मतदार राजा मला आपल्या दरबारात न्याय हवा आहे

0

मी संदीप महाजन माझ्या जीवनात शिक्षक, पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील अ‍ॅकेडमी संचालक म्हणून कार्य केले आहे. व करत आहे हे काम करताना मी नेहमीच समाजहित लक्षात घेतले आणि कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. सत्याची बाजू घेतली, कधी कठोर भूमिका घेतली, पण कधीही स्वार्थापोटी कोणावर अन्याय केला नाही दबाव आणला नाही. याच विचारांनी प्रेरित होऊन आज मी आपल्याला विनंती करतो की, आपले मत विचारपूर्वक द्यावे.कारण आज मी तुमच्या दरबारात मतदान रुपी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे
गेल्या दीड वर्षाच्या काळात बालीका अत्याचार व हत्या गोंडगाव प्रकरण झाल्यानंतर जी बातमी तयार केली त्या प्रकरणी माझ्यावर अनेक खोटे आरोप लावले गेले या आरोपांमध्ये आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिवीगाळ आणि धमक्यांचा उल्लेख आहे. ही क्लिप मतदारसंघातील सर्व घरा-घरात ऐकली आहेच. त्याचबरोबर त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात शेतकर्‍यांच्या हृदयस्थान असलेल्या भ्रष्टाचारातून ज्यांनी एक रुपया सुद्धा कमवलेला नाही स्व कष्टातून रॉकेलच्या गाडीवरून आज कुठे दिस झाले ? असे विद्यमान शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब उर्फ मनोहर गिरधर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी माझ्यावर त्यावेळी जे केलेले आरोप आमदार समर्थक व पदाधिकारी यांच्या कडून मला झालेली अमानुष मारहाण देखील सर्वांना ठाऊक आहे. एवढेच नाही तर त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर अनेक चुकीचे आरोप केले. या सर्व घटनांना उत्तर देताना मी जाहीर आव्हान दिले होते की, जर मी समाजात कोणा व्यक्तीवर अन्याय केला असेल, आर्थिक फसवणूक केली असेल, ब्लॅकमेलिंग केले असेल किंवा कोणाची उधारी बुडवली असेल असे एक उदाहरण जरी एक दिवस नव्हे तर तब्बल एक वर्षात सिद्ध केले तर मी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील मुख्य प्रवेशद्वारावर बसून मुंडन करेल आणि पत्रकारिता व सार्वजनिक जीवन त्यागुन पाचोरा शहरच काय तर जिल्हा राज्य सोडून निघून जाईल असे मी त्यावेळी म्हणजे दीड वर्षांपूर्वी खुले आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान भगवान शंकराच्या पिंडेवर हात ठेवून शपथ घेणारे लाभार्थी रावसाहेब मनोहर गिरधर पाटील किंवा त्यांच्या आजुबाजुला असलेले लाभार्थी दिड वर्षात सिध्द करू शकले नाही.
कारण कोणत्याही व्यक्तीची फसवणूक किंवा धमकी देऊन स्वत: फायदा घेतला नाही. कोणाची उधारी सुद्धा बुडवली नाही आणि जे केले ते स्पष्ट आणि उघड केले माझ्या आयुष्याची संपूर्ण पाने उघड आहेत म्हणून अनेकांनी फाईली तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या फाईलीत एक पान देखिल लावू शकले नाही. मात्र एवढे निश्‍चीत जो माझ्या रस्त्यात आता त्याला लोकशाही मार्गाने कधीच सोडले नाही परंतु माझ्यावर खोटे आरोप केले मात्र दीड वर्ष झाले अखेर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करण्यात माझ्या विरोधकांना अपयश आले आहे. आजवर मी समाजासमोर स्पष्टपणे काम केले आहे. माझ्या सत्य आणि न्यायाच्या भूमिकेवर माझा ठाम विश्वास आहे व होता म्हणूनच जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात मला मारहाण प्रकरणी न्याय मिळाला. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील मतदारांना व्यक्तीशः विनंती करतो की, माझ्या मागील कार्य आणि सत्याशी असलेली निष्ठा पाहून आपले मतदान विचारपूर्वक करावे.आपल्यासारख्यांनी माझ्यावर केलेल्या विश्वासावर मी आजही खंबीर उभा आहे, आणि आपल्यासारख्या सच्च्या मतदारांचा पाठिंबा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.लक्षात असूद्या गेल्या निवडणुकीचा विचार केला तर आपल्या मतदान विभाजनामुळे विद्यमान आमदार किशोर पाटील फक्त 34% मते मिळून विजयी झाले होते त्यावेळी देखील 66% मतदान त्यांच्या विरोधात होते फक्त या 66% मतदारांची विभागणी धर्म ,जात , नाते , व्यक्तीगत संबंध यामुळे झाली त्यामुळेच 34% मतं मिळून आमदार किशोर पाटील या पदी निवडून आले होते
मात्र यावेळी मी म्हणणार नाही की याच उमेदवाराला मतदान करा मात्र जात – पात -धर्म – गट -तट गाव तालुका विसरून विशेषतः आपल्या पर्यंत जरी दिवसा – रात्री % वारीची व खोक्यातील रक्कम आली त्याला बळी न पडता फक्त मतदान करताना सर्व भेदभाव विसरून जो व्यक्ती निवडून येणार असेल अशाच व्यक्तीला मतदान करा आपले मत विभाजन मुळे पाच वर्ष पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका आपणास % वारी मुक्त , फेकू मुक्त,गुंडगिरी मुक्त , निकृष्ठ कामे मुक्त , गद्दारी मुक्त ,निकृष्ठ पोषण आहार मुक्त मतदार संघ घडवायचा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here