पाचोरा – विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही महिन्या पासून खाजगी मानधन तत्वावर काही निवडडक आशासेविका आणि अंगणवाडी सेविकां & काही बचत गटाची टिम एका राजकीय पक्षांचे कार्य करण्यासाठी कार्यरत होती परंतु निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील काही शासकीय कर्मचारी, तसेच शासकीय मानधन किंवा पगार घेणाऱ्या आशासेविका आणि अंगणवाडी सेविकां आजही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे त्यांच्यावर योग्य ते पुरावे घेऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी पत्रकार संदीप महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली असून या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. महाजन यांचे म्हणणे आहे की, या शासकीय कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट पक्षाच्या समर्थनासाठी विशेष अधिकारी वर्गाचे आशीर्वाद मिळत आहेत, जे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम करू शकतात
यासाठी अधिकृत 65B प्रमाणपत्रासह ऑडियो, फोटो, आणि व्हिडिओ पुरावे सादर करून निवडणूक आयोगाला योग्य तपासाची विनंती करण्यात येणार आहे. या पुराव्यांच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी पत्रकार महाजन यांच्याकडून केली केली जाणार आहे या संदर्भात, जर कोणाकडे अशा पुराव्यांचे संकलन झालेले असेल, तर त्यांनी संदीप महाजन यांच्याशी 73 8510 8510 या क्रमांकावर संपर्क साधावा पुरावे व योग्य ती माहिती देणाऱ्यास रु 11000 अकरा हजार ते 51000 एक्कावन हजारा पर्यत अपेक्षित असे बक्षीस दिले जाईल ( माहिती पुरवणाऱ्या व्यक्ती व माहिलेचे नांव गुप्त ठेवण्यात येईल असे पत्रकार संदीप महाजन यांच्या तर्फे आवाहन करण्यात आले आहे.ह्या तक्रारीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांचा राजकीय सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.