या विधानसभा निवडणूकीत विकास-विकास-विकास तो सुध्दा तब्बल 3-4 हजार कोटींचा ऐकायला मिळत आहे. परंतु ध्येय न्युजच्या माध्यमातून ऑन व्हिडीओ कॅमेरा जनतेसमोर येण्यासाठी पत्रकार संदीप महाजन यांचे आमदार किशोर पाटील व त्यांच्या तज्ञ टिमला खुले आव्हान आहे. आपण जाहिर केल्याप्रमाणे विकासाचा 3000 कोटी किंवा मुख्यमंत्री यांनी जाहिर केल्याप्रमाणे 4000 कोटीचा जो काही निश्चीत आकडा असेल तो जाहिर केल्याप्रमाणे निश्चीतच या सर्व कामांची सविस्तर माहिती व प्रत्येक कामावर खर्च झालेली आकडेवारी असेलच व याची माहिती मतदारांना मिळणे क्रमप्राप्त आहे.यासाठी कदाचित विकासाची ऐनेवळी पुस्तिका देखिल प्रकाशित करण्याची आपली तयारी असू शकते. परंतु ही कामे व त्या कामांवर खर्च झालेली रक्कम ही जनतेसमोर येईपर्यंत वेळ झालेली असेल. म्हणून दि.15 नोव्हेंबर 2024 सकाळी 7.00 पावेतो या 3-4 हजार कोटी खर्च झालेल्या कामांची सविस्तर माहिती व सदरचे काम पूर्ण झाले असेल तर त्या संदर्भात असलेले फोटो ध्येय न्युजच्या कार्यालयात पाठविणेस विनंती. सोबतच अवघ्या उरलेल्या 10 दिवसाचे असलेले विद्यमान आमदार महोदय यांना वेळ असेल तर त्यांनी स्वत: किंवा त्यांचे अधिकृत अधिकार पत्र घेवून त्यांच्या कोणत्याही एक तज्ञ प्रतिनिधीने ध्येय न्युजच्या स्टुडिओमध्ये सद्यस्थितीत सदरचे झालेले काम कोणत्या स्थितीत आहे. त्यांचे जीपीएसद्वारे काढलेले दिनांक, वेळेसह असलेले व्हिडीओ व फोटोसह थेट लाईव्ह चर्चेसाठी दि.18 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी दुपारी 1.00 वा.उपस्थिती करिता संपादक संदीप महाजन यांचे नम्र आवाहन वजा चॅलेंज करण्यात येत आहे. जेणेकरून जनतेला 3-4 हजार कोटीचा विकास कोणत्या कामावर खर्च झाला किंवा सदरचे काम कागदोपत्री दाखवून कोणाचा विकास झाला आहे आणि आज सद्यस्थितीत त्या कामाची काय परिस्थिती आहे हे सर्व सहज लक्षात येण्यासाठी ध्येय न्युज व साप्ता.झुंजचा हा छोटासा प्रयत्न व थेट चॅलेंज आहे.
हे खुलं चॅलेंज देतांना मला माहीत आहे विद्यमान आमदार यांचा पराभव निश्चित आहे फक्त पराभवात त्यांचा क्रमांक ३ किंवा ४ काय असेल हे बघायचे आहे या पराभवाचा केंद्रबिंदु पत्रकार संदीप महाजन ठरणार आहे हे पण मला माहीत आहे निवडणुकीत किंवा निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर घरावर हल्ला होऊन कदाचित त्यात माझी विक्त व जिवीतहानी सुद्धा होणार आहे मी वेळो – वेळी पोलीस संरक्षण मागितले व मागत आहे परंतु प्रशासन मला ते सत्ताधारी आमदाराच्या दबावाखाली देत नाही म्हणुन माझ्यावर हल्ला झाल्या नंतर प्रथम आरोपी आधी मला संरक्षण न देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना करण्यात यावे तद्नंतर हल्ला करणाऱ्या आरोपींना व त्यांचे गॉडफादर यांना करण्यात यावे कारण कालच्या मुख्यमंत्री महोदयांच्या सभेत स्टेजवर आपण बघितलेच असेल की जे पोलीस प्रशासनाच्या रेकॉर्डवर आजही फरार आरोपी आहेत ते चक्क स्टेजवर होते यावरून लक्षात येते की प्रशासन किती डोळे झाक व भेदभाव करत आहे
स्नेही ,मित्र परिवार , विद्यार्थी , पालक आणि माझ्या नात्यातील व समाजातील माता-पिता , बंधु भगिनी यांना आता हे ठरवण्याची वेळ आली आहे आपणास गुंडशाही अपेक्षीत आहे की ?✨ लोकशाही ⚡आता हिच वेळ आहे मला न्याय देण्याची व योग्य निर्णय घेण्याची तुम्ही ठरवा स्वाभिमाने जगायचे की जे रोज – रोज पार्ट्या झोडून ठेक्यांचे लाभार्थी तुमच्यापर्यंत मत मागण्यासाठी पोहोचत आहेत आज त्यांना ! योग्य जागा दाखवायची ? माझ्या आयुष्यात ज्यांची मी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कामे केली आहे वेळेप्रसंगी सहकार्य केले आहे मदत केली आहे आज मला त्याची परतफेड स्वाभिमानाचे मतदान रूपाने मिळणे अपेक्षित आहे
बस . एवढेच बाकी मला काय सांगायचे ते आपणास समजले असेलच
“समाजहितासाठी लढणारा पत्रकार: खोट्या आरोपांना ठाम उत्तर” – मतदार राजा मला आपल्या दरबारात न्याय हवा आहे
“मी माझ्या जीवनात शिक्षक, पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील ॲकेडमी संचालक म्हणून कार्य केले आहे. व करत आहे हे काम करताना मी नेहमीच समाजहित लक्षात घेतले आणि कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. सत्याची बाजू घेतली, कधी कठोर भूमिका घेतली, पण कधीही स्वार्थापोटी कोणावर अन्याय केला नाही दबाव आणला नाही. याच विचारांनी प्रेरित होऊन आज मी आपल्याला विनंती करतो की, आपले मत विचारपूर्वक द्यावे.कारण आज मी तुमच्या दरबारात मतदान रुपी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे
गेल्या दीड वर्षाच्या काळात बालीका अत्याचार व हत्या गोंडगाव प्रकरण झाल्यानंतर जी बातमी तयार केली त्या प्रकरणी माझ्यावर अनेक खोटे आरोप लावले गेले या आरोपांमध्ये आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिवीगाळ आणि धमक्यांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात शेतकऱ्यांच्या हृदयस्थान असलेल्या भ्रष्टाचारातून ज्यांनी एक रुपया सुद्धा कमवलेला नाही स्व कष्टातून रॉकेलच्या गाडीवरून आज कुठे दिस झाले ? असे विद्यमान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब उर्फ मनोहर गिरधर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर त्यावेळी केलेले आरोप आमदार समर्थक व पदाधिकारी यांच्या कडून मला झालेली अमानुष मारहाण देखील सर्वांना ठाऊक आहे. एवढेच नाही तर त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर अनेक चुकीचे आरोप केले. या सर्व घटनांना उत्तर देताना मी जाहीर आव्हान दिले होते की, जर मी समाजात कोणा व्यक्तीवर अन्याय केला असेल, आर्थिक फसवणूक केली असेल, ब्लॅकमेलिंग केले असेल असे जर सिद्ध केले एक दिवस नव्हे तर तब्बल एक वर्षात सिद्द के तर मी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील मुख्य प्रवेशद्वारावर बसून मुंडन करेल आणि पत्रकारिता व सार्वजनिक जीवन त्यागुन पाचोरा शहरच काय तर जिल्हा राज्य सोडून निघून जाईल असे मी त्यावेळी म्हणजे दीड वर्षांपूर्वी खुले आव्हान दिले होते
मी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यक्तीची फसवणूक किंवा धमकी देऊन फायदा घेतला नाही. कोणाची उधारी सुद्धा बुडवली नाही आणि जे केले ते स्पष्ट आणि उघड केले जो माझ्या रस्त्याचाला त्याला कधीच सोडले नाही परंतु माझ्यावर खोटे आरोप केले मात्र दीड वर्ष झाले अखेर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करण्यात माझ्या विरोधकांना अपयश आले आहे. आजवर मी समाजासमोर स्पष्टपणे काम केले आहे. माझ्या सत्य आणि न्यायाच्या भूमिकेवर माझा ठाम विश्वास आहे.
आपणास व्यक्तीशः विनंती करतो की, माझ्या मागील कार्य आणि सत्याशी असलेली निष्ठा पाहून आपले मतदान विचारपूर्वक करावे.आपल्यासारख्यांनी माझ्यावर केलेल्या विश्वासावर मी आजही खंबीर उभा आहे, आणि आपल्यासारख्या सच्च्या मतदारांचा पाठिंबा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
गेल्या निवडणुकीचा विचार केला तर आपल्या मतदान विभाजनामुळे विद्यमान आमदार किशोर पाटील फक्त 34% मते मिळून विजयी झाले होते त्यावेळी देखील 66% मतदान त्यांच्या विरोधात होते फक्त या 66% मतदारांची विभागणी धर्म ,जात , नाते , व्यक्तीगत संबंध यामुळे झाली त्यामुळेच 34% मतं मिळून आमदार किशोर पाटील या पदी निवडून आले होते
मात्र यावेळी मी म्हणणार नाही की याच उमेदवाराला मतदान करा मात्र जात – पात -धर्म – गट -तट गाव तालुका विसरून विशेषतः आपल्या पर्यंत जरी दिवसा – रात्री % वारीची व खोक्यातील रक्कम आली त्याला बळी न पडता फक्त मतदान करताना सर्व भेदभाव विसरून जो व्यक्ती निवडून येणार असेल अशाच व्यक्तीला मतदान करा आपले मत विभाजन मुळे पाच वर्ष पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका आपणास
% वारी मुक्त , फेकू मुक्त,गुंडगिरी मुक्त , निकृष्ठ कामे मुक्त , गद्दारी मुक्त ,निकृष्ठ पोषण आहार मुक्त मतदार संघ घडवायचा आहे
विनीत
*Dhyeya News & सा. झुंज* *संपादक..✒️ संदीप दा. महाजन, पाचोरा*
*M0. 73 8510 8510*
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.