उमेद अभियानात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन? पत्रकार संदीप महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यास घेतला पुढाकार

0

जळगाव: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (MSRLM) महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने चालना देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जळगावने तालुका अभियान व्यवस्थापकांना एक पत्र पाठविले असून, आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यात उमेद अभियानातील घटकांना राजकीय पक्षांच्या प्रचारात सहभागी न होण्याची सक्त ताकीद दिली आहे.

हेच ते अधिकृत पत्र


आदेशानुसार आदर्श आचार संहितेचे पालन आवश्यक पत्र क्र. MSRLM/RR/129/12024, दि. 17 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रानुसार, विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहेत. यामुळे उमेद अभियानांतर्गत महिलांनी राजकीय प्रचारात सामील होऊ नये आणि सर्व संबंधितांना आचार संहितेच्या पालनाबाबत सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आचार संहितेचे उल्लंघन? तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू तथापि, सध्या CRP (Community Resource Person) पदावर असलेली एक महिला पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर पाटील प्रचार कार्यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. या महिलेची संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप ध्येय न्यूज आणि साप्ताहिक झुंजच्या कार्यालयात प्राप्त झालेली आहे. यासंदर्भात पत्रकार संदीप महाजन यांनी विधीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 65 B प्रमाण पत्रासह निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष उमेद अभियानात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने यासंबंधी त्वरित तपास करून कारवाई करावी, अशी संदीप महाजन यांनी व्यक्त केली आणि यात स्थानीय पातळीवर दखल घेतली जाणार नाही तुम्ही बिनधास्त रहा तुमचे काहीच होणार नाही परंतु निवडणुक काळ असा आहे आणि निवडणुक आयोग एवढे डेंजर आहे की त्यांनी जर दखल घेतली तर राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्लासारख्यांवर थेट दिल्ली येथुन आशीर्वाद जरी होता तरी त्यांच्यावर कारवाई झालीच म्हणून आपण कोणत्या स्तरावर आहोत याची प्रत्येकाने दखल घेऊन अशी इशारा वजा  विनंती पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे
सरकारी योजनांचा राजकीय कारणांसाठी वापर टाळावा सरकारी योजनांचा राजकीय कारणांसाठी वापर होऊ नये, यासाठी आचार संहितेचा कडक अंमल आवश्यक आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून लाभार्थी महिलांनी या आदेशांचे पालन करून कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले असतांना पाचोरा मतदार संघात ही मंडळी कोणाच्या आशीर्वादाने काम करत आहे तसेच प्राप्त माहितीनुसार नगरदेवळा येथील एक महिला याचे नेतृत्व करत असल्याचे कार्यालयात विश्वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे म्हणून मोबाईलची सी डी आर देखील तपासणी करणे महत्त्वाचे आहे असे तक्रारीत पत्रकार संदीप माझ्या यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here