सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मोफत डायलेसिस सेवेला एक वर्ष पूर्ण: दुसऱ्या वर्षात पदार्पण

0

पाचोरा – शहरातील सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत डायलेसिस सेवा सुरू केल्यापासून गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी या सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून दुसऱ्या वर्षात प्रवेश करताना रुग्णालयाने आपला प्रवास अभिमानाने साजरा केला आहे.
रुग्णांसाठी समर्पित सेवा



पाचोरा येथील डॉ स्वप्नील प्रल्हाद पाटील व डॉ ग्रिष्मा स्वप्नील पाटील संचलित सिद्धीविनायक हॉस्पिटलने मागील वर्षभरात अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डायलेसिससाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोफत उपचार मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही सेवा सुरू करण्यात आली होती. पाचोरा शहराबरोबरच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
डॉ. स्वप्नील प्रल्हादराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील हॉस्पिटलने रुग्णसेवा क्षेत्रात एक आदर्श उभा केला आहे. एम.बी.बी.एस. एम.डी. (मेडिसिन) गोल्ड मेडलिस्ट, सायन हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे क्रिटीकल केअर स्पेशालिस्ट म्हणून काम केलेल्या डॉ. पाटील यांनी रुग्णसेवेचा वसा पुढे नेत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्रेम, विश्वास आणि पुढील वाटचाल
मोफत डायलेसिस सेवा सुरू करण्याचा उपक्रम म्हणजे रुग्णांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न होता, जो अत्यंत यशस्वी ठरला आहे. रुग्णांच्या उदंड प्रतिसादामुळे हॉस्पिटलचे संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना पुढील प्रवासासाठी नवी उभारी मिळाली आहे. आपल्या शुभेच्छांचे पाठबळ आमच्या सोबत राहिल्यास, आम्ही अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे.
सिद्धीविनायक हॉस्पिटलने गरजूंना दिलेले सहकार्य आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्व रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांचे आभार मानले आहेत. “आपल्या विश्वासामुळेच आम्हाला ही सेवा सुरू ठेवण्याचे बळ मिळाले आहे. आपला प्रेमाचा आशीर्वाद असाच राहो,” अशी भावना हॉस्पिटल प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दुसऱ्या वर्षातील संकल्प
दुसऱ्या वर्षात या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मानस हॉस्पिटलने व्यक्त केला आहे. भविष्यात अधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, तसेच प्रशिक्षित स्टाफ यांच्या मदतीने सेवांची व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
संपर्कासाठी माहिती
मोफत डायलेसिस सुविधेचा लाभ घेण्यासाठी संपर्क –
सिद्धीविनायक हॉस्पिटल
मयूर सोनवणे: 9923288720
पत्ता:
पहिला मजला, एस. एस. पाटील कन्स्ट्रक्शन ऑफिस, गजानन पेट्रोल पंप समोर, महाराणा प्रताप चौक, पाचोरा.
हॉस्पिटलने सेवा विस्ताराबाबत दिलेली ग्वाही आणि योजनेची यशोगाथा हे सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. “रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा,” या ध्येयाने प्रेरित असलेल्या सिद्धीविनायक हॉस्पिटलला त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here