पाचोरा- तातुक्यात भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी आता पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. पाचोरा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, तसेच प्रशासनातील बेजबाबदार आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात ठाम उभे राहत, पाचोरा तालुक्यातील पत्रकारांनी एका व्यापक जनआंदोलनाचा निर्धार केला आहे.
सद्यस्थितीत पाचोरा पोलीस स्टेशन आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध स्वरूपाचे अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. हे व्यवसाय केवळ कायद्याला


हरताळ फासणारे नसून, समाजाच्या नैतिक आणि आर्थिक अधःपतनाचे मूळ कारण बनत आहेत. अशा स्थितीत या अवैध व्यवसायांविरोधात समाजात जागरूकता निर्माण करणे, प्रशासनावर दबाव टाकणे आणि नागरिकांना या व्यवस्थेविरोधात एकत्र करणे, ही काळाची गरज बनली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा सर्रास व्यापार सुरू आहे. स्थानिक किराणा दुकानदारांपासून थेट घाऊक विक्रेत्यांपर्यंत गुटखा सहज मिळत असून, पोलीस आणि अन्न सुरक्षा विभाग यांचे कथित ‘मूकसंमती’मुळे हा व्यवसाय भरभराटीला जात आहे.
पाचोरा शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी गुप्त मार्गाने देशी व विदेशी दारूंचा पुरवठा सुरू आहे. ग्रामीण व शहरी भागांतील युवक दारूपायी नैतिक अधःपतनाकडे झुकत असून, कुटुंबीयांवर मानसिक आणि आर्थिक ओझं वाढत आहे.
दुग्ध व्यवसायातील भेसळ :-दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुरू असलेल्या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. केवळ पाण्याची भेसळच नव्हे तर रासायनिक पदार्थ मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
वन विभागाच्या हद्दीत अवैधरित्या लाकूड, आणि खनिज उत्खनन चालते. यामध्ये विभागातील काही अधिकाऱ्यांची कथित संलिप्तता असल्याचे पुरावे हाती येत आहेत.
जिलेटिन कांड्यांचा धोकादायक व्यापार :
जिलेटिनच्या नावाखाली सुरू असलेला स्फोटक पदार्थांचा व्यवसाय समाजासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागात अशीच भ्रष्टकामकाजाची व कारभाराची परिस्थिती आहे भ्रष्टाचाराशिवाय कामे होत नसल्याचे चित्र सामान्य बनले आहे.
वरील सगळ्या पार्श्वभूमीवर समाजात लोकजागृती निर्माण करून प्रशासनासमोर पुराव्यांसह ठोस भूमिका मांडण्यासाठी पत्रकार संदीप दामोदर महाजन .
यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकार एकत्र आले आहेत.याच अनुषंगाने सर्व संबंधित विभागांतील भ्रष्टाचाराची व अवैध धंद्यांची तंतोतंत माहिती, कागदपत्रे, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष साक्षीपुरावे गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. हे सर्व पुरावे जमा झाल्या नंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित खात्यांना निवेदनाच्या माध्यमातून थेट भेटुन सादर करण्यात येणार आहेत
जर निवेदनानंतर प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर पत्रकारांनी जनतेसोबत विविध मार्गांनी व माध्यमांतून मोहिम राबवली जाणार आहे तरी पत्रकार बांधव व नागरीकांकडे जर अशा कोणत्याही अवैध धंद्यांविषयी माहिती, कागदपत्रे किंवा पुरावे असतील, तर ती तत्काळ पत्रकार संदीप महाजन यांच्याकडे देण्यात यावी हि विनंती
संपर्क : 7385108510
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.