पाचोरा – माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून, ते सालाबादप्रमाणे यावर्षी देखील व्यापारी पेठेत दीपावली शुभेच्छा देत असताना त्यांना यावर्षी व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिलीपभाऊ वाघ यांनी पाचोरा शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या दीपावली शुभेच्छा या विशेष दौऱ्यात महाराणा प्रताप चौक, भडगाव रोड, स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक यांसारख्या ठिकाणी वाघ यांनी भेट दिली. या ठिकाणी व्यापारी वर्गाने जल्लोषात स्वागत करत त्यांना पुढील विषयासाठी विश्वास दिला
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने, दिलीपभाऊ वाघ यांनी सुवर्ण व्यापारी, सोनार, कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, हॉटेल, सुपर मार्केट, दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिक आणि पुस्तक दुकानदारांना भेट दिली. या भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी त्यांच्या भावी नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त करत मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. “दिलीपभाऊ आमचे भविष्यातील आमदार असतील आणि त्यांनी पाचोराच्या व्यापाऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेषतः सुरक्षेसाठी सतत कार्य केले आहे भविष्यातही असेच करावे,” असे अनेकांनी आपल्या शुभेच्छांमधून सांगितले.
दिलीपभाऊ वाघ यांचा दौरा अतिशय गतिमान होता. त्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी शहराच्या उद्योग व व्यवसाय क्षेत्रात आणखी विकास घडवण्याची सोबत भयमुक्त व गुंडगिरी मुक्त मतदार संघ घडवण्याची ग्वाही दिली. “व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहू, पाचोराला औद्योगिक क्षेत्रात व व्यापारक्षेत्रात प्रगतीपथावर नेऊ न युवकांना व नविन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल ,” अशी दिलासा देणारी भावना दिलिपभाऊ वाघ यांनी व्यक्त केली.
यावेळी दिलीपभाऊ वाघ यांचे बंधू संजयनाना वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या प्रचार दौऱ्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यापारी वर्गाने लक्ष्मीपूजनाचा प्रसाद देत वाघ बंधूना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. “दिलीपभाऊ यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, त्यांनीच आमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी व भयमुक्त व गुंडगिरी मुक्त सहकार्य करावे,” अशी भावना व्यापारी वर्गात दिसून आली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.