मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते साडी वाटतांना…… उद्धव गट आक्रमक

0

ठाणे – आज उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे विभागप्रमुख अशोक जाधव यांना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वर नगरात साड्यांचे वाटप करताना रंगेहाथ पकडले आणि शिंदे गटाचे लोक घरोघरी जाऊन लोकांना साड्यांचे वाटप करत असल्याचा आरोप केला. पैसे वाटप करत असल्याची तक्रार उद्धव गटाचे कार्यकर्ते करत होते, त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना साड्या वाटप करताना पकडले आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. विशेष म्हणजे उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत हा सर्व प्रकार अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
        वृत्त लिहेपर्यंत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई झाली नसून, नियमांची पायमल्ली करणाऱ्या शिंदे गटाच्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. का फक्त निवडणूक अधिकारी बघ्याची भुमिका बजावणार आहेत……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here