बांबरुड महादेव येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न – धर्माआबा राजपूत यांची सामाजिक जाणिवेची प्रेरणादायी घोषणा – गावाचा & आमदार किशोरआप्पा यांचा अभिमान वाढवणारे व्यक्तिमत्त्व

0

पाचोरा – तालुक्यातील पवित्र बांबरुड महादेव मंदिर प्रांगणात तब्बल 24 वर्षा पासुन अखंड सुरू असलेला हा कार्यक्रम यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला. अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरलेला हा कार्यक्रम केवळ धार्मिक उत्सव न राहता, एक सामाजिक चळवळ बनत चालल्याचे चित्र यंदा विशेष ठळकपणे दिसून आले.
सप्ताहाच्या उद्घाटनापासून समारोपा पर्यंत प्रत्येक दिवशी अध्यात्मिक उत्साह व भक्तिभाव वातावरणात अनुभवायला मिळाला. भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन यांमधून गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक एकवटले.
सप्ताहात सहभागी कीर्तनकारांनी फक्त धार्मिक गोष्टी सांगून थांबले नाहीत, तर सामाजिक विषमता, कन्यादानाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, नारीशक्तीचा सन्मान यासारखे महत्त्वाचे विषय आपल्या

कीर्तनातून प्रभावीपणे मांडले.
‘नातं देवाशी जोडलं की माणूस माणसाशी जोडतो’ – सरजेराव महाराज विसरणेकर
‘स्त्री ही शक्ती आहे, तिला शिक्षण, सन्मान व स्वावलंबन मिळालं पाहिजे’ – विकास महाराज मोरफडकर
‘दान हे देण्याच्या भावनेत असावे, प्रसिद्धीच्या हव्यासात नव्हे’ – विशाल महाराज बोरनार
‘मृत्यूनंतरही आपण इतरांसाठी उपयोगी ठरतो, हेच खरं जीवनमूल्य’ – योगेश महाराज चिंचोलीकर
हा कार्यक्रम मनाच्या तारा छेडणारा असल्याची जाणीव झाली त्यामुळे
कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही भाविकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना
भाऊसाहेब पाटील बांबरुड यांनी सांगीतले “दरवर्षी येतो, पण यंदाचा सप्ताह अधिक भावस्पर्शी झाला. धर्माआबा यांची घोषणा ऐकून डोळे पाणावले.”
बांबरुडगावाचे सरपंच मंदाकिनी पाटील “अशा कीर्तनातून केवळ भक्ती नव्हे, तर शिकण्यासारखे खूप काही मिळते.”
“धर्माच्या नावाने एकत्र येणाऱ्या लोकांनी समाजासाठी एकत्र काम करावे, हेच खरे धर्म.”असे सांगितले
तसेच मागील वर्षाचे थंडीचे मानकरी धर्माआबा राजपूत – पद्माई कन्स्ट्रक्शनचे संस्थापक, सामाजिक जाणिवेने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, आमदार किशोरआप्पा यांचे निकटवर्तीय. त्यांचा साधेपणा, कार्यकुशलता आणि समाजाबद्दलची आंतरिक बांधिलकी यामुळे त्यांचं नाव सर्वसामान्यांच्या मनात आदराने घेतलं जातं.
त्यांनी आपल्या वडील पिताश्री स्व. धर्मसिंग हरसिंग राजपूत आणि मातोश्री गं.भा.हिरकोरआई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक मदतीचा अभिनव उपक्रम जाहीर केला. त्यांनी गरजू मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपयांची मदत देण्याची आणि गरीब कुटुंबातील अंत्यविधी खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेण्याची घोषणा करताच, परिसरात एक आदर्श निर्माण झाला.
“ही केवळ आर्थिक मदत नाही, ही आमच्या संस्कृतीची जबाबदारी आहे. आपण समाजाने दिलेले परत द्यावे लागते – त्याच भावनेतून ही मदत सुरू केली आहे. हे कार्य मी माझ्या मातापित्यांच्या स्मरणार्थ करतो.” असेही धर्माआबा यांनी सांगितले
गावकरी, कार्यक्रमाचे संयोजक आणि भाविक यांच्यात एकच भावना ठळक दिसून आली – ‘धर्माआबा यांच्यासारखा माणूस आमच्या गावात आहे, ही आमची ताकद आहे.’ याच कार्यक्रमामुळे धर्माआबा राजपूत यांचे नाव फक्त एका यशस्वी उद्योजकाचे नाही, तर समाजासाठी समर्पित व्यक्तीमत्त्व म्हणून उजळून आले आहे. त्यांच्या कार्याने आमदार किशोरआप्पा यांचे नेतृत्व अधिक सशक्त झाले असून, अशा सहकार्यांच्या माध्यमातूनच गावात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांनी एकमुखाने असे कार्यक्रम दरवर्षी वाढत्या प्रमाणात आयोजित करावेत, सामाजिक उपक्रमांची व्याप्ती वाढावी आणि गावाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करावे, असे मत धर्मा आबा यांनी व्यक्त केले.
बांबरुड महादेव येथे पार पडलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अध्यात्म, समाजसेवा आणि एकतेचे प्रतीक ठरला. धर्माआबा राजपूत यांची समाजाभिमुख घोषणा ही या कार्यक्रमाची आत्मा ठरली. यामुळे गावाचा गौरव वाढला, आमदार किशोरआप्पा यांचे सामाजिक भान अधोरेखित झाले आणि संपूर्ण पंचक्रोशीत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here