3 हजार कोटी कामासंदर्भात ठेकेदारांचे व लाभार्थींचे कार्यसम्राटआमदार किशोर पाटील यांनी खुले आव्हान स्विकारलेच नाही

0

पाचोरा – भडगाव  विधानसभा निवडणूकीत विकास-विकास-विकास तो सुध्दा तब्बल 3-4 हजार कोटींचा ऐकायला मिळत होता. त्यामुळे एकतर 3 हजार किंवा 4 हजार कोटी कशाला म्हणतात हे माहित नसावे व तेवढा विकास मतदार संघात झालेलाच नव्हता किंबहुना झाला असेल तर तो फक्त कागदोपत्री म्हणून दुध का दुध.. पाणी का पाणी होण्यासाठी व ध्येय न्युजच्या माध्यमातून ऑन व्हिडीओ कॅमेरा जनतेसमोर येण्यासाठी पत्रकार संदीप महाजन यांनी आमदार किशोर पाटील व त्यांच्या तज्ञ टिमला खुले आव्हान होते. आमदार किशोर पाटील हे निवडणूक लागण्याआधी व लागल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीत 3000 कोटीचा विकास केल्याचे सांगत आहेत. किंबहुना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तर 4000 कोटीचा आकडा जाहिर केला त्यावर सारवासारव करीत आमदार किशोर पाटील यांनी 1 हजार कोटीचे कामे मंजुर असल्याचे सांगितले. जो काही निश्‍चीत आकडा असेल तो जाहिर केल्याप्रमाणे निश्‍चीतच या सर्व कामांची सविस्तर माहिती व प्रत्येक कामावर खर्च झालेली आकडेवारी असेलच व याची माहिती मतदारांना मिळणे क्रमप्राप्त आहे.यासाठी कदाचित विकासाची ऐनेवळी पुस्तिका देखिल प्रकाशित करण्याची आपली तयारी असू शकते. अर्थात खरोखर तेवढा विकास झाला असेल आणि प्रत्यक्षात तो दिसत असेल तर ते विकासाची पुस्तिका प्रकाशित करून जाहिर करू शकतात. जेणेकरून ज्या ठिकाणी कामे झाले आहेत ती प्रत्यक्षात जागेवर आहेेत की नाही असेल तर नेमकी ते किती लाख व कोटीची दिसत आहे हे जनतेसमोर येण्यासाठी दि.15 नोव्हेंबर 2024 सकाळी 7.00 पावेतो या 3-4 हजार कोटी खर्च झालेल्या कामांची सविस्तर माहिती व सदरचे काम पूर्ण झाले असेल तर त्या संदर्भात असलेले फोटो ध्येय न्युजच्या कार्यालयात पाठविणेस विनंती केली होती. सोबतच अवघ्या उरलेल्या 10 दिवसाचे असलेले विद्यमान आमदार महोदय यांना वेळ असेल तर त्यांनी स्वत: किंवा त्यांचे अधिकृत अधिकार पत्र घेवून त्यांच्या कोणत्याही एक तज्ञ प्रतिनिधीने ध्येय न्युजच्या स्टुडिओमध्ये सद्यस्थितीत सदरचे झालेले काम कोणत्या स्थितीत आहे. त्यांचे जीपीएसद्वारे काढलेले दिनांक, वेळेसह असलेले व्हिडीओ व फोटोसह थेट लाईव्ह चर्चेसाठी दि.18 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी दुपारी 1.00 वा.उपस्थिती करिता संपादक संदीप महाजन यांचे नम्र आवाहन वजा चॅलेंज करण्यात दिले होते. जेणेकरून जनतेला 3-4 हजार कोटीचा विकास कोणत्या कामावर खर्च झाला किंवा सदरचे काम कागदोपत्री दाखवून कोणाचा विकास झाला आहे आणि आज सद्यस्थितीत त्या कामाची काय परिस्थिती आहे हे सर्व सहज लक्षात येण्यासाठी ध्येय न्युज व साप्ता.झुंजचा हा छोटासा प्रयत्न होता.
हे खुलं चॅलेंज देतांना स्व.स्वातंत्र्य सैनिक आण्णासाहेब सुपडू भादू पाटील, स्व.बापुसाहेब के.एम.पाटील, स्व.आप्पासाहेब ओं.ना.वाघ, पारोळा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार स्व.भास्करआप्पा पाटील, काकासाहेब वसंत मोरे, सतिषआण्णा पाटील, चिमणआबा पाटील यांच्यासारख्या राजकीय क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींचा स्पर्श या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या पावनभुमिला झालेला आहे. म्हणून या शांतताप्रिय अनुभवी असलेल्या मतदारसंघातील जनतेला राजकारण कोणत्या स्तरावर जावू शकत याचा परिपूर्ण अनुभव आहे. परंतु गुन्हेगारी,अवैध व्यवसाय आणि गुंडगिरी, दहशत हे मान्य नाहीत किंबहुना त्यांनी अनुभवले देखिल नाही. या राजकीय मान्यवरांचे राजकीय आखाड्यातील वाद-विवाद कोणत्याही स्तरावर असले तरी किंवा होते परंतु आमदार किशोर पाटील यांच्या अर्थात सध्याच्या कार्यकाळात जी मतदारसंघात गुन्हेगारी,अवैध व्यवसाय आणि गुंडगिरी, दहशत बघितली किंबहुना काहींनी अनुभवली देखिल आहे. त्यामुळे साप्ता.झुंजचे संपादक संदीप महाजन यांना परिपूर्ण माहीत होते विद्यमान आमदार यांचा पराभव निश्चित आहे फक्त पराभवात त्यांचा क्रमांक 3 किंवा 4 काय असेल हे निकालात बघायचे आहे मात्र या पराभवाचा केंद्रबिंदु पत्रकार संदीप महाजन ठरणार आहे हे निश्‍चीत. यासाठी पूर्वसुचना म्हणून निवडणुकीत किंवा निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्यावर म्हणजेच संदीप महाजन यांच्यावर किंवा माझ्या परिवारावर घरावर हल्ला होऊन कदाचित त्यात वित्त व जिवीतहानी सुद्धा होणार आहे मी वेळो – वेळी पोलीस संरक्षण मागितले व मागितले देखिल आहे. परंतु प्रशासन मला ते सत्ताधारी आमदाराच्या दबावाखाली देत नाही म्हणुन माझ्यावर हल्ला झाल्या नंतर प्रथम आरोपी आधी मला संरक्षण न देणार्‍या जबाबदार अधिकार्‍यांना करण्यात यावे तद्नंतर हल्ला करणार्‍या आरोपींना व त्यांचे गॉडफादर यांना करण्यात यावे असे पत्र देवून पूर्वसुचित केले आहे.
स्नेही ,मित्र परिवार , विद्यार्थी , पालक आणि माझ्या नात्यातील व समाजातील माता-पिता , बंधु भगिनी यांना आता हे ठरवण्याची वेळ आली आहे लोकशाहीत आता हिच वेळ आहे मला न्याय देण्याची व मतदानाद्वारे योग्य निर्णय घेण्याची तुम्ही ठरवा स्वाभिमाने जगायचे की जे रोज-रोज पार्ट्या झोडून ठेक्यांचे लाभार्थी तुमच्यापर्यंत मत मागण्यासाठी खोक्यातून लाखो-हजारो रूपये घेवून पोहोचत आहेत व पोहचतील देखिल परंतू त्यांना ! योग्य जागा दाखवायची ? माझ्या आयुष्यात ज्यांची मी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कामे केली आहे वेळेप्रसंगी सहकार्य केले आहे मदत केली आहे आज मला त्याची परतफेड स्वाभिमानाचे मतदान रूपाने मिळणे अपेक्षित आहे
बस . एवढेच बाकी मला काय सांगायचे ते आपणास समजले असेलच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here