Home Blog Page 90

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

Loading

निगडी (गुरुदत्त वाकदेकर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त, दरवर्षीप्रमाणे सरस्वती माध्यमिक विद्यालय, आकुर्डी, पुणे येथील शिक्षिका, लेखिका, कवयित्री, निवेदिका, संपादिका, समीक्षक प्रतिमा काळे (खेमनर) यांनी यंदाही ऑनलाइन स्वरूपात एकूण पाच स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, लेख लेखन आणि काव्य लेखन या प्रकारांचा समावेश होता. यामध्ये विशेषतः लेख लेखन व काव्य लेखन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्पर्धेसाठी परीक्षक नेमले होते : वक्तृत्व स्पर्धा : प्रमोद सूर्यवंशी, मुंबई, रांगोळी स्पर्धा : सारिका अस्मार, पुणे, चित्रकला स्पर्धा : कु. अक्षदा तावरे, पुणे, लेख लेखन स्पर्धा : राजश्री मराठे, पुणे, काव्य लेखन स्पर्धा : आनंद घायवट, कसारा

सर्व परीक्षकांनी अत्यंत योग्य पद्धतीने व वेळेत परीक्षण करून निकाल जाहीर केला. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आयोजिका प्रतिमा काळे यांनी केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संजीवनी शिवाजी जगताप यांनी सर्व पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची प्रभावीपणे जनजागृती झाली.

प्रत्येक स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे :

१) वक्तृत्व / व्हिडीओ सादरीकरण स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: प्रिशा स्नेहा विराज तांबे
गट ५ (खुला गट)
प्रथम: पल्लवी कदम
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप

२) रांगोळी स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: आयुष अविनाश तांबे
द्वितीय: प्रिशा स्नेहा विराज तांबे
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: माहेश्वरी बापूराव बाजगिरे
द्वितीय: जान्हवी बापूराव बाजगिरे
तृतीय: गौतमी भानुदास कांबळे
गट ५ (खुला गट)
प्रथम: हर्षा उध्दव भुरे
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप

३) चित्रकला स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: गायत्री गणेश काळे
द्वितीय: आयुष अविनाश तांबे
तृतीय: सक्षम संदीप आखाडे
गट २ (इ. ३ री ते ५ वी)
प्रथम: आस्मी मुकुंद पेटकर
द्वितीय: आरव उदावंत
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
सर्वोत्कृष्ट: वेदश्री पुनम विनायक जाधव
उत्कृष्ट: महेश्वरी बापूराव बाजगिरे
प्रथम: जान्हवी बापूराव बाजगिरे
द्वितीय: मीरा मंगेश मगर
तृतीय: मृण्मयी गणेश काळे
उत्तेजनार्थ: राजरत्न भानूदास कांबळे, गौतमी भानूदास कांबळे, श्रावणी वाल्मिक जावळीकर
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: गार्गी संतोष तितर
द्वितीय: दिव्यांका संगम बगाडे
तृतीय: स्नेहल सागर मडके
उत्तेजनार्थ: जगदीश हनुमंता नरसन्ना
गट ५ (खुला गट)
प्रथम: संगीता संजय रोंघे
द्वितीय: श्रीमती संजीवनी शिवाजी जगताप
तृतीय: राधिका बापट

४) लेख लेखन स्पर्धा:
गट १ (इ. १ ली ते २ री)
प्रथम: संजीवनी शशिकांत बंडगर
द्वितीय: इनायानूर रशीद अन्सारी
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: दर्शन अभिनंदन देबाजे
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: दिव्या ज्ञानेश्वर पाटील
द्वितीय: वैष्णवी सुनिल कोठूरकर
गट ५ (खुला गट)
सर्वोत्कृष्ट: संतोष गोकुळदास जगताप
उत्कृष्ट: श्रीमती कोकिळा ज्ञानेश्वर ढाके
प्रथम: वैशाली चांदेकर
द्वितीय: किशोर खराते
तृतीय: अलका ज्ञानोबा सपकाळ
उत्तेजनार्थ: विकास गोपाळ खराते, डॉ. शैलजा शंकरराव करोडे, अनुराधा जोशी

५) काव्य लेखन स्पर्धा:
गट ३ (इ. ६ वी ते ८ वी)
प्रथम: दर्शन अभिनंदन देबाजे
द्वितीय: अक्षदा प्रदीप शिरढोणे
तृतीय: गायत्री धनंजय टिळेकर
गट ४ (इ. ९ वी ते १२ वी)
प्रथम: स्नेहा मीरा संतोष खोडके
द्वितीय: वैष्णवी सुनिल कोठूरकर
तृतीय: अनुष्का उदय पाटील
गट ५ (खुला गट)
सर्वोत्कृष्ट: अमर दादाराव जंजाळ
उत्कृष्ट: गुरूदत्त दिनकर वाकदेकर
प्रथम: राधिका बापट
द्वितीय: सुरेश शेठ
तृतीय: चेन्नूर अश्विनी श्रीनिवास
उत्तेजनार्थ: कु. वैशाली लांडगे, सावित्री कांबळे, किशोर खराते

या स्पर्धांच्या आयोजिका प्रतिमा काळे यांनी विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे समाज माध्यमातून वितरित केली असून, ११ जून २०२५ रोजी पुण्यात प्रत्यक्ष कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करून प्रेरणादायी कार्य सादर करणाऱ्या सर्व सहभागी व विजेत्यांचे आयोजिका प्रतिमा काळे यांनी अभिनंदन केले असून, यशस्वी कार्यक्रमाबद्दल परीक्षक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

मान्सूनची चाल मंदावणार; पावसाच्या भरवशावर पेरणी नको – कृषी विभागाचं शेतकऱ्यांना सावध आवाहन

Loading

पाचोरा – राज्यात अनेक भागांमध्ये नुकत्याच पडलेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये या वर्षी मान्सून लवकरच सक्रिय होईल आणि शेतीकामांना वेग येईल, अशी धारणा निर्माण झाली आहे. विशेषतः २५ मे रोजी दक्षिण कोकणात मान्सूनच्या आगमनाने अनेक भागात समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच कृषी विभागाने अत्यंत महत्वाचं आणि तितकंच संवेदनशील असं आवाहन केलं आहे की, शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये. कारण हवामान खात्यानं व कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा प्रवास लवकरच मंदावणार असून राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येणार आहेत. राज्यात २५ मे रोजीच मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. हा मान्सून दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करताच काही भागांत चांगल्या पावसाचा अनुभवही घेतला गेला. त्यामुळे कोकणासह इतर भागातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं व समाधानाचं वातावरण निर्माण झालं. मात्र २७ मेपासून मान्सूनचा प्रवास मंदावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. परिणामी कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित बहुतांश भागांत मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हवामान कोरडेच राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरु असलेला मान्सूनपूर्व पाऊस खरा समजून किंवा अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची कोरडवाहू पेरणी करू नये, असे स्पष्टपणे कृषी विभागाने म्हटले आहे. कारण अशा घाईघाईने केलेल्या शेतीकामांमुळे नंतर पावसाची विश्रांती पडल्यास उगमलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते – एकीकडे बी-बियाण्यांचा खर्च वाया जातो आणि दुसरीकडे जमिनीच्या योग्य ओलाव्याअभावी उत्पादनही प्रभावित होते. हवामान खात्याचा अंदाज व कृषी विभागाची चिंता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात मान्सूनचा प्रवास सध्या जरी सशक्त दिसत असला तरी लवकरच त्याची गती मंदावेल. यामुळे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत तरी मान्सूनसदृश वातावरण तयार होणार नाही. कोकणात सुरुवातीला आलेला पाऊस देखील एकप्रकारचा वादळी स्वरूपाचा असून, तो दीर्घकालीन शेतीसाठी आधारभूत ठरणार नाही. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्पष्ट सांगतात की, “पाऊस पडतोय हे पाहून अनेक शेतकरी बियाणे विकत घेत आहेत, शेताची तयारी करत आहेत. पण अजून हवामान अनिश्चित आहे. हवामान खात्याचे अपडेट्स सतत पाहणे, स्थानिक कृषी अधिकारी व कृषी विस्तार सेवेशी संपर्कात राहणे आवश्यक आहे.” पूर्वीचे अनुभव आणि शेतकऱ्यांना मिळालेली धडे गेल्या काही वर्षांच्या मान्सूनचा आढावा घेतल्यास असं लक्षात येतं की, जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या मान्सूननंतर काही वेळा मोठ्या विश्रांतीमुळे पेरण्या वाया गेल्या आहेत. अनेक वेळा पावसाचा एक जोरदार फटका बसल्यानंतर पंधरा-वीस दिवस कोरडं हवामान राहिल्यामुळे उगवलेली बियाणं मरून गेली आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानावर होत असतो. त्यामुळे कृषी विभागानं यावर्षी अगोदरच दक्षता घेत शेतकऱ्यांना सावध केलं आहे. माहिती, मार्गदर्शन व शाश्वत शेतीसाठी धोरणात्मक भूमिका राज्यातील कृषी विद्यापीठे, हवामान तज्ज्ञ व राज्य कृषी विभाग एकत्रितपणे काम करत असून, स्थानिक हवामान केंद्रांमार्फत सातत्याने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या हवामान केंद्राशी संपर्कात राहून शेतीसंदर्भातील निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांसाठी विविध माध्यमांतून – मोबाईल मेसेज, कृषी सल्लागार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, एफएम रेडिओ, स्थानिक टीव्ही वाहिन्या – यांचा वापर करून कृषी विभाग पेरणीसंबंधी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. याशिवाय ‘माझी शेतकरी योजना’, ‘शाश्वत शेती मिशन’ अशा उपक्रमांतूनही कृषी माहिती उपलब्ध केली जाते. कोणती पेरणी टाळावी आणि कोणती पुढे ढकलावी? कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, मका यांसारख्या पिकांची पेरणी पावसाची नियमितता निश्चित झाल्यावरच करावी. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बी उगमण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे उगमल्यानंतरही पावसाचा पुरवठा नसल्यास रोपं सुकून जातात. याशिवाय, काही भागांत ‘सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनीच’ फारकत घेतल्यानंतर पेरणीसंबंधी निर्णय घ्यावा. कारण अशा ठिकाणी शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने शक्यतो धोका टाळता येतो. शेतकरी बांधवांची अपेक्षा आणि वास्तव शेती ही निसर्गाधीन असलेली प्रक्रिया असल्यामुळे पावसावरील अवलंबन अपरिहार्य आहे. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीच्या खुणांवर विश्वास ठेवून पेरण्या करून बसण्याऐवजी हवामान खात्याचे अचूक अंदाज, कृषी विभागाचे सल्ले आणि स्थानिक परिस्थितीचा बारकाईने विचार करूनच शेतीसंबंधी निर्णय घेणं हीच यशस्वी व टिकाऊ शेतीची गुरुकिल्ली आहे. कृषी विभागाचं हे वेळेवरचं आणि परिणामकारक आवाहन शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेतल्यास उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढवण्यास निश्चितच मदत होईल आणि अनावश्यक आर्थिक फटका टाळता येईल

पंजाब किंग्ज क्वालिफायर-१ मध्ये पोहोचणारा पहिला संघ, मुंबई इंडियन्स एलिमिनेटर खेळणार

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोश इंग्लिश आणि प्रियांश आर्य यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव करून क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबने १८.३ षटकांत तीन गडी गमावून १८७ धावा केल्या आणि सामना जिंकला. 
पंजाब किंग्जने १० वर्षांनंतर पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, संघाने २०१४ मध्ये पात्रता सामना खेळला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने १४ सामन्यांमध्ये नऊ विजय आणि चार पराभवांसह लीग टप्प्यात पूर्ण केले. यामुळे गुजरात टायटन्स १९ गुणांसह आणि ०.३७२ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर पोहोचले. दुसरीकडे, मुंबईने आठ विजय आणि सहा पराभवांसह चौथे स्थान पटकावले. सध्या, आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांना मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. जर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने हा सामना जिंकला तर ते दुसऱ्या स्थानावर जातील आणि २९ मे रोजी पंजाबविरुद्ध क्वालिफायर-१ खेळतील. तर, मुंबई शुक्रवारी, ३० मे रोजी एलिमिनेटर सामना खेळेल.
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाबला ३४ धावांवर सुरुवातीचा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने प्रभसिमरन सिंगला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला फक्त १३ धावा करता आल्या. तथापि, पंजाबच्या फलंदाजांनी हार मानली नाही आणि प्रियांश आर्यने जोश इंग्लिशसह संघाला विजयाच्या जवळ आणले. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत १०९ धावांची मोठी भागीदारी झाली. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. सलामीवीर प्रियांशने नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याच वेळी, इंग्लिशने ४२ चेंडूत ७३ धावांची शानदार खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने संघाला विजयाकडे नेले. तो १६ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला आणि नेहल वधेरा २ धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून मिचेल सँटनरने दोन आणि बुमराहने एक विकेट घेतली.
त्याआधी, रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी झाली. मार्को जॅन्सनने रिकेलटनला श्रेयस अय्यरकडून झेलबाद केले. तो २० चेंडूत २७ धावा काढून बाद झाला तर रोहित शर्मा २१ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह २४ धावा काढून बाद झाला.
यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली. तो एका टोकाला खंबीरपणे उभा राहिला पण दुसऱ्या टोकाला फलंदाजांकडून त्याला फारशी साथ मिळाली नाही. असे असूनही, उजव्या हाताच्या फलंदाजाने ३४ चेंडूत हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. तो ३९ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा काढून परतला. त्याच्याशिवाय मुंबईकडून तिलक वर्मा यांनी एक, विल जॅक्सने २६, हार्दिक पांड्याने २६ आणि नमन धीरने २० धावा केल्या. दरम्यान, मिचेल सँटनर एक धाव काढून नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, मार्को जानसेन आणि विजय कुमार विशाख यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय हरप्रीत ब्रारला यश मिळाले.

ती अपयशी नव्हती, आधाराचा अभाव होता…

Loading

एका कर्तबगार, निष्ठावान महिला पोलीस उपअधीक्षकाच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. ही घटना केवळ तिच्या वैयक्तिक वेदनेची नव्हे, तर आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या त्रुटींची, मानसिक आरोग्याकडे असलेल्या दुर्लक्षाची, लिंगभेदाच्या कटु वास्तवाची आणि शासकीय असंवेदनशीलतेची साक्ष आहे.

ती सत्तेसाठी नव्हे, तर कायद्याच्या बाजूने लढणारी धाडसी अधिकारी होती. कोपर्डी प्रकरणाच्या तपासातील तिचे निर्भय कार्य हेच तिची खरी ओळख होते. तिच्या चिठ्ठीतले शब्द “माझं काही चुकलं असेल, तर शिक्षा करा, पण असा मानसिक छळ करून मारू नका…” — हे शब्द तिच्या अंतःकरणातील वेदनेचा टाहो आहेत आणि व्यवस्थेच्या अनास्थेवर केलेला सवाल आहे.

१. मानसिक आरोग्य – दुर्लक्षित पण अत्यावश्यक आधार

पोलीस कर्मचारी अनेकदा दीर्घ कामाचे तास, सततचा तणाव, जोखमीच्या जबाबदाऱ्या आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मानसिक थकव्याला सामोरे जातात.

NCRB (२०२३) च्या आकडेवारीनुसार, देशभरात १३,००० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी सुमारे ६% पोलीस दलातील आहेत.

Centre for Mental Health Research and Services (२०२२) च्या संशोधनानुसार, ४०% पोलीसांमध्ये तीव्र मानसिक ताणाची लक्षणे दिसून आली. ही आकडेवारी केवळ एक इशारा नसून, तातडीच्या उपायांची गरज दर्शवते.

सुधारणेचे मार्ग आणि अंमलबजावणी:

जिल्हास्तरावर प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती – राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खास मानसिक आरोग्य कक्ष सुरू करावेत.

गोपनीय, विनामूल्य व सहज उपलब्ध समुपदेशन सेवा – २४x७ हेल्पलाइन क्रमांक, ई-समुपदेशन अ‍ॅप्स, व पोलीस आयुक्तालयांत समुपदेशन बूथ.

मानसिक आरोग्य कार्यशाळा व सहकारी पाठिंबा गट – प्रत्येक पोलीस ठाण्यात दर सहा महिन्यांनी कामाच्या ताणावर आधारित प्रशिक्षण सत्र व समूह चर्चा.

मानसिक आरोग्य तपासणी व विश्रांती योजना – वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करणे व मानसिक थकवा दिसल्यास विशेष विश्रांती मंजूर करणे.

२. महिला अधिकारी व व्यवस्थेतील लिंगविषयक भेदभाव

भारतीय पोलीस दलात महिलांचे प्रमाण केवळ ११.७% इतके आहे. महिला अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दुय्यम वागणूक, सूक्ष्म लैंगिक छळ, वरिष्ठांकडून अपुरा पाठिंबा आणि सामाजिक एकटेपणाला सामोरे जावे लागते.

शिफारसी आणि रचना:

प्रत्येक जिल्ह्यात महिला सहाय्यता केंद्रांची स्थापना – महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सहाय्यता व मार्गदर्शन कार्यालय. महिला आयोग व गृह मंत्रालयाच्या सहकार्याने निधी व नियोजन.

महिला सल्लागार व तक्रार निवारण समित्या – स्थानिक महिला अधिकाऱ्यांचे नेतृत्व असलेली तक्रार निवारण प्रणाली. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल व कालमर्यादा असलेले निवारण पथक.

लिंग-संवेदनशीलतेचे नियमित प्रशिक्षण – आयपीएस प्रशिक्षण केंद्रे, राज्य पोलीस अकादमीमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक प्रशिक्षण.

स्वायत्त अंतर्गत तक्रार निवारण समित्या (ICC) – POSH कायद्यानुसार प्रभावी ICC समित्या कार्यरत करणे व वार्षिक ऑडिट करणे.

३. उच्चस्तरीय तपासांतील ताण आणि संस्थात्मक पाठिंब्याचा अभाव

गुंतागुंतीचे व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गुन्हे तपासताना अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दडपण, गुन्हेगारी धमक्या आणि अंतर्गत मत्सराला सामोरे जातात.

सुधारणेची दिशा व पद्धत:

स्वतंत्र तपास यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था – महत्त्वाच्या प्रकरणात “विशेष संरक्षण शाखा” सक्रिय करणे; अधिकाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा सुविधा.

कायदेशीर सल्ला आणि मानसिक आधार सेवा – तपास अधिकाऱ्यांसाठी कायदेशीर सल्लागारांची नियुक्ती व समुपदेशन सत्र (fast-track support cells).

राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना – वरिष्ठ आयएएस/आयपीएस व न्यायिक सदस्यांचा समावेश असलेली समिती (State Oversight Body).

४. माध्यमांची जबाबदारी आणि संवेदनशीलता

आत्महत्यांच्या बातम्यांचे असंवेदनशील व सनसनाटी पद्धतीने सादरीकरण केवळ मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत नाही, तर समाजातही चुकीचे संदेश पोहोचवतो.

डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार (२०२१):

आत्महत्येच्या कारणांबाबत तटस्थ आणि सूज्ञ मांडणी

कुटुंबाच्या भावना व मृत व्यक्तीचा सन्मान राखणे

मदतसेवा क्रमांक व समुपदेशन माहितीचा समावेश

अंमलबजावणी उपाय:

पत्रकारांना संवेदनशील पत्रकारितेचे प्रशिक्षण – पत्रकारिता अभ्यासक्रमात मानसिक आरोग्यविषयक संवेदनशीलता आणि आत्महत्येचे जबाबदार वार्तांकन यांचा समावेश करावा.

प्रेस कौन्सिलमार्फत देखरेख व आचारसंहिता लागू – अनावश्यक सनसनाटीपणा केल्यास दंडात्मक कारवाई.

५. चौकशी आणि उत्तरदायित्व

मृत्यूपूर्व पत्रातील आरोपांचे स्वतंत्र आणि वेळेत तपास – Judicial Magisterial Inquiry किंवा सीआयडी विभाग मार्फत स्वतंत्र चौकशीची तरतूद.

केवळ निलंबन नव्हे, तर उत्तरदायित्व सुनिश्चित करणारी कारवाई – दोषी असल्यास सेवा नियमांनुसार शिक्षात्मक कारवाईची कालमर्यादा पाळली जावी.

चौकशी अहवाल जनतेसमोर सादर करण्याची पारदर्शक यंत्रणा – गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सार्वत्रिक चौकशी अहवाल प्रसिद्धी.

६. धोरणात्मक व प्रशासकीय सुधारणा

ठोस उपाय व रचना:

गोपनीय तक्रार प्रणाली – हेल्पलाइन, QR कोड-आधारित मोबाईल अ‍ॅप व मेलद्वारे तक्रारी दाखल करता येतील.

मानसिक आरोग्य सेवा – डायल ११२ वा डायल MH-PoliceCare अंतर्गत मानसिक आरोग्य सहाय्य क्रमांक सुरू करणे.

मार्गदर्शक कार्यक्रम – प्रत्येक नवोदित अधिकाऱ्यासाठी अनुभवी मार्गदर्शक अधिकारी नेमणे व तिमाही संवाद सत्रे.

प्रशंसा व पुनर्बलन कक्ष – राज्य पोलीस मुख्यालयात पुरस्कार, पुनर्बलन योजना, व मानसन्मानाचे आयोजन.

क्रियाशील उपाययोजना:

प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन सेवा व मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती

महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सहाय्यता केंद्रे व तक्रार निवारण प्रणाली

उच्चस्तरीय तपासांसाठी कायदेशीर व मानसिक आधार रचना

माध्यमांसाठी आत्महत्या वार्तांकन मार्गदर्शक व पत्रकार प्रशिक्षण

संस्थात्मक उत्तरदायित्व निश्चित करणारे धोरणात्मक बदल

ही आत्महत्या तिचे वैयक्तिक अपयश नव्हते, तर व्यवस्थेतील अपूर्णतेचे दर्शन होते. जर आपण केवळ श्रद्धांजलीपुरते थांबलो, तर तिच्या वेदनेचा अनादर ठरेल. आज आवश्यक आहे — संवेदनशील प्रशासन, कृतीशील धोरणं आणि दीर्घकालीन सुधारणा, जे तिच्यासारख्या अनेक जिवांना आधार देतील. जेव्हा ती एकटी होती, तेव्हा आपण तिच्या सोबत नव्हतो. पण आज तिच्या मृत्यूतून शिकून इतर “तीं”साठी आधार निर्माण करण्यासाठी करणे — हाच तिच्यासाठी खरा श्रद्धांजली संदेश ठरेल. कारण अजूनही अनेक “ती” आपल्या आजूबाजूला आहेत – त्यांना अपयश नव्हे, आधार हवा आहे. आपण व्यवस्था म्हणून प्रत्येक अशा ‘ती’च्या पाठीशी उभे राहणार आहोत का?

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०५/२०२५ वेळ : ०६:१२

विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणारे अजातशत्रू शिक्षक – प्रा. राजेंद्र चिंचोले सरांना वाढदिवसाच्या प्रेरणादायी शुभेच्छा!

Oplus_16777216

Loading

पाचोरा – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचा जीवनप्रवास अर्पण करणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक दीपस्तंभ ठरलेल्या, अत्यंत शांत, संयमी, अजातशत्रू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे अधिष्ठान असलेल्या आदरणीय प्रा. राजेंद्र चिंचोले सरांचा आज वाढदिवस! शिक्षण आणि मार्गदर्शन या क्षेत्रात आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या चिंचोले सरांना वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत, आणि सामान्य नागरिकांपासून ते शासकीय यंत्रणांपर्यंत सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.चिंचोले सरांनी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ब्रँड उभारण्याची क्षमता असताना देखील त्यांनी मार्गदर्शनाच्या व्यवसायीकरणाचा मार्ग न निवडता विद्यार्थ्यांसाठी आपले ज्ञान नि:स्वार्थपणे आणि निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून दिले. हा त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आंतरिक आत्मियतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय देणारा अत्युच्च दर्जाचा आदर्श आहे. आज ज्या लाखो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनातून यशाच्या वाटेवर वाटचाल करत आहेत, ते हेच त्यांच्या कार्याचे जीवंत स्मारक आहेत.चिंचोले सरांचा शैक्षणिक प्रवास केवळ शालेय पातळीवर शिक्षक म्हणून मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन केवळ औपचारिकतेपुरते न करता, त्या विषयाच्या खोलवर अभ्यासातून राज्य परीक्षा मंडळ व पाठ्यपुस्तक मंडळात लेखक, प्रश्नपत्रिका आणि प्रश्न पेढी निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला. अनेक वर्षे त्यांनी या स्तरावर अभ्यासू शिक्षक म्हणून आपल्या ज्ञानाची छाप उमटवली. आजही हजारो विद्यार्थी त्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिकवणीला आदराने आणि उत्कंठेने स्मरतात, कारण त्यांनी हा विषय जिवंत केला, समजावून सांगितला आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. खान्देशातील स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात ‘ज्ञानप्रबोधिनी’ हे एक महत्वाचे योगदान त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहे. ही संस्था केवळ एक शिकवणी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रयोगशाळा ठरली आहे. या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर वैचारिकदृष्ट्या घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय सेवांमध्ये जबाबदारीची पदे भूषवत आहेत.राज्य शासनाच्या ‘करीअर कट्टा’ या अभिनव उपक्रमात राज्यस्तरीय करीअर मार्गदर्शक म्हणून चिंचोले सरांनी आपली भूमिका पार पाडली. त्यांनी ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ आणि ‘करीअर सारथी’ ही पुस्तके प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिशा दाखवली. या पुस्तकांचे लेखन फक्त पुस्तकी नव्हते, तर ते मार्गदर्शक पुस्तिकांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरत आहेत. या लेखनातून सरांनी केवळ विचार दिले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करत आत्मविश्वासाचे बीज पेरले.इतकेच नव्हे तर विविध नामांकित दैनिकांमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षा, अभ्यास पद्धती, करीअर निवड याविषयी केलेले स्तंभलेखनही अत्यंत प्रभावी ठरले. या लेखनासाठी त्यांनी संबंधित वृत्तपत्रांनी दिलेले मानधनही नम्रतेने नाकारले, हे त्यांच्या निःस्वार्थ वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. ज्ञानाचा प्रसार हाच त्यांचा ध्यास असल्यामुळे त्यांनी या लेखनालाही समाजोपयोगीतेचे स्वरूप दिले.शिक्षण व लेखनाच्या क्षेत्राबरोबरच चिंचोले सरांना पर्यटन आणि चित्रपट यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व परदेशातील पर्यटन स्थळांची माहिती, त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक संदर्भांची विस्तृत माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या व्यासंगामुळे त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नव्याने शिकायला मिळते. चित्रपटांविषयी त्यांचे मत हे केवळ रसिकतेपुरते मर्यादित नसून त्यांनी सिनेमा हे समाजाच्या आरशासारखे माध्यम म्हणून पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या चर्चेत चित्रपटांतील सौंदर्य, तांत्रिक बाजू, सामाजिक आशय या सर्वांवर अचूक भाष्य ऐकायला मिळते.या सर्व कामगिरीमुळे चिंचोले सर केवळ एक शिक्षक किंवा मार्गदर्शक राहिलेले नाहीत, तर एक विचारवंत, एक साहित्यिक, एक मार्गदर्शक, एक सखा, एक दिग्दर्शक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सच्चा पालक ठरले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विविधांगी छटा त्यांना सर्वांचेच लाडके सर बनवते. त्यांचा अभ्यास, आचरण, विचार यामुळे ते विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, पत्रकार, लेखक, आणि समाजातील विविध घटकांमध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांची सहजता, नम्रता आणि विनयशीलता यामुळे कुणालाही त्यांच्या सान्निध्यात आपलेपणा वाटतो.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या जुने विद्यार्थी त्यांच्याबद्दलच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकांनी त्यांच्या शिकवणीमुळे, केलेल्या संवादामुळे आणि दिलेल्या प्रेरणेमुळे जीवनात दिशा मिळाल्याचे नमूद केले आहे. त्यांचे हे योगदान केवळ शब्दांपुरते नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्षात परिवर्तन घडवणारे आहे.आजच्या या मंगल दिनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, अपार यश, आणि अखंड सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचा उत्साह, ऊर्जाशक्ती, आणि सेवाभाव अशीच अखंड राहो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी प्रेरणेचा प्रकाश टाकत राहो. “तुम जियो हजार साल, हर साल के दिन हो पचास हजार…!””जीवेतम् त्या शरदः शतम्” – अशी शुभेच्छा देताना आमचे मन अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते. आपल्यासारखा शिक्षक म्हणजे समाजाचे खरे वैभव.आदरणीय, वंदनीय प्रा. राजेंद्र चिंचोले सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या चिंचोले सरांचे कार्य शिक्षणक्षेत्रात मार्गदर्शक ठरले आहे. आपणास उत्तम आरोग्य, यश आणि समाधान लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

आमदार किशोरआप्पा & मा आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील “तिरंगा रॅली – एकता, देशभक्ती आणि जनजागृतीचा जिवंत संगम” यावर सविस्तर विश्लेषण

Loading

पाचोरा – स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं उलटून गेली, परंतु भारतीय जनतेच्या रक्तात असलेली देशभक्तीची धग आजही तितकीच तीव्र आहे. भारतमातेच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमणं, हातात तिरंगा घेत रस्त्यांवर उतरलेली माणसं, वयोवृद्धांच्या डोळ्यांतून ओघळलेले अभिमानाचे अश्रू, आणि तरुणाईच्या घोषणांमधून झळकणारी ऊर्जा – हे दृश्य कुठलेही भाष्य न करता स्वतःच सर्व काही सांगून जातं. अशाच एका अभूतपूर्व तिरंगा रॅलीला पाचोरा शहर साक्षी ठरलं. देशाच्या सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे जनतेच्या मनात अनेक वेळा संताप, अस्वस्थता आणि कर्तव्यबुद्धी जागृत होते. जेव्हा कश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप भारतीय नागरिकांना लक्ष्य करत हल्ला करण्यात आला, तेव्हा संपूर्ण देश शोकाकुल झाला. मात्र भारतीय सैन्याने दिलेलं सडेतोड उत्तर हे केवळ शौर्याचं नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरलं. त्याच भावनेचा आणि कृतज्ञतेचा प्रत्यय या रॅलीतून पाचोरा नगरीने दाखवून दिला.या रॅलीत केवळ झेंडा नुसता फडकवला गेला नाही, तर प्रत्येक नागरिकाने मनाचा झेंडा उंच फडकवून देशाच्या अस्मितेची आणि एकतेची प्रत्यक्ष साक्ष जगाला दाखवून दिली. भारत डेअरी स्टॉप येथून सुरू झालेली ही रॅली शहराच्या विविध प्रमुख रस्त्यांवरून, चौकातून आणि गल्ली-बोळातून पुढे जात हुतात्मा स्मारकाजवळ समारोपाला आली. हे केवळ प्रवास नव्हता, तर एका राष्ट्रभावनेच्या शक्तिशाली जागृतीचा सोहळा होता.या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाला कोणताही धार्मिक, जातीय वा पक्षीय रंग नव्हता. प्रत्येकजण फक्त ‘भारतीय’ म्हणून सहभागी झाला होता. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख अशा सर्व धर्मीयांनी, महिला, तरुण, वृद्ध, बालके अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी, आणि शेतकरी, दुकानदार, शिक्षक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, पत्रकार अशा सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी यात सहभागी होऊन ही रॅली एक ‘जनआंदोलन’ बनवली.या ऐतिहासिक रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ. या दोघांनी यावेळी केलेली उपस्थिती केवळ औपचारिक नव्हती, तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावना, त्यांच्या हातात असलेला तिरंगा आणि वृद्ध मातेस दिलेला सन्मान – याने ते एक नेता नसून जनतेच्या भावनांशी एकरूप झालेले ‘देशभक्त नागरिक’ भासले. वयोवृद्ध आजीबाईंना त्यांनी दिलेला साडी-चोळी व नारळाचा सन्मान हा केवळ औपचारिकता नव्हे, तर त्या पिढीच्या बलिदानाची आणि देशसेवेच्या परंपरेची जाणीव होती.शहरातील तरुणांनी 1000 ते 2000 फूट लांबीचा तिरंगा खांद्यावर घेत, सळसळत्या जोशात पुढे चालत दिलेले घोष – “भारत माता की जय”, “जय हिंद”, “वंदे मातरम्” – हे फक्त घोषणा नव्हत्या, तर भारतवर्षाच्या नसांमध्ये वाहणाऱ्या अस्मितेचे प्रतिध्वनी होते. काही तरुणांनी सैनिकांचा गणवेश परिधान करून देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असल्याचा संदेश दिला. महिलांनी पारंपरिक पेहरावात सहभाग घेत आपल्या उपस्थितीने संपूर्ण रॅलीला एक अनोखी ऊर्जासंपन्नता दिली.अनेकांनी आपल्या घरांच्या गॅलरीतून, दुकानांमधून किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून या रॅलीचे स्वागत केले. लहान मुलांनी हातात झेंडे घेतले, वृद्धांनी हात जोडले, काहींनी फुलांची उधळण केली. नागरिकांनी स्वतःहून रॅलीच्या मार्गावर स्वच्छता ठेवली, पाण्याची सोय केली, आणि शिस्त राखली. हे सर्व पाहून कोणताही भारतीय अंतर्मनापासून भारावून गेला नसता तरच नवल.पोलिसांनी केलेली बंदोबस्त व्यवस्था, स्वयंसेवकांची अनुशासित जबाबदारी, रॅलीतील सहभागी नागरिकांची अनुकरणीय शिस्त – हे सर्व घटक या उपक्रमाच्या यशस्वीतेत महत्वाचे ठरले. मात्र या सर्वाच्या पाठीमागे एक निस्वार्थी भावना होती – ती म्हणजे देशासाठी काहीतरी सकारात्मक आणि प्रेरणादायी घडवण्याची.तिरंगा फक्त एक झेंडा नाही, तो आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. आणि या तिरंगा रॅलीतून पाचोऱ्यातील जनतेने दाखवून दिलं की भारत फक्त भूगोलात एक देश नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर असलेली एक भावना आहे.या रॅलीमधून एक गोष्ट स्पष्ट झाली – कोणतीही अडचण, संकट किंवा शत्रूची आगळीवेगळी कृती भारतीय जनतेचं मनोबल खचवू शकत नाही. आपल्यात एकता आहे, बळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशासाठी काहीही करण्याची तयारी आहे.शेवटी हे लिहिताना एकच विचार मनात येतो – अशा रॅली केवळ एक दिवस घडाव्यात असं नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या मनात दररोज एक ‘तिरंगा रॅली’ चालू ठेवली पाहिजे. ती असो स्वच्छतेसाठी, सन्मानासाठी, देशासाठी काही चांगलं करण्यासाठी.किशोर आप्पा पाटील आणि दिलीपभाऊ वाघ यांच्यासारख्या नेतृत्वकर्त्यांनी यात केवळ उपस्थिती नोंदवून नाही, तर प्रत्यक्ष सहभाग घेत संपूर्ण जनतेला एक संदेश दिला – की नेता तोच, जो संकटात जनतेसोबत उभा राहतो, आणि देशभक्तीचे कार्य केवळ भाषणांनी नव्हे, तर कृतीने साकारतो.या रॅलीमधून उगम पावलेली एकजूट, देशप्रेम आणि सामाजिक समरसता ही भविष्यातही अशा अनेक रचनात्मक उपक्रमांची प्रेरणा ठरावी, हीच सदिच्छा.

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा उद्या 27 मे रोजी भाजप प्रवेश – राजकीय गणित, वस्तुस्थिती आणि भविष्यातील दिशा

Loading

पाचोरा -मागील आठवड्यात 22 मे रोजी ध्येय न्युजच्या वेब पोर्टलला
“भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी दिलीप भाऊंचा तातडीने पक्ष प्रवेश अत्यावश्यक”

या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते
तदनंतर दिनांक 24 मे च्या झुंज वृत्तपत्रामध्ये “पाचोरा भाजपासाठी निर्णायक क्षण दिलीप भाऊंच्या प्रवेशासाठी विलंब नको निर्णय हवा”
या शिक्षकाखाली संपादकीय लेख प्रसारित केला होता

हे दोघेही वृत्तप्रसारी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर विरोधकांनी उपवासात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घेतला आणि उद्या दिनांक 27 मे रोजी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे प्रवेशाचे मुहूर्त निश्चित झाले माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी हा निर्णय राजकीय गरज म्हणून पाहिला, तर काहींनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून झालेला बदल मानला. काही राजकीय निरीक्षकांनी याला स्वार्थ म्हणून हिणवले, तर काही समर्थकांनी याला राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याची गरज असल्याचे मान्य केले. परंतु, या निर्णयामागील वस्तुस्थिती, राजकीय समीकरणे आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेतल्यास, तो केवळ एक राजकीय तडजोड नसून पुढील राजकीय प्रवास सुसह्य करण्यासाठीचा रणनीतिक विचार असल्याचे स्पष्ट होते.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून अनेकांनी आपापल्या परीने विश्लेषण सुरू केले. काहींना आश्चर्य वाटले की, एका समाजवादी कुटुंबातून आलेले आणि कधीही हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंध नसलेले दिलीपभाऊ भाजपमध्ये कसे सामील होऊ शकतात? काहींनी त्याचा अर्थ स्वार्थी राजकारण आणि सत्तेची आस याशी लावला.मात्र, राजकारण हा केवळ विचारधारांचा खेळ नसून, तो वास्तवावर आधारलेला असतो. एखाद्या नेत्याच्या भूमिका, त्याच्या वाटचालीतील संघर्ष, त्याला मिळालेला पाठिंबा किंवा झालेली उपेक्षा, याचा बारकाईने विचार केला तर या निर्णयामागील कारणे सहज उलगडतात.माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे वडील, स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, हे महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात गरीब, मध्यमवर्गीय व्यापारी आणि शेतकरी समाजाच्या हितासाठी लढा दिला. त्यांनी निवडणुका लढवल्या, आमदारकी भूषवली आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. विशेष म्हणजे, स्व. आप्पासाहेब वाघ हे 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे पहिले सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अपक्ष आमदारांपैकी एक होते. त्यांच्या आणि इतर अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार सत्तेत आले आणि सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजपशी संबंध नव्याने सुरू झालेला नाही, तर तो अप्रत्यक्षरीत्या पूर्वीपासून होता.आजचे राजकारण 90च्या दशकाच्या किंवा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीसारखे राहिलेले नाही. आजच्या घडीला विचारधारेपेक्षा पक्षाचे पाठबळ, आर्थिक बळ आणि सत्ता समीकरणे अधिक महत्त्वाची ठरतात. एकेकाळी विचार आणि तत्वांसाठी झटणारे कार्यकर्ते आजच्या राजकीय वातावरणात पैशाच्या बाजारात हरवत चालले आहेत.
आजच्या निवडणुकीच्या राजकारणात, उमेदवाराच्या लोकप्रियतेपेक्षा पक्षाच्या आर्थिक पाठबळाचा प्रभाव जास्त दिसून येतो. निवडणुकीच्या काळात घरच्या भाकरी बांधून प्रचार करणारे कार्यकर्ते आता कुठे दिसत नाहीत, आणि त्यांची जागा पैसे देऊन विकत घेतलेले समर्थक घेत आहेत. त्यामुळे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांसारख्या नेत्यांनी सत्तेच्या समीकरणानुसार निर्णय घेणे अपरिहार्य ठरते.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर काम केले. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही. पक्षाकडूनही आणि काही ठिकाणी मतदारांकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे, निवडणूक लढवण्यासाठी वारंवार स्वतःच्या मालमत्ता विकाव्या लागतात, हे कुणालाही दीर्घकाल टिकवता येणार नाही.
अशा परिस्थितीत, “समय के साथ चलो” या तत्त्वाचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरते. पक्ष आणि विचारधारेशी बांधील राहण्याचा आग्रह धरत बसल्यास, राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय केवळ तडजोड नसून, भविष्याचा विचार करून घेतलेला व्यावहारिक निर्णय आहे.
सध्याच्या EVM च्या राजकीय वातावरणात स्वतंत्र लढून अस्तित्व टिकवणे कठीण आहे. भाजपसारख्या पक्षात सामील झाल्यास त्यांना अधिक संधी आणि पाठबळ मिळू शकते.
भाजप सरकारमध्ये स्थानिक विकासाच्या संधी अधिक आहेत. त्याचा लाभ मतदारसंघासाठी होईल.
नव्या पिढीच्या बदलत्या राजकीय वातावरणात नव्या पिढीच्या राजकारणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
स्व. आप्पासाहेब वाघ यांचा अप्रत्यक्ष वारसा :– 1995 च्या सरकार स्थापनेत त्यांनी थेट प्रत्यक्षपणे मदत केली होती. किंबहुना यांचे थोडक्यात मंत्रीपद देखील हुसकले होते हे विसरून चालणार नाही त्यामुळे भाजपसोबत जाणे पूर्णतः अनपेक्षित नाही.
कोणत्याही पक्षाचा नेता असो, सत्ताधारी पक्षाच्या जवळ राहिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवणे सोपे होते.
दिलीपभाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशावर विरोधकांनी टीका करणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकारणात कोणताही निर्णय घेतल्यावर समर्थन आणि विरोध असणारच. त्यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहतील, तर विरोधक त्याला संधी म्हणून पाहतील.
भाजप प्रवेशामुळे, त्यांच्या मतदारसंघात नवे समीकरण तयार होईल. काही पारंपरिक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, तर नवीन कार्यकर्ते जोडले जातील. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा निर्णय भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय स्वार्थ किंवा विचारधारेला तिलांजली देण्याचा निर्णय नाही, तर तो परिस्थितीनुसार घेतलेला व्यावहारिक आणि आवश्यक निर्णय आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी, हा बदल व्यापक दृष्टीकोनातून पाहायला हवा.
“राजकारण हे स्थित्यंतरशील असते आणि त्यात टिकून राहायचे असेल, तर काळानुसार बदल स्वीकारावेच लागतात.”पाचोरा भडगाव राजकारणाची विशेष बाब म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे एकतर्फे वर्चस्व आहे आणि शिंदे शिवसेना व भाजप यांचे मनोमिलन हे फक्त सत्तेवर बसण्यासाठी निवडणुकीनंतर एकत्र झालेले नाही तर एकत्रित निवडणूक लढवून एकतर्फी बहुमत प्राप्त केलेले आहे अशा त्रिसूत्री सरकार मधील पक्ष हे मित्र पक्ष समजले जातात आणि स्थानिक पातळीवर विरोधाला विरोध म्हणून राजकारण करणे शक्य नाही म्हणून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार केव्हा हात मिळवणी करायची कुठे थांबायचे आणि कुठे लढायचे याचे परिपूर्ण गणित दिलीपभाऊ वाघ यांना असल्यामुळे निश्चितच मित्र पक्षाशी वाद उफाळून न येता मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका होतील असे आज तरी निश्चित दिसत आहे ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्रातर्फे दिलीपभाऊंना भाजप प्रवेशासाठी व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

आयपीएल २०२५ : हैदराबादची सांगता विजयाने कोलकात्याचा पराभव; दोन्ही संघ स्पर्धेबाहेर

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला ११० धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबादने हंगामाचा शेवट केला. रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. आयपीएलमधील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ १८.४ षटकांत १६८ धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
या सामन्याने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२५ मधील प्रवास संपला. हैदराबादने १४ पैकी सहा सामन्यात विजय आणि सात सामन्यात पराभवासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, केकेआर पाच विजय आणि सात पराभवांसह आठव्या स्थानावर राहिला. हैदराबादने केकेआरला ११० धावांनी पराभूत करून त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी २०१९ मध्ये संघाने हैदराबादमध्ये आरसीबीला ११८ धावांनी पराभूत केले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांच्याकडून मनीष पांडेने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. याशिवाय हर्षित राणा ३४ धावा करून बाद झाला आणि सुनील नारायण ३१ धावा करून बाद झाला. दरम्यान, क्विंटन डी कॉक (९), अजिंक्य रहाणे (१५), रिंकू सिंग (९) आणि आंद्रे रसेल (०) हे हैदराबादच्या गोलंदाजांविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. या सामन्यात रमनदीप सिंगने १३ धावा केल्या तर वैभव अरोरा खातेही उघडू शकला नाही. दरम्यान, अँरिक नॉर्टजे खाते न उघडता नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबादने २० षटकांत तीन गडी गमावून २७८ धावा केल्या. त्यांच्यासाठी, उजव्या हाताच्या फलंदाज क्लासेनने १०५ धावांची सर्वाधिक नाबाद खेळी केली. त्याच वेळी, ट्रॅव्हिस हेड ४० चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. केकेआरकडून सुनील नारायणने दोन आणि वैभव अरोराने एक विकेट घेतली.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली. सुनील नरेनने अभिषेकला आपला बळी बनवले. तो १६ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३२ धावा काढून बाद झाला. यानंतर, नरेनने ट्रॅव्हिस हेडला तंबूनचा रस्ता दाखवला. तो सहा चौकार आणि तितक्याच षटकारांसह ७६ धावा काढून बाद झाला. त्याने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 
कोलकाता विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात हेनरिक क्लासेन वेगळ्याच रंगात दिसला. त्याने फक्त ३७ चेंडूत शानदार शतक पूर्ण केले आणि एक मोठी कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या युसूफ पठाणची बरोबरी केली. या शानदार खेळीमुळे हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. यापूर्वी, संघाने राजस्थानविरुद्धच्या साखळी टप्प्यातील पहिल्या सामन्यात सहा विकेट गमावून २८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात इशान किशनने २९ धावा केल्या तर अनिकेत वर्मा १२ धावा करून नाबाद राहिला.

आयपीएल २०२५ – सीएसकेने विजयाने मोहिमेचा केला शेवट

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २० षटकांत पाच बाद २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघ १८.३ षटकांत १४७ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे गुजरातने सलग दोन सामने गमावले आणि आयपीएलमधील धावांच्या बाबतीत हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. या सामन्यात गुजरातची फलंदाजी खूपच खराब होती आणि संघाचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. 
गुजरातला गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध ६३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता, जो त्यांचा स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव होता, परंतु या सामन्यात गुजरातची फलंदाजी खूपच खराब होती आणि त्यांना आयपीएलमधील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, सीएसकेने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेचा शेवट विजयाने केला. पराभवानंतरही, गुजरात १४ सामन्यांतून १८ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, तर सीएसकेने १४ सामन्यांत चौथा विजय नोंदवला आणि आठ गुणांसह दहाव्या स्थानावर आपली मोहीम संपवली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर अर्शद खानने २०, शाहरुख खानने १९, राहुल तेवतियाने १४, कर्णधार शुभमन गिलने १३ आणि रशीद खानने १२ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि जेराल्ड कोएत्झे पाच धावा काढून बाद झाले. गुजरातकडून अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी तीन, तर रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात सीएसकेसाठी कॉनवे आणि ब्रेव्हिस यांनी अर्धशतके झळकावली. शेवटी ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली ज्यामुळे सीएसके २०० धावांचा टप्पा ओलांडू शकले. 
प्रथम फलंदाजी करताना आयुष म्हात्रे आणि कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. म्हात्रे फॉर्ममध्ये दिसत होता पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. १७ चेंडूत ३४ धावा करून म्हात्रे बाद झाला. यानंतर, कॉनवेने उर्विल पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ती साई किशोरने उर्विलला बाद करून मोडली. १९ चेंडूत ३७ धावा काढून उर्विल तंनूमध्ये परतला. त्यानंतर शाहरुख खानने १७ धावा करून बाद झालेल्या शिवम दुबेला बाद केले. 
कॉनवेने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर रशीद खानने त्याला बाद केले. कॉनवेने ३५ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५२ धावा काढल्या आणि तो बाद झाला. यानंतर, ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. ब्रेव्हिसने स्फोटक फलंदाजी केली. या हंगामात ब्रेव्हिसने सीएसकेसाठी १७ षटकार मारले आहेत. तथापि, डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ब्रेव्हिसने २३ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह ५७ धावा केल्या आणि तो बाद झाला. 
सीएसकेकडून, जडेजा १८ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावा काढून नाबाद परतला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर आर साई किशोर, रशीद खान आणि शाहरुख खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तोतया पत्रकाराच्या मुखवट्याआडचा सट्टेबाज… प्रतिनिधी की बाजारबाज!

Loading

पाचोरा – तालुक्यात सध्या एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर येत आहे. ‘स्टॅटेलाईट चॅनलचा प्रतिनिधी’ & राज्य स्तरावरील दैनिकाचा प्रतिनीधी म्हणून ओळख निर्माण करत काही व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये, राजकीय बैठकीत, राजकीय मान्यवरांसमोर, कार्यक्रमांमध्ये, तसेच विविध सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या व्यक्तींच्या ओळखीबाबत जबाबदार आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. स्थानिक पत्रकारिता क्षेत्रात एक चांगली आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणाऱ्या सॅटॅलाइट चॅनल व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा गैरवापर करून स्वतःला ‘प्रतिनिधी’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीमुळे खऱ्या पत्रकारांच्या कामावरच संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा परिसरात वावरणाऱ्या या ‘तोतया पत्रकारा’ची नावे निश्चित न सांगता, तो कोणत्या अधिकृत सॅटॅलाइट चॅनलशी संबंधित आहे याची कुठलीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुष्टी न मिळता, तो सर्रासपणे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनिधीच्या

भूमिकेत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे त्याने कुठल्याही अधिकृत मान्यता न घेता, ना आयडी कार्ड, ना नियुक्तीपत्र, केवळ चॅनलचे व राज्यस्तरीय दैनिकाच्या नाव सांगून बातम्या गोळा करणे, फोटो काढणे, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अशा प्रकारचे वर्तन केवळ पत्रकारितेच्या नावलौकिकावरच नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर देखील गदा आणणारे आहे. हे लोक केवळ चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा आधार घेत, घडामोडी कव्हर करत नाहीत, तर अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारिता हे एक जबाबदारीचे, समाजाशी बांधिलकी ठेवणारे, सत्य आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेले क्षेत्र आहे. मात्र असे तोतया लोक जेव्हा बाजारात उघडपणे फिरू लागतात, तेव्हा ते संपूर्ण क्षेत्राला बदनाम करून टाकतात. विशेष बाब म्हणजे, जिल्हा स्तरावरील मूळ सॅटॅलाइट चॅनलच्या प्रतिनिधींनी

व राज्यस्तरीय दैनिकाच्या या प्रकरणाकडे तातडीने आणि गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित चॅनलच्या व्यवस्थापनाने पाचोरा परिसरात त्यांचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे, याची स्पष्ट आणि सार्वत्रिक घोषणा करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘घरबसल्या’ बातम्या व पाकीट पाठवणारा आणि चॅनलच्या नावावर बाजार करणारा हा व्यक्ती भविष्यात चॅनलच्याच नावाला धक्का पोहोचवेल. अशा प्रकारच्या बनावट प्रतिनिधींच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात, दलालगिरीत, प्रशासकीय फेऱ्यांमध्ये. आणि समाजात चिथावणीखोर वातावरण तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक सॅटॅलाइट चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकाच्या हे ठरवून द्यायला हवे की कोणत्या बातम्या अधिकृत आहेत,आणि त्या कोण पाठवत आहे. तसेच जर हे तोतया पत्रकार राज्यस्तरीय दैनिकाच्या व खऱ्याच चॅनलचा अधिकृत प्रतिनिधी नाही आणि तरीही त्याच्या पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असतील यावरून हे लक्षात घ्यावे की, या कथित प्रतिनिधीच्या बातम्या कुठून येतात? तो कोठे वास्तव्यास आहे? त्याचे चॅनलशी संबंध काय आहेत? या सर्व गोष्टींची छाननी झाली पाहिजे. अनेक वेळा असे ही निदर्शनास आले आहे की, या कथित पत्रकारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना ‘कव्हरेज’ देण्याच्या नावाखाली दबाव टाकून लाभ घेतलेले आहेत या पार्श्वभूमीवर, सॅटॅलाइट चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या अधिकाऱ्यांनी अशा बनावट प्रतिनिधींविषयी ठोस भूमिका घेऊन, अधिकृत प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध करणे, त्यांच्या आयडी कार्डांची नोंद प्रशासनाकडे पाठवणे, आणि सोशल मीडियावर त्यांचा अधिकृत परिचय देणे ही काळाची गरज आहे. शिवाय अशा तोतया प्रतिनिधींनी पत्रकारितेच्या आडून सट्टेबाजी, दलाली, धमकी, किंवा कोणत्याही प्रकारचे अनैतिक कार्य केल्याचे आढळून आल्यास, चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून आपला आळवलेला नाताच संपवावा. पाचोऱ्यासारख्या शहरात, जिथे अनेक युवक पत्रकारितेच्या नावाने सामाजिक बदलासाठी योगदान देत आहेत, तिथे अशा तोतया लोकांमुळे संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरते. त्यामुळे या प्रकारांना वेळीच रोखणं हे समाजासाठी, प्रशासनासाठी आणि खरी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य ठरतं. पुन्हा एकदा जिल्हास्तरावरील सर्व सॅटॅलाइट चॅनल प्रतिनिधींनी व राज्यस्तरीय दैनिकाच्या व्यवस्थापन मंडळ सजग होणे, पाचोरा परिसरातील या बनावट पत्रकाराची ओळख पटवून त्याच्याविरोधात ठोस पावले उचलणे, आणि जनतेसह शासकीय यंत्रणेलाही खरे आणि खोटे यामधील फरक समजेल अशी दिशा देणे आवश्यक आहे. कारण खरी पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि तोतया पत्रकार या स्तंभावरचा मोठा धोका! आहे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!