जळगाव जिल्ह्यात नाफेडच्या वतीने १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरु

0

जळगाव (जिमाका) : जळगावात केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीनची खरेदी सुरु झाली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये जळगाव जिल्ह्यात नाफेडच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी सुरु झालेली आहे. सोयाबीन खरेदीचा कालावधी हा १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी पर्यंत आहे. सोयाबीन शेतमाल विक्रीसाठी आणण्यापुर्वी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर सोयाबीनचे नमुने घेवून जाऊन मॉईश्चर १२% पेक्षा कमी आर्द्रता असलेला सोयाबीनच विक्रीसाठी आणावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरुन माल परत घेवून जावा लागणार नाही. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here