पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

0

भडगाव – तालुक्यातील गोंडगाव घेथे दि.२९ जुले २०२३ रोजी एक बालिका बेपत्ता झाली होती. सदरच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करून आल्याची घटना दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आली. गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल पाटील यास अटक करण्यात आली. सदर आरोपीस कडक शासन व्हावे यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व अँड. उज्वल निकम यांची सरकार पक्षातर्फे नियुक्ती होणेसाठी दि.०४ ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय, सर्व धार्मिय मुक मोर्चा भडगाव तहसिल कार्यालयावर काढण्यात आला.  मुक मोर्चाच्या मागणीबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने पत्रकार संदीप महाजन यांनी याबाबत बातमी प्रसारीत केली. सदरच्या बातमीच्या शिर्षकामध्ये मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या शब्दाचा राग येवून आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना त्याच रात्री अश्लिल शिवीगाळ केली सदरचे रेकॉडींग निश्चीतपणे माझेच आहे अशी पुष्टी देखिल दिली.   तक्रार केली. दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी पत्रकार संदीप महाजन एका आंदोलनाची बातमी घेवून घराकडे परतत असतांना पाचोरा नगरपालिकेसमोर पत्रकार महाजन यांच्या वडीलांच्या नावाने असलेला कै स्वातंत्र्य सैनिक आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन
या चौकात दुपारी १.०० च्या सुमारास त्यांच्या तोंडावर रूमाल टाकून गाडीवरून खाली पाडले. व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसारण व त्यांचे वेळोवेळी लोकेशन देण्याचे काम अजय जैसस्वाल कुरंगी यांनी आपल्या वॉटस ॲप ग्रुपवर केले. सदरची मारहाणीची तक्रार व पत्रकार संरक्षण कायद्याअन्वये पाचोरा पोलिस प्रशासनाने दखलपात्र न नोंदविता साधी एन.सी. नोंदवून संबंधित मारेकऱ्यांना कलम १०७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करून सोडून दिले. त्यावेळी तात्कालिन विशेष बाब म्हणजे यातील आरोपी शरद युवराज पाटील व सुमित रविंद्र सावंत यांच्या विरुध्द जळगाव जिल्हा सत्रन्यायालयाचे व पाचोरा न्यायालयाचे पूर्वी असलेल्या गुन्ह्यातील वेळोवेळी दरमहा NBW चे वॉरंट प्रलंबित होते. अखेर संदीप महाजन यांनी पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याने औरंगाबाद खंडपिठात क्रिमीनल रिटपिटीशन नं. १४ २२/२३ हे दाखल करून १) संदीप महाजन यांना संरक्षण मिळावे २) आरोपी विरुद गुन्हा दाखल करण्यात यावा ३) आरोपी विरूध्द विशिष्ट कालावधीत तपास करण्याचे आदेशासाठी पिटीशन दाखल केले त्यावर में. औरंगाबाद खंडपिठाने महाजन यांच्या अर्जावर क्र.१ व ३ दाखल करून नंबर २ मध्ये नमुद केल्याप्रमाणे १५६(३) प्रमाणे कनिष्ठ कोर्टात संधी उपलब्ध आहे असे नमुद केले. आणि इतर मागण्यांबाबत सर्व संबंधितांना नोटीस काढण्यात आली. सदरचा खटला आजही मे. औरंगाबाद सांडपिठात प्रलंबित आहे. मे. उच्ब न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा न्यायालयात भारतीय दंड संहिता कलम १५६/३ नुसार अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज पाचोरा न्यायालयात नामंजुर झाल्यानंतर श्री. महाजन यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अपील अर्ज दाखल केला. सदरचा अपिल अर्ज Cri.Rev.App./31/2024 क्रमांकाने दाखल होवून कामकाज जळगाव जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश श्री. आर.एस. पवार यांच्या समोर चालले. दोघं पक्षांची बाजू ऐकल्यानंतर त्याचा निकाल दि. 15 नोव्हेंबर २०२४ रोजी देण्यात आला. यात विद्यमान आमदार किशोर धनसिंग पाटील, अजयकुमार देविदास जैस्वाल (कुरंगी), शरद युवराज पाटील, शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुमित रविंद्र सावंत, चरणसिंग प्रेमसिंग पाटील (वडगाव सतीचे ता. भडगाव) यांच्या विरुद्ध पत्रकार संदीप महाजन यांचा १५६/३ अन्वये अर्ज मंजुर करण्यात आला. व भारतीय दंड संहिता कलम ३२३,५०४,५०६,१२० (४) व ३४ प्रमाणे प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमतेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश करण्यात आले, अर्जदार संदीप महाजन यांच्यातर्फे ॲड परेश आर. पाटील   ( Mo.8625034444 ) तरआमदार किशोर पाटील सह इतरांतर्फे ॲड सागर एस. चित्रे (जळगाव), ॲड दिपक व्ही. पाटील (पाचोरा),  ॲड नोमन एस. पठाण,  ॲड श्रीमती, वैशाली एस. महाजन यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here