महिला दिन म्हणजे केवळ औपचारिक साजरा करण्याचा दिवस नव्हे, तर खऱ्या अर्थाने समाजासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आज अनेक ठिकाणी महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा गौरव करताना त्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील रणरागिणी पोलीस कॉन्स्टेबल भावसार ताईंच्या कार्याची नोंद घेणे गरजेचे वाटते. त्यांचा सन्मान करणे हे केवळ एक औपचारिक कृत्य नसून, खऱ्या स्त्रीशक्तीला दाद देण्याचा एक प्रयत्न ठरला असता. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे काही महिन्यांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला. दोन निष्पाप व्यक्तीनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अर्थात अपघात होऊन दोन मृत्यु झाले या अपघातानंतर स्थानिक गावकरी आणि पंचक्रोशीतील लोक एवढे संतप्त होते. अर्थात गावकरीच काय ? तो अपघात बघीतल्या नंतर कोणीही व्यक्ती असो त्याने संतप्त होणे सहाजिकच होते आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की, अपघात घडवणाऱ्या वाहनासह त्यातील चालक आणि इतर व्यक्तींवर रोष निघाला असता या संतप्त जमावाने वाहनासह अपघात करणारा चालक आणि गाडीतील प्रवाशांना ठार मारण्याचा किंवा जाळून टाकण्याचा निर्णय घेण्याची परिस्थीती होती संपूर्ण परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती परंतु परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाण्याआधी जळगावहून शासकीय काम आटोपून परतणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शारदा भावसार ताई घटनास्थळी सुदैवाने पोहचल्या. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत, कोणत्याही अतिरिक्त पोलिसी मदतीशिवाय, त्यांनी जमावात जाण्याचे धैर्य दाखवले.
या संपूर्ण घटनेत भावसार ताईंनी दाखवलेली धैर्यशीलता, संयम आणि कर्तव्यदक्षता हा खऱ्या स्त्रीशक्तीचा आदर्श नमुना आहे.
अपघातानंतर जमाव इतका संतप्त झाला होता की, कोणत्याही क्षणी हिंसाचार उसळू शकला असता. लोकांच्या रोषाचा परिणाम असा झाला असता की जमावाच्या हातुन अनर्थ घडला असता नंतर निर्दोष लोकही त्यात गोवले गेले असते.
भरतीसाठी प्रयत्न करणारे युवक, नोकरीच्या शोधात असणारे काही तरुण, आणि निष्पाप गावकरीही या प्रकरणात अडकले असते गुन्हे दाखल झाले असते परंतु शारदा भावसार ताईंनी परिस्थितीचे भान ठेवत, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेतली. पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्याआधीच, सौ भावसार ताईंनी जमावाशी शांततापूर्ण संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.
ज्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळेच समाजातील कायदा व सुव्यवस्था राखली जाते.त्यापैकी भावसार ताईंसारख्या महिलांमुळे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची खरी ताकद लक्षात येते. त्यांनी त्यावेळी जमावासमोर कोणाची बहीण – कोणाची आई म्हणून धैर्याने उभे राहून परिस्थिती हाताळली.
त्यांनी केवळ पोलिसी दबाव न वापरता, लोकांना समजूत घालून कायदा सुव्यवस्थेचे पालन करायला भाग पाडले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, एका मोठ्या हिंसाचाराला त्यांनी स्वतःच्या संयमाने आळा घातला. हे कोणीही विसरणार नाही
महिला दिनानिमित्त मोठमोठे सत्कार समारंभ झाले विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला गेला. मात्र, प्रत्यक्ष संकटाच्या वेळी समाजाचे संरक्षण करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या अशा महिलांचा गौरव होतो का?
जर खऱ्या अर्थाने समाजासाठी धैर्याने उभ्या राहणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा, असे वाटत असेल, तर रणरागिणी पोलीस कॉन्स्टेबल शारदा भावसार यांचा सत्कार करण्यास अधिक महत्त्व दिले पाहिजे.
परंपरागत दृष्टीकोनानुसार, महिलांचे कार्य फक्त घर, कुटुंब आणि सामाजिक कार्यापुरतेच मर्यादित मानले जाते. पण भावसार ताईंनी दाखवून दिले की, महिलांनी सामाजिक संरक्षणाची जबाबदारीही सक्षमतेने पार पाडता येते.
स्त्रिया फक्त संस्कृतीचा वारसा चालवणाऱ्या नाहीत, तर समाजाच्या सुरक्षेच्या रक्षणकर्त्याही आहेत.
पोलीस दलातील महिला अधिकारीही संकटाच्या वेळी मागे हटत नाहीत, तर परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात.
महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ नोकऱ्या मिळवणे नव्हे, तर समाजरक्षणात सक्रिय सहभाग घेणे आहे.
पाचोरा आणि परिसरातील नागरिकांनी तरी महिलांच्या कार्याचा गौरव करताना, अशा भावसार ताई सारख्या रणरागिणींच्या कार्याची दखल घेतली पाहिजे.
काही पोलीस कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेत नाहीत, पण भावसार ताईंसारख्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पोलीस दलावर लोकांचा विश्वास कायम राहतो.
जर समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात असे धाडस दाखवले, तर कायद्याचे उल्लंघन होण्याआधीच अराजकता थांबवता येईल.
महिलांनी फक्त कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी योगदान द्यावे, याची प्रेरणा अशा घटनांमधून मिळते.
महिला दिन हा सामाजिक बदल, सशक्तीकरण आणि खऱ्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी असतो.
केवळ औपचारिक सत्कार सोहळे आयोजित करण्यापेक्षा, अशा कर्तव्यदक्ष महिलांना खरोखर योग्य सन्मान मिळायला हवा.
सरकार, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी रणरागिणी महिलांच्या कार्याला योग्य तो न्याय द्यावा.
भावसार ताईंनी दाखवलेली हिमंत, संयम आणि जबाबदारी याचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येकाने महिलांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे.
आज आपण समाजात अनेक व्यक्तींचा सत्कार करतो, पण खऱ्या धैर्यवान आणि कर्तव्यदक्ष महिलांचा गौरव करण्यास मागे का राहतो?
पोलीस कॉन्स्टेबल भावसार यांनी दाखवलेली साहस, धैर्य, संयम आणि समाजहितासाठी घेतलेले निर्णय यामुळे त्यांचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान होणे आवश्यकच होता
अशा महिलांचा गौरव फक्त त्यांच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळावी म्हणूनही करायला हवा.
“सत्कार केवळ परंपरागत गोष्टींसाठी अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो खऱ्या धैर्यासाठी आणि समाजरक्षणासाठीही असावा!”
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.