.
शुभ अंक: ५
शुभ रंग: फिकट निळा

मीन:
आजचा दिवस सौख्यदायक आहे. घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. चांगले निर्णय घ्याल.
शुभ अंक: ३
शुभ रंग: सफेद

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

जालना शेतकरी अनुदान घोटाळ्यांचा धक्कादायक उलगडा २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल – पाचोऱ्यात काय होणार?

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानातील गंभीर घोटाळा उघड झाल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा बेकायदेशीरपणे इतरांच्या खात्यात वळवून हडप केल्याचे धक्कादायक वास्तव प्रकाशझोतात आल्याने प्रशासन हादरले आहे. या प्रकरणावर पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी आवाज उठवला असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास ते १ सप्टेंबर २०२५ पासून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण सुरू करण्याच्या निर्धारावर ठाम आहेत. सन २०२३-२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील तब्बल ५२,६८९ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. या नुकसानीसाठी शासनाने ७० कोटी १६ लाख ५३ हजार २४० रुपयांचे अनुदान मंजूर केले. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. चौकशीत असे समोर आले की तब्बल ३९ शेतकऱ्यांच्या सुमारे १४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम परस्पर इतरांच्या खात्यात वळवण्यात आली होती. प्रशासनाने याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून आतापर्यंत केवळ ४ लाख ६३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, पत्रकार महाजन यांनी ठामपणे सांगितले आहे की, “हा प्रकार थेट गुन्हा असून त्याची चौकशी SIT किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडून (EoW) व्हायलाच हवी.” घोटाळा उघड झाल्यानंतर काही संबंधितांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग झाली होती, त्या शेतकऱ्यांकडे जाऊन “आम्हाला ती रक्कम मिळाली आहे” अशा आशयाचे लेखी कागद घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकारावर महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा प्रकार मानला जात आहे. सन २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अनुदान वितरणात महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा अपहार केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ ऑगस्ट २०२५ रोजी दौऱ्यादरम्यान तपासाचे आदेश दिल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल करून सदरचा तपास थेट आर्थिक गुन्हा शाखेकडे (EoW) वर्ग करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास उच्च पातळीवर नेल्याने सत्य उघड होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केले की, “जालना येथे तलाठी आणि इतरांवर गुन्हे दाखल होऊन तपास EoW कडे वर्ग करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जर पाचोऱ्यातही गुन्हा दाखल होऊन तपास EoW कडे वर्ग झाला, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा केवळ नोटिसा व वसुली पुरेसे नाही.” आत्तापर्यंत १४ लाख ५० हजारांचा गैरव्यवहार समोर आला असला तरी, प्रत्यक्षात हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावच्या चावडीवर शेतकऱ्यांची नावे व मिळालेली रक्कम जाहीर केली गेली, तर मोठा स्फोट होईल, असा इशारा पत्रकार महाजन यांनी दिला आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा प्रांताधिकारी व तहसीलदार सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी देखील मंत्रालयात जाऊन मंत्री गिरीशभाऊ महाजन व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही व्यथा मांडण्याची तयारी दाखवली आहे. जालना आणि पाचोरा हे दोन्ही प्रकरणे शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला टाकणारी आहेत. जालना येथील धर्तीवर पाचोऱ्यातही गुन्हा दाखल होऊन तपास EoW कडे गेला, तरच दोषींवर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांचा विश्वास परत येईल. अन्यथा हा घोटाळा कोट्यवधींचा असून, तो राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्यायलढ्यातील एक निर्णायक टप्पा ठरू शकतो.

पाचोरा साई मोबाइल स्टेशन की ओर से गणेश चतुर्थी पर विशेष “मोरया ऑफर”

0

Loading

पाचोरा : गणेश चतुर्थी के पावन अवसर पर ग्राहकों के लिए अनेक आकर्षक योजनाएँ प्रस्तुत करते हुए पाचोरा स्थित मोबाइल स्टेशन ने विशेष “मोरया ऑफर” की घोषणा की है। इस योजना के अंतर्गत मोबाइल क्रय करने वाले प्रत्येक ग्राहक को सरप्राइज़ उपहारों के साथ एक ही खरीद पर दस विशेष लाभ प्राप्त होंगे। गणेशोत्सव हर्ष और मंगल का पर्व है। इसी को ध्यान में रखते हुए मोबाइल स्टेशन ने ग्राहकों के लिए “110 का विशेष ऑफर” प्रारंभ किया है। इस ऑफर के अंतर्गत मोबाइल क्रय करने पर ग्राहकों को आकर्षक उपहार जीतने का अवसर मिलेगा। इनमें ट्रॉली बैग (मूल्य ₹ 5999), नॉइज़ स्मार्ट वॉच (मूल्य ₹2499), नेकबैंड, एयर बड्स, ब्लूटूथ स्पीकर, पावर बैंक, हैंड बैग तथा मोबाइल स्टैंड जैसी उपयोगी वस्तुएँ सम्मिलित हैं। इसके अतिरिक्त, मोबाइल खरीद पर दो वर्ष की विशेष डबल वारंटी प्रदान की जाएगी। साथ ही SBI एवं HDFC बैंक कार्ड पर ₹ 3000 तक कैशबैक की सुविधा उपलब्ध होगी। ग्राहकों के लिए बजाज फिनसर्व द्वारा शून्य प्रतिशत ब्याज दर पर वित्त सुविधा भी प्रदान की गई है। साई मोबाइल स्टेशन के संचालक आकाशभाई एवं महेशभाई ने बताया कि, “इस गणेश चतुर्थी को ग्राहकों के लिए यादगार बनाने की दृष्टि से यह योजना आरंभ की गई है। एक ही खरीद पर ग्राहकों को दस विभिन्न लाभ प्राप्त होंगे और उनके मोबाइल क्रय का अनुभव और भी सुखद एवं लाभकारी बनेगा।” स्टेशन रोड, पाचोरा स्थित साई मोबाइल स्टेशन में यह विशेष ऑफर उपलब्ध है। विस्तृत जानकारी एवं संपर्क हेतु Mo. 9766240240 जारी किया गया है। आयोजकों के अनुसार, गणेशोत्सव के पावन अवसर पर आकर्षक उपहार एवं बहुपयोगी लाभ पाने का यह सुनहरा अवसर है।

शाळेच्या दुर्लक्षामुळे उघडले लव्ह जिहादचे भयावह रूप- समाज हादरला

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर (जि. जळगाव) पो स्टे हद्दीत घडलेली अल्पवयीन मुलीवरील अमानुष घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण मानव समाजाच्या स्वाभिमानाला काळा डाग लावणारी आहे. मानवी संवेदनांना झणझणीत चपराक मारणाऱ्या या घटनेने केवळ पीडित कुटुंब नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे. गावागावांतून संतापाची लाट उसळत असून आरोपींवर तातडीने कठोर आणि आदर्शवत अशी शिक्षा व्हावी, हीच काळाची मागणी आहे. या प्रकरणातील आरोपी विवाहित हाबिद हुसेन शेख (पत्नी व दोन मुले असलेला) व त्याची आई फातिमा बी शेख जलील ही सुद्धा या षडयंत्रात सहभागी असल्याचे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे समोर आलेले आहेत. परंतु एवढ्यावरच थांबून चालणार नाही. या विकृत कृत्यात त्यांच्या सोबत इतरांनी साथ दिली असेल, तर त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात बसविणे अनिवार्य आहे. अन्यथा न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास डळमळीत होईल. समाजात असा संदेश गेला पाहिजे की, गुन्हेगारी प्रवृत्तीला साथ देणारा कोणताही व्यक्ती कायद्याच्या पाशातून सुटणार नाही. ही घटना लव्ह जिहादच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. केवळ एका विकृत वाहनचालकाने केलेली कृत्य म्हणून हा गुन्हा दुर्लक्षीत करण्याचा प्रयत्न होऊ नये. मुलींच्या सुरक्षेशी निगडित गंभीर प्रश्नांकडे आपण समाज म्हणून डोळेझाक केली, तर अशा विकृती अधिक बोकाळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीडित मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतरही संबंधित शाळेने कोणतीही कारवाई केली नाही, हा प्रकार अक्षम्य आहे. दोषी वाहनचालकाला नोकरीवरून काढून टाकणे ही प्राथमिक जबाबदारी होती. पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळा प्रशासनानेच या विकृत कृत्याला अप्रत्यक्ष पाठबळ दिले, असेच म्हणावे लागेल. अशा निष्काळजी वर्तनामुळे आज एक अल्पवयीन मुलगी नराधमांच्या विकृत वासनांना बळी पडली आहे. म्हणूनच या शाळेच्या प्रशासनावरही कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल व्हावा, एवढेच नव्हे तर त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करून कठोर दंडात्मक कारवाई व्हावी. कारण शाळा-विद्यापीठे ही मुलांच्या सुरक्षिततेची पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरात जर कमी पैशात नोकरी करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाववरत असतील, तर त्याची जबाबदारी थेट प्रशासनावरच येते. अशा कारवाया झाल्या तर भविष्यात कोणतीही शाळा वा महाविद्यालय गुन्हेगार वृत्तीच्या व्यक्तींना कामावर ठेवण्याचे धाडस करणार नाही. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत चार्जशीट दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणे गरजेचे आहे. अन्यथा गुन्हेगार वर्षानुवर्षे कायद्याच्या पळवाटांचा गैरवापर करून सुटू शकतात. अल्पावधीत न्याय मिळणे हेच या कुटुंबाच्या मानसिक समाधानाचे साधन आहे. न्यायाला विलंब झाला, तर तो अन्याया समान ठरतो. म्हणूनच या घटनेत कठोर, वेगवान व आदर्शवत निकालाची आवश्यकता आहे. याच ठिकाणी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करावी लागेल. सध्याची परिस्थिती पाहता व येणारे विविध हिंदू–मुस्लिम धार्मिक सण लक्षात घेता हे प्रकरण अतिशय संवेदनशील होते. अशा परिस्थितीत पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती वर्मा मॅडम यांनी आपल्या पोलीस दलासह अत्यंत शांत, संयमी व निर्णायक भूमिका निभावली. कुठेही आपल्या हालचालींचा गवगवा न करता, कोणत्याही प्रकारच्या तणावाला वाव न देता आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यांच्या या कार्यपद्धतीचे व धैर्यशील नेतृत्वाचे निश्चितच कौतुक करावे लागेल. कारण अशा घटनांमध्ये पोलिसांचा दृष्टिकोन हा समाजात शांतता राखणारा, तसेच न्यायप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. पीडित कुटुंब आज अत्यंत संकटात आहे. त्यांच्या आयुष्याचा आधारच कोसळला आहे. अशा स्थितीत सरकारने त्यांना तातडीने मदत करणे ही केवळ औपचारिकता नाही तर नैतिक जबाबदारी आहे. त्यांना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय व मानसोपचार मदत, तसेच पुरेशी सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. कारण न्यायाच्या प्रक्रियेत त्यांना धमक्या मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेने एक मोठा धडा शिकवला आहे. समाजातील मुलींची सुरक्षा हा केवळ शासनाचा प्रश्न नाही, तर समाजाचाही आहे. गावोगावी विशेष सुरक्षा उपाययोजना राबविणे, शाळा-महाविद्यालयांत काटेकोर चौकशी करूनच कर्मचारी नियुक्त करणे, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना वेगवान शिक्षा देणे, अशा ठोस पावले उचलणे आता काळाची गरज आहे. जर आपण अशा नराधमांविरुद्ध एकजुटीने उभे राहिलो नाही, तर उद्या प्रत्येक घराची मुलगी असुरक्षित ठरेल. आरोपींना शिक्षा करून कायद्याची ताकद दाखवावी लागेल. समाजात आदर्श निर्माण झाला पाहिजे की, जो कोणी मुलींवर हात उगारण्याचे धाडस करेल, तो जिवंतपणी समाजात तोंड दाखवू शकणार नाही. आज प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आहे. मुलींच्या सुरक्षेला धक्का बसतो म्हणजे संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाला आव्हान दिले जाते. म्हणूनच या घटनेवर केवळ शोक व्यक्त करून थांबता कामा नये, तर ठोस, झटपट आणि आदर्शवत कारवाई हीच खरी न्यायप्राप्ती आहे
समाजाने आता जागे होऊन ‘नराधमांना शिक्षा’ आणि ‘मुलींना सुरक्षा’ या दोन मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे अशक्य होईल.

त्याग, संयम और आत्मशुद्धि का दीप प्रज्वलित करने वाला पर्युषण पर्व : अंबे वडगांव की कु. वैष्णवी चोपड़ा (जैन) का प्रेरणादायी अन्नत्याग उपवास

0

Loading

पाचोरा – दिनांक 21 अगस्त 2025 गुरुवार से श्वेतांबर और स्थानकवासी जैन बंधुओं का पावन पर्युषण पर्व बड़ी श्रद्धा, भक्तिभाव और निष्ठा के साथ प्रारंभ हुआ है। भारतीय संस्कृति के इतिहास में जैन धर्मियों का यह पर्व विशेष महत्व रखता है। क्योंकि इस पर्व का मुख्य आधार है त्याग, संयम और आत्मशुद्धि। आज के भौतिक प्रगति के युग में जहाँ मानवीय संबंध, आत्मीयता और भावनात्मक बंधन दूर होते जा रहे हैं, वहाँ जैन धर्म की यह सीख हमें हमेशा सावधान करती है – “सांसारिक सुख की दौड़ में आत्मिक शांति का विस्मरण न हो।” ‘पर्युषण’ शब्द का अर्थ ही है आत्मा के समीप रहना। इस समय जैन बंधु बाहरी संसार से मन हटाकर आत्मशुद्धि, अंतर्मुखता और संयम की ओर बढ़ते हैं। यह पर्व केवल धार्मिक उत्सव नहीं, बल्कि मानवता का मार्ग दिखाने वाला पवित्र काल है। हमारे देश में अनेक धर्म और परंपराएँ हैं। अधिकांश धर्मों में पर्वकाल आते ही पूजा, आराधना, उत्सव, सुंदर वस्त्र, स्वादिष्ट भोजन और उल्लास का वातावरण दिखाई देता है। लेकिन जैन धर्म की परंपरा भिन्न है। उनके पर्व का समापन भोग से नहीं, त्याग से होता है। जैन आचार्यों ने पर्युषण पर्व के निमित्त से दशलक्षण धर्म बताए हैं। ये दस विचार मानवीय जीवन के आधार स्तंभ हैं – 1. उत्तम क्षमा – क्षमा माँगना और क्षमा देना। 2. उत्तम मार्दव – नम्रता और अहंकार का त्याग। 3. उत्तम आर्जव – सरलता और ईमानदारी। 4. उत्तम शौच – आंतरिक और बाह्य पवित्रता। 5. उत्तम सत्य – सत्य बोलना और सत्य आचरण। 6. उत्तम संयम – इंद्रियों का नियंत्रण। 7. उत्तम तप – आत्मशुद्धि के लिए कष्ट सहन करना। 8. उत्तम त्याग – आसक्ति का त्याग। 9. उत्तम आकिंचन्य – कुछ भी अपना नहीं मानना। 10. उत्तम ब्रह्मचर्य – शुद्ध आचरण और आत्मनिष्ठा। ये दस गुण मानव जीवन को सही दिशा देने वाले आध्यात्मिक मार्गदर्शक दीपस्तंभ हैं। आज के तकनीकप्रधान, तेज़ जीवन में मनुष्य अधिक से अधिक भोग और सुख की ओर भाग रहा है। लेकिन इस दौड़ में शांति, संतोष, प्रेम और आत्मीयता खोते जा रहे हैं। पर्युषण पर्व हमें स्मरण कराता है कि सच्ची उन्नति आत्मिक होती है। जैन धर्म का पर्व केवल बाहरी उत्सव नहीं, बल्कि आत्मिक साधना और अंतर्मुख यात्रा है। इसी पावन पर्व की पृष्ठभूमि में पाचोरा तालुका के अंबे वडगांव निवासी दिलीप चोपड़ा (जैन) की सुपुत्री कु. वैष्णवी चोपड़ा (जैन) ने समाज में प्रेरणादायी आदर्श प्रस्तुत किया है। दिनांक 20 अगस्त 2025 बुधवार से उन्होंने अन्नत्याग करके उपवास साधना प्रारंभ की है। अन्नत्याग केवल भोजन त्यागना नहीं, बल्कि इंद्रिय संयम, मानसिक दृढ़ता और आत्मिक उन्नति का संगम है। आज के युग में किसी युवती द्वारा ऐसी साधना करना निश्चित ही सराहनीय है। क्योंकि इस समय अधिकांश युवक-युवतियाँ भौतिक सुख की ओर दौड़ते हैं, लेकिन कु. वैष्णवी ने आत्मसाधना का मार्ग चुनकर समाज के सामने आदर्श रखा है। कु. वैष्णवी का यह उपवास अखंड सात दिनों का है। इस अवधि में उन्होंने अन्नत्याग के साथ प्रार्थना, ध्यान, स्वाध्याय और संयम का मार्ग अपनाया है। उपवास का अर्थ केवल भोजन त्यागना नहीं, बल्कि मन, वाणी और कर्म से संयमी रहना भी है। इस संपूर्ण साधना से वह केवल अपनी आत्मशुद्धि नहीं कर रही, बल्कि समाज को “आध्यात्मिक शक्ति कैसे प्राप्त होती है” इसका जीवंत उदाहरण प्रस्तुत कर रही हैं। कु. वैष्णवी का यह प्रेरणादायी उपवास दिनांक 27 अगस्त 2025 बुधवार को पाचोरा स्थित जैन स्थानकों में संपन्न होगा। इस दिन जैन बंधु बड़ी श्रद्धा से उपस्थित होकर उनकी साधना के साक्षी बनेंगे। समापन समारोह में सामूहिक प्रार्थना, सामूहिक आराधना और आत्मिक संदेश का वातावरण रहेगा। कु. वैष्णवी चोपड़ा (जैन) के इस उपवास से युवा पीढ़ी को संयम, त्याग और आत्मशुद्धि का महत्व ज्ञात होगा। आज के समय में जहाँ भोजन की बर्बादी, अति-भोगवाद और विलासी जीवनशैली बढ़ रही है, वहाँ एक युवती द्वारा किया गया अन्नत्याग समाज को कृतज्ञता, संतोष और संयम का पाठ पढ़ाने वाला सिद्ध होता है। जैन धर्म का संदेश सभी के लिए जैन धर्म की शिक्षा केवल एक समाज तक सीमित नहीं, बल्कि संपूर्ण मानवजाति के लिए मार्गदर्शक है। अहिंसा, दया, करुणा और संयम जैसे मूल्यों की आवश्यकता आज हर किसी को है। पर्युषण पर्व हमें यह याद दिलाता है कि – क्षमा माँगना और क्षमा देना जीवन का सबसे बड़ा पुण्य है। भौतिक प्रगति के साथ आत्मिक प्रगति भी उतनी ही आवश्यक है। त्याग के बिना सच्ची शांति और संतोष संभव नहीं। अंबे वडगांव की कु. वैष्णवी चोपड़ा (जैन) के अन्नत्याग उपवास से इस वर्ष के पर्युषण पर्व को विशेष आध्यात्मिक प्रकाश प्राप्त हुआ है। उनकी साधना केवल उनके परिवार के लिए ही नहीं, बल्कि पूरे जैन समाज और वास्तव में समस्त समाज के लिए प्रेरणादायी सिद्ध होने वाली है। उनके त्यागमय मार्ग ने यह दिखा दिया है कि – “संयम में ही सच्ची शक्ति है, त्याग में ही सच्ची संपन्नता है और आत्मशुद्धि में ही सच्चा संतोष है।”

आज दि.26/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
नवीन कामाची संधी मिळेल. जोखीम पत्करणे फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: ९
शुभ रंग: तांबडा

वृषभ:
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक स्थैर्य राहील.
शुभ अंक: ४
शुभ रंग: क्रीम

मिथुन:
गोड बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. प्रवास संभवतो.
शुभ अंक: ७
शुभ रंग: आकाशी

कर्क:
स्वतःवर विश्वास ठेवा. सामाजिक सन्मान प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घ्या.
शुभ अंक: २
शुभ रंग: चंदेरी

सिंह:
महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते. नव्या योजनांना गती मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: १
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
सकारात्मक विचार ठेवा. कामांमध्ये यश मिळेल. जुनी चिंता दूर होईल.
शुभ अंक: ५
शुभ रंग: फिकट हिरवा

तूळ:
एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे त्रास होण्याची शक्यता. मन शांत ठेवा. निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: ८
शुभ रंग: तपकिरी

वृश्चिक:
मिळालेल्या संधीचे सोनं करा. महत्त्वाचे फोन किंवा ई-मेल येण्याची शक्यता.
शुभ अंक: ३
शुभ रंग: केशरी

धनु:
धार्मिक कामात सहभागी व्हाल. मानसिक समाधान लाभेल. घरात आनंददायी वातावरण राहील.
शुभ अंक: ६
शुभ रंग: पांढरट निळा

मकर:
कार्यक्षेत्रात समाधानकारक प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक. मित्रांचा पाठिंबा लाभेल.
शुभ अंक: २
शुभ रंग: गडद हिरवा

कुंभ:
नवीन गुंतवणुकीस अनुकूल वेळ. जोडीदाराशी सुसंवाद साधावा लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: ७
शुभ रंग: फिकट केशरी

मीन:
मनातील चिंता दूर होईल. जुने नाते पुन्हा जोडले जाईल. मन शांत राहील.
शुभ अंक: ५
शुभ रंग: निळा

आज दि.25/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल. जुन्या गोष्टी उकरल्या जाऊ शकतात. शांतपणे संवाद साधा.
शुभ अंक : २
शुभ रंग : राखाडी

वृषभ :
नवीन करारात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती सौख्य मिळेल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : हिरवा

मिथुन :
जुने मैत्र जपावे लागेल. कामात थोडा विलंब होऊ शकतो. संयम ठेवा.
शुभ अंक : ९
शुभ रंग : नारिंगी

कर्क :
स्वतंत्र निर्णय घेण्याची वेळ. कुटुंबात समाधान. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : ३
शुभ रंग : पांढरा

सिंह :
महत्त्वाचे निर्णय आज टाळा. पैसा अडकण्याची शक्यता. संयमाने वागा.
शुभ अंक : ५
शुभ रंग : जांभळा

कन्या :
व्यवसायात चांगली संधी मिळेल. परिश्रमाचे चीज होईल. नवे मार्ग उघडतील.
शुभ अंक : १
शुभ रंग : फिकट निळा

तूळ :
नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. प्रवासाचे योग. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
शुभ अंक : ४
शुभ रंग : गडद तपकिरी

वृश्चिक :
भावनिक निर्णय टाळा. पैशाचे योग्य नियोजन करा. वरिष्ठांशी बोलताना काळजी घ्या.
शुभ अंक : ८
शुभ रंग : गडद लाल

धनु :
शुभ संदेश येण्याची शक्यता. घरात एखादा कार्यक्रम ठरेल. आनंददायी दिवस.
शुभ अंक : ७
शुभ रंग : पोपटी

मकर :
कामाचा ताण जाणवेल. छोट्या चुका मोठा परिणाम देऊ शकतात. दक्ष राहा.
शुभ अंक : ५
शुभ रंग : करडा

कुंभ :
जुनी समस्या मार्गी लागेल. मित्रांपासून आधार मिळेल. नवे ध्येय ठरवा.
शुभ अंक : ३
शुभ रंग : फिकट पिवळा

मीन :
आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कागदपत्रांवर सही करताना तपासून घ्या.
शुभ अंक : ६
शुभ रंग : निळसर

आज दि.24/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष :
कामात अधिक मेहनत लागेल. जुनी गुंतवणूक फायदा देईल. थोडा संयम ठेवावा लागेल.
शुभ अंक : ७
शुभ रंग : पांढरा

वृषभ :
कौटुंबिक सौहार्द टिकवून ठेवा. व्यवसायात थोडा धीर ठेवावा लागेल. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक : ५
शुभ रंग : आकाशी

मिथुन :
तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनासारखी कामगिरी होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ अंक : १
शुभ रंग : गडद पिवळा

कर्क :
अचानक खर्च वाढू शकतो. प्रवासाच्या योजना पुढे ढकला. तणाव दूर ठेवावा.
शुभ अंक : ४
शुभ रंग : तांबडा

सिंह :
महत्त्वाच्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रगतीचा मार्ग खुलेल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
शुभ अंक : २
शुभ रंग : सोनेरी

कन्या :
गुप्त चिंता सतावू शकते. खर्चावर नियंत्रण आवश्यक. संयम ठेवा आणि शांत राहा.
शुभ अंक : ९
शुभ रंग : करडा

तूळ :
नवीन कामाच्या संधी मिळू शकतात. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक : ३
शुभ रंग : निळा

वृश्चिक :
प्रेमात गोडवा राहील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल. मनाजोगती घटना घडेल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : नारंगी

धनु :
यशाचा दिवस आहे. स्पर्धात्मक कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
शुभ अंक : ८
शुभ रंग : फिकट जांभळा

मकर :
घरगुती वादविवाद टाळा. कामात अडथळे येतील. खर्च नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक : ७
शुभ रंग : तपकिरी

कुंभ :
नवीन संकल्पांची सुरुवात होईल. मित्रांचा आधार लाभेल. सृजनात्मक विचारांना चालना मिळेल.
शुभ अंक : ५
शुभ रंग : पोपटी

मीन :
मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. सामाजिक कार्यात नाव होईल. प्रसन्नतेचा दिवस.
शुभ अंक : ६
शुभ रंग : फिकट गुलाबी

श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा व मिरवणूक भक्तिभावात संपन्न

0

Loading

पाचोरा, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी गिरणा पंपिंग रोड परिसरातील बळीराम पाटील नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि भंडारा कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. अनेक वर्षांपासून भाविकांची इच्छा असलेले हे मंदिर आता प्रत्यक्षात साकार झाल्याने नागरिकांत समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सोहळ्याची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य मिरवणुकीने झाली. सकाळी कीर्तनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांचा गजर, वारकरी संप्रदायातील बाळगोपाळ, पालखी सजावट आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगला. महिलावर्गाने ओव्या म्हणत स्वागत केले, घराघरांत रांगोळ्या काढल्या. २० ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा आनंद घेतला. कीर्तनकारांनी श्री हनुमानजींच्या चरित्रातून भक्तांना प्रेरणा दिली. या कार्यात श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष भास्कर नाना पाटील, उपाध्यक्ष संजय राजगुरे, सचिव हिरालाल परदेशी, सदस्य निलेश मराठे, हेमंत चौधरी, नितीन सुरेश पाटील, सल्लागार आण्णासो प्रकाश चौधरी, संजय मुळे, पंकज चौधरी, उमेश वाघ, राजू सावंत, संदीप राणा, नाना शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट रीतीने पूर्ण करणारे कॉन्ट्रॅक्टर इंजिनीयर प्रमोद पाटील यांचे विशेष आभार मानले गेले. तसेच आमदार निधीतून परिसराचे सुशोभीकरण व सभामंडपाची उभारणी शक्य झाली. सोहळ्यात जगदीश सोनवणे, राजूभाऊ धनराळे, सुमित चौधरी, आबा (बजरंग) चौधरी, सोपान पाटील, मनोरे साहेब, चंद्रकांत पाटील, जितेंद्र साळवे, आनंदा ढवळे, गोकुळ पाटील, शुभम परदेशी, नानू चित्ते, अमोल वाघ, मुन्ना शिंदे, भरत भेरु, महावीर महाराज, रोहिदास आदिवाल, गणेश शिंदे, मयूर चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायातील बंधू-भगिनी सहभागी झाले. समितीने भविष्यात मंदिर परिसरातून केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. श्री हनुमानजींच्या कृपेने पाचोऱ्यातील हा परिसर अध्यात्मिक व सामाजिक केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!