जळगाव (जिमाका) जळगाव येथील जिल्हा कोषागार, कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आपले हयात प्रमाणपत्र १ नोव्हेंबर २०२४ पासून बँकेमार्फत सादर करावे लागणार आहे. जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी याबाबतीत प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यासमोर १० डिसेंबर २०२४ पर्यंत स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.