पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय रंगमंचावर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्या नावासमोरील क्रमांक नऊ असून “शिट्टी” हे त्यांचे उमेदवारी चिन्ह आहे. त्यांच्या समर्थकांनी मतदारांना “वाजवा शिट्टी, करा सर्वाची सुट्टी” या घोषणेच्या जोशात मतदान करण्यासाठी आग्रह धरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून
पाचोरा-भडगाव मतदारसंघात वातावरण तापत आहे. विद्यमान आमदारांनी “ पंटर आणि पाटलांमध्ये होता, म्हणून तुला कोरोना झाला” अशी टीका केल्याने स्पेशली पाटील समाजाच्या मतदारांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. यामुळे दिलीपभाऊंना पाठींबा देणाऱ्या समर्थकांनी या विधानाचा निषेध करत एकजुटीने त्यांना पाठिंबा दिला आहे. हे विधान पाटील समाजाच्या स्वाभिमानावर परिणाम करणारे असल्याचे मानून स्थानिक मतदारांनी दिलीपभाऊंच्या प्रचारात एकजुटीने सहभाग घेतला आहे.
दिलीपभाऊ वाघ यांची छबी पाचोरा-भडगाव मतदारसंघात एका लोकनेत्याच्या स्वरूपात आहे. वाघ परिवाराने राजकारणात पदार्पण केल्यापासून मतदारसंघातील असो की बाहेरील सर्वसामान्यांसाठी आवाज उठवला आहे. त्यांची लोकप्रियता केवळ त्यांचा कार्यकर्ता म्हणून घेतलेला अनुभव आणि त्यांची कामगिरीच नव्हे, तर त्यांचे कष्ट आणि प्रामाणिकता यांमुळे आहे. त्यांच्या समर्थकांना दिलीपभाऊंवर विश्वास आहे की ते या मतदारसंघात खरी बदल घडवू शकतात. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले आहे.
प्रचाराच्या सुरुवातीपासूनच दिलीपभाऊंनी गावोगावी प्रचार करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक गावात प्रचार करताना त्यांची ‘शिट्टी’ चिन्हाची प्रतिमा ठळकपणे मांडली जात आहे त्यांच्या समर्थकांनी या प्रतीकेला प्रचंड प्रतिसाद दिला असून, गावागावात ‘शिट्टी’ वाजवून मत मागण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे. याचबरोबर, स्थानिक युवा कार्यकर्ते, महिला, आणि वृद्ध नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. “वाजवा शिट्टी, करा सर्वाची सुट्टी” या घोषणेचा आधार घेऊन कार्यकर्ते दिलीपभाऊंच्या प्रचारात उत्साहाने भाग घेत आहेत.
महिलावर्गाच्या सहभागाने या प्रचाराला आणखी बळ मिळाले आहे. महिला कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह मतदारांना भेटण्यासाठी गावोगावी संपर्क करणे सुरू केले आहे. प्रचारात महिलांचा सहभाग मोठा असण्याचे एक कारण म्हणजे दिलीपभाऊंनी महिला सशक्तीकरणासाठी घेतलेले प्रयत्न. त्यांच्या काळात केलेले महिला बचत गटांचे कार्य, विविध योजनांतर्गत महिलांना दिलेली मदत हे सर्व या महिलांसाठी आदर्श ठरले आहे. यामुळे महिला वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यातच स्वर्गीय आप्पासाहेब ओ ना वाघ यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जुन्या समर्थकांनीही पारंपरिक कर्तव्य म्हणून स्वतःच्या खर्चाने प्रचाराला हातभार लावला आहे. स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत, दिलीपभाऊंनी मतदारसंघात काम करताना प्रामाणिकता आणि निष्ठा जपली आहे. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे. काही समर्थकांनी तर ” धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ” हे ब्रीद वाक्य लक्षात घेत थोडीफार का असेना आर्थिक मदत करून प्रचाराला मदतीचा हात दिला आहे.
सध्याचे राजकीय वातावरण बघता, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात दिलीपभाऊ वाघ यांच्या समर्थकांची एक वेगळीच ऊर्जा दिसून येत आहे. दिलीपभाऊंनी गावोगावी भेटी देऊन, लहान थोरांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. यामुळे मतदारसंघातील स्थानिकांमध्ये त्यांच्या बद्दल विश्वास वाढला आहे. त्यांच्या प्रचारामध्ये स्थानिकांचे वाढते समर्थन पाहता, पाचोरा शहर आणि तालुक्यात “वाजवा शिट्टी, करा सर्वाची सुट्टी” हे घोषणा नुसते घोषवाक्य राहिले नसून, मतदारांमध्ये जोश निर्माण करणारे एक चळवळीचे रूप घेत आहे.
समर्थकांनी गल्लोगल्ली प्रचाराच्या मोहिमा राबवत दिलीपभाऊंच्या विजयी होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार तयारी चालवली आहे. प्रत्येक गल्ली-बोळात ‘शिट्टी’ चिन्हाचे महत्त्व सांगत आणि “शिट्टी” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कटिबद्ध आहेत. प्रचाराचा हा उन्माद आता इतका वाढला आहे की पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे गल्लीबोळ सध्या “वाजवा शिट्टी, करा सर्वाची सुट्टी” या घोषणांनी दणाणून गेले आहे.
तरुण कार्यकर्ते, महिला मंडळे, आणि वृद्ध मतदार दिलीपभाऊंच्या या मोहिमेत सामील झाल्याने हा प्रचार अधिक प्रभावी ठरला आहे. “टायगर अब मैदान में” अशी जोरदार घोषणा करीत दिलीपभाऊ पुन्हा मैदानात उतरले आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.