पाचोरा – मतदारसंघातील सध्याचे राजकारण आणि आमदार किशोर पाटील यांची कृत्रिम प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आकडेवारीसह त्या कृत्रीम प्रतिमेचा भंग करणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी किती मत गमावलीत आणि जनतेची खरी प्रतिक्रिया काय आहे हे स्पष्ट होईल.
२०१९ च्या निवडणुकीतील आकडेवारी
किशोर पाटील यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पाचोरा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ७५,६९९ मतं मिळवून विजयी झाले.( मात्र या विजयात एकूण मतदानाच्या % वारी पैकी फक्त 34% मते त्यांना मिळाली होती & 66% मतदान देखील त्यावेळी विरोधात होते हे विसरून चालणार नाही ) या विजयामध्ये त्यांचा राजकीय अनुभव आणि मतदारसंघातील शिवसैनिकांची एकजूट , निर्मलची दुरदृष्टी असलेली यंत्रणा , स्व .मुकूंदआण्णां सारख्या निधड्या छातीच्या मित्राची साथ महत्त्वाची होती. मात्र, पुढे आलेल्या राजकीय बदलांनी आणि पक्षांतर्गत हालचाली व मित्रांशीच विश्वासघात & उपकाराची परतफेड अपकाराने करण्याची वृत्ती स्वतःला कार्यसम्राट पदवी लावून विकासाचा टेंभा मिरवत असले तरी विकास झाला पण कोणाचा ? या एकच प्रश्नामध्ये विकासाबाबत सर्व काही आले आहे आणि जनता देखील उघड्या डोळ्यांनी पहात आहे विकास नेमका कोणाचा झाला यामुळे यशात व विश्वासात गढूळपणा निर्माण झाला आहे.
गद्दारीनंतरचा परिणाम
जेव्हा आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय अंतर तयार केले, अर्थात गद्दारी केली तेव्हा पाचोरा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली खुद्दार शिवसैनिक पोरका झाला होता एकनिष्ठ शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान असलेले २५,००० मतदार नाराज झाले. हे मतदार गमावणं म्हणजेच त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा आघात झाला. शिवसेनेतील गद्दारीमुळे हा मतदार वर्ग आता दुसऱ्या दिशेने झुकलेला दिसत आहे.
वैशाली सूर्यवंशी यांचा राजकीय प्रवेश
आमदार किशोर पाटील यांची गद्दारीमुळे पोरका झालेला खुद्दार शिवसैनिकांच्या डोक्यावरील हक्काची कार्यालयाचे छत गेले खुद्दार शिवसैनीकांनी 20 वर्षे हक्काचा आमदार देऊन देखील त्यांच्यासाठी शिवसेनेचे हक्काचे कार्यालय नव्हते म्हणून ऐनवेळी प्राथमिक स्वरूपात का असेना नाथ मंदिरात जारगाव येथे खुद्दार शिवसैनिकांची मीटिंग ठरली पुनच्छ शिवसैनिक स्वर्गीय अशोक दत्तू पाटील यांच्या पान टपरी वरून म्हणजेच रोड छाप जुन्या कार्यालयावरून खुद्दार शिवसेनेसाठी तयारी करू लागला अशातच स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या मातोश्री वरील निष्ठेला कायम ठेवत त्यांची कन्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेव खुद्दार शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत खुद्दार शिवसैनिकांना सहारा देत पाचोरा राजकारणात प्रवेश केला, त्यादिवशीच आमदार किशोर पाटील यांच्यावर आणखी एक मोठा धक्का बसला. वैशाली ताईंशी संलग्न असलेल्या निर्मल सीड्सच्या २०,००० कर्मचाऱ्यांसह इतर ५,००० ते ७,००० मतदारही पाटील यांच्या विरोधात उभे राहिले. एकूणच, या घडामोडींमुळे जवळपास २५,००० मतदार त्यांच्यापासून दूर गेले.
गमावलेली एकूण मतं
जर आपण एकूण आकडेवारी पाहिली, तर गद्दारीमुळे २५,००० मतदार आणि वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रवेशानंतर २५,००० असे एकूण ५०,००० मतदार यात अगरबत्ती – मेणबत्ती & निपाणे प्रकरणास न विसरणारे जय भीम समाजातील स्वाभिमानी मतदार सह गुंडगिरीला सहन न करणारा मतदार स्वर्गीय मुकूंदआण्णा बिल्दीकर यांच्या निधनाची पोकळी & कालच्या सभेतील कोरोना संदर्भातील वक्तव्य यांचा तर हिशोबच पकडलेला नाही अशी अनेक मते आमदार किशोर पाटील यांनी गमावले आहेत. हे आकडे त्यांच्या भविष्यातील राजकीय स्थितीवर मोठा परिणाम करणार आहेत.
स्थानिक आणि मोठ्या नेत्यांची नाराजी
गेल्या अडीच वर्षांत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेनेचे कोणतेही मोठे नेते किशोर पाटील यांच्या सोबत १-२ कार्यक्रम सोडले तर पाचोऱ्यात आल्याचं दिसत नाही. ही बाब त्यांच्या राजकीय समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे. पक्षांतर्गत आणि बाहेरील राजकीय नेत्यांचा पाठिंबा गमावल्याने आमदार किशोर पाटील यांची प्रतिमा कमजोर होत चालली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली मनोरंजन
या अडीच वर्षांच्या काळात आमदार किशोर पाटील यांनी लाखो रुपये खर्च करून पाचोरा आणि जवळपासच्या भागात दांडिया, गणपती उत्सव, दहीहंडी, आणि कीर्तन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले. हे सगळे कार्यक्रम केवळ लोकांचे मनोरंजन करण्यासाठीच होते, अशी जनतेची धारणा आहे. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांचा प्रत्यक्ष मतांशी काहीच संबंध नसून, फक्त तेवढाच लोकसमुदाय दाखवून आपल्याला पाठिंबा मिळतोय, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळी आहे.
पक्षप्रवेशाचे ढोंग
किशोर पाटील यांनी आणखी एक युक्ती वापरली, ती म्हणजे कंत्राटदार आणि काही छोटे-मोठे नेते यांना पैसे देऊन त्यांना त्यांच्या पक्षात सामील करून घेतलं. यात 10-15 लोकांचा छोट्या समूहांचा सहभाग असायचा, आणि ते पक्षप्रवेशाचे भव्य आयोजन असल्याचं दाखवलं जायचं. मात्र, या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेले बहुतेक लोक फक्त स्वारस्य दाखवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी उपस्थित असायचे. लोकांमध्ये ही भावना पसरली आहे की या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमधील ९०% लोक फक्त पार्टी आणि मद्यपानासाठी येत होते, त्यांना राजकारणात काहीही रस नव्हता.
सोशल मीडियावरील प्रतिमा निर्मिती
या सगळ्याला सोशल मीडियाची जोड देण्यात आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि विकले गेलेले पत्रकार यांचा वापर करून किशोर पाटील यांची “कार्यसम्राट” आणि “विकासपुरुष” अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की ५०,००० मतदारांमध्ये काहीच बदल झालेला नाही, ते अजूनही नाराज आहेत आणि किशोर पाटील यांच्यापासून दूर गेलेले आहेत.
आमदार किशोर पाटील यांची कृत्रिम वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये असलेली अस्वस्थता हे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी धोकादायक आहे. गमावलेली मतं परत मिळवणं हे त्यांच्या या निवडणुकीसाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.